Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

हे सारे तुझ्यासाठीच ४

हे सारे तुझ्यासाठीच ४
हे सारे तुझ्यासाठीच ४

 

     " नाही हो साहेब , हे सर्व खोटं आहे."
      " मग खरं काय आहे, ते तू मला सांग."
      " मला खरंच काही माहीत नाही."
      " साहेब हा असा बोलणार नाही, ह्याला पोलिसांचा
खास ख्याका दाखविल्या शिवाय हा तसा बोलणार नाही."
कॉन्स्टेबल हरीश बोलला.
     " मग जा ह्याला घेऊन." त्यानंतर त्याला आंत घेऊन जातात आणि त्याची चांगलीच धुलाई करतात. परंतु त्याच्या तोंडून एकच वक्तव्य निघत असतं आणि ते म्हणजे मला मारू नका. मी खरंच निर्दोष आहे. परंतु पोलीस कुठलं ऐकून घेतात. तो मार खाऊन खाऊन बेशुध्द झाला. तसा कॉन्स्टेबल हरीश पोलीस कोठडीचा दरवाजा बंद करून बाहेर येतात नि इन्स्पेक्टर विजयला माहिती देत असतात. तेवढ्यातच विवेकचे वडील एका वकीलाला घेऊन आले सोबत जामीन चे कागदपत्र सुध्दा आणले. आणि ते कागदपत्र इन्स्पेक्टर विजय ला दाखविले. तसे इन्स्पेक्टर विजय ने ते जामीन चे कागदपत्र तपासून पाहिले नि
कॉन्स्टेबल हरीश ला आदेश दिला की हरीश जा  आणि त्या विवेक ला घेऊन ये बाहेर . त्याची जमाणत झाली आहे."
      "  पण साहेब विवेक .....पुढे बोलू शकला नाही. परंतु
त्याच्या बोलण्याचा अर्थ  विवेक चे वडील विश्वासराव ने
लगेच ओळखले त्यानी विचारले ," काय झालं विवेक ला ?"
     " काही नाही जरा बेशुध्द झाला आहे."
     " बेशुद्ध झाला आहे, मग तुम्ही नक्कीच त्याला मारझोड
केली असणार , त्याच्या विरुद्ध तुमच्या कडे काही पुरावा नसताना तुम्ही त्याला मारलातच कसं ? तुमच्या वर केस
होऊ शकते." वकील म्हणाला.
      " साहेब गुन्हेगारा कडून सत्य वदवून घ्यायचे असेल तर
त्याना मारावेच लागते."
      " म्हणून एवढं ......बेशुध्द होईस्तोवर ?"
      " काय करणार साहेब आमचं कामच तसं आहे."
      तेवढ्यात कॉन्स्टेबल हरीश  त्याला पकडून बाहेर घेऊन
आला .त्याचे तोंड सुजलेले पाहून विश्वासराव चिडले, म्हणाले, " ही काय मारायची पद्दत झाली ? तोंड सुजेपर्यंत मारलेत त्याला." त्यावर इन्स्पेक्टर विजय म्हणाला ," आता घेऊन जा परंतु लवकरच तो परत येईल पोलीस कस्टडीत मग बघा त्याचे काय अवस्था होते ती." त्यावर विश्वासराव म्हणाले ," पहा वकील साहेब काय बोलतात ते."
     " त्याना बोलू द्या. त्याना मी कोर्टात पाहून घेईन. तुम्ही
चिंता नका करू."  असे बोलून तिघेही तेथून निघून गेले.
     तेव्हा कॉन्स्टेबल हरीश उद्गारला ," साहेब , आता काय
करायचं ?"
     " काय करायचं म्हणजे ?"
     " मंत्र्यांचा फोन आला तर काय सांगायचं ?"
     " म्हणायचं तपास सुरू आहे, तपास लागला की सांगतो."
     " तो ऐकणार आहेत का ?"
      "  का नाही ऐकणार ? हातावर हात घेऊन बसलो नाहीत आम्ही इथं. म्हणावं तपास सुरूच आहे." असे म्हणत असतानाच मंत्री महोदय विश्वासराव देशमुखांचा फोन आलाच त्यांनी विचारले, " माझ्या मुलाचा तपास लागला का ?"
    " नाही अजून तपास सुरू आहे."
    " तपास  सुरू आहे - तपास सुरू आहे , हे एकच पालुपद कशाला ऐकविता ? तुम्हांला जमत नसेल तर तसे सांगा. मी ही केस सी.आय.डी.च्या हातात देतो." त्यावर इन्स्पेक्टर विजय म्हणाला," अहो, साहेब आमचे पर्याय सुरू आहेत. आम्ही काही निवांत बसलेलो नाहीये."
    " हो मग आतापर्यंत काय तपास लावलेत बरं ?"
    " आपल्या मुलाचा विषय गंभीर आहे."
    " म्हणजे ? मी समजलो नाही याचा अर्थ."
    " आपल्या मुलाला कुणी माणसाने गायब केले नाहीतर
एका आत्म्याने गायब केले आहे."
    " काय भुताने .....इन्स्पेक्टर विजय तुम्ही शुध्दीवर आहात ना का आज थोडीशी जोकून आलात ड्युटीवर !"
    " ना मी ड्युटीवर जोकून येत ना मी ड्युटीरुन घरी गेल्यावर घेत. तेव्हा मी पूर्ण शुध्दीवरच आहे."
     " तुम्ही घेत नाही ही चांगली गोष्ट परंतु तुम्ही मला देत
असलेली खबर तुमच्या हिताची नाहीये. तुम्हाला कल्पना
आहे का ? जर माझा मुलगा सापडला नाही तर मी तुमचं काय करीन ते."
     " पण साहेब आमचं जरा ऐकून तर घ्याल."
     " ठीक आहे, सांगा." त्यानंतर इन्स्पेक्टर विजय ने आतापर्यंत केलेल्या तपास कामाची सविस्तर माहिती दिली.
काय म्हणालात त्या मुलीचे नाव ?" इन्स्पेक्टर विजय उद्गारला, " सौंदर्या मोहन म्हात्रे .
     " आणि तिच्या त्या हीरोचं ?"
     " विवेक गोपाळराव फाळके
     " कुठं राहतात ते दोघे ?" मंत्री महोदय प्रश्न केला.
तेव्हा इन्स्पेक्टर विजय त्या दोघांचा पत्ता सांगितला. तो
मंत्र्यांच्या पी ए  ने लिहून घेतला.  तेव्हा मंत्री विश्वासराव
म्हणाले, " त्या दोघांचा फोटो असेल तर whats app वर फोटो सेंट करा." इन्स्पेक्टर विजय कदम ने व्हाट्स एप
वर त्या दोघांचा फोटो सेंट केला. त्यानंतर विश्वासराव म्हणाले," आता मी काय सांगतो ते नीट ऐका. तुम्हा त्या दोघांच्या आई-वडिलांचा जर फोन आला तर त्यांचा फोन रिसिव्ह करू नका. आणि समजा केलाच तर सांगा तपास सुरू आहे , बस्स ! बाकी काय करायचं ते मी करतो."
      " परंतु तुम्ही करणार काय आहात ?"
      " दुसरं काही नाही तुम्ही जे केलात तेच आम्ही करणार
पण आमच्या पद्धतीने. कळलं." असे म्हणून फोन कट केला. आणि लगेच एका गुंडाला फोन करून सांगितले की,
मी त्या दोघांचा पत्ता नि फोटो सेंट करतो. त्या दोघांना
पकडून  आपल्या फार्म हाऊस वर घेऊन ये." असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर  धनराजच्या त्या साऱ्या मित्रांना सांगितले की तुम्ही सारे त्या फार्म हाऊस वर या  तेथे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. " असे सांगितले. आता ते लोक नाही तर म्हणू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी यायचे कबूल केले.

    कॉलेजमध्ये तर चर्चेचा विषय बनला होता. सौंदर्या ला
जो तो विचारू लागला की काय झालं त्या दिवशी ? परंतु
सौंदर्या ला त्याबद्दल काहीच माहीत नव्हते तर ती काय सांगणार बिच्चारी ! परंतु त्या दिवशी टार्गेट मुलं सुध्दा तिच्या पासून जरा दूरच राहू लागली. सर्वांचे एकच मत झाले की हिच्यावर एक समंध प्रेम करतो, ही फार वाईट गोष्ट आहे, लवकरच त्याचा इलाज कर, नाहीतर पुढे तो तुला भारी पडेल." परंतु सौंदर्याचे म्हणणे असे  होते की आपल्याला काही त्रास नाही ना ? शिवाय विवेक ला त्रास नाही. मग असू दे ना समंध असला तर !" तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला  म्हणू लागल्या ," सौंदर्या आता तरी तुझी खात्री पटली ना की विवेक वर समंध भुताचा ताबा आहे." त्यावर सौंदर्या म्हणाली," हूं sss थोडी थोडी खात्री पटू लागलीय खरी ! म्हणून मी आता त्या गोष्टीचा फायदा
उचलायचा ठरविला."
    " म्हणजे ?" सीमाने विचारले.
    " धनराजला शिक्षा मिळाली तशी त्या बाकीच्याना पण
शिक्षा मिळायला हवी आहे."
     " हां परंतु ती आता कशी देणार ?"
     " सेम तशीच जशी धनराज ला दिली."
     " म्हणजे पुन्हा त्याना फार्म हाऊस वर घेऊन जाणार
आहेस ?" वैशाली ने विचारले.
    " नाही गं त्यांच्याशी सुध्दा प्रेम करण्याचे नाटक करणार."
    " ते आता तुझ्या जाळ्यात फसणार नाहीत. कारण त्याना आता माहीत पडलं आहे, की तुझ्या प्रेमात एक भूत पडलं आहे, तेव्हा तुझ्या वाटेला कोणीही जाण्याचा भानगडीत  पडणार नाही."
     
    सुशिलाबाईंना आठवलं की काही दिवसांपूर्वी सौंदर्या
समंध बद्दल विचारत होती. समंध त्या तंत्रिकांच्या कैदेतून
सुटला की काय ? असा विचार त्यांचे मन भीतीने थर थर
कापले. आणि त्याना काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला.
सौंदर्या आपल्या मामच्या गावी गेली असताना ती पिंपळाच्या झाडाखाली भ्याली होती. मध्येच रात्रीची घाबरून किंचाळत उठे म्हणून आपण तिला एका तांत्रिका कडे घेऊन गेली. तेव्हा तांत्रिकाने  आपल्या शक्तीच्या जोरावर त्या समंधला बंदीस्त करून एका काचेच्या बरणीत
भरून ठेवले, त्या दिवसापासून आजपर्यंत तिला कशाचाच त्रास झाला नाही. मला वाटतं त्याच्या कडे पुन्हा एकदा जायला लागेल आणि समंधाचा पूर्ण बंदोबस्त करून यायला लागेल. असा विचार करून त्या तांत्रिका कडे जायला निघाल्या.

    कॉलेज सुटले सर्व मुलं कॉलेज मधून बाहेर पडत होती.
ज्यांच्या स्वतःच्या फोर व्हीलर होत्या. ते लोक फोर व्हीलर ने जात होते. तर काही जणांच्या बाईक होत्या ते स्टुडन्ट बाईक वर बसून जात होते. सौंदर्या आपल्या मैत्रिणी सोबत निघाली. कॉलेज च्या प्रवेश द्वार मधून बाहेर पडून जश्या त्या हायवेवर आल्या. तेवढ्यात एक ओमनी कार सौंदर्या जवळ  येऊन थांबली. त्यातून काही तगडी माणसे खाली उतरली. आणि कुणाला काही कळण्या अगोदर त्यांनी सौंदर्या ला पकडले नि गाडीत कोंबले नि ते लोक  पटापट गाडीत शिरले नि लगेच गाडी सुसाट सुटली. तिने  मोठ्या ने ओरडून विचारले ," कोण आहात तुम्ही ? "
    " तिकडे गेल्यावर कळेल आम्ही कोण आहोत ते."
    आणि थोड्याच वेळात मोटार फार्म हाऊस वर पोहोचली. तिला मोटारीतून खाली उतरविले नि एका खोलीत बंद केले. थोड्या वेळाने विवेक ला पण तेथे आणण्यात आले. त्यानंतर धनराज ते सारे मित्र ही आले नि शेवटी विश्वासराव देशमुख सुध्दा तेथे आले. त्यांनी भीमाला म्हटलं, " त्या दोघांना पण माझ्या समोर आण. " तसा भीमा गेला नि विवेक नि सौंदर्या ला घेऊन आला. त्या दोघांना पाहून
विश्वासराव म्हणाले ," अच्छा तर ते तुम्ही आहेत दोघं ? माझ्या मुलाला गायब करणारे , सांगा कुठं आहे धनराज ?"
     " आम्हाला माहीत नाही." दोघेही एकदम म्हणाले.
     " माहीत नाही काय ? आता माहीत पडेल. ?" असे
म्हणून ते भीमा कडे पाहत म्हणाला," ह्याला बांधून घाल."
भीमाने लगेच एक दोरखंड घेतले नि विवेक चे दोन्ही हात
वर करून बांधून घातले. त्यानंतर सौंदर्या कडे पाहत म्हणाला, " हा तुझा हीरो नाही का , आता बघ मी त्याला
कसे झिरो बनवितो ते." असे म्हणून भीमा कडे पाहत विश्वासराव म्हणाले," हिला बेड रूम मध्ये घेऊन जा आणि
एकेकानी आपापली मनोकामना पूर्ण करा. पाहू या कोणते भूत हिला वाचवायला येते ते आणि तू पण ऐक गं जोपर्यंत तू ह्या सर्वांची मनोकामना चुपचाप पूर्ण करत राहशील तोपर्यंत तुझा तो हिरो जिवंत राहील. आणि तिकडे जर तू काही नखरे केलेस की हा इकडे संपला म्हणून समज.आणि भीमा सी सी टीव्ही कॉमेरा चालू कर, मला सर्व दृश्य पाहायचं आहे." असे म्हणून त्यांनी सरळ विवेक वर पिस्तुल ताणून धरले. तसा विवेक म्हणाला, " अरे देवा आता मी करू ? माझ्या शरीरात कुण्या भुताचा आत्मा नाहीये , हे सांगून कुणाला पटत नाहीये. सौंदर्याही पटत नव्हतं.
आता सौंदर्याची अब्रू ह्या नराधमापासून कशी वाचवू ?"

         क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..