रोबोट -११
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रोबोट -११ |
" काय झाले , कुणाचा आहे फोन ?"
" जफर खांनचा ?"
" मग बोल ना, त्याच्याशी ! फोन कट का करतोयस ?"
" पण काय बोलू ?"
" आधी फोन कशासाठी केलाय ते तर विचार."
होकारार्थी मान डोलवून फोन रिसिव्ह केला आणि
म्हटले , " हँलो sss ?
" हँलो के बच्चे सुनाई नहीं देता है क्या ? कब से फोन कर रहा हूं ?"
" क्यों कर रहे हो फोन ?"
" झक मारने के लिए साला बेवखुप कहिका ।"
" जफर भाय जुबान संभालकर बात करो।"
" सुन ."
" हाँ कहो ।"
" जितना जल्दी हो सके उतना जल्दी चले आना ।"
" क्यों ? और किस लिए ?"
" वो सब यहाँ आने के बाद बता दूँगा ।"
" कुछ धोका तो नहीं करोगे ना, हमारे साथ ?"
" अगर इतना डर लग रहा हैं, बॉडीलेस बन के आ जा ।"
" कोई जरूरी काम है क्या ?"
" अगर जरूरी काम न होता तो तुम्हें बुलाता क्या मैं ?"
" ठीक है ,आता हूँ ." असे बोलून फोन कट केला नि
डॉ. विश्वजित कडे पाहत बोलला," काय करू डॉक्टर ? जाऊन येऊ का ?' " त्यावर डॉ .विश्वजित बोलले ," हां जाऊन ये ना काहीतरी महत्वाचे काम असेल त्याचे. त्या शिवाय तो असा बोलणार नाही तुला ."
" काही दगा फटका तर नाही करणार ना माझ्याबरोबर ?"
" एवढी भीती जर वाटते त्याची तुला तर बॉडीलेस बनून जा ."
" तो सुद्धा असंच म्हणाला."
" हो ना , मग काही काळजी करण्याचे कारण नाही.
आणि तसं पण कुणाला माहीत नाही की, बब्बर ही तूच आहेस नि गब्बर ही ......"
" खरं सांगायचं तर सिंगापूरहुन मी इथं यासाठी आलो होतो की , मला माझ्या भावाच्या खुनाचा बदला घेता यावा म्हणून."
" हां पण तुझ्या भावाला मारलं कुणी तर इन्स्पेक्टर श्रीकांत ने आणि त्या इन्स्पेक्टरला बॉडीलेस ने ठार मारले.
मग झाला ना बदला पुरा."
" हो ; बरोबर आहे. पण ....?
" पण काय ? "
" ज्याच्या मुळे मारले गेले , तो जफर खान आणि त्याचा भाऊ पाशा खान अद्याप जिवंत आहेत. त्यांना संपविण्यासाठी खरे तर मी इथं आलोय."
" पण इथं येऊन काय केलंस तर त्यांचीच मदत करून पोलिसांचा वैरी मात्र झालास."
" तसं नसते केले तर त्यांचा विश्वास बसला नसता माझ्यावर. तो किती चलाख माणूस आहे हे माहीत आहे ना तुला ?"
" पण आता काय करणार तू ?"
" काय करू तेच कळणासं झालंय. ह्या बॉडीलेस ने माझं सारं प्लॅन उद्ध्वस्त करून टाकले. जर पहिलावाला बॉडीलेस तू तयार केला असता तर त्या बॉडीलेसच्या मदतीने मी ह्या सर्वाना धडा शिकविणार होतो . परंतु तुझा स्मृतिभ्रश झाला नसता आणि तू सर्व विसरला नसतास तर माझे सारं प्लॅन फसल नसतेे. शिवाय तुझे ते असिस्टंट कुठे गायब झालेत ते ही कळत नाहीये. ते जरी सापडले असते तरी माझे सोपे
झाले असते."
" ते कसे बुवा ?"
" त्यांनी तुला मदत केली असती. म्हणजे बॉडीलेसला एकदा बनविले असतेस तर आपली सर्व कामे यु चुटकी सरसी झाली असती. पण त्या दोघांचा काही त्यांग पत्याच
लागत नाहीये. कुठल्या बिळात लपून बसले आहेत ते देवच
जाणे ."
" बरं ते जाऊ दे. त्याला आधी भेटून ये. मग पाहू काय करायचे ते." मग त्याने लगेच पाय वर उचलला आणि
पायात घातलेल्या शूज मध्ये एक छोटा सा कप्पा होता त्यात
ड्रिल मशीन लपविलेली होती ती बाहेर काढली नि त्या ड्रिल मशीन ने चिप आपल्या मनगटात टाकली आणि अदृश्य झाला आणि थोड्याच वेळात जफर खानच्या अड्यावर पोहोचला. जफर खान त्याची वाटच पाहत होता. आंत प्रवेश
करताच बब्बर बोलला," बोलो जफर भाय क्यों बुलाया मुझे ?"
" अरे अरे इतना भी क्या गुस्सा ? हमने ऐसा किया क्या हैं ?"
" वो सब छोड़ो बुलाया किसलिए ? वो बोलो."
" भूल गए कल क्या बताया था ?"
" अच्छा वो आतंकवादी जो आने वाले हैं।
" हां ध्यान देऊन ऐक." असे म्हणून त्याने पुढे सांगायला
सुरुवात केली. मागच्या वेळी पण बॉडीलेस मुळे त्यांचे प्लॅन फसले होते. त्याचा राग तर आहेच परंतु काही दिवसांपूर्वी
मुंबईतच्या समुद्र किनाऱ्यावर घडलेली घटना अर्थात पाच दहशतवादी मारले गेले त्यात बॉडीलेसचा हात असल्याची
शक्यता वर्तविली जातेय. तेव्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये
म्हणून एक नवीन प्लॅन बनविले आहे. ते प्लॅन असे आहे की,
माझ्या काही माणसा सोबत तू बँकेवर दरोडा टाकायचा."
" आणि बॉडीलेस तेथे येणार नाही असं वाटतं का तुला ?"
" तो तिथं यावा हीच तर आमची योजना आहे."
" मी समजलो नाही तुला नेमके काय करायचे आहे ते ?"
" तेच तर सांगतोय. पण तू ऐकून घेशील तर ना ?"
" बरं . सांग, ऐकतो."
" तू त्याला तिथं गुंतवून ठेवलास की दुसरीकडे दहशतवाद्या बरोबर माझी माणसं , भारतातील मुख्य चार
शहरात बॉम्ब ठेवण्यात यशस्वी होतील. उद्या चा दिवस
भारत वाशियांसाठी काळ रात्र ठरेल. त्यानंतर आपण सर्वजण पाकिस्तान मध्ये पळून जाऊ म्हणजे भारतातील
पोलीस आपले काहीच वाकडं करू शकत नाही. कळलं."
" दहशतवादी आलेत का ?
" हो आलेत ."
" कधी ? "
" ज्या दिवशी तू बँक लुटण्याचा प्रयत्न करत होतास ना, त्या दिवशीच आलेत आणि खरं सांगायचं तर ते एक प्लॅन
होते . बॉडीलेसला तेथे गुंतवून ठेवायचं त्या प्रमाणे आम्ही ते यशव्ही करून दाखविले."
" म्हणजे बँकेवरचा दरोडा हे एक प्लॅन होते ?"
" येस मेरे दोस्त और उसमे हम कामयाब भी हो गये ।"
" मग माझ्या पासून का लपवून ठेवलेस ?"
" ते यासाठी बॉडीलेस तुझ्या आसपास असतो ना , त्यामुळे त्याला कळले असते. म्हणुन ही खबरदारी घेण्यात आली."
" मग आता का नाही खबरदारी घेतली गेली ?"
" आता तर आम्हालाच वाटतंय की ही खबर त्याच्या पर्यंत
पोहोचावी. " तेव्हा बब्बरने न समजून विचारले," तुला काय वाटतं बॉडीलेस गप्प बसेल ?" त्यावर जफर खान बोलला,
" हम भी यही चाहते हैं कि वह अपने देशवासियों को बचाने की कोशिश करे मगर वो वहां कभी भी नहीं पहुंच पायेगा उसका हम इंतजाम कर चुके है।"
" देखो जफर भाय वो बॉडीलेस कब क्या करेगा कुछ पता नही होता है।"
" अरे तुम खामख्वाह डर रहे हो , ऐसा कुछ भी नही होने,
वाला है मेरी राय मानो और जैसा मैंने कहा है ठीक वैसे ही
करो बस्स !" तसा बब्बर आपल्या मनात बोलला ," मै भी तो यही चाहता हूं की तेरी मौत बॉडीलेस हाथो से हो ताकी मेरा बदला पुरा हो सके ।" असे मनात बोलून उघडपणे बोलला,
" ठीक है तो मैं चलु ?"
" बेशक ! लेकींन जो काम करणे के लिए कहा है ,ठीक वैसे ही होना चाहिए ।"
" हो जायेगा चिंता की कोई बात नहीं ।" असे म्हणून तो
तेथून निघून गेला. तो थेट आपल्या गुप्त स्थानावर पोहोचला.
तेव्हा डॉ. विश्वजित ने विचारले ," मग काय म्हणतोय जफर
खान ? " त्यावर बब्बर ने जफर खानची पूर्ण योजना ऐकविली. ते ऐकल्यानंतर डॉ. विश्वजित म्हणाला," म्हणजे
मागच्या वेळी जे साध्य करता आले नाही ते या वेळी साद्य करण्याचा मनसुबा आहे तर त्याचा. मग तू काय काढलेस
तोडगा याच्यावर ?"
" मी काय काढणार याच्यावर तोडगे ?"
" म्हणजे काय ? आपल्या देशात दहशतवादी बॉम्ब स्फोट
घडवून आणणार आहेत हे माहीत पडल्यावरही गप्प बसायचं
का आपण ?"
" त्याला आपण काय करू शकतो ? नाही म्हणजे गप्प बसण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय आहे का आपल्या जवळ ? नाही ना ?"
" नाही कसा ? शोधा म्हणजे सापडेल असे म्हटले आहे ना , ते काय उगाच ? "
" नाही पण आपण काय उपाय करू शकतो ?"
" आपण पोलिसांना माहिती देऊन त्यांची उचल बांगडी करू शकतो. अर्थात जफर खानला ही पकडून देऊ शकतो."
" अजिबात नाही. मागच्या वेळी तो वाचला होता. पण
यावेळी तो अजिबात वाचता कामा नये."
" कोण मारील त्याला ?"
" त्याला दुसरा कुणी मारायला नकोय बॉडीलेसच मारेल."
" अर्थात तू ."
" मी नाही."
" मग ?"
" खरा बॉडीलेस."
" तुला एकदम खात्री आहे बॉडीलेसच मारील याची ?"
" हो . मागच्या वेळी जर पोलिसांनी त्याला रोखले नसते तर तेव्हाच गेला असता तो ढगात ."
" पण त्या वेळचा बॉडीलेस वेगळा होता नि आताचा वेगळा आहे. तेव्हा आताच बॉडीलेस त्याला मारील किंवा नाही हे कुणास माहीत आहे ?" डॉ . विश्वजित उद्गारले.
" हूं ssमग काय करायचं म्हणता ?"
" मला वाटतं पोलिसांच्या ताब्यात देऊ."
" मग एके दिवशी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून
जाईल. झालं. "
" असं का वाटतं तुला ?"
" मागच्या वेळी पण तर असंच झालं."
" झाले नाही . ते तू करविलेस नाहीतर सडला असता जेल
मध्येच अजूनपर्यंत." त्यावर बब्बर निरुत्तर झाला. पण
मनात बोलला, मी मदत केली म्हणजे काय ? मला अगोदर
वाटले की माझ्या भावाला पोलिसांनी ठार मारले. म्हणून पोलिसांवर सुड उगविण्याच्या हेतूने मी जफर खान आणि त्याच्या साथीदारांना तुरूंगातून बाहेर काढले. परंतु नंतर कळाले की इन्स्पेक्टर श्रीकांत ने जफर खानच्या आदेशा वरून मारले गेले त्याला. पण अगोदर माहीत नव्हते ना नेमके कुणी मारले ते माझ्या भावाला. नाहीतर मी त्या दोघांना तुरुंगातच संपविले असते. पण काही हरकत नाही. आता माहीत पडले मला. तेव्हा त्याला नि त्याच्या पूर्ण गँगला संपविणार मी , हे निश्चत आहे. असा विचार करून तेथून चालता झाला.
दुसऱ्या दिवशी ज्या बँकेत दरोडा पडणार होता त्या बँकेत पोलीस कसे अगदी वेळे वरच हजर कसे झाले ठाऊक ? पोलिसांनी बँकेला घेरले नि जफर खान च्या सर्व साथीदारांना अटक केली. मात्र दोन बॉडीलेस मध्ये सुरू असलेले तुंबळ युद्ध म्हणजे शाब्दिक एकमेकांवर चिखल फेक सुरू होती . ते पाहत पोलीस उभे राहिले. बॉडीलेस न २ चे म्हणणे होते की माणसाने एकदा ठोकर खाली की त्याला शहान पण येते . पण त्या दिवशी एवढा मार खाल्ला तरी पुन्हा आलास मार खायला. " त्यावर तोतया बॉडीलेस बोलला की , नाही. आज मी तुझ्याशी मारामारी करायला नाही आलो . आज मी एका वेगळ्याच कामासाठी आलोय."
" मला माहितेय ते तुझं वेगळं काम ?"
" हो का ? मग सांग बरं."
" तुला आज बँकेत दरोडा नव्हता घालायचा तर मला इथं
रोखून ठेवायचे काम होते , बरोबर ? "
" अगदी बरोबर."
" तुला काय वाटलं मला इथं रोखलेस म्हणजे ? दहशतवादी आपले काम चोख करतील. असेच ना ?"
" हो !"
" चुकीची समजूत आहे तुझी ! बॉम्ब आपल्या वेळेनुसारच फुटणार पण त्याची जागा वेगळी असेल."
" म्हणजे ?"
" ते उद्याच्या वर्तमानपत्राच वाच."
" म्हणजे काय केलेस तू ?"
" भविष्यात काय घडणार आहे हे अगोदर देव सांगतो का
कुणाला ? नाही ना ? मग मी कसं सांगणार ? आणि मी काहीच केलेलेे नाही. कारण मी तुझ्या समोरच उभा आहे."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा