बॉडीलेस १४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बॉडीलेस १४ |
आपल्या खिशात टॅब नाही हे जसे समजले तसा बळीला एकदम धक्काच बसला. पण त्याचा आनंद मात्र त्या लोकांना फार झाला. पाशा एकदम खूष होत बोलला, " अरे ह्याच्या खिशात टॅब नाही, म्हणजे ह्याच्या मदतीला बॉडीलेस येणार नाही. याचा अर्थ हा आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही. सच पुछो तो अब आयेगा मजा . बता, तेरा बॉस बॉडीलेस कहाँ है ?"
" मुझे नही पता. " बळी बोलला.
" और पता होगा भी कैसे ? जब कभी तुमने देखाही नही उसे ? और आज के बाद तो तुम उसे देखोगे भी नही क्योंकी तुम्हारे पास अब टॅब जो नही है ."असे म्हणून पाशा खान मोठ्याने हसला. " लेकीन छोटे .....यह कैसे पता चलेगा की अखिरकार बॉडीलेस है कौन ? और उस फार्म्युले का क्या जो हर किंमत में हमे चाहिये था. जफर खान ने खंत व्यक्त केली. त्यावर सर्वजण विचारमग्न झाले. संधीचा फायदा घेत सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे हळूच बळीला बोलला," लवकर आठव ना टॅब कुठं ठेवलास ते ?"
" ठेवला नाही कुठे, खिशातून पडला मघाशी हाणामारी करत असताना . "
" म्हणजे इथंच कुठंतरी असेल. " असे म्हणून इकडे तिकडे पाहू लागतो. तसा सस्पेंड पो. इन्स्पेक्टर राणे मनात म्हणाला," अजून कुठं राहीला हा ? कधी बोलविलं होतं मी ह्याला ? हा अर्जुन पण एकदम युजलेस आहे जेव्हा याची गरज असेल, तेव्हा हा गायब !"
तेवढ्यात पाशाचा आवाज कानी पडला. तसा सस्पेंड इन्स्पेक्टर विरेंद्र राणे भानावर आला. पाहतो तर काय पाशाने पिस्तुल कानशिलावर ठेवली नि उद्गारला," बोल , बॉडीलेस कोण आहे ? आणि विश्वजीतने बनविलेलेला फार्म्युला कुठं आहे तो सांग. "
" मला माहीत नाही."
" खोटं बोलतोयेस तू . हे बघ , आता तुला वाचवायला बॉडीलेस येऊ शकत नाही, म्हणून तू आम्हांला बॉडीलेसचे राज सांगुन टाक. नाहीतर हकनाक मरशील. "
" खरं तेच सांगतोय मला खरंच माहीत नाहीये. "
" ठीक आहे. तो फिर तू उपरवाले को याद करले. "
" अरे, बोलत का राहीला आहेस ? शूट कर त्याला. "
पाशा खानने पिस्तुलचा चाफ ओढला आणि त्यातून गोळी निघणार तोच पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर पोलीस पथकासह तेथे पोहोचला आणि नेम धरून त्याने बरोबर पाशाच्या हातावर एक गोळी झाडली. ती पाशाच्या हाताला चाटून गेली आणि त्याच्या हातातील तिस्तुल खाली पडले. त्यानंतर दुसरा फायर छताकडे केला नि म्हटले," खबरदार, कुणी जागचे हलाल तर ! एकेकाला यमसदनास पाठविन.
पोलिसांना तेथे आलेले पाहून रशीद खान घाबरला आणि तेथून गुपचूप पळून जाण्याच्या बेतात होता. पण तेवढ्यात पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकरची नजर त्याच्यावर पडली. तसा तो धमकावत म्हणाला," खबरदार रशीद खान पळण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. फुकटच प्राणास मुकशील. " असे म्हटल्यानंतर रशीद खान आपल्या जागीच उभा राहीला.
त्यानंतर पो. इन्स्पेक्टर अर्जुन ने जयचंदच्या बांधलेल्या रस्सीवर गोळी मारून जयचंदला मोकळं केले. तेव्हा जफर खान सहीत सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आणि त्याहून मोठा धक्का तेव्हा बसला. जेव्हा सस्पेंड इन्स्पेक्टर राणे नी आपल्या चेहऱ्यावर लावलेला नकली चेहरा म्हणजे मास्क काढले . तेव्हा तर बळीला सर्वांत मोठा धक्का बसला. आतापर्यंत तो त्याला आपला साथीदार जयचंद समजत होतो तो जयचंद नसून सस्पेंड इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे निघाला. मग आपला साथीदार जयचंद कुठे आहे ? आणि आपण ह्याला ओळखलं कसं नाही. असे अनेक प्रश्न बळीच्या मनात उठले होते. एवढ्यात सस्पेंड पो. इन्स्पेक्टर राणे बोलला," काय मग बळी कसा वाटला माझा हा खेळ ? " त्यावर बळी बोलला," खेळ तर फार चांगला खेळलास. पण त्यात एक चुक केलीस तू.....कोणती चूक ती माहीती आहे का तुला ?"
" कोणती चुक केली मी ? सांग बर. "
" अजून खेळ संपलेला नाहीये आणि तू अगोदरच पत्ते ओपण करून दाखविलेस. आता बघच तू मी हरलेली बाजी कशी जिंकतो ती. "
" तू बाजी जिंकणार ? कशी बरं ? कारण तुझा तो मदतगार बॉडीलेस तुझ्या मदतीला तर इथे येणार नाही , कारण तुझ्याकडे त्याचा टॅब नाहीये. मग कसा येईल बरं तुझ्या मदतीला ?" तेवढ्यात कुठून तरी एक गोळी सू सू करत आली आणि बळीच्या हाताला बांधलेल्या रस्सीला लागली
आणि रस्सी जळली तसा त्याचा एक हात मोकळा झाला. आणि त्याच बरोबर एक आवाज सुध्दा शांत वातावरणात उमटला की , " खबरदार , कोई अपनी जगहसे हीला तो ? एक एक को भुन के रख दुंगा !" अगोदर सर्वाना वाटलं की, बॉडीलेसच आला की काय ? पण जसं सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहीले तसा त्या सर्वाना जयचंद दिसला. जयचंदला पाहून बळी एकदम खूष होऊन बोलला,' शाब्बास जयचंद ! अगदी वेळवर आलास. आता या लोकांना जरा मजा चकवूया." असे बोलून तो आपला टॅब शोधू लागला. तेवढ्यात त्याची नजर त्या टॅबवर पडली तसा तो टॅब घेण्यासाठी टॅबच्या दिशेने धावला. पण ही गोष्ट सस्पेंड पो. इन्स्पेक्टर विरेंद्र राणेच्या ध्यानात आली. तसा राणे ही त्या दिशेला धावला आणि त्याच क्षणी जयचंदने मारलेली गोळी सस्पेंड पो. इन्स्पेक्टर राणेच्या खांद्याला चाटून गेली. किचिंत त्याचा नेम चुकला. नाहीतर जयचंदच्या पिस्तुल मधून निघालेली गोळी सस्पेंड इन्स्पेक्टर वीरेंद्र राणेच्या हृदयालाच लागली असती. पण थोडक्यात वाचला आणि दुसरी गोळी मारणार तोच जवळच पडलेलं पिस्तुल पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर ने उचलले आणि त्याने सरळ जयचंदच्या हातावर गोळी मारली. निशाना अचूक साधला नि जयचंदच्या हातातले पिस्तुल खाली पडले. मग सस्पेंड इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे ने आपल्या जीवाची पर्वा न करता सरळ बळीला धडक दिली. त्यावेळी बळी टॅबवर बॉडीलेसचा नंबर डायल करत असल्यामुळे तो एकदम बेसावध होता. त्याला अचानक धडक बसल्याने त्याच्या हातातील टॅब हातातून निसटून खाली जमिनीवर पडला नि फुटला . म्हणजे बॅटरी वगैरे वेगळी झाली. हे पाहून बळी राणेवर भयंकर चिडला आणि धडक देणाऱ्या सस्पेंंड इन्स्पेक्टर राणेच्या कानशिलावर मारत म्हटलं," यु ब्लडी रास्कल व्हॅट्स इज धीश !"
पण सस्पेंड पो. इन्स्पेक्टर विरेंद्र राणे कुत्सितपणे
हसून म्हणाला ," च्यक च्यक हा डाव देखील फसला. अब क्या करोगे ? तेव्हा बळीने शेवटचा उपाय म्हणून खिशातून फाँऊटन पेनच्या आकाराची एक ड्रील मशीन बाहेर काढली आणि आपल्या मनगटावर दाबणार तोच त्याच्या हातावर पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणेने हात मारला. त्यामुळे ड्रिल
मशीन हातातून खाली पडली. ती उचलण्याचा त्याने पुन्हा प्रयत्न केला. परंतु पो. इन्स्पेक्टर अर्जुन ने लाथेच्या एका ठोकरेने ती ड्रील मशीन दूर फेकली गेली. त्यामुळे बळीचा नाईलाज झाला. पण तो पो. इन्स्पेक्टर अर्जुनला खाऊ की गिळू या नजरेने त्याच्याकडे पाहत असतानाच पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला," मि. बळी काय झालं ? बोलव ना तुझ्या त्या बॉडीलेसला ?" त्यावर बळी काहीच बोलला नाही. तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला," मि. बळी तुझा खेळ आता संपला आहे तेव्हा आता मुकाट्याने पोलीस स्टेशनला चल. आणि आता तूच सायंटिस्ट विश्वजीत कोल्हे असल्याचं कबुल कर." आणि खरं सांगायचं तर पो. इन्स्पेक्टर अर्जुनने हा अंधारात तीर मारला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्या प्रतिक्रिया उमटतात. हे पाहायच्या होत्या. परंतु असं काहीच घडलं नाही. मात्र बाकीचे सर्वजण आश्चर्यचकीत होऊन पहात होते.
तेव्हा सर्वांच्या मुखातून आश्चर्य व्यक्त करणारे उद्गार निघाले ,
" काय ? हा सायंटिस्ट डॉ विश्वजीत कोल्हे आहे का ?" पण बळीकडून कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही. तसा पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला," आता जरी काहीच नाही बोललास ना, तरी लवकरच तुला बोलतं करीन मी ! चला रे घेऊन ह्याला पोलीस स्टेशनला. असे बोलून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आणि निघाले पोलीस स्टेशनला. पण अचानक रस्तामध्येच पोलिसांची जीप पाशा खांनच्या गुंडांनी अडविली. तेव्हा पोलीस आणि गुंड ह्याच्या झालेल्या चकमकीत काही गुंड मारले गेले तर काही पोलीस जखमी झाले. मात्र जफर खान, पाशा खान पळून जाण्यात यशस्वी झाले आणि हल्लेकरीही पसार झाले. तेव्हा बळी मात्र हसत होता. जणू तो पोलिसांच्या अपयशी योजनेची खिल्ली
उडवत होता. त्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला," जफर खान आणि पाशा खान आज जरी पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी लवकरच त्याना आम्ही गजाआड करू."
त्यावर बळी खो खो हसत बोलला," गीर गया तो भी टांग उपर हे कसं जमतं तुम्हांला ? नाही म्हणजे पोलिसांना फक्त पोकळ वल्गना करता येतात. बाकी काही येत नाही. हो ना ?"
त्यानंतर पो. इन्स्पेक्टर अर्जुन काहीच बोलला नाही. पोलिसांची व्हॅन पोलीस स्टेशनला पोहोचल्यावर बळी आणि जयचंद या दोघांना एका पोलीस कोठडीत बंद केले आणि बाकी इतरांना दुसऱ्या पोलीस कोठडीत बंद केले. जवळ-पास कुणीनाही असं पाहून जयचंद हळूच बोलला," आता तू मला सांग. त्या टॅबची काय भानगड आहे ? आणि यावेळी आपला बॉस आपल्याला का नाही वाचवायला आला ?"
तेव्हा बळी ने सर्व काही सत्य कथन केलं की, आपण खरे कोण आहोत ? आणि बळी बनून आपण सर्वाना कसा धोका दिला. तेही सांगितलं बॉडीलेस हा खरा बॉस नसून खरा बॉस मीच आहे, विश्वजीत कोल्हे." त्यावर जयचंदने विचारले," मग आवाज जो यायचा तो कुणाचा ?"
" अर्थात माझाच आवाज असायचा तो. पण रेकार्ड केलेला."
तेव्हा जयचंदने न समजून विचारले," म्हणजे ?"
" बॉडीलेस हे नाव मी बनविलेल्या रोबटचे आहे. "
" म्हणजे, ते सर्व कारनामे तो रोबट करायचा ?"
" होय. "
" पण रोबट तर स्वयंचलीत नसतो. ना ? मग हे कारनामे कसे केले त्याने ?"
" मी बनविलेला रोबट ऍडव्हास रोबट आहे. हा रोबट माणसा प्रमाणे चालू शकतो ,बोलू शकतो,माणसं जे काही करतात. ते सर्वकाही तो करू शकतो. मात्र एक गोष्ट तो करू शकत नाही आणि ती गोष्ट म्हणजे मनुष्या प्रमाणे मूल जन्माला घालू शकत नाही. कारण ती एक मशीन आहे."
" पण मग तो दिसत का नाही ?"
" कारण त्याच्या मनगटात अदृश्य होण्याची मी एक चीप टाकली आहे. ती चीप जोपर्यत त्याच्या मनगटात आहे, तोपर्यंत तो कुणालाही दिसणार नाही. "
" अर्थात तुला पण ?" जयचंदने विचारले.
त्यावर बळी उत्तरला," हो मला सुध्दा दिसणार नाही."
" मग त्याच्याशी संपर्क कसा साधायचास तू ? आणि नेमका आपण जिथं असू तिथं नेमका तो कसा पोहोचायचा. "
जयचंदने एकदम उत्सुकतेने विचारले. तेव्हा बळी उर्फ विश्वजीत कोल्हे बोलला," टॅबच्या साह्याने."
" म्हणजे?"
" टॅब मध्ये एक सिक्रेट नंबर आहे तो डायल केलं की,एक मॅसेज येतो - मे आय कम इन सर ? आणि त्या मॅसेजच्या जस्ट खाली दोन पर्याय येतात. येस & नो त्या मध्ये येस वर क्लिक केले की, बॉडीलेसच्या हातावरील ग्रीन बल्फ पेटायचा. मग त्यावरून त्याला कळायचे की, माझा आदेश आहे की, माणसाना गायब करण्याचा आहे. मग लगेच ओके ! आय एम कमीन. " असा मॅसेज येतो. बस्स ! आणि थोड्याच वेळात तो हजर होतो."
" याचा अर्थ असा की, आम्ही तुला फोन करून सांगितले की, लगेच तू त्या नंबरवर मॅसेज पाठवायचास ?"
" येस !"
" पण मला अजूनही कळलं नाही की, आपण जिथं असू तिथं तो नेमका कसा हजर व्हायचा ? म्हणजे त्याला कसं कळायचं ? आपण कोठे आहोत ते ?"
" कसं कळायचं म्हणजे ? तो नेहमी आपल्या सोबतच असायचा. फक्त माझ्या आदेशाची वाट पहात असायचा तो. जो पर्यंत टॅब वरून मी त्याला संदेश पाठवत नाही, तोपर्यंत तो काहीच कार्यवाही करणार नाही. "
" म्हणजे आताही सोबत आहे तो आपल्या ?"
" येस !"
" मग बोलवा ना त्याला आपल्या मदतीला. "
" कसं बोलवणार ?"
" का ?"
" टॅब तोडला ना त्या हरामखोर इन्स्पेक्टर ने. "
" म्हणजे तो आता आपली काहीच मदत करू शकणार नाही."
" हां !"
" मग काय उपयोग त्याचा ?"
" त्यासाठी माझी इथून सुटका झाली पाहीजे. एकदा का मी अड्डयावर पोहोचलो की, दुसऱ्या टॅबच्या साह्याने मी बॉडीलेसशी संपर्क साधू शकतो. "
" असं आहे तर मी तुझी इथून तिथं जाण्याची व्यवस्था करतो. "
" कशी करणार ?"
" मी जशी अज्ञात स्थळी आयडीया केली होती. तशीच आयडीया पुन्हा एकदा करतो. सिपंल !"
असे बोलून पोटात दुखण्याचे नाटक करून तो मोठ-मोठ्याने ओरडू लागला. तसा भींती आड लपलेला पो. इन्स्पेक्टर अर्जुन समोर येत म्हणाला," बंद कर तुझं ते नाटक ....आणि तुला काय वाटलं पोट दुखायचं नाटक करशील ? मग पोलीस शिपाई तुझी मदत करायला इथं येतील आणि तू त्यानाच आंत मध्ये बंद करून पळून जाशील ? पण दिडशहाण्या एकदा केलेली चालाकी पुन्हा करता येत नाही एवढं तर कळायला हवं होतं तुला. आणखीन एक महत्वाचे ऐक ----तू तेथून पळायला यशस्वी झालास. त्या मागे सुध्दा माझीच आयडीया होती समजलं. "
असे म्हटल्यावर ते दोघे आश्चर्याने पाहूं लागले. तसा पो. इन्स्पेक्टर अर्जुन उत्तरला," मीच तसं त्या दोघांना म्हणजे अज्ञात स्थळी जे पहारेकरी ठेवले होते ना , त्याना तुझ्या समोर येऊन तसं बोलायला सांगितले होते आणि त्या प्रमाणे ते बोलले आणि मला अपेक्षितच होतं ते सारेे घडले. आता सुध्दा मला अपेक्षितच असलेलं घडलं. " तेव्हा दोघेही आश्चर्याने एकमेकाकडे पाहू लागतात. तसे पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर पुढे म्हणाले," बॉडीलेसला बोलविण्याचे गुपीत तर आम्हाला अगोदरच कळलं होतं. फक्त अजून काही मार्ग आहे का? बॉडीलेस पर्यत पोहोचायचा हे मला पहायचं होतं. शिवाय बॉडालेसचा अड्डा कोठे आहे, हे सुध्दा मला माहीत करून घ्यायचं होतं. त्या प्रमाणेच माहीत करून घेतलं आता मुखाट्याने मला तेथे घेऊन चल."
तेव्हा बळी कुत्सितपणे बोलला," फार खूष होऊ नकोस. खेळ अजून संपलेला नाहीये. अजून बाकी आहे." पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर ठामपुर्ण स्वरात म्हणाला," तुझा खेळ संपलेला आहे, कारण मी तुला मघाशीच काही वेळापुर्वी पाशा खानच्या अड्डयावर सांगितले होतं की, स्वतःचा गुन्हा स्वतःच कबुल करशील म्हणून. आणि त्या प्रमाणे तू केलासच !"
असे म्हटल्यावर ते दोघे एकमेकांकडे गोंधळून पाहू लागतात. तेवढ्यात पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर ने कोपऱ्यात ठेवलेल्या कॉम्प्युटरवरील पडदा बाजूला केला नि कॉम्प्युटर ऑन केला. थोड्याच वेळात त्या दोघांमध्ये होत असलेले संभाषण त्यांच्या छायाचित्रासहीत दिसू लागले. म्हणून आश्चर्य चकीत होऊन त्याने आपल्या आजूबाजूला पाहीले. पण सी. सी. टिव्ही कॅमेरा कुठे दिसेना. मग अचानक डोक्यावर छताकडे नजर गेली. तेव्हा त्याना एक छोटेसे सी. सी टिव्ही कॅमेरा दिसला. तेव्हा त्याला स्वतःच्या मूर्खपणावर भंयकर राग आला. पण आता उपयोग काय त्याचा ? घडू नये ते घडलं. आता फक्त एकच उपाय होता. तो म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या फॉऊटन पेन आकाराच्या ड्रील मशीनचा काय उपयोग आहे हे अद्याप कुणालाही माहीत नव्हतं. पण पो. इन्स्पेक्टर अर्जुनच्या ध्यानात होते की, त्या ड्रील मशीन मध्ये काहीतरी रहस्य लपले आहे. पण काय ? हे जाणून घेण्याच्या हेतूने विचारले की, तू सर्व काही सांगितलेस . परंतु ह्या छोट्याशा ड्रील मशीनचं रहस्य अजून सांगितले नाहीस. ते पण सांगून टाक. म्हणजे मला पुढील कार्यवाही करण्यास सोपं जाईल. " त्यावर उपहासपुर्ण स्वरात बळी म्हणाला," आणि तुला काय वाटतं ते मी सांगेन. इतका दुधखुळा बाळ समजतोयेस तू मला ? नेव्हर कधीच कळणार नाही तुला ते. "
" विश्वजीत प्लीज लिसीन टू मी ! मी तुला दुधखुळा समजत नाहीये. तू फार मोठा सायंटिस्ट आहेस. तुझा हा शोध साऱ्या जगाला कळायला पाहीजेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं नाव होईल आणि तुझं नाव साऱ्या जगात चमकून उठेल. "
" नकोय मला तुझी किर्ती ! काय दिलंय मला तुझ्या या जगान ?"
" म्हणजे ? मी नाही समजलो. "
" तुझ्या या जगाने मला मारायचे ठरविले. मी लावलेला हा नवीन शोध माझ्या हातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, कारण त्याना तो स्वतःच्या नावावर खपवायचा होता. मी त्या गोष्टीला नकार दिला म्हणून त्यानी मला ठार मारायचे ठरविले. ते माझ्या एका मित्राने मला येऊन सांगितले .म्हणून मी तेथून पळून आपल्या देशात येण्याचा निर्णय घेतला. पण तेही त्याना माझ्या त्याच मित्राकडूनच समजले. मग त्यानी माझा पाठलाग केला. मी बनविलेले जेट विमान सुर्य उर्जेवर चालणारे असल्यामुळे मी तेथून रात्रीच्यावेळी पळू शकत नव्हतो. म्हणून दिवसा पळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी माझा पाठलाग सुरु केला. मी जीव मुठीत धरूण मोठ्या मुश्किलीने भारताची सीमा पार केली. पण त्यावेळी भारतात रात्र सुरू होती. त्यामुळे माझे विमान पुढे पळू शकले नाही. त्यातच त्यांनी माझ्या विमानावर बॉम्ब फेकला. माझ्या विमानाने पेट घेतला. मग मी स्वतःचा प्राण वाचविण्यासाठी पॅराशुठच्या मदतीने खाली उडी मारली. पण त्या अगोदर माझ्या शरीरात अदृश्य होण्याची चीप टाकली होती. त्यामुळे ते लोक मला पाहू शकले नाहीत. त्याना वाटलं मी विमानात जळून खाक झालो. पण मी समुद्रात कोसळलो. माझ्या नशीबाने म्हणा अथवा विधात्याची तशी योजना असावी म्हणा. वादळात फुटलेल्या गलबतच्या लाकडी फलाटावर मी पडलो. एवढ्यात मला माझ्या जवळून जाणारे जहाज दिसले. मी त्याना मदतीसाठी हात वर केला. पण माझ्याकडे कुणी लक्ष देईना. तेव्हा माझ्या ध्यानात आलं की माझ्या मनगटात अदृश्य होणारी चीप असल्याने मी त्याना दिसत नाहीये. हे जसे ध्यानात आले तसे मी माझ्या खिशातून ड्रील मशीन काढली नि मनगटात टाकलेली चीप मी काढून टाकली. तसा मी त्या लोकांना दिसलो. मग त्यानी मला वाचविले आणि आपल्या गैगमध्ये सामील करून घेतले. तेव्हा बब्बर बॉसने मला माझं नाव विचारले," पण मी माझी जगापासून ओळख लपविण्यासाठी खोटं सांगितलं की, मला माझं नाव आठवत नाही. म्हणून मग बब्बर बॉसने मला नवीन नाव दिले.
" आणि जशी गरज सरली तशी त्याला मारून टाकलं. होय ना ?" पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला.
" नाही. मी माझ्या प्राणदात्याला नाही मारलं ?
" खोटं ! तूच मारलेस त्याला ?"
" पण मी का मारेन त्याला ?"
" कारण तुला गैगचा सरदार बनायचं होते. "
" साफ खोटं आहे हे. "
" मग खरं काय आहे ? ते तर सांग. "
" बब्बर बॉसला मी नाही मारले तर इन्स्पेक्टर श्रीकांत जाधवने धोकेबाजीने मारले. म्हणून मी श्रीकांत जाधवला मारलं. "
" पण तुला असं का नाही वाटतं श्रीकांत जाधवने जे केले. ती तर त्याची ड्युटी होती. पण तू जे केलेस ते गैरकानुनी होतं." पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला. त्यावर बळी उर्फ विश्वजीत बोलला," आमचा बॉस गैर कानुनी काम करत नव्हता. उलट तो पोलिसांची मदतच करत होता. पाशा खान आणि जफर खान यांचा माल पोलिसांना पकडून द्यायचा आणि त्या बदल्यात सरकार कडून कमिशन मिळवायचा. परंतु इन्स्पेक्टर श्रीकांत जाधव लाच घेणारा ऑफीसर होता. तो जफर खानची दलाली करायचा पगार सरकारचा घ्यायचा. पण नोकरी मात्र जफर खानची करत होता म्हणून मी त्याला ठार मारलं. "
" चल, मानलं इन्स्पेक्टर श्रीकांत जाधव जफर खानचा दलाल होता. म्हणून तू त्याला मारलेस. पण मला सांग बब्बर बॉस मेल्यानंतर त्याच्या प्रमाणे पोलिसांची मदत करायची सोडून स्वतः चोरलेल्या मालाची स्मग्लींग करू लागलास. ते का.?
" त्याचं कारण एक आहे हे की, त्यानंतर आमचा पोलिसावरचा विश्वास उडाला आणि स्मग्लीग काही आम्ही स्वतःसाठी करत नाही. "
" मग कुणासाठी करतोयेस हे सगळं ?" पो. इन्स्पेक्टर अर्जुन ने उत्सुकतेने विचारले.
" दीन-दुभळ्या लोकांसाठी म्हणजे हाता-पायाने लुळे-पांगळे आहेत अशा लोकांसाठी ¡ " तसा पो. इन्स्पेक्टर अर्जुन कुत्सितपणे हसला. तो रागवून पुढे बोलला," हसू नकोस. खोटं वाटत असेल तर जाऊन चौकशी कर. वृद्धाआश्रम, अनाथालय , शाळा रूग्णालय सारख्या धर्मदाय संस्थाना आम्ही गुप्त दान दिले आहे. " तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन खुदकन हसून बोलला ," वा ! हे बरंय. म्हणजे , धन दुसऱ्याचं नाव मात्र स्वतःचं ही चांगली धर्म करण्याची पद्धत आहे. पण त्यानं केलेला गुन्हा माफ होत नाही. अपराध हा अपराधच असतो. मग तो कोणताही असो. तेव्हा आता तुला ह्या देशाचा कायदाच काय ती शिक्षा देईल. आता फक्त एकच गोष्ट कर.... आम्हाला तुझा एकदा अड्डा दाखव. "
" ठिक आहे .अड्डा दाखवेन मी तुला. पण त्या अगोदर मला माझं फॉऊटन पेन दे." त्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला ," तू काय मला मुर्ख समजतोयेस फॉऊटन पेन तुझ्या हातात द्यायला ?"
" अरे, न देण्या सारखं आहे काय त्यात फॉऊटन पेनच तर आहे ते त्याचा तुला उपयोग तरी काय होणार आहे ?
" मला जरी त्याच उपयोग होणार नसला तरी काही ना काहीतरी रहस्य लपलंय त्यात म्हणूनच तू त्याची मागणी करतोयेस. सांग बरं काय रहस्य आहे ह्या फॉऊटन पेन मघ्ये?"
" काहीच रहस्य नाहीये त्यात. "
" रियली?"
" येस !"
" आय कान्ड बिलिव्ह धीस "
" तो तुझा प्रॉब्लेम आहे मी त्याला काहीच करू शकत नाही."
" बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो तू स्वतःला गरिबाचा मदतगार म्हणवितोयेस, मग बँक का लुटली ? त्या बँकेत गरिबाचे सुध्दा पैसे होते. "
" त्या बँकेने मला कर्ज द्यायचं नाकारलं होते म्हणून मी त्या बँकेला लुटून मी त्या मॅनेजरला अद्दल घडविली. पण त्याच बरोबर गरिब लोकांचे पैसे मी त्यांच्या घरी जाऊन पोहोच केले आणि हे जर खोटं वाटत असेल तर त्यांच्या घरी जाऊन चौकशी कर, म्हणजे सत्य काय आहे तेआपोआप कळेल तुला. "
" म्हणजे एकंदरीत तुला म्हणावयाचे आहे की तू महान कार्य केले आहेस. होय ना ?"
" मुळीच नाही. "
" मग स्वतःचा अड्डा दाखवायला का घाबरतो आहेस ?"
" ते मी कोर्टातच सांगेन. "
" ठीक आहे. मग आता आपली भेट कोर्टातच होईल."
असे बोलून इन्स्पेक्टर अर्जुन तेथून निघून गेला आणि त्याच्या पाठोपाठ पोलीस शिपाई कोठडीतून बाहेर पडले नि त्यानी कोठडीचा दरवाजा नीट बंद करून त्याला कुलूप ठोकले. तेव्हा रहस्यमय स्वरात बळी बोलला ," यह तो सिर्फ ट्रेलर है अब पुरी फिल्म बाकी है . इन्स्पेक्टर जिस दीन नाटकपरसे परदा हठा दुंगा तब पता चल जायेगा. वास्तव मे बॉडीलेस है कौन ? यह देखकर तुम्हारी ऑखे फटी की फटी रह जायेगी इन्स्पेक्टर ! तब तक इंतजार करो वेट अँन्ड वॉच !"
क्रमश:
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा