वंशवेल -३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वंशवेल -३ |
वंशवेल ३
पुरुषोत्तम सासरी जाण्याचा विचार करत होता ; तेवढ्यात
ती स्वतःच येऊन थडकली. पुरुषोत्तम ने सुध्दा काही एक प्रश्न न करता घेतलं. परंतु कांताबाईला मात्र प्रश्न पडला की
आपल्या नवऱ्या ने जर असे विचारले की शेवटी आलीसच
नाक मुठीत घेऊन तर काय उत्तर द्यायचं वगैरे ? असा विचार
करत होती. परंतु तिला योग्य कारण सुचत नव्हतं. पण
पुरुषोत्तम तिला काही बोललाच नाही. तसा तिची धीर वाढला. आणि स्वतःहूनच म्हणाली ," मी स्वतः आली जास्त
भाऊ नका. खरं म्हटलं तर मी येणारच नव्हती. परंतु आईच
म्हणाली , जाऊ दे. पहिला अपराध समजून माफ कर."
तसा पुरुषोत्तम उद्गारला ," हो , तुला काय स्वतःला हिटलर
समजते. मनात येईल तसे वागायला ?"
" हो, हिटलरच आहे मी !"
" परंतु इथं हिटलरचे इथं कामच नाहीये. त्याने जर्मनीत
जायला हवं."
" पुरे झाला हां हा फाजीलपणा . ऐकून घेते याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही पण बोलाल."
" त्यात फाजिलपणा कसला ? खरं आहे ते सांगितले."
" पुरे पुरे ! एवढं हिंनवायचं कारण नाही काही !"
" मी कुठं हिनवतोय तूच विषय काढलास ! "
" बरं बरं ! चुकलं आमचं !"
" आता कशी एकदम रितीचं बोलली."
" आता तुम्ही असं बोलणारच हो, मी स्वतःहून आली म्हटल्यावर तुमची मिजास वाढणारच ! माहितेय मला."
" माहीत आहे तर उगाच वाद कशाला घालतेस. मी गप्प
होतो ना,मग तू पण गप्पच राहायचं."
" कळलं कळलं तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते."
" इथं प्रेमाचा आणि भांडणाचा काय संबंध ?"
त्यावर कांताबाई समजून गेली की आता गप्प बसण्यातच
शहाणपण आहे, परंतु याचा वचपा आपण काढू कधीतरी !"
त्या दिवसापासून सर्वकाही सुरळीत सुरू होते. म्हणजे
पुरुषोत्तम चे पहिल्या बायको कडे जाणे सुरूच होते. कारण
त्यांचे आपल्या पत्नीवर फार प्रेम तर होतेच शिवाय प्रतीक्षा
त्यांची लाडकी लेक होती. प्रतीक्षा साठी तर त्याना तेथे जाणे
भागच होते. कारण प्रतीक्षा त्यांची आतुरतेने वाट पाहत राहायची. पुरुषोत्तम ना घरी यायला जरा देखील उशीर झाला
तर ती आपल्या आईला विचारत असे, " मम्मी पप्पा ,अजून
आले नाहीत. फोन करून विचार ना गं अजून का नाही आलेत ?" तेव्हा मिराबाई ने त्याना सांगून ठेवले होते की
भले माझ्या साठी येऊ नका इथं परंतु आपल्या लाडक्या
लेकी साठी इथं येऊन जा, नाहीतर जेवणार सुद्धा नाही.सारखी विचारत राहते पप्पा अजून का नाही ते आधी
सांगा." त्यामुळे सकाळ संध्याकाळ पुरुषोत्तम तिला भेटायला
जावेच लागे. आणि कांताबाई मुळात तेच आवडत नव्हते.
म्हणून तिची इच्छा होती की आपल्याला पहिला मुलगाच व्हावा. म्हणजे ह्यांचे आपल्या सवती कडे येणे जाणे आपोआपच बंद होईल , परंतु त्यासाठी आई होणे महत्त्वाचे
होते. मुख्य तेच होत नव्हते. म्हणजे गर्भवती होत नव्हती
अशातला भाग नव्हता. तिला दिवस जायचे परंतु मुलं जगत
नव्हती. जसे मोठीच्या बाबतीत घडत होते अगदी तिच्या
बाबतीत ही घडू लागले. डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी
पण करून घेतली. रिपोर्ट सर्व नॉर्मल यायचे. मग नेमकी
माशी कुठं शिंकत होती तेच कळत नव्हतं. परंतु मोठीला
अर्थात मिराबाई ला ठाऊक होते की असे का घडत आहे, परंतु ती कुणाला काही बोलली नाही मात्र आपल्या नवऱ्या ला म्हणाली ," पाहिलंत शेवटी झालं ना माझं खरं ! मी
हजार वेळा सांगत होती की आपल्या नशिबात आला मूल
नाहीये. लग्न करू नका. पण तुम्ही माझं ऐकलं नाही. शेवटी
काय झालं पाहताय ना ?" परंतु पुरुषोत्तम ते मान्य करायला
नव्हता. त्याचे म्हणणे होते की ही अंधश्रद्धा आहे, परंतु सर्व
गोष्टीना अंधश्रद्धे मध्ये तोलने योग्य नव्हे ना ? का कुणास
ठाऊक त्याला वाटत होते की आपल्याला मूल होईल.परंतु
नाही झाले. शेवटी आपल्या नशिबात नाहीये याची त्यांना
पक्की खात्री पटली. परंतु धाकटीची अर्थात कांताबाई ची
स्वप्ने मात्र फार उद्ध्वस्त झाली. म्हणजे तिची अशी इच्छा
होती की जर आपल्याला प्रथम पुत्र झाला तर आपण आपल्या नवऱ्याला आपलासा करू ! अशी मनापासून फार
इच्छा होती. परंतु ती पूर्णत्वास नाही, याचे तिला अफार दुःख
झाले. त्यातच तिला कुणाकडून तरी कळले की तुझ्या नवऱ्याला ज्योतिषाने सांगितले होते की तुमच्या नशिबात
जेवढी मुलं होती तेवढी झाली. आता तुम्हाला मुलं होणार
आणि झाली तरी जगणार नाहीत. असे सांगितले असतानाही
तुझ्या नवऱ्याने तुझ्याशी लग्न केले. अर्थात तुझ्या नवऱ्यानेच
तुझ्या जीवनाचे फार वाटोळे केले. इतकं समजलं मग काय
ती गप्प बसण्यातली थोडीच होती. ती नेहमी म्हणायची की
तुम्ही माझ्या आयुष्याचे वाटोळे केलं. जर तुम्हाला माहीत
होते की ,तुम्हाला मुलं होणार नाहीत तर का केलं तुम्ही
माझ्याशी लग्न ? " त्यावर बिच्चारा पुरुषोत्तम काय बोलणार
कारण ती जे काय बोलत होती ते चुकीचे पण तर नव्हतं.
परंतु आता तिने एका वेगळ्याच गोष्टीचा हट्ट धरला,
ती त्याला म्हणू लागली की , मला मूल देण्याची तुमच्यात
क्षमता नाही ना , मग मला दत्तक मूल घेऊन द्या." पुरुषोत्तम ला ते अजिबात मान्य नव्हते. त्याचे म्हणणे होते की माझ्या
प्रॉपर्टी फक्त नि फक्त माझ्या मुलींचाच अधिकार आहे, त्यात
मी दुसऱ्या कुणाला मी करणार नाही. शिवाय माझा एक मुलगा ही आहेच ना ? भले तो कुठं आहे तो माहीत नाही.
परंतु तो कुठं ना कुठं जिवंत असणार. कारण त्याची बॉडी
पोलिसांना मिळाली नाही. याचा अर्थ तो जिवंत असण्याची
शक्यता आहे. असे त्याला नेहमी वाटायचे म्हणूनच काय तो
दत्तक पुत्र घेण्यास टाळा टाळ करत असे.
दिवसामागून दिवस जात होते. परंतु पुरुषोत्तम दत्तक
पुत्र घेण्यास तयार नव्हते. आता तर त्याने एक वेगळेच कारण सांगितले की, प्रतीक्षा चे लग्न होत नाही तोपर्यंत
दत्तक पुत्राचे नाव काढायाचे नाही. अशी तंबी देऊन ठेवली.
पुरुषोत्तम दोघींनाही सारखीच वागणूक देत होते कुणाला
काही कमी करत नव्हते. दोघीना पण पूर्ण महिन्याचे घरात
लागणारा किराणा माल स्वता आणून देत होते. आणि स्वतः
सुद्धा कधी मोठी कडे तर कधी धाकटी कडे जेवत असत.
मोठीचा स्वभाव चांगला असल्याने ती कधीही विरोध करत
नव्हती. धाकटीचा स्वभाव जरा कुजकट असल्याने ती नेहमी
मोठीवर जळत राही. नवऱ्या ला तिच्या बद्दल काही ना काही
सांगत असे. पण पुरुषोत्तमाना मोठीचा स्वभाव चांगलाच
माहीत असल्याने ते छोटीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत
असे.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा