हे सारे तुझ्यासाठीच -२
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हे सारे तुझ्यासाठीच -२ |
धनराजशी तिने चांगली दोस्ती केली. फक्त धनराजशी नाही
तर त्याच्या मित्राशी ही तिने दोस्ती त्या सर्वांना अद्दल जी
घडवायची होती. परंतु विवेक शी ती बोलत असताना त्या
लोकांनी तिला पाहिले. तेव्हा ते समजले की ही आपल्याशी
नाटक करते. हिला चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे.
असा विचार करून ते खंडाळ्याला पिकनिक काढतात.
गेल्या वर्षी एका मुलीला तिथे नेऊन तिची इज्जत लुटून तिला खून करून फेकून दिले. तसे हिला ही गायब करण्याचा विचार होता त्याचा. परंतु घडले मात्र विपरीत. तिच्या ऐवजी तो स्वतःच गायब झाला. पोलीस तपास करत आहेत.
आता पुढे-
धनराज गायब होऊन दोन दिवस झाले तरी त्याचा पत्ता काही लागेना, मंत्री विश्वासराव ने पोलिसांना आदेश दिला होता की लवकरात लवकर माझ्या मुलाचा शोध घ्या. जर माझा मुलगा सापडला नाही तर तुमचंही काही खरं नाहीये. एकेकाची अश्या ठिकाणी ट्रान्सफर करीन की तिथून परत येणार नाहीत तुम्ही लोक." इन्स्पेक्टर विजय म्हणाला," साहेब तपास सुरू आहे." त्यावर मंत्री महोदय म्हणाले," ही
उत्तरे तुम्ही दुसऱ्या ना द्या. मला नका देवू !" इन्स्पेक्टर विजय
उद्गारला ," साहेब, आम्ही आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न
करतोय. विश्वास ठेवा आम्ही अवश्य त्याचा शोध घेऊ."
" विश्वास पानिपत च्या लढाईत मेला आहे, हे माहीत
आहे ना तुम्हाला ?"
" मी त्या विश्वसराव विषयी नाही बोलत आहे, साहेब."
" बस्स बस्स ! जास्त अक्कल पाजळू नका. सांगितलं
तेवढं काम करा."
" ओके सर !" इन्स्पेक्टर विजय बोलला नि कॉन्स्टेबल
हरीश कडे पाहत म्हणाला," साला रुबाब असा झाडतोय जशा आम्ही त्याच्या ठेवलेल्या रांडा ! " किचिंत थांबून हरीश ला म्हणाला ," आताच्या जा नि त्या धनराज च्या साऱ्या मित्रांकडून काही माहिती मिळते का बघा. नाहीतर असं करा
त्या साऱ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन या. इथंच त्यांच्या कडून माहिती घेऊ." कॉन्स्टेबल हरीश ने एक जोरदार सैल्युट मारली नि निघाला. पोलिसांनी धनराज च्या त्या पाची मित्रांना पोलीस स्टेशनला आणलं. तेव्हा त्यांच्या कडून मिळालेली माहिती थक्क करणारी तर होतीच परंतु कोणी त्यावर विश्वास ठेवणार नाही ,अशी होती. इन्स्पेक्टर विजय म्हणाला, " तू म्हणतोहेस त्यावर माझा विश्वास बसत नाही बघ."
" पण साहेब आम्ही सांगतोय त्यातले अक्षर नि अक्षर
सत्य आहे."
" चल मानलं. त्या मुलीवर म्हणजे काय नाव म्हणालास
त्या मुलीचे .....?"
" सौंदर्या !" विलास म्हणाला.
" अच्छा सौंदर्या.....तिला एका भुताने झपाटले आहे ?"
" हां साहेब , आम्ही खरं तेच सांगतोय."
" अरे पण विश्वास कसा कोण ठेवणार तुमच्या , ह्या बोलण्यावर ? कारण भूत वगैरे काही असतं यावर माझा
अजिबात विश्वास नाहीये. राक्षस , भूत ही फक्त गोष्टींच्या
पुस्तकात सापडतात. त्यांचा वास्तविकेशी काहीही संबंध
नाहीये. तेव्हा खरं काय ते सांगा. नाहीतर तुम्हां साऱ्यांना
आंत टाकेन."
" पण आम्हाला का ?" राजेश ने विचारले.
" तुम्ही सुध्दा होता ना त्याच्या सोबत ज्या दिवशी तो
गायब झाला."
" हां साहेब ? "
" कुठं गेला होता तुम्ही ?"
" खंडाळा."
" कशासाठी गेला होता खंडाळ्याला ? "
" पिकनिक ला."
" कोण कोण होते सोबत ?"
" आम्ही सहाजण आणि सौंदर्या !"
" अच्छा म्हणजे सौंदर्या पण तुमच्या सोबत होती तर !"
" हां साहेब."
" आता तिथं काय घडलं ते सविस्तर सांग." तसे ते
एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागतात. तसा इन्स्पेक्टर त्या
लोकांकडे पाहत म्हणाला ," आता एकमेकांकडे पाहायचं सोडा नि तिथं काय घडलं तेवढं फक्त सांगा." तसा राजेश
म्हणाला ," साहेब , सौंदर्या ने आम्हां साऱ्यांशी दोस्ती करण्याचे नाटक केले."
" पण का नाटक केले ?"
" ते माहीत नाहीये सर !"
" मग तिने नाटक केले , असं कशावरुन म्हणताय ?"
" तिला आम्ही एके दिवशी दुसऱ्या मुला बरोबर पाहिले.
" मग तो सुध्दा तुम्हां लोका प्रमाणे मित्र असेल तिचा . त्यात काय ? आजकाल मुलांचे अनेक गर्लफ्रेंड असतात
आणि मुलीचे पण मित्र असतात. त्यात नवल ते काय ?"
" मित्र नाही साहेब बॉयफ्रेंड !"
" अच्छा ठीक आहे, बॉयफ्रेंड पुढे....?"
" ती आपल्या बॉयफ्रेंड ला सांगत होती ती तिने आम्हाला कसे उल्लू बनविले ते."
" बरं पुढे बोल."
" म्हणून मग आम्ही पण ठरविले की तिला चांगली अद्दल घडवायची ! आणि त्याप्रमाणे आम्ही तिला खंडाळ्याला घेऊन जायचे ठरविले."
" बरं पुढे !"
" आम्ही तिला सांगितले की आम्ही लोक पिकनिकला चाललोय. तू पण चल आमच्या सोबत. अगोदर ती नाहीच
म्हणत होती पण नंतर कोण जाणे कशी तयार झाली. आणि
ठरल्या प्रमाणे आम्ही पिकनिक ला खंडाळ्याला गेलो तेथे
धनराजच्या वडिलांचे फार्म हाऊस आहे तिथं उतरलो. अगोदर तिकडच्या निसर्गरम्य परिसरात फिरलो. त्यानंतर
आम्ही फार्म हाऊस वर आल्यानंतर ड्रिंक वगैरे केली आणि
आमच्या सोबत तिला ही ड्रिंक पाजली. परंतु तिला जी
ड्रिंक पाजली त्यात लव्ह ड्रग्स मिक्स केले होते. तिला नशा
झाली तशी आम्ही तिला एका रूम मध्ये नेले आणि धनराज
तिच्यावर बळजबरी करू लागला. तेवढ्यात विद्यतु पॉवर कट झाली नि रूम मध्ये अंधार दाटला. थोड्या वेळानंतर
विद्युत पॉवर परत आली. परंतु रूम मधून धनराज गायब
झाला होता. "
" आणि ती मुलगी ?"
" कोण सौंदर्या ....?"
" हां सौंदर्या !"
" ती तिथंच रूम मध्ये होती." विलास कडून सविस्तर
घटना ऐकून इन्स्पेक्टर विजय पण विचारात पडला नि मनात उद्गारला ," असं कसं होईल बरं ? ही पोरं खोटं तर बोलत नसतील ना ? परंतु ह्यांचे म्हणणे आहे, सौंदर्याच्या भुताने त्याला गायब केले. पण हे कसं शक्य आहे ? काहीतरी हे लोक नक्की लपवत आहेत. असा विचार करून इन्स्पेक्टर विजय ने विचारले ," त्या सौंदर्याचा बॉयफ्रेंड काय नाव म्हणालांत त्या मुलाचं "
" विवेक ?"
" हां विवेक तो पण आला होता का तुमच्या सोबत ?"
" नाही सर !"
" त्याला माहित होतं का तुम्ही कुठं जाणार ते ?"
" तिने सांगितलेच असणार ना त्याला ."
" अगदी बरोबर बोलतो आहेस तू विवेक कुठं राहतो ते
माहीत आहे का तुम्हां लोकांना ?"
" नो सर !"
" बरं मग ती मुलगी कुठं राहते ते माहीत आहे का तुम्हांला ?"
" येस सर !"
" मग आड्रेस सांग तिचा." असे म्हणून कॉन्स्टेबल हरीश कडे पाहत इन्स्पेक्टर विजय म्हणाला ," हरीश आड्रेस लिहून घे." असे म्हणून विलास कडे पाहत म्हणाले ," हां आड्रेस सांग."
विलास ने सौंदर्याच्या घरचा आड्रेस सांगितला आणि
कॉन्स्टेबल हरीश ने लिहून घेतला. त्यानंतर कॉन्स्टेबल हरीशकडे पहात म्हणाले," हरीश तुम्ही एका लेडीज कॉन्स्टेबल ला सोबत घ्या नि आताच्या आता ह्या आड्रेस वर जा नि त्या सौंदर्या नावाच्या मुलीला अटक करून घेऊन या आणि या पाच जणांना पोलीस कस्टडी मध्ये ठेवा. अजून ह्यांच्या कडून बरीच माहिती काढावयाची आहे."
" ओके सर ! " असे म्हणून एक कॉन्स्टेबल त्या पाच जनांना स्वत: सोबत घेऊन गेला, इन्स्पेक्टर विचार करू
लागले. विवेकच्या शरीरावर खरंच भुताने ताबा मिळविलाय
का ? असेल सुध्दा नाहीतर तो अद्याप जिवंत कसा ? कारण सौंदर्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाची जर तो हत्या करत असेल तर विवेक ला पण त्याला मारायला पाहिजे होते ना, पण तसं काही घडलं नाही. ह्याचा अर्थ प्रेतात्मा ने त्या विवेक च्या शरीरावर ताबा मिळविला तर नसेल ना ? काय खरं नि काय खोटं काहीच कळेनासे झालंय. तेव्हा कॉन्स्टेबल सुधा म्हणाली ," सर, मला काय वाटतं माहितेय."
" काय वाटतंय तुला सांग बरं."
" गेल्या वर्षी नाही का ? त्याने अशाच एका मुलीचे अपहरण करून खंडाळ्याच्या फार्म हाऊस वर नेले.
अगोदर तिच्यावर रेप केला नि नंतर तिच्या खून करून
तिला फार्म हाऊस च्या मागे पुरून टाकले आणि मंत्री महोदयच्या दबावाला बळी पडून आपण नाही का ती केस रफादफा करून टाकलीत." तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने विचारले, " अहो मिस त्या केसचा ह्या केश शी काय संबंध ?"
" संबंध नाही कसा साहेब , तिचा आत्मा तिथंच भटकत
असणार आणि संधी मिळताच त्या आत्म्यानेच धनराजला
गायब केलं असणार."
" अहो मिस असं भलते सलते काही बोलू नका. तुम्ही
म्हणता तसं खरंच जर झालं असेल ना , तर तो मंत्री काही
आपली वर्दी उतरविल्याशिवाय राहणार नाहीये. तेव्हा शुभ बोला." कॉन्स्टेबल सुधा म्हणाली ," त्याला भुताने मारले तर
आपण काय करणार त्याला." इन्स्पेक्टर विजय उद्गारला,
" हां तुम्ही म्हणता ते पण बरोबरच आहे म्हणा. आधी
पाहू सौंदर्या कडून काय माहिती मिळते ती. त्यावरून पुढची चौकशी ची दिशा ठरविता येईल."
" मला काय वाटतं साहेब, आपल्याला एकदा घटनास्थळी जाऊन पाहायला पाहिजे, काही ना काही
पुरावा तिथेच मिळू शकतो आपल्याला."
" यु आर राईट !" असे म्हणून त्यांनी लगेच कॉन्स्टेबल ला
आदेश दिला की गाडी काढा. आधी आपण घटनास्थळी जाऊन येऊ." इन्स्पेक्टर विजय एक पोलीस पथक घेऊन
घटनास्थळी निघाले.
कॉन्स्टेबल हरीश आणि कॉन्स्टेबल प्रियंका दोघेही सौंदर्याच्या घरी गेले. दरवाजा आतून बंद होता. त्यांनी बेल चे बटन दाबले. तसा आतून आवाज आला कोण आहे ?"
" पोलीस !" पोलिसांचे नाव ऐकताच सौंदर्याचे अंग भीतीने थरथरले कापले आणि तिच्या आईला पण प्रश्न पडला की पोलीस आपल्या कडे का बरं आले असावेत ? पण तरी देखील त्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा पोलिसांनी विचारले," सौंदर्या म्हात्रे इथंच राहतात का ?" त्यावर सौंदर्यांची आई उद्गारली ," हो इथंच राहते. माझी मुलगी आहे ती, परंतु साहेब माझ्या मुलीने काय गुन्हा केला ?" त्यावर कॉन्स्टेबल हरीश ने म्हटलं," गुन्हा कोणी केला हे अजून ठरायचे आहे, परंतु गुन्हा घडताना तुमची मुलगी तिथं उपस्थित होती, म्हणून आम्ही तिची साक्षी घ्यायला आलोय. कुठं आहे ती." त्यावर त्या म्हणाल्या," थांबा. मी आता बोलावते तिला. तोपर्यंत आपण बसा." असे म्हणून त्या आंत गेल्या नि सौंदर्याला विचारू लागल्या की सौंदर्या बाहेर पोलीस आले आहेत काय केलेस तू ?"
" मम्मी मी खरं सांगते की मी काहीच केले नाहीये."
" मग काय पोलीस उगाच आले आहेत का आपल्याकडे ?"
" मम्मी मी तिथं होते पण मी काहीच केलेले नाहीये."
" केव्हाची गोष्ट आहे ही ?"
" त्या दिवशी नाही का आम्ही पिकनिक ला गेलो होतो."
" अच्छा म्हणून त्या दिवशी लवकर घरी परत आलीस काय ?.तरी सांगत होते जाऊ नकोस म्हणून. पण आमचं सांगणं कुणी ऐकेल तर ना ! चल आता पोलिसांना खरं काय आहे ते सांगून टाक." तशी ती भीतीने म्हणाली ," मम्मी मी खरंच काही नाही केले." त्यावर तिला धीर देत त्या म्हणाल्या ," तू काही केले नाहीस ना, मग तुला घाबरायचे कारण नाहीये. फक्त तेथे काय घडले ते सांग. चल माझ्या बरोबर." असे म्हणताच ती आपल्या आईच्या मागे भितभितच बाहेर आली. तेव्हा कॉन्स्टेबल ने तिला विचारले," धनराज देशमुख त्या दिवशी खंडाळ्याला पिकनिक ला गेल्या पासून बेपत्ता आहेत. त्या दिवशी तुम्ही सुद्धा होता ना त्यांच्या सोबत तेथे नेमके काय घडलं ते सविस्तर सांगा." तेव्हा तिने भीतभित सर्वकाही सांगितले. ते ऐकून कॉन्स्टेबल म्हणाला," ठीक आहे, तुम्ही आमच्या सोबत पोलीस स्टेशनमध्ये चला नि जे आम्हाला सांगितलात तेच आमच्या साहेबांना पण सांगा."
" पण साहेब तुम्ही पण तर तिने सांगितलेले तुमच्या साहेबांना सांगू शकता." सौंदर्यांची म्हणाली.
" नाही. साहेबांना अजून काही विचारायचे असेल तर !"
" मग मी पण येते तिच्या सोबत."
" तुम्ही नंतर या पोलीस स्टेशनला. आम्ही अगोदर ह्यांना घेऊन चलतो पुढे." असे म्हणून त्यांनी आपल्या साहेबांना फोन लावला.
इन्स्पेक्टर विजय पोलीस पथक घेऊन देशमुखांच्या
फार्म हाऊस वर पोहोचले. त्यानंतर त्यांनी तिथला संपूर्ण
परिसर कसून तपासून पाहिला, परंतु संशात्मक काहीच
आढळले नाही. मागच्या वेळी जिथे एका तरुणीचे प्रेत सापडले होते ती जागा देखील पाहिली. इतक्यात त्यांच्या मोबाईल ची बेल वाजली. त्यांनी फोन रिसिव्ह केला नि हॅलो म्हटलं. तेव्हा समोरून कॉन्स्टेबल हरीश चा आवाज आला. तसे ते म्हणाले," हां बोल हरीश !"
" साहेब , तिने दिलेली माहिती आणि धनराजच्या मित्रांनी दिलेली माहिती अगदी सेम आहे." त्यावर इन्स्पेक्टर विजय म्हणाला," ठीक आहे, तिला पोलीस स्टेशनला घेऊन ये. तोपर्यंत मी इथली माहिती गोळा करून घेऊन येतोच तिथे."
" म्हणजे आता तुम्ही पोलीस स्टेशनला नाहीयेत."
" मी खंडाळ्याला धनराज देशमुख च्या फार्म हाऊस वर
आलोय."
" परत जायचं कारण ?"
" आल्यावर सांगतो." असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर तिथल्या चौकीदारशी विचार पूस केली तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने विचारले ," तू म्हणतोस त्या दिवशी तुझ्या मालकाने तुला सुट्टी दिली होती." तेव्हा तो चौकीदार म्हणाला ," हां साहेब, मी खरं तेच सांगितले."
" मग ह्या फार्म हाऊस ची किल्ली कोणाकडे असते ?"
" एक माझ्याकडे असते नि एक मालकाकडे असते."
" अच्छा तुझे मालक नेहमी असंच करतात. ज्या ज्या वेळी ते इथं येतात. त्या त्या वेळी तुला सुट्टी देतात."
" नाही साहेब तसं नाही. म्हणजे ते एकटेच येतात तेव्हा
मी इथंच असतो."
" अच्छा म्हणजे ते कुणा तरुणी सोबत येतात तेव्हाच
तुला सुट्टी देतात. असंच ना ?"
" नाही साहेब तसं नाहीये."
" खरे बोल, नाहीतर आंत टाकीन तुला. मग बस तुरुंगात
दगडी फोडत."
" नाही साहेब. मला तुरुंगात नका टाकू !"
" मग खरं काय ते सांग."
" ते ज्या ज्या वेळी आपल्या मित्रा सोबत येतात. त्या त्या
वेळी ते मला सुट्टी देतात." चौकीदार
" अच्छा मित्रा सोबत कोण कोण असतात त्याचे मित्र ?"
इन्स्पेक्टर विजय ने विचारले. मग त्या चौकीदार ने छोट्या
मालकाच्या साऱ्या मित्रांची नावे सांगितली. विलास, राजेश,
प्रकाश, विनय, प्रताप इत्यादी , तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने
त्यांच्या सोबत आणखीन कोणी असते का ? म्हणजे तरुणी
वगैरे ?" असे विचारताच तो चौकीदार चूप झाला, तसा
इन्स्पेक्टर विजय म्हणाला ," आता बऱ्या बोला ने सांगणार
आहेस का आंत टाकायला सांगू ?"
" नका साहेब मला आंत नका टाकू मी सर्वकाही सांगतो." असे म्हणून त्याने त्या दिवशी काय घडलं ते सर्वकाही सांगितले. ते इन्स्पेक्टर विजय ने दरडावून विचारले ," मग मघाशी खोटं का बोलत होतास ?"
" साहेब , मी आपला घाबरलो होतो."
" तू सकाळी जेव्हा आलास तेव्हा एका तरुणाला फार्म
हाऊस च्या मागे बेशुध्द अवस्थेत पाहिलेस तेव्हा काय केलेस तू ?" त्यावर तो चौकीदार म्हणाला," मी त्याच्या तोंडावर पाणी मारलं तसा तो शुद्धीवर आला. मी त्याला विचारले,
" कोण आहेस तू ? तेव्हा तो म्हणाला, मी धनराज चा मित्र आहे. तसे मी त्याला विचारले की , छोट्या मालकांच्या साऱ्या मित्रांना मी ओळखतो. पण तुला कधी नाही पाहिले त्यांच्या सोबत. त्यावर तो म्हणाला , आमची आता नव्या ने दोस्ती झाली."
" अच्छा तू नवीन दोस्त आहेस होय तरी म्हटलं तुला मी
ओळखत कसं नाही ? " त्याने मला विचारले,
" मी आता जाऊ ? मी विचारले, " कुठं जाणार तुम्ही ?"
तर तो म्हणाला ," माझ्या घरी !" मग मी विचारले ," मग छोटे
मालक आणि बाकीचे मित्र कुठं गेले ?"
" ते मला माहित नाही. कारण रात्री अचानकपणे विद्युत
पॉवर गेली नि अंधारातच माझ्या डोक्यावर काहीतरी वजनदार वस्तू पडली नि मी बेशुध्द झालो. तो अजूनपर्यंत
बेशुध्दच होतो. " त्यावर मी म्हटलं ," छोटे मालक आणि त्यांचे बाकीचे मित्र कुठे गेलेत त्या बद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही. असेच ना ?"
" अगदी बरोबर."
" ठीक आहे, जा तुम्ही ,असे म्हणून मी त्याला सोडून
दिलं." त्यावर इन्स्पेक्टर विजय म्हणाला ," बरं तू त्याला जर
पुन्हा पाहिलेस तर ओळखु शकतो का ?"
" नक्कीच ओळखेन."
" ठीक आहे, आता त्याचे वर्णन सांग." असे म्हणून त्यांनी स्केच काढणाऱ्याला वर्णनावरून त्याचे स्केच काढायला सांगितले. चौकीदार वर्णन करत गेला. तसे त्याचे स्केच काढत गेला. थोड्याच वेळात स्केच तयार झाले. तसे इन्स्पेक्टर विजय ने ते स्केच आपल्या हातात घेतले नि नीट त्याचे निरीक्षण केले नि मग त्या चौकीदार ला दाखवत म्हटलं," हाच होता का तो तरुण ?" त्यावर तो चौकीदार म्हणाला," हां साहेब हाच होता."
" ठीक आहे, तू इथून कुठंही जायचं नाही. कळलं ."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा