Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

बॉडीलेस १५

बॉडीलेस १५
बॉडीलेस १५

 

            
             कोर्टात खटला उभा राहीला. कोर्टासमोर थोर सायटिंस्ट डॉ. विश्वजीत कोल्हे आणि त्याचा साथीदार जयचंद या दोघांना कोर्टासमोर उभे केले.

       दोन्हीकडच्या वकीलानी आपापला परीने युक्तीवाद माडंला. कोर्टा समोर सादर केलेले पुरावे ते नीट तपासून पाहत न्यायाधिश म्हणाले," मि. विश्वजीत कोल्हे तुम्हांला तुमचा गुन्हा कबूल आहे का ?

      " अजिबात नाही सर. "

      " तुम्हाला कोर्टा समोर काही सांगायचं आहे का?"

      " येस मिलार्ड !'

      " परवानगी आहे. परंतु तुम्हांला जे काय सांगायचं आहे थोडक्यात सांगा. "

       असे न्यायाधीशानी म्हटल्यानंतर विश्वजीत थोडक्यात सविस्तर वर्णन केले. ते ऐकल्यानंतर न्यायाधीश महाशय म्हणाले," मि. विश्वजीत कोल्हे बालपणी तुमच्यावर फार अन्याय झालाय, हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. परंतु याचा अर्थ असा मात्र कदापी होत नाही की स्वतःवर झालेल्या अन्याची शिक्षा इतर निर्दोष लोकांना द्यावी. कायदा आणि प्रशासन  ह्याना वेठीस धरावे  हे कदापी न्यायाचे नाहीये. तेव्हा तुम्हांला तुमच्या अपराधाची शिक्षा कोर्ट देईलच. पण त्या अगोदर तुमचा अड्डा आणि त्या मधील प्रयोग शाळा कोर्ट बघू इच्छितेय. तेव्हा ती तुम्ही स्वतः पोलिसांच्या उपस्थित नेऊन दाखवावी.  त्यावर विश्वजीतने होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक आणि पो. इन्स्पेक्टर अर्जुन आणि स्वतः न्यायाधीश त्या पडक्या ईमारती जवळ आले. विश्वजीतने ने पडक्या ईमारती जवळ असलेली एक गुप्त कळी दाबताच. पूर्ण ईमारत जागची हलली आणि एक  ट्रॉली वरती आली. त्या ट्रॉलीवर पोलिसांची व्हॅन उभी राहाताच ट्रॉली हळूहळू खाली गेली. खाली गेल्यावर विश्वजीतने एक गुप्त कळ दाबली. तशी भींत
बाजूला सरकली आणि प्रवेश द्वारे दिशू लागले. त्या दरवाजातून आत प्रवेश करताच एक हॉल दिसू लागला. हॉल मध्ये काही खुर्च्या नि समोर स्टेज दिसले आणि एक गळपाश ही लटकताना दिसला. 
         त्यानंतर एक गुप्त कळी दाबली. तशी समोरील भींत सरकली नि त्या भींतीच्या मागे अजून एक खोली होती. त्या खोलीत छोटीशी प्रयोग शाळा होती. त्या प्रयोग शाळेत प्रवेश करताच विश्वजीत तिथला एक टॅब उचलला म्हणून पो. इन्स्पेक्टर अर्जुनने लगेच त्याच्या कानशिलावर पिस्तुल टेकवत म्हटलं," अजिबात चालाकी करायची नाही विश्वजीत ! "
         त्यावर विश्वजीत हसून म्हणाला," सर मी कोणतीही चालाकी करत नाहीये. मी फक्त न्यायाधीश महाशयाना दाखवीत आहे. " तेव्हा न्यायाधीशानी विचारले की ह्या टॅबचे काय महत्व आहे ?" तेव्हा विश्वजीतने टॅब विषयी सविस्तर माहिती दिली. तेव्हा न्यायाधीश महाशयानी विचारले की , आता या क्षणी बॉडीलेस प्रगट होईल. का ?" त्यावर विश्वजीत बोलला," नाही त्याला तसं पाहता येणार नाही. "

     " मग कसं पाहणार त्याला ?

     " त्यासाठी मला  अदृश्य व्हावे लागेल."

     " मिलार्ड अजिबात परवानगी देऊ नका ह्याला ? नाहीतर हा पळून जाईल. "

     " न्यायमुर्ती महाशय आता तुम्हीच काय ते ठरवा. मला पळून जायचं तर मी आपले  हे गुप स्थान  तुम्हांला दाखविले असतं काय ? नाही ना ?"

       न्यायाधीश महाशयाना विश्वजीतचे म्हणणे पटले. त्यानी त्याला परवानगी दिली. तेव्हा आपल्या हातातील बेड्या काढावयाची विनंती केली. तसा लगेच न्यायाधीशानी त्याच्या हातातील बेड्या काढण्याचा आदेश दिला. पोलिसांनी विश्वजीतच्या हातातील बेड्या काढल्या. त्यानंतर विश्वजीतने तिथली फॉऊटन पेनच्या आकाराची ड्रील मशीन उचलली. आणि आपल्या मनगटावर दाबली. चिप मनगटात शिरताच विश्वजीत अदृश्य झाला. बराच वेळ झाला तरी विश्वजित काही बोलला नाही पो. इन्स्पेक्टर अर्जुनने दोन तीन हाका मारल्या. पण हू नाही की चू नाही. तसे सर्वजण समजले की विश्वजितनेे आपल्याला चकविलं. तसा पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर बोलला," पाहीलंत सर तुम्हांला म्हटलं नव्हतं का मी ? की त्याला परवानगी देवू नका म्हणून. .....आता झालं ना खरं ! गेला ना तो पळून ? आता कसं पकडायचं ते सांगा बरं. " त्यावर न्यायाधीश बोलले," नाही असं होणार नाही. विश्वजीत माझा विश्वासघात कधीच करणार नाही. मला खात्री आहे त्याची !" असे बोलून त्यानी विश्वजीतला हांक मारली. पण विश्वजीतने ओ दिला नाही. तसे न्यायाधीश महाशय म्हणाले," विश्वजीत हे तुझ्या सारख्या थोर सायंटिस्टला शोभत नाहीये. ताबडतोब प्रगट हो !"

     " सॉरी! न्यायमुर्ती महाशय मी पुन्हा तुमच्या समोर येणार नाही. बाय बाय सी यू  !"

       असे म्हटले मात्र लगेच न्यायाधीश महाशय त्याला त्याच्या वचनाची आठवण करून देत म्हणाले ," विश्वजीत तू मला वचन दिले आहेस हे विसरू नकोस. "
         " वचन s s हसण्याचा आवाज येतो पुन्हा हसणं थांबवत बोलला," वचन पाळायला मी काय राजा हरीचंद्र वाटलो की काय  तुम्हांला ? तोडलं वचन .....

      तेव्हा न्यायाधीश महाशय गयावया करत म्हणाले," असं नको रे करूस विश्वजीत माझं पुर्ण करिअर बरबाद होईल ना रे आयुष्यभर मिळविलेली इभ्रत एका क्षणात नष्ट होईल. बघ शिवाय तुझ्या सारख्या देशप्रेमीकाला हे कृत्य शोभत नाही आणि जर का तुझ्या हृदयात आपल्या देशाविषयी प्रेम आणि आपुलकी असेल तर तू माझा विश्वासघात करणार नाहीस."     
       असे म्हटल्यावर क्षणभर काहीच घडलं नाही. पण त्या नंतर मात्र हळूहळू मनुष्य आकृती स्पष्टपणे दिसू लागली. सर्वांना वाटले की ती मनुष्य आकृती विश्वजीतची आहे. कारण हुबेहुब तोच चेहरा आणि तीच अंगक्राती दिसत होती. पण आकृती हलेना की बोलेना. तेव्हा सर्वाना शंका आली. म्हणून पो. इन्स्पेक्टर अर्जुन त्या आकृती जवळ गेला  आणि त्याला स्पर्श करून पाहीले. तेव्हा जाणवले की तो विश्वजीत नसून विश्वजीत सारखा दिसणारा केवळ पुतळा आहे. तेवढ्यात विश्जीतचा आवाज कानी पडला - बॉडीलेस बघायची सर्वांची इच्छा होती ना मग पाहून घ्या. हाच तो बॉडीलेस !"
            तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर म्हणाला," हा तर केवळ पुतळा आहे."

     " हा पुतळा नाही रोबट आहे. "

     " मग तू कोठे आहेस. "

     " मी तुझ्या पाठीमागे उभा आहे. "

       असे म्हणताच पो. इन्स्पेक्टर अर्जुन ने पटकन मागे वळून पाहीलं तर खरोखरच विश्वासजीत कोल्हे उभा असलेला दिसला. तसा तो उद्गारला ," थॅक्स गॉड ! तू आला परत. नाहीतर माझी वाटच लागली असती."

     "  पण तुम्हांला माहीत नसेल की मी ईमानदार पोलिसांना कधीच त्रास देतही नाही म्हणून मी परत आलोय. " तेव्हा न्यायाधीश म्हणाले," चला हे सर्व जप्त करून टाका. " असा पोलिसांना त्यानी आदेश दिला. तेव्हा विश्वजीत कोल्हे बोलला," तुम्ही इथून काहीच नेऊ शकणार नाही. कारण थोड्याच वेळात एक धमाका होईल. आणि हे सर्व बेचिराख होईल. म्हणून तुम्ही सर्वजण अगोदर इथून बाहेर निघा. " असे म्हणताच सर्वजण पळत सुटले. जसे सर्वजण बाहेर रस्त्यावर आले. तसा एक मोठा स्फोट झाला आणि पडकी ईमारत जमिनदोस्त झाली. तेव्हा न्यायाधीशानी विचारले," हा काय प्रकार आहे ?"

     " हा सारा प्रताप त्या रोबटचा आहे. "

     " म्हणजे ?

     " मी जो रोबट बनविला होता ना त्यात एक अशी खूबी होती की जोपर्यंत त्यात अदृश्य होण्यासाठी वापरलेली चीप आहे तोपर्यंतच तो रोबट आहे. त्यातून चिप बाहेर काढली की तो बॉम्ब तयार झाला. आणि जर दहा मिनीटाच्या आत त्यात पुन्हा चिप टाकली नाहीतर तर त्याचा आपोआप स्फोट होईल आणि त्याचप्रमाणे स्फोट झाला सुध्दा ! "

     " अरे मग पुन्हा चिप का नाही टाकली आत ?"

     " काही नको. अशा खतरनाक रोबटची देशाला गरज नाहीये. कुणीही त्या रोबटचा गैर वापर करू शकतो. म्हणून मी त्याला नष्ट केला. "

     " अरे, पण त्याने तर चांगली कामं केली आहेत. "

     " हो ! कारण त्याचा रीमोट माझ्या हातात आहे म्हणून आणि समजा मी जर वाईट प्रवृतीचा मनुष्य असतो  तर याचा वापर वाईट प्रकारे सुध्दा करू शकलो  असतो. म्हणून शिक्षा ही व्हालाच पाहीजे. तरच गुन्हेगारीला आळा बसेल.  "
        " खराय तुझं ! विज्ञान शक्तीचा लोक दुरउपयोग पण करू शकतात. " पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर बोलला," आणि खरं सांगायचं तर तू बक्षीसाचा मानकरी आहेस. परंतु कायद्या दृष्टीने तू एक अपराधी आहेस म्हणून तुला या देशाची न्यायदेवता जी शिक्षा देईल ती तू स्विकारावीस. अशी माझी तुला विनंती आहें.  "

     " मला मान्य आहे अर्थात मी  आनंदाने कोणतीहीे शिक्षा भोगायला तयार आहे. " विश्वजीत उत्तरला त्यावर न्यायाधीश म्हणाले,"  तू फार चांगले केले आहेस. परंतु कायद्याचे उल्लघनही केले आहेस म्हणून तुला सहा महिन्याची कारावासाची शिक्षा ठोठावली जात आहे. असा न्यायमुर्तीनी निकाल दिला. त्यानंतर सायंटिस्ट डॉ. विश्वजीत याला सेन्ट्रल जेल मध्ये नेण्यात आलेे. दहशतवादी पकडले गेले. म्हणून पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकरचे प्रमोशन झालं आणि त्याचा दुसऱ्या पोलिस स्टेशनला ट्रान्सफरही झाला. पण त्याला अपराधी पकड्यासाठी खरी मदत कुणाची झाली असेल तर सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे यांची म्हणून पो. इन्स्पेक्टर राणेची सुध्दा सस्पेंडऑर्डर कॅन्सल होऊन त्याना पुन्हा कामावर रूजू होण्याचा आदेश मिळाला. परंतु आतंकवादी खरेच पकडले गेले होते का ? हा प्रश्न वादाचा ठरेल. कारण खरे आतंकवादी सुखरूप पाशा खान आणि जफर खान च्या अड्डयावर पोहोचले होते. आता तुम्ही म्हणाल हे घडलं कसं ? जसे पोलिसांचे खबरी असतात. तसे गुन्हेगार लोकांचे सुध्दा खबरी असतात. त्यामुळे पाशा खानने  पोलिसांना गुमराह करण्यासाठी अगोदरच एक योजना बनविली होती. त्या योजनेनुसार दोन्ही वेळी आतंकवादी पकडलेली माणसं पाशा खानचीच होती. आतंकवाद्याचा प्रमुख म्हणून पकडला गेलेला रशीद खान सुध्दा नकलीच होता. खरे आतंकवादी आणि त्यांचा प्रमुख इब्राहीम खान मागावून आला भारतात मध्ये आणि सुखरूपणे अड्डयावर पोहोचलाही आणि खरं सांगायचं तर जफर खान आपल्या उद्देशा मध्ये पुर्णपणेे यशस्वी झाला होता. पोलीस आणि बॉडीलेस ह्या दोघांनाही त्याने चांगलाच गुगारा देवून खऱ्या आतंकवाद्याना सहीसलामत आपल्या अड्डयावर आणले होते. त्यामुळे आतंकवाद्याचा प्रमुख त्याच्यावर फार खूष झाला होता. आणि त्याला भेटायला भारतात आला. अर्थात जफर खान आता मालामाल होणार यात यत्किंचितही शंका नाही. परंतु म्हणतात ना जास्त उत्तसाह ही माणसाला स्वस्थ बसू  देत नाही आणि मग आपल्या यशाचा डंका पिटण्याची त्याला हुरहुरी येते. तेव्हा त्याची विवेक बुध्दी सुध्दा त्यावेळी त्याच्या कामी येत नाही. अगदी तसेच झाले जफर खानचे ! कधी एकदा तूरुंगात जाऊन विश्वजीतला भेटतो असे झाले होते त्याला आणि म्हणतात ना विनाश कालीन विपरीत बुध्दी ! अगदी तीच अवस्था झाली जफर खानची! त्याने स्वतःचा वेश बदली केला. म्हणजे, कुणी आपल्याला ओळखू नये. म्हणून त्याने वेषांतर केले आणि सरळ तुरूंगात जाऊन डॉ विश्वजीतला भेटला नि त्याची खिल्ली उडवत म्हणाला," किती मुर्ख आहेस रे तू ? "

     " हु आर यू ?"

     " काम डाऊन ! बताता हू वैसे इस नाजिसको जफर खान कहते है कुछ आई बात समजमे नही आई ? कोई बात नही असे बोलून नकली लावलेली दाढी काढून दाखविली आणि पुढे बोलला," आता तरी ओळखले का ?" त्यावर डॉ विश्वजीत हसून म्हणाला," तुम्हे कौन नही पहचानता और सच बताऊ।

     " कैसा सच ?"

     " यही की तुम जैसे सुवर की औलादकों मै उसके महकसेही पहचान लेता हू।"

     " हरामजादे ! "

     " चिल्हाओ नही वरना पूलिस पहचानगी फीर यहाँ से निकल ना तो दूर की बात है सांस भी नही ले पाओगे  क्या समझें  "

     " तुझे मै देख लुगा. "

     " शौक से देख लो लेकीन अब यह बताओ की तुम यहाँ किस लिए आये हो ?"

     " बस्स तुम्हे यही बताने आया था  की   कीस तरह तुम्हे और तुम्हारे पुलीस को मैने कैसे गुमराह कर दिया हूं ! "

     " ऐसा तुम्हे लगता है वास्तव मे मैने तुम लोगोको गुमराह कर दिया. "

     " कैसे ?"

       सगळं काय आताच ऐकणार आहेस ?'

     " होय "

     " हो !"
     " मग अगोदर तू सांग तू काय तीर मारलेस ते " तेव्हा जफर खानने सांगितलं की दोन्ही वेळेला आतंकवादी म्हणून तुम्ही ज्या लोकांना पकडलेत ती सर्व माझीच माणसं होती. आधी पोलीस फसले आणि मग तूही फसलास  आणि स्वतःचाच हाताने स्वतःच अस्तित्व संपवून टाकलेस. ज्या बॉडीलेसची निमीर्ती तू केली होतीस त्याला तूच ठार मारून टाकलेस. आता बैस तुरूंगातील कच्च्या चपात्या खात. आणि मी जातो हिन्दूस्थानातील चार शहरे बेचिराख करायला. हिंम्मत असेल तर हे रोखून दाखव मला. नाहीतर मुखाट्याने हार मान्य कर. क्योकी बॉडीलेस तो मर गया अब कौन बचायेगा तुम्हारे भारत को ?" विकटपणे हसतो.

      " अरे बेवखूफ  मरते वो है जो पैदा होते है जो पैदा हुआही नही वो मरेगा कैसे ?"

     " क्या मतलब है तुम्हारा ?"

     " मतलब वही है की मैने तुम लोगों के साथ तीन पत्ती का डाव खेला था तुम्हे और पुलीस को गुमराह करने के लिए  सो मैने किया   "

     " तुम कहना क्या चाहते हो ?"

     " पहले मेरी पुरी बात सुनो ... हां तो मै क्या कह रहा था ? हां याद आ गया अब सुनो -पहला पत्ता मै उस वक्त खोला जिस दिन पो. इन्स्पेक्टर अर्जुन मुझे जेल मे मिलने आया था तब मैने उसे विश्वजीत की झुठ कहानी सुनाई थी और उसे सच लगी और फीर उन्हे मेरे अड्डेपर लेकर गया और उनके सामनेही  बम से  रोबट के साथ उडाया  इसलिए वो समझते है बॉडीलेस खत्म हो गया है और अब दुसरा पत्ता खोलने जा रहा हूं और तुम्हे एक सच बताने जा रहा हूं की बॉडीलेस आज भी जिंदा है और इस वक्त तुम्हारे सामने खडा है !" असं म्हणताच जफर खान घाबरून दो पाहूलं मागे सरकला. तसा डॉ विश्जीत हसून म्हणाला," डरो नही जब तक मै न कहू तब तक वो तुम्हे कुछ नही करेगा "

     " लेकीन यह कैसे संभव है ?" "असंभव को संभव करना मेरे बाए हाथ का खेल है "

     " नही-नही यह सच नही हो सकता "

     " तो जाओ तुम भी यही मानकर चलो समय आनेपर सच का पता चल जायेगा "

     " नाही हे शक्य नाहीये खोटं बोलतो आहेस तू ? मला घाबरविण्यासाठी होय ना ?"

     " जो पहलेशी डरा हूआ,? है उसे और क्या डरायेगे।"

   " बॉडीलेस इथं आहे तर त्याला आवाज काढायला सांग. "

     " ताकी जेलवाले भी जान जाए की बॉडीलेस जिंदा है इतना बेवखूफ समजा है क्या तुमने हमे ?"

     " तो कैसे माने ?"

     " मानने की जरूरत नही है तुम जल्दी अपने अड्डेपर पहूँच जाओ क्योंकी अब बॉडीलेस निकल पडा है तुम्हारे अड्डे की ओर और उसकी रफ्तार  इतनी तेज है की हवा भी नही पहुच सकती है उससे पहले"

     " क्या बकते हो "

     " बकता नही सच कहता हूं  अगर तुमको झुठ लगता है तो थोडा देर इंतजार करो समाचार भी आ जायेगा  एफ. एम. रेडिओ पर  रेडिओ चालू करो रे असे म्हणताच जफरखान एकदम घामाघूम झाला आणि मग माघारी वळला आणि पळत सुटला. तसा डॉ. विश्वजीत हसून बोलला, " साला, आया था मुझ मुझे डराने लेकीन खुदही डरकर भाग गया "

     " म्हणजे तू खोटं सांगितलंत त्याला ?"

     "  तुला वाटतं का ? मी खोटं  सांगेन असं ?"

     " म्हणजे खरंच बॉडीलेस गेलाय ?"

     " हां तुला काय खोटं वाटतं ?"

     " नाही खोटं कसे म्हणेण मी "

     " विश्वास आहे ना ?

     " हो !'

     "  मग झालं तर !"

     " मी काय म्हणत होते हां तीन पत्ता ही काय भानगड आहे ? आणि  तिसऱ्या पत्त्याचं रहस्य काय आहे ?"

     " तिसऱ्या पत्त्याचं रहस्य हे आहे की बॉडीलेस वास्तव मे कौन है ? यह पता सबको हो जायेगा।
          असे बोलून मोठ्याने ओरडायला सुरूवात केली. तसे शिपाई आणि जेलर पळत  तेथे आले. तेव्हा डॉ विश्वजीत ओरडतच म्हणाला," अहो, साहेब तो बघा जफर खान पळतोय पकडा त्याला. "
         तेव्हा जेलरने विचारले," कोण जफर खान ?" तेव्हा साहेब तुम्ही आताच्या आता पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे ना फोन करा आणि सांगा जफर खान आता नुकताच येऊन गेला आणि सांगितले की खरे आतंकवादी त्याच्याकडे सुरक्षित आहेत आणि जे आतंकवादी म्हणून पकडले गेले. अथवा पोलीस चकमकीत ठार झाले ते सर्व नकली होते. अर्थात ते सर्व जफर खानच्या गैंगची माणसं होती. परंतु आता जे जफर खानच्या अड्डयावर आहेत. तेच खरे आतंकवादी आहेत. त्यावर जेलर म्हणाला," ठीक आहे .मी फोन करून सांगतो त्याना. असे बोलून जेलर  तेथून निघून गेला.
          तसा विश्वजीत स्वतःशीच म्हणाला,"आता खरी बॉडीलेसला माझी गरज आहे. मला इथून निघायलाच हवं.असे मनात बोलून जयचंदकडे वळत पुढे म्हणाला," जयचंद मला बॉडीलेस मदतीला जायला हवंय रे. "

     " बॉडीलेस एकटाच सगळ्यांना पुरून उरेल."

     " हो ! मान्य आहे. परंतु तो माझ्या आदेशा खेरीज काहीच करू शकणार नाही. "

     " पण तू जेलच्या बाहेर जाणार कसा ?"

     " दुनियाकी किसी भी जेल की दीवार इतनीे पक्की नही जो विश्वजीत को कैद कर सके ! जेल मे आने का सिर्फ बहाणा था जो बिल मे छुपे साप को बाहर निकालना था सो मैने निकालही दिया बस्स! अब उसक फन कुछलना बाकी है और उसीके लिए मुझे जाना जरूरी है "
          असे बोलून त्याने डावा पाय वर उचलला आणि शुजच्या एका कप्प्यात लपविलेली एक छोटीशी डबी बाहेर काढली आणि दुसऱ्या कप्प्यातून फॉऊटण पेनच्या आकाराची ड्रील मशीन काढली आणि त्या डबीतील छोटीशी चीप बाहेर काढली आणि ती मनगटावर दाबली आणि त्याच क्षणी विश्वजीत गायब झाला.  तेव्हा जयचंद बोलला," मी पण येतो तुझ्या बरोबर " तेव्हा विश्वजीत बोलला ," तू नको येऊस कारण हा शेवटीचा सामना आहे. तेव्हा तेथे काहीपण घडू शकते. मी मेलो तर माझ्या पाठीमागे रडणारं कुणी नाही आहे. पण तुझं तसं नाहीये. तुझ्या मागे तुझी पत्नी आहे आणि  काही दिवसापूर्वीच मला कळाले की, तुझी पत्नी खूप सुंदर आहे. तेव्हा तिच्या सोबत सुखाने संसार कर एवढीच माझी कामना आहे आणि दुसरं काय देऊ शकतो. मी तूला !  सिर्फ दूवाये दे सकते हैे आबाद रहो खुष रहो  चलो चलता हूं  बच गये तो फीर मिलेगे वरना इतनाही साथ था हमारा "असे बोलून जायला निघाला तसा जयचंदला एकदम गहीवरून आलं. तेव्हा जयचंद बोलला," एक बार गले नही लागोगे ? " शेवटी पुन्हा विश्वजितला वास्तविक रुपात यावे लागले. त्यानंतर   त्याने विश्वजीतला कडकडून मिठी मारली. त्यानंतर विश्वजीतला पुन्हा चिप मनगटात टाकून गायब व्हावे लागले. तेथून जायला निघाला. पण त्या अगोदर बाजूच्या कोठडीत जाऊन जफर खानच्या एका माणसाला गायब केलं. कारण जफर खानने आतंकवाद्याना जरूर गुप्त स्थळी नेऊन ठेवले असावे. म्हणून त्याच्या साथीदाराला सोबत घेणे गरजेचे होते. आणि जेलच्या बाहेर येताच त्याला आदेश दिला की मुखाट्याने गाडीत बस आणि तुझ्या बापाच्या घरी म्हणजे जफर खानकडे घेऊन चल. बॉडीलेसचा आवाज ऐकून तो जाम टरकला. मग नाही म्हणण्याचा प्रश्न कुठं उरला.

                                 

  क्रमशः




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.