Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

परिवर्तन-२

परिवर्तन-२
परिवर्तन-२

 

      आप्पासाहेबांना इत्यंभूत सविस्तर घडलेली हकीगत
सांगितली. सर्व शांतपणे  ऐकून घेतल्यानंतर आप्पासाहेब
तिला धीर देत म्हणाले," तू म्हणतेस ते जर खरे असेल तर
तुला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी."    आप्पासाहेबांकडून हे आश्वासन मिळताच तिच्या जीवात जीव आला. आणि त्यांचे आभार मानत ती पुढे म्हणाली,
      " माझ्या सारख्या अबलेला जर तुम्ही न्याय मिळवून
दिलात तर आप्पासाहेब तुमचे  फार उपकार होतील बघा माझ्यावर. आणि तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही." त्यावर आप्पासाहेब बोलले की, बरं , बरं ! काकासाहेबांशी बोलतो मी या संदर्भात."
     " काहीही उपयोग होणार नाही त्याचा."
     " का बरं म्हणतेस तू असं ?"
     " तुमच्याकडे येण्यापूर्वी मी त्यांचकडेच गेले होते. न्याय
मागायला."
      " बरं मग काय म्हणाले ते ?"
      " ते जे म्हणाले त्याचे वर्णन मी इथं करू शकत नाही."
      " का ?"
      " ते असभ्यपणा ठरेल."
      " असं काय बरं म्हणाले ते ?"
      " ते मी तुम्हांला सांगू नये आणि तुम्ही ते ऐकू नये. असे
आवार्च्छ भाषेत म्हणाले."
        " बरं , बरं . मग नकोच सांगू तू. मी विचारतो त्याना."
        असे आश्वासन देताच ती त्यांचे आभार मानून म्हणाली," आभारी आहे मी तुमची . माझी तक्रार तुम्ही ऐकून
घेतल्याबद्दल." असे म्हणून ती त्याना हात जोडून त्यांचे आभार मानते नि तेथून निघून जाते.
  
     त्यानंतर आप्पासाहेब , काकासाहेबांची भेट घेतात नि
त्यांच्या समोर विलक्षण ने चंद्रकलेवर केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. काकासाहेबानी प्रथम सारे शांत पणे ऐकून घेतले आणि मग आप्पासाहेबाकडे पाहत म्हणाले ," तुम्हांला
काय वाटतं आप्पासाहेब ती रांड खरं बोलतेय." त्यावर आप्पासाहेब बोलले ," काकासाहेब ही भाषा तुमच्या तोंडी
शोभून दिसत नाही , तेव्हा सुसंस्कृत माणसा प्रमाणे सभ्य  भाषेत बोला." त्यावर काकासाहेब बोलले," पण तुम्हांला राग
यायचा कारण काय ? तुम्हांला तर मी काहीच बोललो नाही."
       " काकासाहेब कुण्याही सभ्य मुलीला रांड म्हणण्याचा
तुम्हाला अधिकार नाहीये." तेव्हा उपहासपूर्ण स्वरात बोलले,
       " सभ्य आणि ती मास्तरीन ,अहो आप्पासाहेब तुम्हांला
जेवढी ती सभ्य वाटते तेवढी सभ्य ती नाहीये."
      " तुम्ही स्वत: किती सभ्य आहात ते ठरवा अगोदर.मग
दुसऱ्या ना असभ्य ठरवा. आप्पासाहेब उद्गारले.
       तेव्हा काकासाहेब गर्जले," आप्पासाहेब , तुम्ही आमचा अपमान करताय त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत."
       त्यावर आप्पासाहेब एकदम निर्भयपणे म्हणाले,
       " परिणामाची पर्वा तुमच्या सारख्यानी करावी. आम्हांला त्याची काय पर्वा."
      " आप्पासाहेब , फार बोललात तुम्ही! जा आता इथून."
      " मी जाणारच आहे ; परन्तु जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो,ती नीट ध्यानात ठेवा. " असे म्हणून आप्पासाहेब   किंचित थांबले नि मग दिर्ग श्वास घेऊन ते पुढे म्हणाले," उद्या
पंचायत मध्ये हजर व्हा. तिथं तुमच्या कुकर्माचा पाढा वाचला
जाईल. येतो मी ." असे म्हणून तेथून जाऊ लागले. इतक्यात
काकासाहेबांचे स्वर त्यांच्या कानावर पडतात. तसे थांबून मागे वळून त्यांचे वक्तव्य ऐकू लागले. काकासाहेब म्हणाले
की,आप्पासाहेब , आम्ही जरूर येऊ पंचायत मध्ये. पण माझ्या मुलाला  गुन्हेगार म्हणून सिध्द करणारा पुरावा मात्र आणायला विसरू नका."
      " हो अवश्य ! पुरावा पण भेटेल तुम्हाला."
      " असा कोणता पुरावा आहे तुमच्याकडे ?"
      " ते आता सांगणं इष्ट नाहीये. येतो आम्ही !'
      असे म्हणून असप्पासाहेब निघून गेले. मात्र काकासाहेब
विचारात पडले. ते स्वतःशीच उद्गारले," ह्यांच्याकडे असा कोणता पुरावा आहे बरं ? पण उत्तर मिळाले नाही. तशी त्यांनी विलक्षण ला हांक मारली. पण त्याने दिला नाही म्हणून ते चिडले नि मोठ्याने ओरडले ," विलक्षण बाहेर ये अगोदर."
विलक्षण भीत भीत च बाहेर आला नि म्हणाला ," काय झालं बाबा  ?" तशी सणसणीत एक चपराक त्याच्या कानशीलावर
मारून मग पुढे म्हणाले ," नालायक ,बेशर्म तुला दुसरं कुणी भेटली नाही या गावात , जे मास्तरणीचे तोंड काळ करायला गेलास.?" विलक्षण आपला गाळ चोळत बोलला,"  बाबा खोटी बोलते ती  मी काहीच नाही केलं."
    " चूप ! माझ्या समोर तरी खोटं बोलू नकोस ? खरं काय
ते सांग." तेव्हा विलक्षण ने घडलेली इत्यंभूत सविस्तर
हकीगत कथन केली. ते ऐकून काकासाहेब म्हणाले," ठीक आहे आता एक लक्षात ठेवायचं ,कुणी काही विचारले तरी कबूल अजिबात व्हायचं नाही. काय म्हणायचं  ते ठाऊक आहे का तुला ?" लगेच विलक्षण त्याचे अपूर्ण वक्तव्य पूर्ण
करत बोलला ," तो मी नव्हेच !"
    " अगदी बरोबर बोललास. पण लक्षात राहील ना ?"
    " हो , बाबा."
    " जा आता .आणि काही घडलेच नाही असं समज. बाकी
मी बघतो काय करायचं ते." काकासाहेब त्याला आश्वासन देत म्हणाले. त्यामुळे आता विलक्षण बिनधास्त झाला. त्याला
वाटले की ,आता आपले कुणीही काही वाकडं करू शकत
नाही.

      दुसऱ्या दिवशी आप्पासाहेबांनी पंचायत भरविली. आणि
पंचायत समोर हा विषय ठेवण्यात आला. तेव्हा पंचायत मध्ये
चंद्रकला नि विलक्षण या दोघांना ही बोलविण्यात आले होते.
चंद्रकलेने पंचायत समक्ष विलक्षण चे नाव घेतले. पंचायने विलक्षण ला विचारले की, ही गोष्ट खरी आहे का ? " परंतु
विलक्षण ना कबूल तर झालाच पण त्या शिवाय तो म्हणाला
मी हिला ओळखतच नाही. आजच प्रथम पाहतोय मी हिला.
परंतु ही गोष्ट कुणालाही पटली नाही. कारण गावातील लोकांनी अनेक वेळा विलक्षण ला तिच्या सॊबत गप्पा मारताना पाहिले होते. अर्थात विलक्षण चक्क खोटे बोलतोय
हे सर्वांच्या ध्यानी आले. पण पुराव्या शिवाय काही सिध्द करता येणार नाही. तेव्हा विलक्षण अपराधी आहे हे कसे सिध्द करणार ? पंच आपसात चर्चा करू लागले. तेव्हा आप्पासाहेब उद्गारले," विलक्षण खोटं बोलतोय हे सिध्द करायला आपल्याकडे अजून एक भक्कम पुरावा आहे."
तेव्हा पंच मंडळीने विचारले की  कोणता ?" तेव्हा आप्पासाहेब म्हणाले ," मास्तरीनबाई गरोदर आहे,  आणि त्या बाळाचा बाप विलक्षण च आहे." तेव्हा पंचानी विचारले
की तुम्ही एवढ्या कात्रीने कसे सांगू शकता ?" तेव्हा आप्पासाहेब उत्तरले की, कारण होणाऱ्या बाळाचा बाप कोण
आहे हे फ़क्त त्या मुलाची आईच सांगू शकते. आणि माझी पूर्ण खात्री आहे की ती मास्तरीन खरं बोलतेय." त्यावर पंच म्हणाले ," तू म्हणतोस की तू हिला ओळखत च नाही ,पण हिचे म्हणणे आहे की ,हिच्या होणाऱ्या बाळाचा बाप तू आहेस ? त्या बाबतीत तुझं म्हणणे आहे ?"  त्यावर विलक्षण बोलला," ती खोटं बोलतेय. कारण सारे गाव मरतेय तिच्यावर. केला असेल कुणीतरी हे अघोरी कृत्य."
      " विलक्षण सगळ्या गावाला उगाच वेठीस धरू नकोस.
ती फक्त नि फक्त तुझं नाव घेतेय. तेव्हा तू फक्त तुझ्या पुरतं बोल."
       " मी खरंच सांगतोय ते मुल माझं नाहीये." तेव्हा पंच चंद्रकला बाईकडे पाहत बोलले की, बोला मास्तरीनबाई ,तुमचं म्हणणे काय आहे ?"
       " पंच महाशय कोणतीही इज्जतदार स्त्री आपली अब्रू
चव्हाट्यावर आणणार नाही. तेव्हा माझ्या उदरात वाढणाऱ्या
मुलाचा बाप विलक्षण च आहे." चंद्रकलाबाई बोलली. तेव्हा
मध्येच काकासाहेब उठून उभे राहत बोलले," ह्याला पुरावा
काय ?" तसे आप्पासाहेब उत्तरले," पुरावा पण मिळेल
काकासाहेब." असे म्हणता क्षणी सर्वजण आश्चर्याने आप्पासाहेबाकडे पाहू लागतात. तसे आप्पासाहेब पुढे म्हणाले," थोडा धीर धरा." तसे पंच महाशयांनी विचारले,
     " कोणता पुरावा आहे आप्पासाहेब ?"
      " या दोघांचा डी एन ए टेस्ट करा. लगेच माहिती पडेल
की होणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे ?" त्यावर पंच महाशय यांनी विचारले की, डी एन ए टेस्ट म्हणजे का ?"
      " ती एक वैधकीय तपासणी असते नि ती डॉक्टराकर्वी
केली जाते." त्यावर पंच महाशयांनी निर्णय दिला की अगोदर
या दोघांची डी एन ए टेस्ट केली जाईल. आणि त्यानंतरच या
केस चा निकाल लागेल. त्यानंतर सरकारी रुग्णालयात वैधकीय तपासणी केली जाते. तेव्हा काकासाहेबानी पैशांचे
लालच दाखवून डी एन ए टेस्ट टीपोर्ट गायब करण्याचा प्रयत्न
केला . परंतु आप्पासाहेबांमुळे तो प्रयत्न फसला. शेवटी विलक्षण अपराधी असल्याचे सिध्द झाले. तेव्हा पंचांनी निर्णय दिला की, विलक्षण ने रितसर रीतिरिवाज प्रमाणे
चंद्रकलाबाईशी विवाह करावा." तेव्हा काकासाहेब चिडून
बोलले की, हे पुरावे खोटे आहेत. मी अश्या चाचण्या मी
मानत नाही." तेव्हा आप्पासाहेब उद्गारले," तुम्ही नाही मानला
तरी या देशाची न्यायदेवता जरूर मानेल."
    काकासाहेब चिडून बोलले ," आप्पासाहेब , तुम्ही तुमच्या
पदाचा गैरवापर करताय असं वाटत नाही का तुम्हांला ?"
     " मुळीच नाही. उलट मी माझ्या पदाचा योग्य तो वापर
करत आहे , लोकांनी त्याचसाठी तर मला निवडून दिले आहे." तसे काकासाहेब चिडून बोलले ," परंतु आप्पासाहेब , ही खुर्ची माझ्यामुळे मिळाली तुम्हांला , हे कदापि विसरू नका तुम्ही !" आप्पासाहेब उत्तरले ," नाही विसरणार. परंतु
या खुर्चीवर बसणाऱ्या चे जे कर्तव्य असते. तेच तर मी करतोय काकासाहेब ,मी माझ्या पदाचा कधीही दूर उपयोग
केलेला नाहीये. आणि आता राहिला तुमच्या मुलाचा प्रश्न  तर तुमचा  मुलगा  अपराधी  आहे , अर्थात  त्याला  त्याच्या  अपराधाची शिक्षा मिळायलाच पाहिजे." त्यावर काकासाहेब
खवचट पणे बोलले की, कोण शिक्षा देईल माझ्या मुलाला ?
तुम्ही का तुमची ती मास्तरीनबाई ?"
      " या देशाची न्याय देवता देईल."
      " म्हणजे तुम्ही कोर्टात जाणार तर ?"
     " गरज पडली तर ते पण करू ,म्हणून सांगतोय ती वेळ
आणू नका आमच्यावर."
       " तुम्ही तर ती मास्तरीनबाई तुमची मुलगी असल्या सारखी बोलताय."
       " हो ; या गावातील साऱ्या मुली मला माझ्या मुली सारख्याच आहेत."
      " पण हे प्रकरण फार महागात पडेल तुम्हांला ?"
      " महाग आणि स्वस्त याचा विचार दुकानात प्रवेश
करण्यापूर्वी करायचा असतो ,काकासाहेब. एकदा दुकानात
शिरल्यानंतर तो विचार केला जात नाही. कारण शेवटी प्रश्न
प्रतिष्ठेचा असतो. नाही का ?
       " ते लवकरच कळेल तुम्हांला."
       " ते तेव्हाच तेव्हा पाहू. आताच बोला.....काय करता
चंद्रकलेच ?"
        " आम्ही काय करावं आपली इच्छा आहे ?"
        " पंचायत ने जो निर्णय दिला आहे तो तुम्हांला  मान्य
करावा लागेल."
        " आणि नाही मान्य केला तर ?"
        " पंचायतला तुमच्या विरुध्द पुढील कार्यवाही करावी लागेल."
       "  म्हणजे काय करील पंचायत ?"
       " तुम्हांला वाळीत टाकील."
       " हा निर्णय तुमचा का पंचायत चा ?"
       " अर्थात पंचायतचा."
       " मी पंचायत च्या तोंडून ऐकू इच्छितोय."
       आप्पासाहेब पंच कमिटी कडे पाहत बोलले," त्याना तुमचा निर्णय सांगा." सर्वजण आपसात कुजबुज लागले.
काकासाहेबांच्या विरोधात कुणीही बोलायला तयार नाही.
शेवटी निळकंठ राव उठून उभे राहत बोलले," पंच काय म्हणतात ते मला माहित नाही. परंतु नियम हाच आहे."
     

क्रमशः



      



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..