रोबोट- ९
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रोबोट- ९ |
अगोदर रेणू निघून गेली नि आता बॉडीलेस ही धमकी देऊन निघून गेला. पण मला एक गोष्ट कळत नाही की , बॉडीलेस म्हणून हा जो कुणी आहे त्याला मी दिसतो पण तो मला का दिसत नाहीये हे कसं काय बुवा ? खरंच का पासवर्ड असतो का , प्रत्येक स्वाप्टस्वेअर ला ? असेल ही ! पण माझा पासवर्ड मला माहित नाही परंतु त्याला माहित आहे , हे कसं काय बुवा ? याचं खरं उत्तर जर कुणी देऊ शकेल तर आहे डॉ. विश्वजित कोल्हे , त्यांनाच विचारायला हवं .हो असंच करतो. आज आपल्याला आपला पासवर्ड माहीत नसल्याने आपली फजेती झाली. पण हरकत नाही. पुन्हा नाही होणार अशी चूक. असा विचार करून आपल्या गुप्त स्थानी ज्यायला निघाला.
मंदिरातुन रेणू तेथून घरी जायला निघाली खरी. परंतु मनात अनेक विचारांचे काहूर मांजले होते. त्यातील काही प्रश्न असे होते की, खरंच का ह्या भामट्या बॉडीलेस ने अनेक तरुणींना फसविले. आपल्याला तर वाटलं की हा फक्त नि फक्त आपल्यावरच प्रेम करतोय. परंतु ती आपली खोटी समजूत होती. तरी बरं तो खऱ्या बॉडीलेसने त्याचे भांडे फोडले म्हणून बरे झाले. नाहीतर त्या भामट्याने अजून किती दिवस आपल्याला अंधारात ठेवले असते ते कोण जाणे. पण गोष्ट मला कळत नाहीये की तो जर मनुष्य आहे तर तो
बॉडीलेस सारखा गायब कसा होऊ शकतो ? काय खरं नि काय खोटं , हे आता त्या बॉडीलेस ने त्यांचा घरचा पता दिला आणि मोबाईल नंबर सुध्दा आहे त्या मोबाईल नंबर वरून त्या मुलींशी संपर्क करून खरी माहिती काढू. असा विचार करत करत ती आपल्या घरी पोहोचली.
घरी येऊन पाहते तर काय तिची आई ने आरडाओरडा
करून आपल्या शेजाऱ्या -पाजाऱ्या लोकांना गोळा केले. नि त्याना विनवणी करू लागल्या की, अहो,भाऊ बघा हो जरा , माझ्या मुलीला त्या समंध भुताने पळविले ? तिला वाचवा रे कुणीतरी ! पण भुताच्या भानगडीत कोण पडणार ? म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची पर्वा असते . दुसऱ्याच्या जीवाची कुणालाही अजिबात पर्वा नसते. अर्थात अशी लोक सांत्वन देण्या व्यतिरिक्त दुसरं काहीही देऊ शकत नाही. पण जसे त्यांनी आपल्या मुलीला सुखरूप घरी आल्याचे पाहिले तसा त्याना फार अत्यानंद झाला. त्या तिला विचारू लागल्या की , काय झाले ? कुठं नेले होते तुला ?" आता रेणूला प्रश्न पडला की आता आपल्या आईला काय सांगावं बरं ? म्हणजे लोकांना खरं कसं सांगणार की नेमके काय झाले होते ? सहानुभूती तर सोडाच पण अशी काही बदनामी पसरविली असती ती वेगळीच शिवाय तिला घरातून बाहेर पडणे पण मुश्किल झाले असते , म्हणून तिने स्वतःच्या आईलाच खोटं ठरविले. म्हणजे असे सांगितले की , अगं मम्मी, लोकांना खोटं का सांगते आहेस ? मला कुणी नाही नेलं. मी स्वतःच. गेली होती मैत्रिणीकडे आणि जाताना तुला सांगून तर गेली होती. ते पण विसरलीस ?" त्यावर , तेथे जमलेल्या शेजाऱ्यापैकी एक बाई म्हणाली ," पाहिलंत मी मघाशी म्हणाली नव्हती का ? की ह्या बाईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. ही बाई आपल्याच मुली विषयी काय पण सांगत असते. म्हणून तिच्या बोलण्याकडे कुणी लक्ष देऊ नका." त्यानंतर एकेकीने तेथून काढता पाय घेतला. तशी तिच्यावर चिडून म्हणाली," काय गं लोकां समोर मला खोटी पाडतेस काय ? तुला काही लाज ...?" त्यावर रेणू म्हणाली," हो , आहे ना, लाज पण आणि शर्म पण आहे. पण ती अशी लोकां समोर बोलून दाखवायची असते का ?" तेंव्हा तिची आई म्हणाली," ते जाऊ दे , तू मला आधी हे सांग ? त्याने नेऊन तुला काही केलं तर नाही ना ?" रेणू म्हणाली," नाही गं मम्मी ! तो भूत नाहीये माणूसच आहे फक्त त्याच्याकडे अदृश्य होण्याची शक्ती आहे."
" पण तो लग्न करेल ना तुझ्याशी ?"
" हो. करायला तयार आहे . पण मीच लग्न करणार नाही
त्याच्याशी !"
" काय गं चांगला नाही आहे का तो ?"
" त्या बद्दलच चौकशी करायची आहे मला."
" म्हणजे ?"
" म्हणजे त्याच्या बद्दल मला आज जी माहिती मिळाली
आहे ती खरी आहे का खोटी ? याची माहिती काढणार आहे मी !"
" कोण देईल तुला ही माहिती ?"
" माझ्या सारख्या काहीं तरुणी आहेत . माझ्या सारखे
त्याना पण फसविले आहे त्याने . म्हणून त्या चौघी ना पण विचारायचं आहे. खरं काय आहे ते ?"
" पण मग तुझ्या पोटात त्याचं बाळ वाढतोय त्याचं काय करणार आहेस तू ?"
" त्याचा विचार नंतर करू अगोदर मला एक काम
करायचे आहे ते करते मग सांगते माझा फायनल निर्णय ."
असे बोलून ती आपल्या खोलीत गेली नि तिने एकेकीचा
मोबाईल नंबर डायल करून त्यांच्याशी संपर्क साधला आणि
त्या सर्वांना एका कॉफी हाऊस मध्ये बोलविले. त्यानंतर
स्वतःही ठरलेल्या ठिकाणी पोहोचली. तेव्हा तिने त्याना घडलेली हकीगत सांगितली आणि त्याचे ते फोटो दाखविले.
अगोदर कुणालाच तिचे म्हणणे खरे वाटेना. त्यावर मीना म्हणाली ,"अगं खरंच पाहिलेस का तू त्याला ?"
तेव्हा रेणू म्हणाली ," हो गं बाई ! खरं तेच सांगते. "
" कसा दिसतो गं ?" टीना बोलली.
" मस्त एकदम राजबिंडा."
" मग एखादा त्याच्या सोबत फोटो काढायचा ना तू ?
मग आम्ही सुध्दा पाहिला असता ना ?" टीना
" गप्प गं म्हणे फोटो काढायचा ? तो दिसतो तरी का ?"
" अगं पण हिने पाहिला ना ?"
" अगं कसं शक्य , आहे ? "
" का शक्य नाही ?"
" अगं मी किती वेळा तरी रिक्वेस्ट केली होती की
मला एकदा तुमचा चेहरा दाखवा. तर मला म्हणाला," आपल्याला जेव्हा बाळ होईल ना, तेव्हा मग बाळाच्या रुपात
बघ मला. तो दिसायला अगदी सेम माझ्या सारखाच असेल.
मग मला सांग , तुलाच कसा त्याने आपला चेहरा दाखविला." मीना विचारले.
" अगं मी हट्टच धरला. तेव्हा कुठे तो आपला चेहरा दाखवायला तयार झाला." रेणू उत्तरली.
" काहीतरीच काय सांगतेस ? म्हणे मी हट्ट धरला. मी तर
अनेकदा हट्ट धरला. पण नाहीच दाखविला त्याने आपला चेहरा आणि तू म्हणतेस तुला त्याने दाखविला कोण विश्वास ठेवील तुझ्या या बोलण्यावर. चला गं हिचं काय ऐकताय ? हिला भेटला असेल कुठलातरी सोमा गोमा कापसे त्याने हिला थापा मारल्या आणि हिने त्या ऐकल्या. दुसरं काय ?"
तशा सगळ्या फिदी फिदी हसल्या. पण का कुणास ठाऊक ?
त्यातील शीला त्या सर्वांना उद्देशून बोलली," थांबा गं अगोदर
ऐकून घ्या ती काय सांगते ते."
" तू ऐक. तुला ऐकायचं तर आम्हांला नाही वाटत तिचं
म्हणणे खरे." टीना बोलली.
" मग पश्चात्ताप करण्यापेक्षा आताच सावध झालेलं काय वाईट आहे ? मला सांग मी ऐकते. " तशी रेणूने घडलेली
हकीगत जशीच्या तशी सांगितली. ते ऐकल्यानंतर मात्र
विचारात पडल्या. म्हणजे सर्वांना त्याने सेम आश्वासन दिली
होती. आता मात्र त्याना पण जाणवू लागले की हिच्या बोलण्यात काहीतरी तत्य आहे. त्यावर एकजण बोलली,
" मग आता काय करायचं ?"
" आता सरळ पोलीस स्टेशन गाठायचं , दुसरं काय करणार म्हणा ."
" अगं सर्व पोलीस खिल्ली उडवतील की आपली."
" उडविली तर उडविली दुसरा पर्याय आहे का आता ?"
" हो गं बाई ,चला जाऊ सर्वजणी ! त्याला सोडायचा नाही आता." तशा सगळ्या जणी एकदम बोलल्या," हो,चला."
मग सगळ्याच पोलीस स्टेशनला गेल्या तोतया बॉडीलेस विरुध्द तक्रार करायला. पोलिसांनी त्यांचे म्हणणे नीट ऐकून ही घेतले नि तक्रार पण नोंदवून घेतली. त्याना सांगितले की आम्ही त्याचा शोध नक्की घेऊ आणि त्या अगोदर तो तुमच्या पैकी कुणा जवळ ही आला तर आम्हाला खबर द्यायला विसरू नका. त्यानंतर त्या पाच जणी तेथून निघून गेल्या. तेव्हा हेड कॉन्स्टेबल जयदेव बोलला ," सर, ह्या पोरींना , तोतया बॉडीलेस ने तर चांगलाच बनविले की ! एखाद्या नराधमाला ही लाजवेल असं त्याने काम केलं. यावरून तर एक गोष्ट ध्यानात येतंय का तुमच्या ?'
" कोणती ?"
" हा तोतया बॉडीलेस जो कुणी आहे , तो महा बिलंदर माणूस आहे बघा , किती पद्धतशीर फसविले बघा पोरींना. जर योग्य वेळी तेथे बॉडीलेस पोहोचला नसता तर त्याने रेणू शी लग्न सुद्धा केलं असते. एक मासोळी फसली की लगेच दुसरी असा खेळच सुरू ठेवला असता त्याने."
" अहो , त्याचे एक सोडा , तो नराधमच आहे एका
नराधमाकडून दुसरी कोणती अपेक्षा ठेवू शकता तुम्ही .परंतु
ह्या शिकल्या सवरलेल्या पोरी असा कसा कुणावरही
विश्वास ठेवतात.? याचं आश्चर्य वाटतं मला. "
" पण आता पुढे काय ?"
" पुढे काय काय ? कसं ही करून तोतया बॉडीलेसचे भिंग फोडायचं. बस्स !"
" हो ; पण कसं ?"
" कसं म्हणजे कसं ही करून त्याचा असली चेहरा लोकां समोर आणायचाच ."
" ते झालंच हो ; पण .....?
" पण काय ?"
" पण कसा आणणार , ते सांगा ना . "
" तेच तर कळणासं झालंय. मागच्या वेळी जयचंदला
आपल्या जाळ्यात ओडून पुढील कार्य साध्य केलं होतं . पण
यावेळी तो मार्ग सुध्दा राहिलेला नाही. त्यामुळे काय करावं ते कळणासं झालंय."
" सर आपण असं केलं तर !"
" असं म्हणजे कसं ?"
" आपण त्याचा अड्डाच उद्ध्वस्त करून टाकला तर !"
" बेस्ट आयडिया असंच करू ."
" चल. बघू तर खरं काय आहे त्यात ?"
असे म्हणून एक पोलीस पथक घेऊन निघाले.
बब्बर आपल्या गुप्त स्थानावर पोहोचला. तेव्हा
डॉ. विश्वजित आपल्या कामात व्यस्त पाहून बब्बर आपल्या
मनात म्हणाला," डॉक्टर कडे पाहून तर असं वाटत नाही.
की यांचा स्मृतिभ्रश झाला असेल. स्मृतिभ्रश झाल्याचे नाटक
तर करत नसतील ना ? कुणी सांगावं करत ही असेल
आज आपण त्यांची परीक्षा घेऊ .जर त्यांनी पासवर्ड सांगितला तर हे सिध्द होईल की त्यांचा स्मृतिभ्रश वगैरे झालेला नाहीये. असा विचार करून त्याने विचारले की ,
" डॉक्टर , तुम्ही जेव्हा स्वाप्टस्वेअर बनविता तेंव्हा त्याला पासवर्ड असतो का हो ?"
" हां पासवर्ड लागतोच."
" मग तुम्ही भारतात येण्यापूर्वी बॉडीलेस नावाचा जो रोबट बनविला होता. त्याला पण पासवर्ड होता का ?"
" हो. पासवर्ड तर पाहिजेत. नाहीतर कुणी पण वापर करील त्याचा."
" मग तुम्ही बनविलेल्या रोबट चा पासवर्ड काय होता
हे माहीत असेल ना तुम्हांला ?"
" माहीत होता . पण आता आठवत नाही."
" जरा आठवण्याचा प्रयत्न करता का ? तो फार जरुरी
आहे." डॉक्टर विश्वजित कोल्हे ने पासवर्ड आठवण्याचा खूप
प्रयत्न केला ; पण पासवर्ड काही आठवेना. तेव्हा त्यांनी
दिलगिरी व्यक्त करत म्हटले ," सॉरी ! नाही आठवत."
" आता मला तुम्ही ठेवलेला पासवर्ड कुणा कुणाला माहीत होता ?"
" मी आणि माझ्या दोन असिस्टंटाना माहीत होता."
" पण पासवर्ड कुणाल सांगायचा नसतो ना ?"
" हो . पण त्या दोघांना सांगावा लागला."
" पण का ?"
" ते मला आता नाही सांगता येणार. पण झालं काय ?"
" त्याने मला ओळखले ?"
" कुणी ओळखले ?"
" जो स्वतःला बॉडीलेस म्हणवीत असतो.
" मग नक्कीच त्याला त्या दोघांनी सांगितले असावं.?
" ठीक आहे. तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा."
असे म्हणून तो तेथून निघाला. तेवढ्यात जफर खान चा
कॉल आला. त्याने लगेच कॉल घेतला. तेव्हा पलिकडून असे
सांगण्यात आले की, असशील तसा निघून ये. एवढे म्हणून
फोन कट केला आणि जफर खानच्या अड्यावर जायला
निघाला आणि थोड्याच वेळात जफर खान च्या अड्यावर
पोहोचला. तेव्हा जफर खान बोलला की , आता तू या दोघांना परत नेऊन सोड त्यांच्या मुलखाला . हां . पण त्यांच्या केसाला ही धक्का लागता कामा नये. याची संपूर्ण
जबाबदारी तुझी . कळलं." त्याने होकारार्थी मान डोलावली.
पोलिसांची जीप पडकी इमारती जवळ पोहोचली. हाथ
बॉम्ब टाकून दरवाजा तोडणार होते, तेवढयात आवाज आला ," पो.इन्स्पेक्टर विरेंद्र राणे तेथे आता काहीच नाहीये.
पण जर तुम्हाला शहा-निशा करायची असेल तर दरवाजा तोडून पहा दरवाजा . " पोलिसांनी शेवटी दरवाजा तोडला नि आंत शिरले आणि आंत प्रवेश केल्यानंतर सर्वत्र फिरून पाहिले. पण सगळीकडे तुटलेले फुटलेले आणि विखुरलेले सर्व सामान पडलेले होते. जसेच्या तसे त्यात काहीच बदल
झालेला नव्हता. ते पाहून पो. इन्स्पेक्टर विरेंद्र राणे स्वतःशीच
पुटपुटला की, याचा अर्थ आता इथं बरेच दिवस कुणी आलेले
नाहीये. मग नवीन अड्डा आहे कुठे ह्याचा ? परंतु मागच्या वेळी त्याचा पाठलाग करत आपण इथंच तर आलो होतो.
इथं बब्बरचा अड्डा नाहीये. दुसरीकडे कुठेतरी हलविला
असावा. पण कुठं ? आणि का ? याचे उत्तर कोण देईल बरं ?
कदाचित कुणी नाही. कारण त्याचा साथीदार जो आहे तो
न दिसनारा मग कसं आणि कोणाला पकडावे ?
त्यानंतर पोलिसांनी आपली जीप पोलीस स्टेशनच्या
दिशेने हलविली. पोलीस जीप पोहोचते न पोहोचते तोच पोलीस स्टेशनमध्ये फोनची बेल खणखणली.हेड कॉन्स्टेबल जयदेव ने रिसिव्हर उचलून कानाला लाविला नि हॅलो म्हटलें. पलिकडून बँक मॅनेजर चा फोन आला की आमच्या बँकेवर दरोडा पडला. तसे लगेच पोलीस पथक जीप मध्ये बसले. आणि तिकडे जायला निघाले.
पोलीस जेव्हा बँकेत पोहोचले तेंव्हा पोलिसांकडून
मिळालेली माहिती ऐकून तर सर्वांची खात्रीच पटली की ,
ज्याने म्युजियम मधून चीफ ड्रिल मशीन पळविली तोतया
बॉडीलेस आहे , तोच आतंकवाद्याना मदत वगैरे करतोय.
आणि बँक लुटण्याचा प्रयत्न जरूर केला होता. परंतु ऐनवेळी खरा बॉडीलेस धाऊन आला नि बँक लुटण्यापासून
वाचली. मॅनेजर कडून ऐकलेली माहिती एकदम थरारक होती. तोतया बॉडीलेस ने बंदुकी चे धाक दाखवुन बँक लुटलीच होती. म्हणजे पिस्तुल हवेत तरंगत होतं जणू पण
त्याचा रोख मॅनेजर वर असल्याने बँकेतील कर्मचारी च स्वतः
लॉकर मधील कॅश बॅग मध्ये भरत होते. इतक्यांत कुठूनतरी
सु सु करत गोळी आली नि पिसुलला लागली. पिस्तुल
जमिनीवर पडले आणि त्याच क्षणी एक आवाज उमटला ,
" खबरदार , पिसुल उचलशील तर ! तू मला दिसतो आहेस हे तू विसरू नकोस. तेव्हा तुझा गेम करायला मला फार वेळ लागणार नाही. पण दया येते मला तुझी ! क्या करू
मशीन हु ना मैं इन्सानोकी जैसी नफरत नहीं पाल सकता हूं ,
मैं अपने अन्दर इसलिए......"
त्यावर तोतया बॉडीलेसला वाटले की हा आपल्याला थापा मारतोय आपण ही त्याला दिसत नसणार तो आपली दिशाभूल करत असेल म्हणूनच की काय तो बोलला की , पिसुलाच्या जीवावर रुबाब काय करतोस हिंम्मत असेल तर माझ्या शी दोन हात कर." त्यावर दुसरा बॉडीलेस उत्तरला , वा छान ! खरी तर मी याचीच वाट पाहत होतो की तू हे कधी बोलतोयस ते. आता तूच म्हणाला आहेस तर होऊन जाऊ दे सामना देखते हैं किसके हाथ में कितना दम हैं शेवटी तुझीच इच्छा आहे ना ? फक्त ती मी पूर्ण करतोय इतकेच ! "
त्यानंतर सुरु होते ती त्या दोघांची हाणामारी परंतु कोणीतरी एकटाच मार खात मार खात असणार. कारण ओरडण्याचा आवाज फक्त एकाचाच येत होता आणि दुसऱ्या चा आवाज फक्त हसण्याचा येत होता. पण तेथे उपस्थिती असलेल्या लोकांना मात्र कुणीच दिसत नव्हते. ही सर्वांत मोठी आश्चर्यकारक गोष्ट होती. या पैकी खरा बॉडीलेस कोण ? आणि तोतया बॉडीलस कोण ? हे कसे ओळखणार ? अगदी सोपे आहे जो मारत खातोय तोच तोतया बॉडीलेस आणि फक्त हसतोय तोच खरा बॉडीलेस कारण तो मार खाणारच कसा जर दिसत नाही तर नाही का ?
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा