Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

बॉडीलेस १३

बॉडीलेस १३
बॉडीलेस १३

 

        

          ठरल्या प्रमाणे पाशा आणि जफर खानची माणसं ठीक -ठिकाणी दबा धरून बसली होती. त्याच प्रमाणे बॉडीलेस गैंगची माणसं देखील त्यांच्यावर नजर ठेवून होती आणि त्या सर्वावर पोलीस पथकाची नजर होती. प्रत्येकाला वाटत असते की, आपणच सर्वांवर मात करू. असो-
        सर्वजण समुद्र मार्गावरून येणाऱ्या दहशतवांद्याच्या जहाजाची वाट पाहत होते. पण जहाज येण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. वाट पाहून पाहून सर्वजण कंटाळलेच होते जणू ! एवढ्यात समुद्र किणाऱ्यापासून खूप दूरवर एक जहाज किणाऱ्याच्या दिशेने येताना दिसले. बहुधा ते जहाज दहशतवाद्यांचेच असावे. असा तर्क सर्वांनी केला असावा म्हणूनच की काय सर्वांनी पवित्रा घेतला. ते जहाज जसे जवळ आले. तेव्हा एक माणूस जहाजावरून टेळहणी करत असल्याचा दिसला. बहुधा किणाऱ्याला आपल्याला धोका तर नाही याचा अंदाज तो घेत असावा. असे त्याच्या हावभावा वरून वाटत होते. थोड्याच वेळात चार माणसं उतरताना दिसली. त्या लोकांना घेण्यासाठी काही माणसं पुढे सरसावली. त्याचक्षणी पोलिसांनी त्या सर्वांना गराडा घातला. पोलिसांना पाहून ते चारीजण पुन्हा जहाजाच्या दिशेने पळू लागले होते.  पण पोलिसांनी त्याना संधी दिली नाही. पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकरने  वर हवेत एक गोळीबार केला नि सर्वांवर रिव्हॉल्व्हर रोखत म्हटले ," खबरदार ,जागचे हलाल तर फुकटच मराल. " पण त्यांच्या धमकीला न घाबरता पाशाच्या माणसानी गोळीबारी सुरू केली. त्यामुळे काही पोलीस जखमी झाले. मग पोलिसांनी पण त्याना प्रत्युत्तर दिले त्यात बरेचसे गुंड मारले गेले नि काहीजण पकडले गेले तर काहीजण पळून गेले. त्यात बहुतेक बॉडीलेसने जीवदान दिलेल्या पैकीच होते.
       आणि ज्याना पोलिसांनी पकडले होते. त्याना पोलीस व्हॅन मध्ये घालून पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालेच होते. तोच अचानक बॉडीलेसच्या गैंगच्या माणसानी पोलीसावर हल्ला चढविला. पोलिसांना त्याची अगोदरच कल्पना होती. कारण जयचंदच्या वेषात असलेल्या सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे ने पुर्व सुचना दिलेली होतीच !
         त्यामुळे ते सावध होते. त्यांनी बॉडीलेसच्या साऱ्या माणसाना गोळ्या घातल्या. कारण त्याना पकडून पोलीस स्टेशनला नेण्यात काहीच अर्थ नव्हता. हे पो. इन्स्पेक्टर अर्जुनला चांगले माहीत होते. पण त्यातून बळी निसटलाच अचानक कुठं गायब झाला ते कळलच नाही कुणाला. परंतु जयचंदच्या फक्त पायावर गोळी मारून जखमी केले आणि त्याला पळायची मुद्दाम संधी दिली. मात्र त्याचा पाठलाग करण्याचे नाटक पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकरने व्यवस्थितपणे पार पाडले. त्यामुळे कुणाला संशय येण्याचा प्रश्नच राहीला नाही मुळी !
        त्यानंतर पोलिसांची व्हॅन त्या चार आतंकवाद्याना आणि जफर खानच्या माणसांना घेऊन पोलिसांची व्हॅन स्टेशनला जायला निघाली. पण त्याचक्षणी अचानक पोलिसांच्या व्हॅन मधून पोलीस चालक बाहेर फेकला गेला आणि त्याच्या पाठोपाठ इतर पोलीसही एकामागोग बाहेर फेकले जाऊ लागले होते. शेवटी फक्त आतंकवादी तेवढे व्हॅन मध्ये उरले. त्याना मात्र धडकीच भरली. आता आपलं काय होईल याची ते लोक कल्पना सुध्दा करू शकत नव्हते.
भितीने सर्वजण थर थर कापू लागले होते. सर्वांच्या मुखी एकच उदगार - आता बॉडीलेसच आलाय. आता आपली काही धडगत नाही. असं सर्वांना वाटत होतं. एवढयात व्हॅन मध्ये बसलेल्या पोलिसांना बाहेर फेकले गेले आणि त्याचक्षणी व्हॅन पळत सुटली. पोलीस स्टेशनच्या विरूद्ध दिशेने पो. इन्स्पेक्टर अर्जुन ने जीप मधून त्या पोलीस व्हॅनचा
निष्फळ पाठलाग केला. परंतु थोड्याच वेळात पोलीस व्हॅन दृष्टी आड झाली. अचानक व्हॅन कुठं गायब झाली ते कळलच नाही. पण तेवढ्यात हेड कॉन्स्टेबल जयदेव बोलला," साहेब आपली व्हॅन पडक्या ईमारती जवळ नक्की सापडेल. "
       "  कशावरून सांगतोयेस ?"
       "  कारण बॉडीलेसची मोटार सुध्दा तेथेच उभी असते."

         " हे आता सांगतोयेस ? अगोदर सांगायला काय झालं होतं ?"
        " मला वाटलं तुम्हांला माहीत असावं. "
        "  माहीत असतं तर तिथं पोलिसांचा पहारा बसविला नसता काय ?"
         असे म्हणताच हेड कॉन्स्टेबल जयदेवच्या ध्यानात आलं की सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणेचं नेमके काय चुकले. ते पण या क्षणी काहीही बोलणं उचित ठरलं नसतं. म्हणून तो गप्पच राहीला. त्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन पुढे बोलला,"  मला वाटतं या क्षणी पडक्या ईमारती जवळ पोहोचणे जास्त फायदेशीर ठरेल.
        " तुला असं तर नाही म्हणायचं की,पोलीसांनी त्याला रंगेहात पकडले असते. सस्पेंड पो. इन्सपेक्टर वीरेंद्र राणे बोलले.
         सत्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर काहीच बोलला नाही. कारण त्याला सुध्दा ठाऊक होतं की, बॉडीलेसच्या माणसाना पकडणं एवढे सोपे नव्हते आणि समजा पकडलेच त्याना तरी काय फायदा ? बॉडीलेस पोलीस  स्टेशनला येणार आणि सहीसलामत घेऊन जाणार त्याना. त्यापेक्षा त्याना गोळ्या घालून ठार केले हेच योग्य केले. पण खरा बॉडीलेसचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा बळी तर पोलीसांच्या हातावर तुरी देवून पळून गेला आणि सोबत आतंकवाद्याना पण घेऊन गेला. आता वरीष्ट अधिकाऱ्याना आणि जनतेला काय उत्तर द्यायचे ? बहुधा हाच प्रश्न त्याना पडला असावा. शिवाय पोलिसांच्या अब्रूची लक्तरे उद्याच्या वृत्तपत्रात चव्हाट्यावर मांडली जातीलच ! शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्याना उत्तर देता देता नाकीनव येतील. काय करावं ते सुचत नव्हतं. पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकरला तेवढ्यातच त्यांची जीप त्या पडक्या ईमारती जवळ येऊन पोहोचली. आणि खरंच तेथे पोलिसांची व्हॅन तेथे रिकामी सापडली. त्यात एक चालक बसला नि व्हॅन पोलीस स्टेशनला घेतली. पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर हताशपणे आपल्या खुर्चिवर जाऊन बसला आणि विचार करू लागला की,यातून स्वतःला कसं वाचवावे. पण सुचत मात्र काहीच नव्हते. आता फक्त एकाच बातमीची वाट पाहत होता आणि ती गोष्ट म्हणजे सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंदर राणे आतंकवाद्या बद्दल काय माहिती देतो याकडे त्याचे डोळे लागले होतें आणि थोड्याच वेळात सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणेंचा फोन आला की,आपली सर्वांची जफर खान बंधूनी दिशाभूल केली. त्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर ने विचारले ," म्हणजे ?" तेव्हा सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे बोलला की, आतंकवादी म्हणून पकडलेली माणसं खरे आतंकवादी नाहीयेत. ती जफर खान बंधूची माणसं आहेत. खरे आतंकवादी अजून यायचे आहेत. अथवा एवढ्यात आले सुध्दा असतील. " तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर आश्चर्य चकीत होऊन हर्षभराने बोलला,
           " वाव ! म्हणजे, पोलिसांना तर चकमा दिलाच !  त्यानी पण बॉडीलेसला सुध्दा गुंगारा दिला. त्या दोघांनी मानलं बुवा ! त्यांच्या रणनितीला. "
          त्यावर सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे चिडून बोलला," गुन्हेगारांची प्रशंसा कशाची करतोयेस ? पोलिसांना मुर्ख बनविले. त्यानी त्याचं काहीच वाटत नाही तुला ?"
        " सॉरी सर मला राहावलं नाही म्हणून म्हटलं मी. "
        "  बरं बरं मी आता काय सांगतो ते नीट ऐक."
        " सांगा बरं. "
        त्यानंतर सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे ने बॉडीलेसचे पुढील प्लॅनची माहिती दिली. ती अशी - बॉडीलेसने चारही आतंकवाद्याना ठार मारण्यासाठी आरोपी पिजंऱ्यात उभे केले.
        आणि  त्याना खडसावून विचारले," काय रे ए भडव्यानो ज्या ताटात जेवलेत त्याच ताटाला छिद्र पाडायला निघालेत तुम्ही! लाज नाही वाटली तुम्हांला ?"
       " क्या मतलब है तुम्हारा ?" एक अतिरेखी हिंम्मत करून बोलला.
        " मतलब पुछ रहा है बे साले ?" असे बोलून एक कानाखाली ठेवून दिली. तसा तो कावरा-बावरा होऊन आपल्या आजूबाजूला पाहू लागला. पण बोलणारा कुणी दिसत नव्हता. फक्त त्याचा आवाज येत होता. ते पाहून त्यांचे पाय लटलट कापू लागले. तसा बॉडीलेसचा आवाज उमटला,   " अब सिधी तरह बताते हो या फेक दू जलती हुई शेगडी में "
         त्या चौघाना वाटलं की, आपल्याला फक्त धमकावतोय. त्यामुळे ह्याला काही खरी माहिती सांगण्याची गरज नाही आणि ह्याला खरी माहिती दिली तर पाशा बॉस आपल्याला काही जिंवत सोडणार नाही.  त्यापेक्षा न बोललंच बरं. असा विचार करून तो गप्पच राहीला.  पण बॉडीलेस गप्प बसणाऱ्यांची बत्ती कशी गायब करतो हे त्या लोकांना बहुधा माहित नसावे.  असो.
        " ठीक है तुम लोग ऐसे नही मानोगे " असं बोलून एका अतिरेखेला अलगद उचलले नि जळत्या इलेट्रीक शेगडीत फेकून दिलं. फक्त एकदाच मोठ्याने ओरडला तो आणि क्षणात जळून खाक झाला. ते भयानक दृश्य पाहून बाकीचे थरथर कापू तर लागलेच शिवाय त्यानी सारं सत्य ओकून टाकलं.त्यातील एकजण बोलला की आम्ही खरे आतंकवादी नाही आहोत. तेव्हा बॉडीलेसने दरडावून विचारले की मग कोण आहात तुम्ही ?" तेव्हा त्यानी आपण पाशा खान बंधूची माणसं आहोत हे कबूल केलं. तेव्हा बॉडीलेस त्या तिघाना विचारले ," खरे आतंकवादी कधी येणार आहेत ?"
         तेव्हा त्यांनी सांगितले की , " तुम्हाला आणि पोलिसांना फसविण्याची ती एक पाशा बॉसची चाल होती आणि त्यात तुम्ही फसले देखील. खरे आतंकवादी मागावून येणार होते. किंवा आले देखील असतील. " त्यावर बॉडीलेस बोलले ," ही बातमी तरी खरी आहेना ?" त्यावर एकजण बोलला,"     सोलाना सच है "
          " अगर झुठ निकला तो ?"
          "  आप हमे जो भी सजा देंगे वह हमे मंजूर है ."
          " ठिक है एक बार भरवसा करके देख लेते है  फिरहाल तुम लोग हमारे मेहमान बनकर रहोगे ? क्या हमारे साथी बनकर रहना पसंद करोगे ? फैसला तुम्हे करना है बोलो क्या पसंद करोगे ?"
         अगोदर तिघांनी एकमेकाकडे पाहून एकमेकांना खुणेनच विचारले आणि खूणेनच एकमेकांना आपल्या मनातील मनोगत सांगितले. त्यानंतर त्यातील एकजण बोलला, " हमे आपका साथी बनना मंजूर है "
         " व्हेरी गुड!  एकदम सही फैसला कीया है तुम लोगोने लेकिन यादे रहे गद्दारी की सजा सिर्फ  मौत है और उस सजासे कोई नही बचा सकता है मै भी नही " एवढे बोलून बॉडीलेस जफर खानच्या अड्डयावर हल्ला करण्याची ऑर्डर दिली आहे. तेव्हा आम्ही सर्वजण तिकडेच जात आहोत. तेव्हा तू सुध्दा आपले पोलीस पथक घेऊन जफर खानच्या अड्ड्यावर छापा मार सर्व तेथेच सापडतील." एवढे बोलून फोन कट केला. त्यानंतर पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर एक पोलीस पथक घेऊन निघाले.
           पोलिसांना आणि बॉडीलेसला गुंगारा देवून पाशा खान बंधूच्या साथीदारानी खऱ्या आतंकवाद्याना सुखरूप सुरक्षास्थळी पोहोचविले होते. तेव्हा पाशा खान एकदम खूष झाला. त्याने ती खूष खबर आतंकवाद्याच्या प्रमुखाला दिली. तेव्हा तो देखील खूष झाला नि म्हणाला," मी थोड्याच वेळात तेथे पोहोचतोय मला सुध्दा पहायचंय की कोण  बॉडीलेस आहे तो. शिवाय त्याच्याकडे असलेला अदृश्य होण्याचा फार्म्युला सुध्दा मला पाहीजेल. " त्याचे हे वक्तव्य ऐकून त्या दोघांचा चेहरा काळा ठिक्कर पडला. कारण त्या खान बंधूना सुध्दा तो अदृश्य होण्याचा फार्म्युला हस्तगत करावयाचा होता. तेव्हा पाशा खान मनात बोलला,
      "  आता ह्या हरामखोराला अदृश्य होण्याचा फार्म्युला पण हवाय. जो इथं आम्हांलाच मिळणं मुश्कील झालाय. "
          असे मनात बोलून पुढे उघडपणे स्पष्ट शब्दात बोलला, " हां तो पण मिळवून देऊ. पण त्यासाठी.... पुढील बोलणं न ऐकताच तो अगोदरच बोलला ," पैशांची चिंता तू अजिबात करू नकोस. त्या फार्म्युलासाठी पैशांचा पाऊस पाडीन मी! "असे बोलून त्याने फोन कट केला. तसा पाशा रागाने बोलला," हरामखोर पाजीसाला ! म्हणे पैशांचा पाऊस पाडेन. तुझ्या पैशाना इथं कोण कुत्रा विचारतो का रे ? म्हणे पाऊस पाडेन !" तेव्हा जफर खानने विचारले ," काय झालं छोटेभाय ?" त्यावर पाशा बोलला," तो रे रशीद खान साला मला म्हणतो अदृश्य होण्याचा फार्म्युला मला मिळवून दे. मी तुला मालामाल करीन म्हणून. "
         " त्याला कसं कळलं ? अदृश्य होण्याचा फार्म्युला भारतात आहे म्हणून ?"
          " कुणास ठाऊक कसं कळलं त्याला ?
          " मला वाटतं इथं आलेल्या त्याच्या साथीदारानी सांगितले असेल किंवा वृत्तपत्रात बातम्या ज्या छापून येतात. आजकाल त्या हरामखोर पत्रिकानी बॉडीलेसला एकदम हिरो बनवून टाकलं."
           " खराय !"
           " मग आता पुढे ?
           " पुढे काय त्याच्या हातात फार्म्युला देण्याइतपत आपण काय मुर्ख आहोत. फक्त एकवेळ तो फार्म्युला आपल्या हाती तर लागू दे. मग बघ साऱ्या जगावर कशी आपण हुकूमत करतोय ते. " असं एकदम खूष होत तो बोलला.  तेव्हाच जफर खान मनात बोलला ,  " बेवखूफ तू फक्त स्वप्नेच बघ. तो फार्म्युला तुझ्या हाती पण लागू देणार नाही मी . पण लगेच त्याच्या मनात दुसरा विचार आला की, पण आपल्याला तरी कुठं ठाऊक आहे की, तो फार्म्युला बॉडीलेस कडून हस्तगत कसा करणार या संबंधित काहीतरी उपाच शोधायला हवा. किचिंत विचारमग्न झाली नि लख्ख प्रकाश त्याच्या डोक्यात पडला. तसा तो स्वतःशीच उद्गारला, " त्या फार्म्युल्या पर्यंत पोहोचायचा रस्ता फक्त एकच आहे आणि तो रस्ता म्हणजे बळी ...हां त्यालाच ठाऊक आहे की, बॉडीलेस कोण आहे ? आणि  त्या फार्म्युृलाचा राज काय आहे ? म्हणून त्या बळीचे अपहरण करायला हवं. पण कसं करणार ? कारण त्याला पकडलं की, लगेच बॉडीलेस आलाच वाचवायला. तेवढ्यात एक विचार मनात आला आणि तो हा की बॉडीलेसला बोलवायचं साधन काय आहे तर तो बळी जवळ असलेला टॅब तो अगोदर हस्तगत करायला हवा आणि मग बळीला मजबूर करायला हवे की, आम्हांला बॉडीलीसचे राज सांग.  तरच आम्ही तुला टॅब देऊ. मग काय त्याच्या जवळ दुसरा  पर्यायच नसेल.  योग्य तो उपाय सुचल्यामुळे त्याने स्वतःलाच धन्यवाद दिले. तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहत पाशा बोलला," भाईजान आप बहूत खुष नजर आ रहे है कोई नया उपाय खोज निकाल दिया क्या ?"
        " नही रे अब तक तो कोई उपाय न सुजा लेकीन बहुत जलदी कोई न कोई उपाय जरूर दुंढ लेंगे तुम फिकीर मत करो."
        " हम फिकीर नही कर रहे है बल्की यह सोच रहे है की, अगर वह  फार्म्युला हम दो भाई को मिल जायेगा  तो हम लोग दुनियापर राज करेंगे "
       " जरूर करेंगे लेकिन उससे पहले हमे यह तय करना है की भारत के कीन शहरो मे बम ब्लास्ट करना हैे ?" त्यावर तो बोलला," उस में सोचना क्या है ? भारत के मुख्य चा शहरो में बम ब्लास्ट करना हैे जैसे की मुंबई,चेन्नई,दिल्ली और कोलकोता लेकीन, पहला नंबर मुंबई का होगा  क्योंकी मुंबई में सबसे ज्यादा आबादी है पाशाने सांगितले. त्यानंतर सर्व माणसाना त्यांचे कामं नेमून देण्यात आली. तेवढ्यात त्यांचा प्रमुख रशीद खान सुध्दा आपल्या खाजगी विमानाने तेथे हजर झाला. त्याला अलिगन देवून त्याचे स्वागत केले. त्यानंतर त्याच्या मनोरंजनासाठी नाचगाणं ठेवण्यात आलं होतं. त्या मध्ये एकदम बेधुंद होऊन सर्वजण नाचत होते. आणि त्यांचं मद्यपानही सुरू होतं.
           मोटर पाशा खानच्या अड्डयावर पोहोचली. मोटारी मधून सर्व खाली उतरले. त्यानंतर पाशाची तीन माणसं पुढं सरसावली. कारण त्याना फाटका जवळ कुणी रोखणार नाही हे बळीला ठाऊक होते. म्हणून त्याना पुढं जाण्याची अनुमती मिळाली. ते दोघेही फाटका जवळच जाताच फाटका जवळ उभा असलेल्या सिक्युरीटीने त्या दोघांना ओळखले. जसे फाटक उघडले. तसे ते दोघे सरळ आत गेले आणि त्या दोन्ही सुरक्षा रक्षकाना बेशुध्द केले. त्यानंतर फाटक उघडले गेले. तसे बळी,जयचंद आंत शिरले. रस्तात आडवे येणाऱ्या सर्व सुरक्षाना आडवे करीत पुढे निघाले. शेवटी आंत पोहोचले. जिथं पाशा खानची महफील सुरू होती. अगोदर ते तिघेजण पुढे होतात. त्या तिघांना सुखरूप आल्याचे पाहून तो एकदम खूष होतो. पण क्षणभरच ! लगेच दुसऱ्या क्षणी त्याला शंका येते की, बॉडीलेसच्या तावडीतून सहीसलामत वापस येणे महाकठीण काम आहे आणि असं असताना तुम्हा तिघांना सोडलं कसं ?  काहीतरी घोळ आहे. असा विचारू  मनात करून त्याने सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने विचारले," तुम्ही तिघंच आलात का ?"
        " हो !"
        " चौथा कुठं आहे आँ ?
        " त्याला बॉडीलोसने ठार मारून टाकले."
        " आणि तुम्हा तिघांना सोडले.
        " हां !"
        " का ?"
        " कारण त्याला तुमच्या साऱ्या प्लॅनची खरी माहिती आम्ही देवून टाकली. "
        असे म्हणताच उलट्या हाताची थप्पड त्या तिघांच्या गालावर पडली नि लगेच त्या तिघांवर रिव्हॉल्व्हर रोखत म्हटलं ,' हरामखोरानो मी आता तुम्हां लोकांचा जीवच घेतो."  
      असे म्हणून त्या तिघांवर गोळ्या झाडणार  इतक्यात कुठून तरी सू ss सू ss करत गोळी आली नि पाशा खानच्या हाताला लागली आणि पाशा खानच्या हातातील पिस्तूल खाली पडले. म्हणून पाशा खान ने गांगरून वरती पाहीले.  तेव्हा  गॅलरी मध्ये बळी उभा असलेला दिसला. बळीला पाहून पाशा समजला. ज्या अर्थी बळी इथं आहे त्या अर्थी बॉडीलेस पण इथच जवळपास कुठंतरी असणार  हे जसे आठवले. तसा त्याला दरदरून घाम फुटला  आणि पाया खालील जमीन सरकल्याचा भास झाला जणू ! आता कसंही करून बळीच्या हातातील टॅब हस्तगत करायला पाहीजे. असा विचार मनात सुरू असतानाच बळीने वरून खाली झम्पं मारली नि पाशा खानच्या कानशिलावर पिस्तूल ठेवून म्हटले," तुला काय वाटलं, आमच्या बॉसला उल्लू बनविने एवढं सोपे आहे ? त्यावर पाशा खान हसून म्हणाला," त्यात उल्लू बनवायचं काय बाकी ठेवलं आहे  ? शेवटी बनविलेच ना त्याला उल्लू !'
         " तू मला नाही बनविलेस उल्लू ! उलट तुझ्या त्या खास पाहुण्या पर्यंत पोहोचण्याची संधी दिलीस तू आम्हां. "
         " आलात  आपल्या मर्जीन ! पण इथून बाहेर जाणार माझ्या मर्जीनं ! कळलं ?
         " अरे , वा ! मृत्यू दरवाजात उभा आहे तरी स्वप्न पाहण्याची संधी मात्र सोडु नकोस तू !" एवढ्यात पाठीमागून विक्रम आला बळीच्या पाठाला पिस्तुल टेकवत बोलला, 
      "खबरदार,जागचा हललास तर !"
     " शाब्बास विक्रम !" असे बोलून बळीच्या हातातील पिस्तुल खेचून घेतली नि त्याच्यावरच रोखून म्हटले,' विक्रम ह्याचे खिशे तपासून पहा आणि हयाच्या खिशातून टॅब बाहेर काढ. " असे म्हणताच विक्रम खिशे तपासायला तो खाली वाकला आणि त्याच वेळी नेमका पाशा खानचा लक्ष किचिंत त्याच्यावरून दूर झाले ब बस ! त्याच संधीचा फायदा उजलून बळीने आपला डावा पाय वरती उचलला आणि त्याची ठोकर खाली वाकलेल्या विक्रमच्या नाकावर बसली. विक्रम कळवळला नि उलटा पाशा खानच्या अंगावर कोसळला.         त्यामुळे पाशा खानच्या हातातील पिस्तूल दुर फेकले गेले. ते पिस्तुल पुन्हा हस्तगत करण्यासाठी पाशा खान ने त्यावर झेप घेतली. पण बळी सावध होताच त्याने झटकन पुढे येऊन पाशा खानच्या हातावर पाय दिला नि दुसऱ्या पायाची ठोकर पाशाच्या डोक्यावर मारली. पाशा उताणा पडला. तेव्हा विक्रम बळीला मारायला धावला. तोच चयचंदने अडविले. दोघां मध्ये हाणामारी सुरु झाली. त्याच क्षणी पाशा खानची माणसं एकमेकांवर तुटून पडली आणि खरे सांगायचे तर पाशा खानच्या विरोधात लढणारी माणसं दुसरी कुणी नसून बॉडीलेसने जीवनदान दिलेली, माणसं होती ती. पण जफर खानला त्यातलं काही माहीत नसल्याने, तो भयंकर चिडला. आणि म्हणाला," निमकहराम हे काय चाललंय तुम्हां लोकांचं ? दुश्मनाशी लढायच्या ऐवजी आपसामध्येच लढताय !" पण कुणीही त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. म्हणून रागाने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यात बरेच से साथीदार मृत्यूमुखी पडले. हे पाहून रशीद खान घाबरला नि स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी हेतू ने त्याने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात बळीचे लक्ष त्याच्याकडे गेले. तसे बळीने खाली पडलेले पिस्तुल उचलले  नि पळत जाऊन रशीद खानच्या पाठीशी लाविले.  तेव्हा रशीद खान दचकून उभा राहीला. तसा बळी गर्जला," एवढी घाई का आहे रशीद खान ? अजून बरंच काही पहायचय तुला. "  एवढं बोलत असतानाच बळीच्या पाठीला पाशाने एके ४७ लावत बोलला," एकदम बरोबर बोललास तू बळी, एकदम बरोबर." आणि ते पाहून जफर खान एकदम खूष होत म्हणाला," शाब्बास पाशभाय शाब्बास !
          असे बोलून त्याने बळीच्या हातातले  पिस्तुल खेचून घेतले. तेव्हा पाशा आपल्या साथीदाराना बोलला," बांधा रे ह्या हरामखोराना. " तेव्हा उरलेल्या पाशाच्या माणसानी त्या दोघांना म्हणजेच बळी आणि जयचंद ला बांधून घातले. तेव्हा नुकतेच बॉडीलेसच्या गैंग मध्ये सामील झालेले पाशा खानचे साथीदार घाबरले नि एकमेकाकडे पाहू लागले आणि एकमेकाशी नजरेच्या खुणेने विचारू लागले की आता काय करायचे ? तेव्हा त्यातील एकजण नजरेच्या खुणेने सांगू लागला की, काहीही करायचं नाही. फक्त गप्प राहायचं आपण बॉडीलेसच्या गैंग मध्ये सामिल झालो हे अद्याप आपल्या बॉसला माहीत नाहीये. कदाचित हेच खुणेने एकमेकांना  सांगत होते जणू !"
        पण त्यांची ही खुणवा खुणवी चानाक्ष पाशाने ओळखली नसती तर ते नवल म्हणावे लागले असते. पण तसे काही झाले नाही पाशाने ओळखले की, आपली माणसं मघाशी एकमेकांशी का लढत होती तो समजला तसे त्याने आपल्या हातातल्या एके ४७ ने त्यांच्यावर गोळ्याच वर्षाव करत बोलला," हरामखोर आमच्या वैऱ्यांच्या गटात सामील झालात.  तुमची ही  हिंम्मत ? त्यानंतर त्याने बळीच्या गळ्यावर एके ४७ टेकवत म्हणाला," आता बोल काय शिक्षा देवू मी तुला ?" तेव्हा रशीद खान बोलला," पाशाभाय पुछ क्या रहे हो ? उडा दे हरामजादेको !"  पाशा बोलला," नही नही इतनी आसानीसे नही मारूंगा मै  इसे पहले इसीसे उस फार्म्युला के बारे मे पुछना है , असे बोलून मान वळवून बळीकडे पाहत तो पुढे म्हणाला," बोल बळी कुठं आहे तो अदृश्य होण्याचा फार्म्युला ? पण बळी त्याच्या प्रश्नांचे उत्तर न देता फक्त हसला. ते पाहून पाशा खान अधिकच चिडला नि म्हणाला," हरामखोर हसू नकोस नाहीतर ह्या बंदुकीतील साऱ्या गोळ्या तुझ्या भेजात उतरवीन. " पण त्याच्या बोलण्याचा बळीवर यत्किंचितही फरक अथवा भय जाणवले नाही. उलट तो हसून त्याचा उपहास करत होता. खरं तर पाशा खानचा राग अनावर झाला होता जर त्याला बळी कडून फार्म्युला विषयीची माहिती मिळवायची नसती तर त्याने आपली एके ४७ पुर्ण बळीवर खाली केली असती. एकीकडे पाशा खान चिडला होता तर दुसरीकडे जफर खानला प्रश्न पडला होता की, इतका वेळ झाला तरी बळीच तारणहार बॉडीलेस अजून का आला नाही. बरं मग त्याला आठवले की, आपण सुध्दा असेच एके दिवशी बांधून ठेवले होते. तेव्हा सुध्दा फार उशिरा बॉडीलेस त्याला वाचवायला आला होता. या वेळी सुध्दा असेच काही प्लॅन  नसेल ना त्याचं ? बहुधा तसेच काहीतरी असावे. म्हणून तो नुसता हसतोय हे जसं ध्यानात आलं. तशी ती गोष्ट त्याने आपल्या लहान भावाला म्हणजेच पाशाला सांगितली. तसा पाशा खान बोलला," एss तू आता बोलणार आहेस का तुझा भेजा उडवू . ?"
          त्यावर बळी हसून बोलला," तू मला मारू शकत नाही. कारण बॉडीलेस कोण जाणून घ्यायचं असेल तर मला मोकळा करावे लागेल. "
        " अजिबात नाही. तुला मोकळा केलातर तू आमच्या हातावर तुऱ्या देऊन पळून जाशील. " तेवढ्यात पाशा खानच्या ध्यानात आलं की, मागच्या वेळी ह्याने कसे आपल्याला मुर्ख बनविले. तसा तो खूष होऊन बोलला, "     जफरभाय बॉडीलेस का नाही आला ते माझ्या ध्यानात आलं आहे. किचिंत थांबून दिर्घ श्वास सोडत पुढे बोलला," ह्याच्याकडे असलेला तो टॅब ह्याच्या खिशातून बाहेर काढ आणि तोडून फोडून टाक. मग न रहेगा बास और न बजेगी बासरी. असे म्हणताच बळी घाबरला जफर खान त्याच्या जवळ आला आणि त्याच्या खिशात टॅब शोधू लागला. पण टॅब त्याच्या खिशात नव्हता. तो मघाशी मारामारी करीत असताना कुठंतरी पडला होता.

क्रमश:



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.