रोबोट -१३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रोबोट -१३ |
त्यानंतर कोर्टात खटला दाखल करणयात आला आणि
आरोपीला अपराधी पिंजऱ्यात उभे करण्यात आले. तेव्हा साबाजी ने गब्बरच्या विरोधात साक्ष दिली. तेव्हा गब्बर चिडून बोलला," अरे ,सांबा का खोटं बोलतो आहेस तू ?"
त्यावर साबाजी म्हणाला," मी सांबा नाहीतर डॉ. विश्वजितचा असिस्टंट जॉन आहे." असे बोलून तो आपल्या चेहऱ्यावरील नकली मुखवटा काढला तर खरोखरच नकली चेहऱ्याच्या आंत असली चेहरा जॉनचा होता." ते पाहून गब्बर ओरडून म्हणाला," तू जॉन आहेस तर माझा भाऊ कुठे आहे ?" तेवढ्यात पो. इन्स्पेक्टर राणे एका कैदी ला कोर्टात हजर करत म्हणाले , " न्यायमूर्ती महाराज हा बघा साबाजी उर्फ सांबा ." सर्वांच्या नजरा इन्स्पेक्टर राणेकडे वळतात." गब्बर त्याला विचारले की, तू कुठं होतास ? " तेव्हा पो. इन्स्पेक्टर राणे उत्तर देणार असतात. पण न्यायमूर्ती महाशय त्याना व्हीटनेस बॉक्स मध्ये येऊन बोलायला सांगतात. तेव्हा पो. इन्स्पेक्टर विरेंद्र राणे व्हिटनेस बॉक्स मध्ये येऊन सांगितले की, ह्याला बॉडीलेसने माझ्या स्वाधीन केले नि सांगितले की हा गब्बरचा लहान भाऊ साबाजी आहे, ह्याला असा एका गुप्त स्थनावर नेऊन ठेवा की याची खबर पोलिसांना सुध्दा लागता कामा नये. योग्य वेळी त्याचा खुलासा आम्ही करू आणि त्याप्रमाणे मी ह्याला एका गुप्तस्थळी नेऊन ठेवले होते ." त्यावर सरकारी वकिलाने विचारले," याचा अर्थ बॉडीलेस तुम्हांला येऊन भेटत होता. होय ना ?" पो. इन्स्पेक्टर विरेंद्र राणे बोलले," म्हणजे भेटत नव्हता. "
" पण पुढे घडणाऱ्या गोष्टी विषयी माहिती देत होता."
" हो ."
" आणि तरी तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल काही सांगितले नाही. होय ना ?"
" हो !"
" का नाही सांगितलेत ?"
" कारण बॉडीलेसने गुप्तता पाळायला सांगितली होती."
" मिस्टर राणे तुम्ही नोकरी कुणाची करता ? बॉडीलेसची
का सरकारची ?"
" सरकारची ! "
" मग हे तुमचं कर्तव्य नव्हते का ? आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्या ना सांगायचं ?"
" हो. पण तसं केलं असतं तर आज भारतात बॉम्बस्फोट घडवून आणाण्यासाठी पाकिस्तानातून आलेले दहशतवादी पकडले गेले नसते. आणि लाखोंच्या संख्येने जे लोक मृत्यूमुखी पडले असते ते वाचले नसते."
" म्हणजे त्याची खबर सुध्दा तुम्हांला बॉडीलेस ने दिली असं म्हणायचं आहे का तुम्हांला ?"
" होय. बँकेत दरोडा पडणार आहे याची खबर सुध्दा बॉडीलेस दिली होती आम्हांला. म्हणून आम्ही बँकेत दरोडा
पडण्याच्या अगोदर तेथे पोहोचलो नि सर्व दरोडेखोराना आम्ही रंगे हात पकडले."
" चला मानलं की तुम्हांला बॉडीलेस खबर दिली ,म्हणून तुम्ही ती खबर इतरांना म्हणजे त्या त्या शहरातल्या पोलिसांना दिली . बरोबर बोलतोय ना मी ?" वकील ने विचारले.
" हो . अगदी बरोबर . "
" मग त्यांनी ठेवलेले बॉम्ब कुठे आणि कसे गायब झाले
नि तेच बॉम्ब पाकिस्तानच्या मुख्य शहरात कसे काय फुटले यावर काही प्रकाश टाकू शकाल का ?"
" ती सर्व करामत बॉडीलेसची आहे."
" मिस्टर राणे तुम्ही तर मघाशी म्हणालात की , बॉडीलेस
तुमच्या सोबत तो बँकेत हजर होता म्हणून तर तो त्याच वेळी पाकिस्तानात कसा असू शकतो ? म्हणजे एकाच वेळी तो दोन ठिकाणी कसा काय असू शकतो ? " त्यावर पो. इन्स्पेक्टर राणे निरुत्तर झाले. तसा सरकारी वकील बोलला,
" मिस्टर राणे असं गप्प राहून चालणार नाही. तुम्हांला या प्रश्नांचे उत्तर द्यावेच लागेल ." पण पो. विरेंद्र राणे एकदम गप्पच झालं . पण सरकारी वकील कुठं गप्प राहणार होते त्यांनी ही गोष्ट उचलून धरली. तेव्हा न्यासमूती महाशय म्हणाले,
" मिस्टर राणे तुम्हांला या प्रश्नांचे उत्तर धावेच लागेल."
" ते मला माहित नाही न्यायमूर्ती महाशय."
" तुम्हांला नाहीतर दुसऱ्या कुणाला माहीत आहे ?"
" मला माहित आहे , सर !" जॉन बोलला.
" तुम्हाला जे काय सांगावयाचे आहे , ते साक्षी पिंजऱ्यात येऊन सागा." तसे पो. इन्स्पेक्टर राणे साक्षी
पिंजऱ्यातून बाहेर पडले नि त्यांच्या जाग्यावर जॉन जाऊन
उभा राहिला. बायबल हात ठेवून त्याच्याकडून शपथ घ्यायला लावली आणि मग साक्षी पुराव्याला सुरुवात झाली.
" हां तर मि. जॉन तुम्हांला काय माहीत आहे , बॉडीलेस
बद्दल ?"
" सर्वकाही !"
" सर्वकाही म्हणजे ?"
" म्हणजे असे की , बँकेत जो बॉडीलेस बनून गेला होता , तो दुसरा कुणी नसून मी होतो."
" तुला बॉडीलेस सारखे गायब होता येते ?"
" हो !"
" मग दाखव बरं गायब होऊन."
जॉन ने लगेच चिप आणि ड्रिल मशीन काढली नि आपल्या मनगटावर दाबली तर खरोखरच जॉन गायब
झाला. तसे न्यायाधीश महाशय बोलले," मि. जॉन पुन्हा वास्तविक या बरं." तेव्हा बब्बर बोलला," अहो,साहेब आता कसला येतोय तो समोर गेला असेल पळून." त्याच क्षणी
पुन्हा प्रगट होत जॉन म्हणाला ," पळून जायला तो काय गब्बर नाहीये आणि पळून जायचं असतं तर इथंपर्यंत आलोच नसतो मी. आम्हाला डॉक्टरानी भ्याडपणा नाही शिकविला." तसा बब्बर बोलला," मग मला सांग. तू जर बँकेत होतास तर बॉडीलेस कुठं होता ?" तेव्हा न्यायमूर्ती
गब्बरला ताकीद देत म्हणाले ," मि. गब्बर,प्रश्न विचारण्याचे
काम वकिलांचे आहे, तुमचे नाहीये. कळलं."
" माफ करा न्यायमूर्ती महाशय पण प्रश्नाचे उत्तरअद्याप
नाही मिळालं आहे की, जर ह्याला माझ्या भावाच्या ठिकाणी
अपॉइंट केले तर बॉडीलेस ने डॉ. विश्वजित ची तेथून सुटका
का नाही केली." सरकारी वकिलाच्या ती गोष्ट लक्षात आली
तशी सरकारी वकिलाने नेमका तोच पश्न विचारला. तेव्हा
जॉन बोलला," डॉ. विश्वजित ना सुध्दा अशाच गुप्त आणि सुरक्षित स्थानाची आवश्यकता होती. त्याना कुणीही
डिस्टर्ब नको करायला म्हणून."
" पण माझ्या माहितीनुसार डॉ. विश्वजित चा स्मृतिभ्रश
झाला होता म्हणुन ते बॉडीलेसचा पुनर्निर्माण करू शकले
नाही आणि खरे सांगायचे तर त्याच साठी तर मी त्याना माझ्या अड्यावर बंदीस्त करून ठेवले होते." मध्ये बोलण्याची
परवानगी नसतानाही गब्बर मध्ये बोललाच. पण त्याने काय झाले , नकळत का होईना ,कोर्टाला हवी असलेली माहिती मिळाली. म्हणजे डॉ. विश्वजितचे अपहरण करण्या मागचे रहस्य कळाले.
" खोटे आहे ते साहेब." जॉन उत्तरला," डॉ. विश्वजित यांचा स्मृतिभ्रश झालाच नव्हता. ते फक्त तसे नाटक करत होते."
" पण का नाटक करत होते ?" न्यायमूर्ती नि विचारले.
" कारण त्याना बॉडीलेसला पुनर्जीवित नव्हते करायचे
आणि हा गब्बर त्यांच्या पाठीच लागला होता. म्हणून त्यांनी
स्मृतिभ्रश झालेचे नाटक केले नि आम्हां दोघांना त्यांनी आपल्या कडे बोलवून घेतले."
" तुम्हां दोघांना म्हणजे कुणा कुणाला ?" न्यायाधीश महाशय ने विचारले.
" मला आणि सलीम ला."
" त्यावेळी तुम्ही दोघे कुठे होते ? म्हणजे सिंगापूरला होता
का आणखीन कुठे ?"
" डॉक्टरांचा विमानात अपघातात मृत्यू झाला ,हे ऐकून आम्ही दोघे फार घाबरलो नि सिंगापूर सोडून आपल्या गावाला जाऊन राहू लागलो. परंतु काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी आमच्या मोबाईलवर मॅसेज पाठविला की तुम्ही दोघे मुंबईला या म्हणून. आम्हाला तर डॉक्टर जिवंत आहे हे एकूणच अत्यानंद झाला. मग आम्ही मुंबईला आलो नि पुन्हा त्याना ईमेल केला की आम्ही मुंबईला आलो आहोत , तेव्हा त्यांनी पुन्हा आम्हांला ईमेल करून इथला पत्ता दिला नि सांगितले. इथं आल्यानंतर कुणालाही काही न विचारता माझ्याशी संपर्क साधा. मग मी तुम्हांला एका गुप्त स्थानावर
घेऊन जाईन. बस्स आम्ही जसे गब्बरच्या बंगल्याजवळ आलो तसा डॉक्टराना फोन केला. तेव्हा तेथे आले आणि आम्हां दोघांना गब्बरच्या त्या गुप्त स्थानावर म्हणजेच बंगल्याच्या खाली तळघर आहे तेथे घेऊन गेले. त्यानंतर साबाजी च्या जागी मला अपॉइंट केले त्याच्या चेहऱ्यावचे मास्क लावून आणि स्वतःच्या जाग्यावर सलीमला अपॉइंट केले. स्वतःच्या चेहऱ्याचे मास्क त्याच्या चेहऱ्यावर लाविले.
त्यानंतर साबाजीला पो. इन्स्पेक्टर च्या स्वाधीन करून त्याला एका गुप्त स्थानावर ठेवायला सांगितले आणि त्यानंतर डॉ. विश्वजितनी एका नवीन स्वाप्टस्वेअरची निर्मिती
करायला सुरुवात केली होती. त्या स्वाप्टस्वेअर चे नाव आहे रिपोर्टर !"
हे ऐकत क्षणी गब्बर उद्गारला ," इतना बड़ा धोका !"
" धोकेबाज़ के साथ धोका करना ही उचित होता है इसलिए तुम हमेशा धोके में रहें और डॉ. विश्वजितजी ने देश के दुश्मनो एक एक करके भगवान के पास भेजते रहें ।"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा