Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

आव्हान १

आव्हान १
आव्हान १


      " आव्हान  " ही कादंबरी आँक्टोबर २०१६ ला प्रकाशित झाली. आणि खरं सांगायचं तर ह्या कादंबरी ची कल्पना माझी नसून माझ्या एका मित्राची आहे, १९८८ ची गोष्ट आहे,
त्यावेळी मी आठ नाटक आणि चार कादंबरी लिहिल्या होत्या.
परंतु त्या प्रकाशित करू शकलो नाही. कररण कोणताही
प्रकाशक माझी कादंबरी प्रकाशित करायला तयार नव्हता.
मी कित्येक प्रकाशकांना जाऊन भेटलो. त्याना विनंती सुध्दा
केली. परंतु त्यांचे एक ठरलेले उत्तर आमच्या कडे वेळ नाही.
मी एकदम कंटाळून गेलो होतो. त्याच वेळी माझी तळेकर
नावाच्या  व्यक्तीशी ओळख झाली. अर्थात तो माझ्या धाकट्या भावाचा मित्र होता. माझा भाऊच त्याला म्हणाला, की माझा भाऊ सुध्दा कथा नि नाटक लिहितो. त्यावर तो
म्हणाला,"  तुझ्या भावाला मला भेटायला सांग." तो एका
एकांकिका नाटकाचे दिग्दर्शन करत होता. मी त्याला भेटायला गेलो, तेव्हा तीन नाटके घेऊन गेलो होतो. त्याने
नाटक पाहिली नि मला म्हणाला , " तुम्ही अगोदर कथा लिहून कथेला किंवा नाटकाला शीर्षक देता ?." मी म्हणालो,
मी अगोदर शीर्षक देतो नि त्या शिर्षकावरून कथेची रचना करतो." त्यावर तो बोलला ," व्हेरी गुड ! " मी एक शीर्षक देतो मला त्यावर कथा लिहून दाखव." मी म्हटलं ," ठीक आहे."  त्याने मला " आव्हान ' देऊन म्हटले.एक संवाद देतोय
त्या सवांदाला अनुसरून कथा लिहायची आहे, असे म्हणून त्याने एक संवाद ऐकवीला - ज्या साच्यातून मी  घडलो.
त्याच साच्यातून मी इतरांना घडवायचे काय ?" मी लगेच उत्तर दिले , आई- मुलाची प्रेम कहाणी , तो म्हणाला , " अगदी बरोबर." त्यावर मी म्हणालो ," परंतु हे लोकांना आवडणार नाहीये. " असें येणाऱ्या भविष्य काळात घडणार आहे, असे आपल्याला त्यात भाकीत वर्तवायचे आहे."  मी म्हटले ," ठीक आहे, आणि दुसरे शीर्षक दिले होते की,बॉडीलेस या संबधी माहिती देताना तो म्हणाला," हा एक स्मग्लर दाखवायचा आहे, तो दिसत नाही फक्त त्याचा आवाज येतो. मी किंचित विचार करून त्याला म्हणालो," तो आत्मा असेल. " त्यावर तो म्हणाला," ते काय असेल ते तुझं
तू ठरवायचे आहे. " मी खूप विचार केला होता त्यावेळी, परंतु
त्यावेळी आत्म्या शिवाय दुसरे कोणतेही ऑफशन दिसले नाही. मी घरी आलो , परंतु मी ह्या दोन्ही शिर्षका वरून त्यावेळी कथा काही लिहिल्या नाही. कारण अगोदरच ज्या कथा लिहिल्या होत्या. त्या कथांचेच काय करावे हे सुचत नव्हते तेथे आणखीन नवीन कथा लिहून काय करणार ?
म्हणून त्या शिर्षका ही पुढे नंतर विचारच केला. कारण लिखाण एकदम बंदच करून टाकले. ज्या लिहिल्या होत्या
कथा  त्या दहा वर्षे जतन केल्या. शेवटी कंटाळून रद्दीच्या दुकानात केवढी मोल च्या भावात विकून टाकले. त्यानंतर
२०१३ ला माझी मुलगी कॉलेज मध्ये गेल्यावर कविता करू
लागली तेव्हा तिची मम्मी तिला म्हणाली ," तुझे पप्पा सुध्दा
पूर्वी लेखन करायचे. त्यावर तिने तिला विचारले ," मग पप्पानी लिहिणे बंद का केले ?" तेव्हा ती म्हणाली," फक्त
लिहून काय फायदा त्या कथांचे प्रकाशन पण तर व्हायला पाहिजे ?" त्यानंतर माझी मुलगी  नि मुलगा मला म्हणाले ," पप्पा तुम्ही कथा लिहा आम्ही प्रकाशित करू." मग मला ही
वाटले की पोरं म्हणताच आहेत तर लिहू आणि प्रथमच जो
विषय निवडला तो "आव्हान ' कथेचा आणि एक महिन्यातच
आव्हान कथा लिहून झाली. परंतु पुन्हा प्रकाशनाचा प्रश्न
आलाच तेव्हा मी मौजे प्रकाशन जवळ कथा घेऊन गेलो तेव्हा त्यांनी ही तसेच उत्तर दिले जे ३० वर्षांपूर्वी मला  अनेक
प्रकाशन कडून मिळाले. मी एकदम नाराज होऊन घरी येत
असताना वाटेत एक लायब्ररी दिसली. त्या लायब्ररीत मी प्रवेश केला. त्या लायब्ररी चे मालक तानाजी थोरात बसले होते त्याना कादंबरी प्रकाशन विषयी बोललो. तेव्हा ते मला
म्हणाले ," ते सर्वजण तसेच म्हणतील. तुम्ही अस करा ही कादंबरी  महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे पाठवा त्यांचे तज्ज्ञांनी पसंत केली तर त्यांचे मंडळ च कादंबरी प्रकाशित करतील.आणि त्या प्रमाणे केले. तेथे ही अनेक अडचणी आल्या. मराठीत एक म्हण आहे, नकटी च्या लग्नाला सतराशे विघ्न अगदी तसेच झाले. त्याचे आता संपुर्ण
विवरण इथे देत नाही. कारण त्याचे सारे विवरण मी " संघर्ष "
या माझ्या आत्म कथेत लिहिले आहे, ज्या वाचकांनी माझी
आत्मकथा वाचली असेल त्या वाचकांना माहिती असेलच. असो.
         कादंबरीची निवड झाली तर ती फार मोठी झाली. म्हणजे तेथे फक्त १३५ पुष्ठांची मर्यादा आहे,आणि माझी दोनशे पेक्षा जास्त पुष्ठांची झाली. त्यामुळे ती कमी करून द्यायला सांगितली. मला ती पुन्हा काट छाट करून १३५ पुष्ठांची करावी लागली. अखेर माझी "  आव्हान " कादंबरी प्रकाशित झाली. परंतु त्या तीन वर्षात मी अनेक कादंबऱ्या
लिहिल्या होत्या , त्यांचे काय करायचे हा प्रश्न होताच. कारण
महाराष्ट्र राज्य संस्कृती साहित्य मंडळ फक्त एकच कादंबरी चे प्रकाशन करते. मला काय करावे ते सुचत नव्हते. तेवढ्यात मला शोभना कारंथ ह्या सुध्दा साहिक्तिक आहेत.
माझ्या कादंबरी सोबत त्यांच्या " उमलत्या कळ्या " ही प्रथम कादंबरीचे प्रकाशन झाले. आणि आमची ओळख ही झाली.
त्यानंतर त्यांनीच   मला मॅसेज केला की एक ऑन लाईन वर स्पर्धा आली आहे, त्यात पाच लघू कथा  पाठवायच्या आहेत . मी लगेच तीन कथा पाठविल्या. बहीणच झाली सवत , मुक्ती , भिऊ नकोस ह्या तीन लघु कथा ना आपण रसिक वाचकांनी पसंती ची पावती दिली. त्या बद्दल सर्व रसिक वाचकांचे मनापासून आभार व्यक्त करत आहे नि प्रतिलिपी ने ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचे  देखील मनापासून आभार मानत आहे, हे सर्व सांगायचे कारण इतकेच की  प्रलिलिपी मुळेच आज मी आपल्या सारख्या रसिक वाचकां पर्यंत पोहोचलो. त्यामुळे प्रतिलिपी चे आभार मानावयाचे तेवढे कमीच आहेत.
       ही कादंबरी जशी लिहिली होती तशी इथं प्रकाशित करत आहे, ह्या कथेवर नाटक सुद्धा लिहिले होते नि प्रतिलिपिवर प्रकाशित सुध्दा आहे, परंतु वाचक संख्या फार
कमी आहे, म्हणून कादंबरी च्या रुपात पुन्हा प्रकाशित करत
आहे.
                                                   महेंद्रनाथ रामचंद्र प्रभू

              

प्रस्तावना
     
       आयु : महेंद्रनाथ रामचंद्र प्रभू यांचे " आव्हान " ही कादंबरी प्रेम हा या कादंबरी चा केंद्रबिंदू आहे.जीवन हे कधीच सुतासारखे सरळ नसते.खाच-खळगे,वाटा आणि वळणे असतात.प्रेमिकांना जीवन ही सुखकर आणि सूंदर मनमोहक
बाग वाटत असते.पण जीवनाच्या पाऊल वाटेने चालताना
पदोपदी रक्तबंबाळ करणारे काटे ही असतात,त्याचा प्रत्यय या कादंबरीत येतो.
       विद्या आणि माधव यांची अनेक नागमोडी वळणे घेणारी ही एक प्रेम कहानी आहे.विद्या माधव सारख्या अनाथ तरुणावर प्रेम करते.ते विद्याधर कार्लेकरांना रुचत नाही आणि विद्यावर ते हात उगारतात.त्यांची पत्नी सरस्वती त्यांची समजूत घालते.विद्याधर ,माधव जेव्हा भेटायला बोलावतात तो प्रसंग कादंबरीकाराणे अत्यन्त कुशलतेने साकार केला आहे.
       माधव आणि विद्याधर यांच्या संवादातून त्यांच्या स्वभावाचे धारदार कंगोरे साकार करून व्यक्तीरेखा उभ्या करण्यात महेंद्रनाथ प्रभू यशव्ही झाले आहेत.या कादंबरीतील विध्याधरची व्यक्तिरेखा श्रीमंती आणि त्यातून स्वाभाविकपणे आलेल्या अहंकाराचे प्रतिनिधित्व करते.तर माधव गरीब असला तरी लाचार नाही,वास्तववादी भूमिका घेणारा कसा आहे याची जाणीव होते.एक कोरा चेक देऊन विद्याधर,माधवला खरेदी करू पाहतात पण तो तयार होत नाही.म्हणून त्याला ते घरातून हाकलून देतात.मित्राच्या मुलाशी तिचे लग्न ठरवितात.मुलगा पहायला येतो तेव्हा विद्या त्याला सत्यस्थिती सांगते नि तो लग्नास नकार देतो.
ही कादंबरी नाट्यमय वळणे घेत राहते.त्यामुळे ती मनाची पकड घेते.विद्या नि माधवचे वेषांतर करणे,राज आणि राणी अशी वेगळीच नावे धारण करून आपली ओळख लपविणे,दोघेही नाबालिक असल्याने मंदिरातच लग्न करणे,झोपडीतच मधुचंद्र साजरा करणे,स्वप्नातल्या सुगंधी कळ्या उमलण्यासाठी दोघांची चाललेली धडपड नाटककाराने यशव्ही पणे साकार केली आहे.
कथानक संथ असेल तर कादंबरी रटाळ होण्याचा धोका असतो.परंतु या कादंबरीचे कथानक कादंबरी कारा ने गतिमान ठेवले आहे.वाचकांना कुतुहलाबरोबर कथानक पुढे पुढें सरकत जाते.पुढे काय अशी ओढ वाचकांना लागत राहते.
कोणत्याही कादंबरीच्या कथानकात संघर्ष अतिशय महत्वाचा असतो.या कादंबरीत विद्या आणि माधवच्या जीवनपठावर त्या त्या वेळी उभ्या ठाकलेल्या समस्या आणि
त्यांच्या मनावर झालेला परिणाम हा मानसिक संघर्ष कादंबरीकाराने बारकाईने चितारला आहे, कधी पगारामुळे
दोघांची होणारी आर्थिक घुसमट ,विद्या बाळंतपणात दवाखान्यात असताना ऑपरेशनसाठी पैसे नसणे,पैशासाठी ऑपरेशन करण्यास डॉक्टर ने दिलेला नकार,पैशासाठी माधवचे जुगार खेळणे व पोलिसांकडून पकडणे जाणे या सर्व घटना कादंबरीत एक ताण निर्माण करतात . विद्याचे वडिलांना फोन करणे, आणि विद्याधरांचे डॉक्टरांना ऑपरेशन करायला सांगणे.मुल मृत जन्माला आल्याचे सांगणे आणि मुलाला
अनाथालयात सोडण्यास सांगणे ह्या सर्व घटना एका पाटोपाठ घडत असल्याने कथानकात कुठेच शिथिलता येत
नाही.
अनाथ असलेल्या माधवच्या मुलाला विद्याधर अनाथालयात पाठवायला सांगतात ही घटनाच नाट्यपूर्ण
आहे.नर्स ने आणलेले बाळ अनाथालयातून दिगंबर किर्लोस्कर नावाचे धनवंत गृहस्थ घेऊन जातात माधवला
हे सर्व कळताच बाळासाठी व्याकुळ झालेला माधव बाळ
मागतो, पण या घरात त्याचे भवितव्य उज्जवल असल्याची त्याची समजूत काढली जाते.नोकरी नसताना माधव बाळाचा सांभाळ कसा करणार ? हे धगधगते वास्तव होते.शेवटी धनवनाकडे माधव नोकरी मागतो आणि दिगंबरपंत त्याला
आपला सेक्रेटरी बनवितात.
माधवचा मुलगा श्रीधर पंधरा वर्षाचा होतो.तो हुबेहूब माधव सारखा दिसतो. दिगंबरपंताचा मुलगा दिसायला माधव सारखा कसा म्हणून लोक दिगंबरपंतांच्या पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय घ्यायला लागतात.ह्या सर्व घटना कादंबरीकाराने कमालीच्या सहजतेने आणि स्वाभाविकपणे चितारल्या आहेत,त्यात कुठंही कृत्रिमता जाणवत नाही.
दिगंबरपंतांनी कंपनीचा मालक बनलेल्या श्रीधरला तो
माधवा सारखाच दिसतो. म्हणून स्वप्नील म्हणतो की, माझी बहिण विद्याला डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी मदत करा.आणि श्रीधरला पाहताच त्याला माधव समजून बिलगते.पुढे कथानक अचानक वळण घेते.स्वप्नील विद्या आणि श्रीधरला लग्नाची गळ घालतो.लग्न ठरते मुलाच्या खऱ्या बापाला म्हणजेच राजला ( माधव ने धारण केलेले नाव ) पत्र आणि लग्न पत्रिका पाठवितो.लग्नपत्रिके मधील
नाव वाचून माधवला धडकीच भरते.इथं नाटककार महेंद्रनाथ प्रभू यांनी कथानक अश्या वळणावर आणून ठेवले आहे की आता मुलाचे आईशी लग्न होणार की काय असा प्रचंड ताण
प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्यास लेखक यशव्ही झाला आहे.
माधव आणि विद्याचे मिलन कादंबरीत एक सुखद भाव निर्माण करते.कथानकाचे सामर्थ्य आणि सौन्दर्य, प्रसंग वर्णन ,व्यक्ती दर्शन कौशल्य आणि आशयानुरूप सहज आणि सोपी भाषा .त्यामुळे ही कादंबरी प्रशशनिय झाले आहे.  
                       

                                                        प्रा. दामोदर मोरे


      ऑफिसमध्ये जाण्याची पूर्ण तयारी झाली होती माझी. आरशात पाहून केस विंचरत होतो, इतक्यात बाबांची हांक माझ्या कानावर पडली, "अरे स्वप्निल झाले का रे तुझे ? " मी आतूनच आवाज देत त्यांना म्हणालो," हां  बाबा ! झाले माझे आलोच मी !"  मी उत्तर देणारच होतो, इतक्यात आई चे स्वर माझ्या कानावर पडले ,आई-बाबांना म्हणत होती की, " काय हो काय झालं ? आणि किती ओरडताय उगाचच !"
    " अगं उगाचच ओरडत नाही मी, ऑफिसला जायला उशीर होतोय." बाबा म्हणाले. त्यावर आई उत्तरली ," त्यात काय तो रोजच होतोय, आज नवीन का आहे  ? " त्यावर बाबा म्हणाले ,"  अगं  रोजची गोष्ट निराळी आजची गोष्ट निराळी !" आई ने कुतुहलां ने विचारले ," का ?  काही विशेष आहे का आज ? नाही म्हणजे कोणी  येणार आहे का आज  कंपनीत ?"
    "  होय."
    " मग न्याहरी तरी कराल ना ?"
    "  तेवढा वेळ नाही आमच्या जवळ ."
     " मग टिफिन भरून  देऊ का ? खाल कंपनीत ?"
     " नको . आज कंपनीचे सोय केली आहे."
     " मग अगोदर नाही का सांगायचं ? थोडा आराम केला असता अजून ! " आई नाराज होत म्हणाली.
     "  सकाळी आळश्यासारखे झोपू नये माणसाने."असे कोणीतरी शहाण्या माणसाने  म्हटलेय ते काय उगाचच ?"
      " अहो दिवसभर आम्हा बायकांना किती कामे करावी लागतात , याची कल्पना आहे का तुम्हा पुरुषांना?  सकाळी उठल्याबरोबर प्रथम स्वतः स्नान करा, मग इतरांना स्नानास पाणी द्या. वाशिंग मशीन मध्ये कपडे धुण्यास टाका. सकाळी न्याहारी , दुपारचे जेवण, भांडीकुंडी केर पतोरे , साफसफाई, अशी कितीतरी कामे करावी लागतात. आम्हा बायकांना. दिवसभर सारखी कामे करून  अगदी मेटाकुटीस जीव येतो आमचा. तुम्हाला काय म्हणा त्याचे !" आईच्या विधानावर  बाबा लगेच उत्तर देत म्हणाले ," मग आम्ही काय ऑफिसमध्ये फक्त बसून असतो की काय ?" आई प्रत्युत्तर
करत म्हणाली," असे म्हटले का मी ? आणि काय हो , मी म्हणते असे काय काम असते हो ऑफिसमध्ये ? सर्व कामं तर  कंपनीतले कर्मचारी  करत असतात ना ,  तुम्ही फक्त त्यांच्यावर देखरेख करता एवढेच ना ? त्यात काय आले आहे मोठे कौशल्य ? " त्यावर लगेच बाबा नी प्रतिटोला मारला. ते
म्हणाले ,"  आणि तुझ्या मदतीला नोकर नाही  का आहे ? सारी कामे  तू एकटीच करतेस का ? " पण आई देखील सहजासहजी हार माणण्यातली नव्हती, ती लगेच म्हणाली,
     " आहे ना , मी कुठे नाही म्हणते . पण तो तुमचा नोकर काय - काय काम करतो , हे कोणी विचारलं आहे का कधी ?
एवढं बोलून एक दीर्घ सुस्कारा सोडत ती पुढे म्हणाली," तो
फक्त मंडईत जाऊन भाजी आणतो  आणि दुपारचा  तुमच्या
जेवणाचा टिफिन  कंपनीत पोहोचवितो बस्स ! दुसरं काम  करतो काही ? "
     " मग घरातील इतर काम ही करून घ्यायची ना त्याच्याकडून. कुणी  नाही म्हटले आहे का तुला ?" बाबा म्हणाले. त्यावर आई म्हणाली ," माझ्या स्वयंपाक घरात दुसरा कोणी माणसांनं प्रवेश केलेला मला नाही हो चालायचा."  तेव्हा बाबा उत्तरले,"  मग तो तुझा प्रॉब्लेम आहे आम्ही काय करणार त्यात ."
       " तुम्हाला करायला सांगितले आहे का कुणी ? उगीचच आपले....... त्यावर बाबा निवृत्तर झाले. तसा मी पुढे म्हणालो ," पप्पा झाले का तुमचे सगळे बोलून ?"
      "  हो का  रे ?"
      " नाही.म्हटलं तुमचे झाले असेल बोलून तर कंपनीत जायचं म्हणतोय .अगोदरच उशीर झालाय फार."
      " वा ! उशीर  कोणामुळे झाला ?"
      " अर्थात माझ्यामुळेच ; परंतु आता चलाना जाऊ लवकर."
      " हो,  चल." आम्ही जसे  जायला निघालो तशी आई चेष्टेने म्हणाली,"  संध्याकाळी घरी या हां लवकर, नाहीतर रागाने जाल  कुठेतरी ! " बाबा मिश्किलपणे म्हणाले," तेवढी वेळ आली नाही अजून माझ्यावर ."
       " आणि बरी जाऊदे मी तुम्हाला,  सात जन्माची सोबतीनं आहे मी तुमची ,  पाठ सोडणार नाही." आई एकदम अभिमानाने बोलली.
       "  एका जन्मात नकोशी झालीय  म्हणे  सात जन्माची सोबतीण." बाबा मनातल्या मनात म्हणाले  असणार ,म्हणजे  त्यांच्या चेहऱ्यावरून तसं वाटत होतं. पण वरकरणी बाबा हसत म्हणाले," हो खरंय तुझं ." तेव्हा आई म्हणाली ," आता वाट कुणाची बघताय ?  मुहूर्त काढायचाय का निघण्याचा."
   " नाही  निघणारच आहोत आम्ही  आता."
    " मग निघा. नाही तर उशीर  झाल्यावर माझ्या नावाने शंखनाद कराल. "  दोघांच्या लुटूपुटूच्या भांडणाचा अक्षरश: मला हसू येत होतं ; पण नाही हसलो .फक्त एवढेच म्हणालो,
     "  आई-बाबा !  तुम्हां दोघांचे  भांडण म्हणजे जगातील आठवा  अजूबाच जणू !  कधी भांडता भांडता गोड होता..... तुमच्या दोघांमधील गुपित कोणी सांगू शकेल का? अशक्यच !"
        " अरे,नवऱ्या-बायकोचे भांडण असतं." बाबांनी त्यावर
पुस्ती जोडली.
        " आता वेळ होत नाही वाटतं !" आई  मध्येच म्हणाली. आता मात्र मला हसू आवरता आले नाही , मी हसू लागलो.
मला हसताना पाहून आई-बाबा ही हसू लागले.

             **************************
   
    " ए विद्या sss उठायचं नाही का तुला ? "  आईने विद्याला आवाज दिला. पण विद्याने ओ दिला नाही. म्हणून आई तिच्या खोलीत गेली पाहते ते काय विद्या अजूनही अंतरुणातच  होती. आईने तिच्या अंगावरून पांघरूण ओढत म्हणाली ," अगं उठून घडाळ्यात बघ. किती वाजलेत ते."
     " विद्या ने  पुन्हा अंगावर पांघरुण ओढून घेत म्हणाली,"
    "  थांब ना मम्मी ! झोपू दे जरा. कशाला उठवतेस " आई तिच्या अंगावर पांघरून खेचत म्हणाली ,"  चल उठ ,म्हणे झोपू दे जरा.कॉलेजला नाही जायचंय का तुला ? "
      "  जायचं ना !" विद्या कंटाळून बोलली.

  " मग उठ आधी ! नाहीतर मग घाई करशील जायला. विद्या अंथरुणातच उठून बसत म्हणाली ," अगं मम्मी ! कशाला उठलेस मला ?  किती छान स्वप्न पाहत होते मी!"
     " स्वप्नच  पाहतच राहायचं  का ? कॉलेजला जायचं नाही का तुला ? " अंथरुणातून उठून बाहेर येत म्हणाली ," किती वैताग आहे ना हा कॉलेजला जाण्याचा , त्यापेक्षा झोपायचाच अभ्यास असता तर काय बहार आली असती , नाही ? "
       " वा गं रात्रभर झोपलीस तरी अजून झोपायचं म्हणतेस, आळशी कुठली ! चल उठ  तोंड धुऊन   दात घास नि अंघोळ करून घे पटकन. तोपर्यंत मी चहा नाश्ता तयार करते ." असे बोलून  सरस्वतीबाई निघून गेली स्वयंपाक घरात.

     विद्या ने पटापट आपली तयारी केली नि  कॉलेजला निघून जाते. कॉलेजच्या आवारात तिची भेट माधवशी होते. माधव हा अनाथ मुलगा असतो. वय १८ , वर्ण गोरा , उंची पाच फूट पाच इंच. कधीपासून तिची वाट पाहत होता. विद्या आलेली पाहताच तिच्या जवळ येत  तो म्हणाला ," अगं  किती उशीर केलास ? एक लेक्चर चुकलं ना ? आपल्याला."  तेव्हा ती  वैतागून त्याला म्हणाली," तू जायचं होतं ना , तुला कोणी अडवलं होतं का ?" त्यावर माधव बोलला," तुझ्या शिवाय बसतो का  मी  वर्गामध्ये ? "
   "  सॉरी ! रागावू नकोस ." ती म्हणाली .
   " मग आता लेक्चर्स संपेपर्यंत टाईमपास कुठे करायचा ?"
   "  आणि कुठे ?...    गार्डन मध्ये जाऊन बसू !"
   " आता एक लेक्चर्स चुकला. दुसरा पण चुकवायचा
विचार आहे का तुला ?" माधव बोलला.
     "  अरे, अभ्यास करून कुणाचं भलं झालं आहे ? चल जाऊन बसू गार्डन मध्ये !"
     " तुला अभ्यासाची गरज नसली तरी मला आहे ."
     " का ? "
     " कारण मी गरिब अनाथ आहे ." तेव्हा त्याच्यावर चिडून ती म्हणाली ," खबरदार, पुन्हा स्वतःला अनाथ म्हणशील तर !"
      "  पण ते  खोटं आहे ?"
     "  माझ्याशी लग्न होणार आहे ना तुझं . मग तू अनाथ कसा राहणार तू  ? "
     " कुणाला ठाऊक  तुझ्याशी माझे लग्न होईल की नाही ?" तो उदासपणे म्हणाला.
     " का ? विश्वास नाही का माझ्यावर . "
     " विश्वास तुझ्यावर आहे पण माझ्या नशिबावर नाही ."
      " असं का बरं म्हणतोस ? "
      " अगं तू एका श्रीमंत बापाची मुलगी आणि मी हा असा अनाथ गरिब मुलगा. आम्हा दोघांचा मेळ बसत नाही मुळी !"
माधव एकदम विशण्णं मनाने म्हणाला. तेव्हा ती चिडून म्हणाली,"  असं होतं तर का केलेस माझ्यावर  प्रेम ?"
     " अगं  प्रेम कधी सांगून होतं का ?  ते आपोआपच होतं"
      "  हे तर कबूल आहे ना तुला ?"
      "  हो."
      " मग  माघार का घेतोयेस ?"
      "  माघार  नाही घेत गं जे  सत्य आहे ते सांगितलं .
      " मग अजून एक सत्य आहे , ते मी आज तुला सांगून ठेवते."
      " कोणतं ? " न समजून त्याने विचारले.
      " जर  माझ्या घरच्यांनी तुला नाकारले  तर आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करायचं, समजलं . ती ठामपणे निश्चयी स्वरात बोलली.
      " बाप रे ! "
      " काय झालं ? " तिने चमकून विचारलं.
      " एवढा मोठा निर्णय तू इतक्या सहजपणे कशी घेऊ शकतेस , याचे आश्चर्य वाटलं मला . "
      " आणि समज तू  माझ्या जागी असता तर ?"
      "  मला बुवा  नाही जमला असता असा तडकाफडकी निर्णय घ्यायला."  तो म्हणाला.
     " म्हणून तू फक्त माधव आहेस आणि मीे आहे विद्या ! एका यशस्वी उद्योगपतीची मुलगी समजलं.
     "  हो , मग चालायचं का आता ? "
     " कुठं ? "
     " अगं कुठे म्हणून काय विचारतेस ? दुसरा पिरियड  संपायला आलाय निदान तिसरा तरी अटेंड करू !"
     "  हो, चल. " दोघे कॉलेजच्या दिशेने चालू लागतात.

        ****************************

     दोन दिवसानंतर पराग असाच काही कामानिमित्त तो आमच्या घरी आला. पण त्यावेळी मी घरी नव्हतो. विद्या पण कॉलेजला गेलेली असते.घरात फक्त आई असते. दरवाजाजवळ बेल वाचली.म्हणून आईने जाऊन दरवाजा उघडला. दरवाजा रामोर  उभा असलेला पराग ला  पाहून मंद हास्य करत आई  म्हणाली ," कोण पराग ये आंत ये रे बाबा."
पराग आंत आला , तसे  त्याला बसायला सांगून ती पुढे म्हणाली ,"  कसा आहेस रे तू  ? "
     " छान !...  आपण ?"
     "  एकदम आनंदात."
     "  स्वप्निल आहे का घरात ?"
     " स्वप्नील आणि यावेळी .....?
     " कुठे बाहेर गेला का ? "
     " नाही . "
     " मग ? "
     " ऑफिसला गेलाय..... आपल्या वडिलांबरोबर .काही काम होतं का त्याच्याजवळ ?"
    "  काम तसं काही नाही , सहज आपली चौकशी केली."
    "  बरं चहा घेतलास का थोडा ?"
    "  चहा नको."
    "  घरी चहाच  घेतोस ना ?  का दूध ? "
     " नाही. चहाच घेतो."
    "  मग आमच्याकडे पण घे थोडा."
    "  हो ,चालेल ."
    " बरं बैस हां तू मी जरा चहाचं आंधण ठेवून येते." आई सोफ्यावरून उठत म्हणाली.
    "  बरं."  नाईलाजाने पराग ला बसावेच लागते. नाही  म्हणू शकत नव्हता, नाहीतर त्याचं ही कारण द्यावे लागले असते. म्हणून गप्प बसणे त्याने सोईचे ठरविले.टाईमपास म्हणून तो वर्तमानपत्र चाळत होता. एवढाच बाहेरून विद्या प्रवेश करते. हॉलमध्ये परागला बसलेला पाहून ती चपापली. नि  मनातल्या मनात विचार करू लागली की, परागदादा आपल्या घरी कशाला आला असावा बरं ? त्याने मम्मी जवळ आपली चूगळी तर नसेल ना केली ?  लगेच दुसरे मन म्हणाले ,नाही. तसे तो  करणार नाही, याची खात्री आहे मला. मग येथे येण्याचे  त्याचे काय प्रयोजन ? आला असेल दादाला भेटायला. आपण उगाच संशय घेतो त्याच्यावर. ती  असा असा विचार करत होती, कुणाचीतरी चाहूल लागली म्हणून पेपरात घातलेल्या डोके वर काढून वर   करून त्याने विद्याकडे पाहिले नि मंद हास्य  केले. आणि मग तो तिला म्हणाला ," तू कधी आलीस ?"
     "  आत्ताच !"
     "  नक्की कॉलेज ला गेली होतीस ना ? " त्याच्या या  अकस्मात प्रश्नाने ती थोडी दचकली. पण लगेच स्वतःला
सावरत हो ,  कॉलेजलाच !"
      " आज लवकर सुटले का कॉलेज ?"
      "  नाही."
      " मग लवकर कशी आलीस ?"
      "  हे विचारणारा  तू कोण  ? असा प्रश्न  विचारावा असे तिच्या मनात येऊन गेले.पण लगेच स्वतःच्या मनाला आवरलं
आणि मग  एकदम शांत स्वरात म्हणाली ," शेवटचा पिरियड ऑफ होता आज , म्हणून लवकर येऊ शकले मी."
      " अस्सं अस्सं ! " आता पुन्हा  दुसरे काही विचारु नये म्हणून  तिने तिथून काढता पाय घेत म्हणाली ," बरं तू बैस दादा,मी जरा फ्रेश होऊन येते."
     " ओके माय सिस्टर !" तो बोलला. त्यावर ती हसली आणि आपल्या खोलीत निघून गेली.

                         



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.