पंखरूपी मानव ७
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंखरूपी मानव ७ |
आपल्या कारावासातून कैदी पळाला ही खबर वाऱ्या
सारखी सर्वत्र पसरली. ही खबर जेव्हा पंखरूपी मानवाच्या राजाला समजली. तसा राजा चंद्रसेन भयंकर चिडला. नि
त्याने लगेच सैन्याला हुकूम सोडला की, तो जिथं मिळेल तेथून त्याला पकडून आणा. " सैन्य सर्वत्र त्याचा शोध घेऊ
लागले ; परंतु त्याना बॉडीलेस सापडला नाही. शेवटी राजाने
त्या कैदी सोबत असलेल्या कैद्याला माझ्या समोर हजर करा." असा आदेश सोडला.
" पण महाराज ,तो त्या बाहेर जगू शकणार नाही."
" मग तो कैदी कसा पळाला ? त्या कैद्याला ऑक्सिजन
ची गरज नव्हती का ?" महाराज चंद्रसेन ने विचारले.
" ते काही माहीत नाही महाराज." एक सैनिक बोलला.
" ठीक आहे, आम्हीच येतो कैद खाण्यात ." असे बोलून
चंद्रसेन महाराज जिथे कैद खाना आहे ,तेथे येतात. नि डॉ.
विश्वनाथ जवळ त्या फरार झालेल्या कैद्याची चौकशी केली.
डॉ. विश्वनाथ ला विचारण्यात आले की, तुमच्या सोबत जो कैदी होता तो कुठे गायब झाला नि कसा झाला ? " त्यावर
डॉ. विश्वनाथ म्हणाले," तो मानव नव्हता."
" मग कोण होता तो ?"
" तो एक विज्ञान्याचा अविष्कार होता ."
" म्हणजे ?"
" माझ्या मुलाने तंत्रज्ञानाने तयार केलेला फार्म्युला होता."
" मग आता आहे कोठे तो ?"
" तो पृथ्वी ग्रहावर पोहोचला सुध्दा असेल."
" पण कसं शक्य आहे ? आमचा एवढा कडक बंदोबस्त
असताना तो इथून बाहेर पडलाच कसा ?"
" तो भरपूर शक्तिशाली सुध्दा आहे, आणि अदृश्य होण्याची त्याच्या जवळ शक्ती सुध्दा आहे, त्यामुळे त्याला
कोणीही बंदीस्थ करून ठेवू शकणार नाहीये."
" याचा अर्थ त्याच्या जवळ आमच्या पेक्षा ही शक्ती
आहेत तर !"
" अर्थात."
" पण त्याचं इथं येण्या मागचे प्रयोजन काय ?"
" तो माझा शोध घेण्यासाठी आला होता."
" मग इतक्या वर्षात कोणी नाही आलं ते."
" तेव्हा माझा मुलगा वैज्ञानिक बनला नव्हता."
" पण त्याला कसे कळले की तुम्ही आमच्या इथं कैद आहेत ते ?"
" प्रत्येक ग्रहांवर शोध घेत घेत तो इथं पोहोचला."
" याचा अर्थ भारत देशातून आता आपल्यावर हल्ले होणार तर ?" महाराज चंद्रसेन ने चिंता व्यक्त केली. तेव्हा
डॉ. विश्वनाथ म्हणाले ," भारत देश कधी कोणावर ही अकारण आक्रमण करत नाही. समोरचा देश जेव्हा आक्रमण करतो तेव्हाच त्याला प्रतिकार म्हणून शस्त्र उचलतो. अन्यता
भारत सर्वांशी मित्रता ठेवू इच्छितो."
" पण आम्ही यावर विश्वास कसा ठेवावा ?"
" विश्वास ठेवण्यासाठी तुमच्यासाठी हे एकच कारण
पुरेसे आहे की, बॉडीलेस ने तुम्हाला काही अपाय न करता
तो चुपचाप इथून निघून गेला. नाहीतर तो इतका शक्तिशाली
आहे की, तुमच्या देशातील सारे सैन्य सुध्दा त्याच्या एकट्याशी सामना करू शकणार नाही."
" मग तो इथून पळाला का ?"
" तो पळाला नाहीये. तर माझ्या साठी ऑक्सिजन
आणावयासाठी ती पृथ्वी ग्रहावर गेलाय. लवकरच परत
येणार आहे."
" काय ? तो परत येणार आहे ?"
" हो ; परंतु तुम्हाला काही अपाय करण्यासाठी नव्हे !"
" मग ? "
" मला इथून घेऊन जाण्यासाठी ! "
" आमच्या परवानगीशिवाय ?"
" हो ."
" तुम्हाला काय वाटतं ,आम्ही तुम्हां दोघांना इथून जाऊ
देवू ?"
" अडवून पहा."
" अस्सं ! पाहतोच मी !"
" अवश्य पहा."
" थांबा महाराज ." प्रधान सेनापती म्हणाला.
" बोला, सेनापती काय म्हणणे आहे आपले ?"
" महाराज , तो बॉडीलेस म्हणून जो कोणी आहे,तो फार अदभुत आहे, कारण आमचा पहारा एवढा कडक असूनही
तो फरार झाला. इतकेच नाही तर सीमेवरील सैन्यिकाना ही
तो दिसला नाही. यावरून त्याला कोणती गोष्ट अशक्य असेल
असे मला तरी वाटत नाही."
" मग आम्ही काय करावे अशी आपली इच्छा आहे ?"
" ह्यांना ह्यांच्या देशात जाण्याची अनुमती द्यावी."
" सेनापती तुम्ही काय बोलताय त्याची तुम्हाला कल्पना
आहे का याची ?"
" होय महाराज."
" हा जासूद असला तर ?"
" तशी शक्यता नाहीये. कारण हे ज्या जेट विमानातून
इथं आलेे होते , ते ह्यांनीच बनविलेले जेट विमान होते. कारण
अद्याप तसे विमान अन्य कोणी बनविलेले नाही. शिवाय गेले वीस वर्षे ते सतत हेच सांगताहेत की मी जासूद नसून एक
वैज्ञानिक आहे. परंतु आताच्या प्रकारावरून असेच वाटते की
ते सत्य बोलत आहेत. तसं नसतं तर तो पंखरूपी मानव
आपले काही नुकसान न करता असाच निघून गेला नसता."
सेनापतीचे म्हणणे सर्वाना पटले. तशी सर्वांनी आपली
संमत्ती दर्शविली. तेव्हा चंद्रसेन महाराज म्हणाले ," ठीक आहे, परंतु ह्याला ह्याच्या मायदेशी पाठविणे आपल्यासाठी
घोकेदायक ठरणार नाही ना ? म्हणजे त्यांच्या देशातल्या
लोकांनी आपल्यावर हल्ला केला तर ?"
" तसं होणार नाही. याची ग्वाही मी देतो. आणि समजा
तसं घडलंच तर मी आणि माझा मुलगा आणि त्याने बनविलेला बॉडीलेस मिळून तुम्हाला आम्ही साह्य करू."
" ते ठीक आहे , पण त्या पेक्षा तुम्ही लोक इथंच का राहात नाहीत. म्हणजे कैदी बनून नव्हे ! इथं राहून जे आपल्या देशात करता तेच इथं करा. म्हणजे संशोधन."
" चालेल. पण एकवेळ मी माझ्या माय देशात जाऊन
येतो. तिथं माझी पत्नी नि मुलगा माझी वाट पाहत असतील."
" पण तुम्ही इथून जाणार कसे ? म्हणजे ह्या रूमच्या बाहेर ऑक्सिजन नाहीये. आणि जो आहे, तो सामान्य माणसांना म्हणजे पृथ्वीवरील माणसांना तो घेता येणार नाही.
त्यासाठी इथं राहणारच पाहिजे."
" त्यासाठीच बॉडीलेस पृथ्वीवर गेलाय."
" मग तो येईपर्यंत वाट पहा." असे म्हणून चंद्रसेन महाराज तेथून जाऊ लागतो ; पण काहीतरी आठवले तसे मागे वळून डॉ. विश्वनाथ कडे पाहत बोलला ," हां ; पण तो
इथं आल्यावर त्याची नि माझी गाठ घालून द्या." असे म्हणून
चंद्रसेन महाराज तेथून निघून गेला.
बॉडीलेस डॉ . विश्वजित ना कारावासात जाऊन भेटला
नि त्याना दुसऱ्या दुनियेची माहिती दिली. नि त्यांचे वडील
डॉ. विश्वनाथ जिवंत आहेत नि त्या पंखरूपी मानवांच्या
कैदेत आहेत या विषयी सविस्तर माहिती दिली. आपले वडील जिवंत आहेत , हे ऐकून डॉ. विश्वजित फार अत्यानंद
झाला. ते त्याला म्हणाले ," मग माझ्या बाबांना सोबत का
घेऊन आला नाहीस ? " त्यावर बॉडीलेस म्हणाला ," तेथे ऑक्सिजन नाहीये. आणि जो आहे ,तो पृथ्वीवरील माणसांना
घ्यायला जमणार नाही. "
" असे जर आहे तर मग इतकी वर्षे जिवंत कसे राहिले बाबा ? "
" त्याला कारण त्यांनी त्यांच्या साठी अश्या एका रूमची
व्यवस्था केली आहे की त्या रुम मध्ये पृथ्वीवरील ऑक्सिजन
तयार केला आहे."
" म्हणजे फार चांगल्या मनाचे आहेत ते पंखरूपी मानव."
" हो ; चांगल्या मनाचे तर ते आहेतच. शिवाय शूरवीर ही
आहेत. त्यांच्या जगात गेलेला मनुष्य पुन्हा वापस येऊ शकत
नाहीत. म्हणजे ते कोणालाही ठार मारत नाहीत. परंतु पक्ष्यांना जसे आपण पिंऱ्यात बंदिस्त करून ठेवतो. तसे ते
सुध्दा पृथ्वीवरील मानवांना खोलीत बंदिस्त करून ठेवतात."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा