काळपुरुष -१
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
काळपुरुष -१ |
१
(कथा काल्पनिक आहे,फक्त मनोरंजनासाठी लिहिली.
वास्तवीकेशी ह्या कथेचा काही संबंध नाही. कोण आहे हा काळपुरुष सस्पेंस थ्रिलर रहस्यमय कथा )
आप्पासाहेब सकाळी उठले नाहीत की त्याना सर्वात पहिले वर्तमानपत्र लागायचे. त्यांचे म्हणणे असे की नित्य
नियमाने प्रत्येक माणसाने वर्तमानपत्र वाचायला हवं. जगात
रोज घडणाऱ्या घडामोडीची माहिती घेणे गरजेचे आहे, परंतु आज-काल वर्तमानपत्र वाचायला एवढा वेळ आहे, कोणापाशी ? रोजच्या धावपळीच्या जीवनात माणूस एकदम
मेटाकुटीस आलेल्या असतो. पण तरी देखील थोडा वेळ वृत्तपत्र वाचण्यासाठी वेळ काढायलाच हवा नाही का ?
तरच कळेल ना ? आपला देश कुठं चालला आहे ? आप्पासाहेब वर्तमानपत्र चाळत असतात, तेवढ्यात त्यांची
नजर एका बातमी वर जाऊन स्थिरावली. त्यात लिहिलं होतं
की , सकाळी कामाला गेलेली मुलगी घरी परतली नाही. ती
काम करत असलेल्या कंपनीत तिच्या आईने चौकशी केली
असता तिला समजले की ती आज कंपनीत आलीच नाही.
असे म्हणताच तिच्या आईच्या काळजात एकदम चर्रर्र झालं.
आणि भीतीने अंगावर काटा उभा राहिला. आणि मनात अनेक प्रश्न उभे राहिले. कंपनीत पोहोचली नाही मग ही गेली
कुठे ? तिच्या हृदयात कालवाकालव सुरू झाली. तिने लगेच
पोलीस स्टेशनला फोन करून आपली मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिसांनी लगेच तपास कामाला
सुरुवात केली. ही एक बातमी होती तर दुसरी बातमी होती
की पिंकी नाव असलेल्या मुलीच्या तोंडावर तिच्यावर एक
तर्फी प्रेम करत असलेल्या मुलाने ऍसिड फेकून तिचा चेहरा
विद्रुप करून टाकला. बातमी वाचून आप्पासाहेब बोलले,
" काय चाललंय आपल्या देशात ? ह्या नराधमांना शासन करणारा कोणीच नाही का ?"
" आप्पा कोण शासन करणार ? "
" कोण करणार म्हणजे ? कायदा नाही आहे का ?"
" आहे ना ,सर्वकाही आहे, परंतु रक्षकच भक्षक बनल्यावर न्याय कोणाकडे मागणार ?"
" नेमके काय म्हणायचंय तुला ?"
" कुंपणच शेत खाऊ लागल्यावर दाद कोणाकडे मागणार ?"
" म्हणजे तुला म्हणायचं की कायदाच त्यांची मदत करतो."
" एक्सझटली !"
" मला नाही हे मान्य ,असं कसं होईल ?"
" असंच घडतंय आप्पा असंच घडतंय. म्हणून तर गुन्हा
करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे,"
" मग आपलं सरकार काय करतंय ?"
" सरकार काय करणार त्याला ?"
" काय करणार म्हणजे ? अश्या लोकांवर कडक कार्यवाही करायला पाहिजे."
" हो ; पण गुन्हा सिध्द झाला तर ना ? " गुन्हा करणारे
पुरावा मागे शिल्लक ठेवत नाहीत."
" असं नाही होऊ शकत , गुन्हेगार कितीही चतुर असला
तरी काही काही पुरावा पाठीमागे ठेवतोच तो काही ना काही फक्त तिथे पोहोचणे गरजेचे आहे."
" हो ; पण कसे पोहोचणार. गुन्हे करणाऱ्याचे हात वरपर्यंत पोहोचलेले असतात. अश्या पोलिसांना माघार घ्यावी
लागते."
" हा तर सरळ सरळ अन्याय आहे."
" हो अन्याय तर आहेच ; पण त्याला पर्याय काय ?"
" कोणीतरी यावर पर्याय शोधायलाच हवा. नि त्या नराधमांना शासन करणारा कोणीतरी जन्माला यायलाच हवा."
" म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की कुणी अवतारी पुरुष
जन्माला येईल."
" अत्याचार प्रमानापेक्षा वाढतो ना, तेव्हा ईश्वरला कोणाचे
ना कोणाचे रूप घेऊन जन्माला यावेच लागते."
" आप्पा हे सतयुग नाही कलियुग आहे, या युगात ईश्वर जन्माला येऊ शकत नाही."
" ईश्वर प्रत्येक युगात जन्म घेऊ शकतो. त्याला कुणाचे ही बंधन नाहीये."
" असेल ही पण या युगात नाही येणार."
" का बरं ?"
" या युगात पापी माणसांची संख्या फार जास्त आहे, शिवाय स्वतः श्रीरामचंद्र जी ने कहा है, सियासे की ऐसा कलयुग आयेगा, हंस चुनेगा दाना तिनका कौआ मोती खायेगा. और उन्होंने यह भी कहा की पिता के संग संग नाचेगी घर की बाला. लोकांची नितीच बदलली आहे, शर्म ,लाज लजा, काहीही राहिलेलं नाहीये. एके काळी वडीलासमोर पिणं तर दूरच राहिलं .जवळपास फिरकत
ही नसतं परंतु या काळातील मुलं वडिलांसोबत प्यायला बसतात. ग्लासाला ग्लास भिडवून चिअस करताना दिसतात.
पूर्वी होतं का असं ?"
" हे बाकी खरंय."
" म्हणून म्हणतोय अश्या युगात देव कसा येईल बरं ?"
" ते ठीक आहे, पण स्त्रियांवर अत्याचार होत आहे, हे थांबायला नको का ?"
" थांबायला पाहिजे पण कोण थांबविणार ? आणि असे
अत्याचार फक्त पुरुष च करतात असे नाहीये. स्त्रिया पण त्यात सामील असतात. सेक्स रॅकेट म्हणून एक यु ट्यूबवर व्हिडीओ पाहिला. त्या व्हिडीओ मध्ये मुलीचं , मुलींना फसवीत असतात. म्हणजे स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर त्या मुलीने आपल्या सारख्या दुसऱ्या मुलीला फसवून त्या रॅकेट च्या स्वाधीन करायचे तेव्हाच त्या मुलीची सुटका होणार. म्हणजे स्वतःची सुटका करण्यासाठी बिचाऱ्या दुसऱ्या मुलीला फसविणे हा केवढा मोठा गुन्हा आहे. पण
त्या बेधडक करताहेत. आणि त्या गुन्हेगार लोकांना पोलीस
ही मदत करतंय. मग दाद कुणाकडे मागणार ? "
" फार भयंकर आहे रे,बाबा. न्याय कसा पाहिजे शिवरायांच्या सारखा एकदम कडक कुणालाही माफी नाही."
" आप्पा ते आपले शिवराय होते. त्यांच्या सारखा कुणी
झाला नाही आणि पुढेही होणार नाही."
" खरंय." विलास उद्गारला.
आप्पासाहेबानी पुन्हा वर्तमानपत्रात आपले डोके खुपसले. वाचता-वाचता त्यांची नजर अजून एका बातमी वर
जाऊन स्थिरावली. त्या बातमीदाराने लिहिले होते, ज्या मुलाने पिंकी नावाच्या मुलीवर ऍसिड फेकले होते त्या मुलाचा मृतदेह अगदी तसाच ऍसिड फेकून कुणीतरी जाळला
होता. पोलीस त्या गुन्हेगाराचा कसून शोध घेत आहेत. परंतु
अजून काहीच धागा दोरा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
तसे आप्पासाहेब हसून म्हणाले ," अरे , कशाला शोधताय त्याला ? तुम्हांला नाही जमले ते त्याने करून दाखविले ना ?
उलट तुम्ही त्याला शाब्बासकी द्यायला पाहिजे. म्हणजे नराधमांना शिक्षा देणारा कोणीतरी आहे,हे नक्की ! पण कोण ?
पोलीस चौकी मध्ये खळबळ माजली आहे, कारण पोष्टमार्टम च्या रिपोर्ट मध्ये त्याला भरपूर मारहानी केल्याचे
सिध्द झालेय. परंतु त्यांच्या शरीरावर मारणाऱ्याच्या हाताचे एक पण निशाण नाही, हे कसे ? ऍसिड तर नंतर फेकून त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला. शिवाय मारणाऱ्या ने स्वतः पोलिसांना फोन करून सांगितले की तुम्हाला हवा असलेला अपराधी मरून पडला आहे,त्याला घेऊन जा. शिवाय स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय मी मारलंय त्याला.
आणि नाव विचारले तर म्हणाला ," काळपुरुष ! कोण हा काळपुरुष ? अशा नावाचा माणूस कुठं ऐकिवात नाही. काय समजायचं ? कोणअसेल हा ? " इन्स्पेक्टर विजय स्वतःशीच
बोलला. त्याने लगेच एका कॉन्स्टेबल ला सिमकार्ड कंपनीत
सर्व डिटेल्स आणावया साठी पाठविले. मोबाईल कंपनीने
सांगितले की हा नंबर अस्तित्वात नाही . असं कसं होईल ?
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा