रोबोट-७
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रोबोट-७ |
बब्बर जेव्हा गुप्त स्थानावर पोहोचला. तेव्हा त्याने पाहिले की, डॉ. विश्वजित स्वाप्टस्वेअर बनविण्याचा प्रयत्न
करत आहेत पण त्याना हवा तसा स्वाप्टस्वेअर बनत नाहीये.
तसा बब्बर त्याना उद्देशून बोलला," डॉक्टर , या जन्मात तरी
बनेल का बॉडीलेस." प्रयत्न तर सुरू आहेत. पण बनत नाहीये म्हणून तुला सांगितले होते की, त्या दोघांना शोधून
आण म्हणून. पण तुला ते जमलं नाही त्याला मी काय करू ?" त्यावर तो बोलला," डॉक्टर , तुम्हांला खरंच काही
आठवत नाहीये . का आठवत नसल्याचा बहाना करताय ?"
तेव्हा डॉ. विश्वजित बोलले," असं वाटायचं कारण ? "
बब्बर बोलला ," कारण असल्याशिवाय बोलत नाही मी ."
तेव्हा डॉ. विश्वजित बोलला ," कारण तर सांग ."
" मला अगोदर हे सांगा की, मागच्या वेळी तुम्ही किती बॉडीलेस बनविले होते ?"
" फक्त एक . "
" पण मला असं कळलं आहे की दोन रोबट होते. एक
अड्यावर च कायम असायचा नि एक बळी च्या रुपात सर्व
साथीदारां सोबतच असायचा."
" त्या बद्दल मला काहीच माहीत नाही. आय डोन्ट नो !"
" पण मला माहित आहे."
" मग तू सांग. तुला माहीत आहे तर मला काय विचारतोयस ?"
" मी यासाठी विचारतो की , त्याला तुम्ही जर बनविला नाही तर मग त्याला बनविले कोणी ?"
" बहुधा मी बनविलेल्या बॉडीलेस ने त्याला बनविले असावे."
" एक रोबट स्वत;सारखा हुबेहूब दुसरा बॉडीलेस बनवू
शकतो का ?"
" हां, अवश्य बनवू शकतो. कारण तसे मी तशी त्यात सिस्टम करून ठेवली होती. "
" अच्छा तुम्ही त्यात तशी सिस्टम करून ठेवली होती.
राईट ?"
" येस. "
" मग मला सांगा की , आज मला दुसऱ्या एका बॉडीलेस विषयी माहिती मिळाली ."
" इम्पोसीबल ."
" खरं सांगतोय."
" माझा विश्वास नाही बसत त्यावर."
" अगोदर माझा पण बसला नव्हता विश्वास ; पण आज मी प्रत्यक्ष अनुभलय ."
" पण कसं शक्य आहे ते ?"
" ते मला माहीत नाही. परंतु मला असं वाटतं की , त्या दोघांनी त्याला बनविले असावे."
" कोण दोघे ?"
" माझे असिस्टंट !"
असे म्हणताच बब्बर किंचित विचारमग्न झाला. बहुतेक
त्याचा डॉ. विश्वजितच्या व्यक्तव्यावर विश्वास बसला असावा.
कारण त्याला आठवले की, पोलीस स्टेशनला तो बॉडीलेस
काय म्हणाला ते . म्हणजे त्याला सुध्दा डॉ. विश्वजितचा पत्ता
हवाय. म्हणून त्याने पोलीस स्टेशन मधून जफर खांनची
गाडी आणू दिली. म्हणजे आपल्यासाठी तर ती खुशखबरच
आहे , म्हणजे आपण त्याला ब्लँकमेल करू शकतो. मात्र
त्याला अजिबात भासू दिले नाही पाहिजे की , डॉ . विश्वजित
माझ्याकडे कैद आहेत. नाहीतर ते डॉ. विश्वजित ची मुक्तता
केल्या शिवाय राहणार नाही. त्यापेक्षा जे चाललंय ते ठीकच
चाललंय म्हणायचंय. असे मनात बोलून तो स्पष्टपणे इतकेच
म्हणाला ," चलो ठीक है, आप अपना काम जारी रख्खो .हम
अब चलते है ।" असे बोलून तो तेथून निघालाच होता. तेवढ्यात डॉ. विश्वजित म्हणाले," बब्बर भाय तुम्हें मैं एक नसीहत देना चाहता हूं कि तुम जो कर रहे हैं , मेरे कहने का
मतलब यह है कि लडकियों के इज्ज़त के साथ जो खेल रहे
हो वो सही नहीं हैं । अभी भी वक्त हैं सुधर जाओ ,वर्ना एक
दिन बहुत पछताना पडेगा ।"
" वो दिन कभी नहीं आयेगा . क्यों मालुम हैं , नहीं ना ?
मैं बताता हूं ! "
" बताओ ।"
" मैं उनके सामने वास्तविक रूप मे कभी नहीं गया . जब भी उन लोगोंको मिला बाँडीलेस बनकर मिला । इसलिए वो
लोग बॉडीलेस का नाम लेंगे. मेरा नहीं ।"
" परन्तु उन में से कहीं लड़कियां पेग्नेंट है। "
" तो ?"
" जब उन लड़कियों को बच्चा होगा और उसकी शक्ल
तुम जैसी होगी तो तब क्या करोगे ? कैसे अपने आपको
बचाओगे ?" कुछ पल वो सोचते रह गया । तब उसे डॉ. विश्वजित का कहना सही लगा तो बोल उठा कि , हाँ डॉक्टर
आप सही फर्मा रहे हैं ,अच्छा किया जो आपने हमारी गलती
हमें बता दी । इस के लिए शुक्रिया । अब हम अपनी गलती को सुधारेंगे । थँक्स डॉक्टर ." असे बोलून तो तेथून निघालाच
होता ; पण तेवढ्यात त्याला जफर खानचा फोन आला. त्याला ताबडतोब त्याने आपल्या अड्यावर बोलविले.
जसा बब्बर ,जफर खानच्या अड्यावर पोहोचला. बब्बरला पाहताच जफर खान आज तुम्हारा इम्तहान है ।"
" किस बात का इम्तहान हैं ?"
" पाकिस्तान से कुछ आतंकवादी आने वाले है। और
उनको सही सलामत यहाँ तक पहुँचा ने की जिम्मेदारी अब तुम्हारी है । और ध्यान रहे जो पिछली बार हुआ था वो अब
होना नहीं चाहिये । नहीं तो हम कहीं के नहीं रहेंगें ।"
" नहीं होगा विश्वास करो हमारा ।"
" वो तो वो लोग यहाँ पर सुरक्षित पहुंच जाने के बाद ही
कहा जाता सकता है।"
" ठीक है अब हम चलते है ।"
" तुम कहाँ जा रहे हों ?"
" कहाँ जा रहे हो मतलब ? हमें बॉडीलेस को भेजने के लिए अपने अड्डे पर जाना होगा ना ?"
" उसकी कोई जरूरत नहीं हैं ,तुम यहाँ रहकर ही उसे भेजना है ।"
" ऐसा नही हो सकता ।"
" क्यों नहीं हो सकता ?"
" क्योंकि हमें भरवसा नहीं हैं तुम लोगों पर ।"
" तुम्हें भरवसा करना होगा ।"
" नहीं कर सकते."
" लेकिन क्यों ?"
" हम वजह नहीं बता सकते ?"
" लेकिन क्यों नहीं बता सकते है।
" कहा ना नहीं बता सकते।"
" ठीक है जाओ । लेकिन याद रहे इस बार कोई गलती
नहीं मतलब कोई गलती नहीं. समझ रहे हो ना ?"
" जी !" असे म्हणून बब्बर निघून गेला."
जफर खान मोठ्या आतुरते ने आतंकवाद्यायची वाट पाहत
होता. कारण दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाने तशी ताकीद
दिली होती की , यावेळी कोणतीही चूक माफ केली जाणार
नाही. मागच्या वेळी त्याना रिसिव्ह करण्यासाठी जर बॉडीलेस आला असता तर त्या पैकी कुणी मेलं नसतं ,असा आपला त्यांचा समज . कारण कुणी मारले हे कळालेच नाही.
त्या पाची जनांची प्रेत सापडली ,परंतु छिन्न विच्छिन्न अवस्थेत त्या सर्वांचा चेहरा ही ओळखता येत नव्हता. परंतु
त्यांच्या शरीरावर मिळालेल्या गोळीच्या खुणा वरून फक्त
एवढ्याच निष्कर्ष काढण्यात आला की , त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून भाडण झाले असणार आणि त्या भांडणाचे रुपातंर हाणामारीत झाले असेल , आणि त्याचा परिणाम त्यांच्या मृत्यू मध्ये झाला. परंतु त्यांच्यात भाडणं होण्यासाठी कारण कोणते घडले ते अद्याप कळले नाही. पोलीस शोध
घेत आहेत. म्हणून यावेळी सावधनेचा इशारा म्हणून जफर
खान ने बब्बर ला ताकीद दिली होती की यावेळी कोणताही
अपराध माफ केला जाणार नाही. म्हणूनच जफर खान
बेचैन पणे इकडून तिकडे येर-झारा मारत असतो. एवढयात
बॉडीलेस दहशतवादी संघटनेच्या दोन माणसांना सुरक्षित पणे
जफर खान त्या दोघांना पाहून एकदम खुश होतो. त्याबदल्यात तो बॉडीलेस शाब्बासकी देतो. त्यानंतर बॉडीलेस तेथून निघून जातो. कारण जफर खान दोन तीन वेळा बॉडीलेस s s बॉडीेलेस s s म्हणून हांका मारतो. पण काहीच प्रतिसाद येत नाही. याचा अर्थ बॉडीलेस तेथून निघून गेला होता. आणि थोड्याच वेळात तेथे बब्बर हजर झाला. बब्बरला पाहून जफर खान बोलला," आओ बब्बर भाय आज तुम्हें अपने गले लगाना का जी करता है, क्योंकि सही मायने में आज तुम्हारे बॉडीलेस ने बहुत बहादुरिका काम करके साबित करदिया कि तुम्हारे ऊपर विश्वास करके मैंने कोई गलती नही की है ।" तब बब्बर बोला," विश्वास करो, हमने हमेशा से। तुम्हारा भला ही चाहा है। वर्ना हमे किस बात की कमी है ? चाहे जब मैं बैंक लूट सकते, आपका स्मग्लिंक का माल लूट सकते हैं ,जैसे की , पहले बॉडी लेस करता था , लेकिन हमें ऐसा नही किया ! क्यों जानते हो ?"
" नहीं ।"
" सिर्फ इसलिए कि हम दोस्ती निभाना अच्छी तरह जानते
है । "
" इस में कोई संदेह नहीं बब्बर भाय इसलिए हम तुम्हारे
शुक्रगुजार है ।"
" अब वो सब छोड़ो मुझे मेरी फीस दो । मुझे अब एक
जरूरी काम से बाहर जाना है ।"
" हां जरूर जरूर ." असे बोलून एक नोटांनी भरलेली
बॅग जफर खान ,बब्बरला देतो. बब्बर ती उघडून पाहतो.
मनाची खात्री होताच तो जफर खान ला बाय बाय करून
तेथून निघून जातो. आपल्या गुप्त स्थानावर पोहोचल्यावर
बॅग खोलून नोटांची बंडल उचलून लॉकर मध्ये ठेवून लगेच
संगणक एक मॅसेज टाईप करतो. तोच एक आवाज होतो. की, येस बॉस ss "
तसा बब्बर आलास आता एक काम कर, एका मुलीचा फोटो काढून टेबलावर ठेवत बोलला," ह्या मुलीचा नाव रेणू आहे ,हिला घेऊन आपल्या गुप्त स्थानावर. " पुन्हा आवाज
उमटतो , " ओके बॉस ।"
रेणूंची आई रेणुला सारखी विचारत असते की , हे कुणाचे
पाप आहे ?" त्यावर रेणू म्हणाली ," मम्मी हे पाप नाहीये, आम्हां दोघांच्या प्रेमाचे प्रतिक आहे."
" पण कोण आहे तो मुलगा ."
" मम्मी तो मुलगा नाही."
" मग काय बाप्या आहे ?"
" नाही ग ."
" अग मग कोण आहे ते सांग ना ?
" मम्मी मी तुला आता कसं सांगू ?"
" कसं सांगू म्हणजे ?"
" अग तो माणसा सारखाच ; पण तो माणूस नाही आहे ."
" माणसा सारखाच आहे पण तो नाहीये. ही काय आणखीन भानगड आहे ? "
" भानगड बिनगड काही नाही ग , तो माणसा पेक्षा ही
शक्तिशाली आहे."
" कोणा बद्दल बोलते आहेस तू ?"
" बॉडीलेस बद्दल बोलतेय मी ."
" म्हणजे तो रोबट च ना ?"
" हो ।"
" तुला वेड तर नाही ना लागलं ?"
" हां वेडच तर लागलंय ; पण प्रेमाचं ."
" चुलीत गेलं ते तुझं प्रेम , मशीन वर कुणी प्रेम
करतं का ?"
" का करू नये ? उलट मशीन तर माणसा पेक्षा खुप चांगली. त्यात अद्भुत शक्ती आहे. क्षणात इथं तर क्षणात
तिथं. आणि तुला माहितेय मला होणार बाळ ही तसेच अद्भुत
शक्तीवाले असेल. "
" अग तुला कुणीतरी फसवितोय. "
" नाही ग मम्मी !"
" तू पाहिलेस का त्याला एकदा तरी ?"
" नाही. अदृश्य असतो तो."
" अग मग समधं असेल."
" कोण समधं ?"
" एक भुताचा प्रकार आहे ?"
" नाही ग मम्मी तो भूत नाहीये."
" तुला कसं माहीत ? तू तर त्याला पाहिलं देखील नाहीस."
" पण भुता पासून गर्भधारणा कशी होईल?"
" होते. समधं पासून गर्भधारणा होते."
" अरे बाप रे ! खरंच का ?"
" हां , तुला समधं ने धरलंय पोरी ! "
" नाही ग मम्मी मला घाबरू नकोस."
" चल अगोदर. तांत्रिकाकडे जाऊ."
" पण खरंच असं होतं का मम्मी ?"
" हो ना, म्हणून तर सांगते."
तेवढ्यात एक आवाज आला ,चल रेणू तुला मी न्यायला
आलोय." आवाज ऐकताच तिच्या अंगावर काटा उभा राहिला. पण तोंडातून आवाज फुटेना . पण क्षणभरच. लगेच
दुसऱ्या क्षणी रेणू ला हवेतून जाताना दिसली . ते दृश्य पाहून रेणूंची आई तर भीतीने बेशुध्दच झाली.
थोड्याच वेळात रेणू शुध्दीवर आली पाहते तर जवळपास
कुणी नाही. तशी ती भातीने पलंगावर उठून बसली. तिच्या आईने समधं विषयी सांगितलेली गोष्ट विसरली नव्हती. तेवढ्यात तिच्या कानावर आवाज पडला ," काय झालं एवढी
घाबरली आहेस तू ?"
" मला अगोदर सांग तू कोण आहेस ?"
" तुला माहीत नाहीये का , मी कोण आहे तो ?'
" मला तुमचा चेहरा बघायचा आहे , दाखवाल ?"
" अवश्य !" असे बोलून आवाज बंद झाला नि थोड्याच
वेळात तिच्या समोर एक मानव आकृती दिसू लागली. तिने
मागे वर्तमानपत्रात पाहिलेला बॉडीलेस चा चेहरा नि आता समोर असलेल्या माणसाचा चेहरा सारखाच होता. ते पाहून
ती खुश झाली नि चट्कन पलंगावरून उतरली नि त्याला जाऊन बिलगली. तसा बॉडीलेस बोलला , " आता झालं समाधान ?"
" हो ! " एकदम खुश होऊन रेणू बोलली. त्याच वेळी अजून एक आवाज उमटला ," रेणू तुझी फसवणूक केली जातेय,हा बॉडीलेस नाहीये. " तशी पटकन त्याच्या पासून
दूर होते नि म्हणते की , कोण आहेस तू ?"
तसा नकली बॉडीलेस बोलला, " अग रेणू त्याचं नको ऐकूस मीच बॉडीलेस आहे. उलट तो तुला फसवितोय."
" कोण कुणाला फसवितोय हे कळेलच लवकर."
रेणू मात्र कावरी बावरी होऊन पाहत राहते आवाजाच्या दिशेने आणि बॉडीलेसकडे. कोण खरे बोलतोय नि कोण
खोटं तिला कळेनासे झालेय. तसे तो बोलला," अग रेणू ऐक
माझं मीच खरा बॉडीलेस आहे. मी तुला अदृश्य होऊन दाखवितो." असे बोलून त्याने आपल्या खिशातून फाउंटन पेन च्या आकाराची ड्रिल मशीन काढली नि आपल्या
डाव्या हाताच्या मनगटावर दाबली तसा तो पुन्हा अदृश्य झाला.
" शेर की खाल पहनने से गदा कभी शेर नही बन जाता हैं।"
" जर तू खरा बॉडीलेस तर समोर का येत नाहीस.?"
" येईन समोर सुध्दा येईन. पण योग्य वेळ आल्यावर.
आणि तू कोण आहेस हे ही मला चांगलं माहीत आहे. तुझं नाव जी नि बी पासून सुरू होतेय पुढं सांगू का ? "
" नको."
" नको ना , मग ऐक. तुझं भांड फुटू नये असं जर तुला वाटत असेल तर आज पासून भोळ्या भाबड्या तरुणीना फसवायचे काम बंद कर."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा