Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

बिन फेरे हम तेरे १

बिन फेरे हम तेरे १
बिन फेरे हम तेरे १
                 

    राजेश्वर म्हात्रे हे एक नामांकित बिल्डर  त्यांचा
शांती बिल्डर अँड डेव्हपर्स ही त्यांची कंपनी. परंतु त्यांचे
बालपण फार कष्टमय परिस्थिती मध्ये गेले. कारण त्यांचे
वडील त्यांच्या बालपणीच वारले. त्याचे त्यावेळी असेल
दहा वर्ष असेल. त्याना चार मोठ्या बहिणी होत्या. हे सर्वात
धाकटे बंधू. सायन कोळीवाड्याला रेल्वेच्या कॉर्टर मध्ये ते
राहात होते. परंतु वडिलांचे निधन झाल्याने त्याना रेल्वेचा
रूम सोडावा लागला. त्यावेळी रेल्वे कामगारांना पगार काही फार नव्हता. त्यामुळे जानकीबाई ना फक्त पाचशे  रुपये महिन्याला पेन्शन मिळत असे. आणि पदरात मुले पाच होती. अर्थात एवढ्या पैशात घर चालविणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांचा एकुलता एक भाऊ जाणकीदास तिच्या
मदतीला धावून आला.तो तिला म्हणाला ," ताई , तू माझ्या
घरी येऊन रहा.
      कल्याण मध्ये कचौरे म्हणून एक गाव आहे , तेथे त्यांचा जानकीदास राहात होता. त्यांनी आपल्या बहिणीला
आपल्या घरी बोलविले नि आपल्या घरी राहायला सांगितले. त्याप्रमाणे राजेश्वरची आई , जानकीबाई आपल्या
मुलांना घेऊन आपल्या भावाच्या घरी राहू लागली.
        जाणकीदास यांची तेथे शेतीवाडी होती. आणि जोड
धंदा मासळी विकण्याचा. सकाळी कुलाबा वरून मच्छी
विकत घेऊन यायची नि नाक्यावर विकायला बसायचे.
मच्छीच्या धंदा मध्ये खूप फायदा होतो. लोक सांगतील
तो भाव मच्छीला देतात.
      जाणकीदास ना एकच मुलगी होती तिचे नाव होते लक्ष्मी ! आणि जानकीबाई ना पाच मुलं होती. चार मुली आणि एक मुलगा , मुलींची नावे - सुरेखा, सुमन, वृषाली, वैशाली , आणि मुलाचे नाव राजेश्वर , मुलं हळूहळू मोठी होऊ लागली.मुली जशा मोठं होत गेल्या तशी त्यांची लग्ने
करून दिली.  एकुलता एक मुलगा असल्याने त्याला खूप
शिकविले. म्हणजे एल. एल. बी.पर्यंत शिकविले. पुढे आपल्याच मुली सोबत त्याचे लग्न ही लावून दिले. त्याला
आता वकिली सुरू करायची होती. पण त्या अगोदर त्याचा
एक मित्र त्याला म्हणाला ," वकिली कसली करतोस आपण
दोघांनी पार्टनरशिप मध्ये कन्ट्रक्शन चा व्यवसाय सुरू करू
या." असे म्हणताच राजेश्वर हसू लागला. तसा चिडून
म्हणाला ,"  हसतोस काय असा ?" त्यावर राजेश्वर उत्तर देत म्हणाला ," हसू नाहीतर काय करू ? तू बोलतोसच  हसण्या सारखे !" त्यावर त्याने विचारले ," काय हसण्या सारखे बोललो मी ?" राजेश्वर उत्तरला ," अरे, बिजनेस कशाने करायचा ? त्याला पैसे नको का ? म्हणजे भांडवल रे....?"
     " भांडवल ना, मी देतो ना तुला , माझ्या बापाकडे खूप
पैसा आहे,तो कधी कामाला यायचा."
     " अरे , पण तो तुझ्या बापाचा पैसा आहे ना....?"
     " हां मग बापाने कोणासाठी कमविला आहे, माझ्यासाठी ना ?"
     " ते खरे रे पण वडील देतील का रे एवढे पैसे ?"
     " का देणार नाहीत, मी काय जुगार खेळण्यासाठी पैसे
मागत नाहीये त्यांच्याकडे."
     " बघ त्यांनी ठीकच आहे."
      " त्याची चिंता तू करू नकोस, ते काम माझ्याकडे लागले. तुझी जमीन आणि  माझे पैसे."
     " अरे, पण ही जमीन माझी नाहीये तर ती मामाची आहे."
     " पण मामाच्या नंतर तुझीच होणार ना ? मामाला दुसरा
कोणी आहे का ? एकच तर मुलगी आहे त्याना. ती पण तुला देऊन टाकली. मग बायकोच्या इस्टेटी वर तुझाच ना अधिकार."
    " ते खरं रे, परंतु मामाना विचारायला लागेल एकदा."
    " मग विचार ना ? " मग राजेश्वर ने अगोदर आपल्या
पत्नीची समत्ती घेतली. मगच त्याने आपल्या मामा समोर
प्रस्ताव ठेवला. त्यावर जाणकीदास म्हणाले," कन्ट्रक्शन चा
धंदा करायला हरकत नाही.परंतु मित्र विश्वासु आहे का ?"
     त्यावर राजेश्वर म्हणाला," एकदम डोळे झाकून विश्वास
करण्या सारखा आहे."
     " मग माझी काहीच हरकत नाहीये." मामा उत्तरला.
     मामा कडून समत्ती मिळताच त्यांनी प्रथम छोटेशे ऑफिस बांधले. त्यानंतर  चाळ बांधण्याचा विचार त्यांनी
केला. प्रथम एक चाळ बांधली. त्यातील काही खोल्या विकल्या नि काही भाडे या तत्वावर दिल्या. पैशाची आवक
सुरू झाली. लगेच दुसरी चाळ उभी राहिली. त्या चाळी
मधील पण काही खोल्या विक्रीला गेल्या नि काही भाडे
तत्वावर दिल्या. हातात पैसे खेळू लागले तसे नवीन नवीन
छंद ही जडले. तो आपल्या मित्रा सोबत बार मध्ये जाऊ
लागला आणि बारबाला वर पैसे पण खर्च करू लागला.
ही गोष्ट त्याच्या मामाला कळली तसे मामा ने त्याला दम
दिला की तू जर असा वागत असशील तर मी ही प्रॉपर्टी
कोणाला तरी विकून टाकीन आणि सारे पैसे माझ्या मुलीच्या नावावर ठेवून देईन.आणि त्याला त्याच्या पत्नीने पण सांगितले की ," तुम्ही जर त्या बारबाला वर पैसे उडवत असाल तर मी तुम्हाला घटस्फोट देईन." असे म्हणताच राजेश्वर समजला की बायको गेली तर सगळंच गेलं. त्यापेक्षा घर की मुर्गिच छान ! " त्यानंतर त्याने बार मध्ये जायचे सोडले नि एकदम सज्जन बनला. काही वर्षानंतर जाणकीदास मामा स्वर्गवाशी झाले. त्यामुळे त्यांची सारी प्रॉपर्टी आता लक्ष्मीच्या नावावर झाली. राजेश्वरला  दोन मुलं झाली. एकाचे नाव पुरुषोत्तम तर दुसऱ्याचे नाव काशीनाथ मुलं जशी मोठी झाली तशी शाळेत जाऊ लागली होती.
         राजेश्वर मोठा बिल्डर झाला. त्याने मित्रा सोबत असलेली पार्टनरशीप आता तोडली होती ,कारण  दोघेही आता  आपापला स्वतंत्र्य बिझनेस करू इच्छित होते. मोठा मुलगा काशीनाथ त्याला तर  अभ्यासाची अजिबात आवड नव्हती. उनाडक्या करणे, खोड्या करणे, शाळा चुकवून मित्रा सोबत सिनेमा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे वगैरे तो करू लागला. शाळेतून मास्तरांचा तक्रार पत्र पण घरी आले. तेव्हा कुठे घरच्याना कळाले की आपला मुलगा शाळेत जात नाहीये.दांड्या मारतोय, मग हा नेमका जातोय
कुठं ? याचा शोध घेतल्यावर त्यांना कळले की कधी हा मित्रा सोबत टिटवाळ्याच्या गणपतीला जातो तर कधी आणखीन कुठं ? आईला नेहमी वाटायचे की आपला मुलगा कॉलेज मधून घरी आला. म्हणजे कॉलेज सुटायचा टाईम माहीत असल्याने तो बरोबर त्याच टायमाला घरी यायचा त्यामुळे कोण कशाला संशय घेतोय ? आणि मुलं एकदा मोठी झाली की त्यांच्या वर आई-वडिलांची जोर जबरदस्ती पण चालत नाही ना ? ही सर्वात मोठी अडचण असते. लहान मुलांना दोन- चार धपाटे घालून तरी समजावता पण
मोठ्या मुलांना कसं समजविणार ?  थोडीधी दमदाटी करून  पाहणार , सुधारला तर सुधारला. आबासाहेबानी त्याला थोडीशी दमदाटी केली. परंतु त्याच्या मध्ये काहीच सुधार झाला नाही. म्हणून त्याचा नाद सोडून दिला. पण तरी देखील जेमतेम त्याने  एच. एच. सी. पर्यंत शिक्षण झाले.
त्यानंतर तो म्हणाला ," मला पुढे नाही शिकायचे. कारण काय तर म्हणे की, जास्त शिकून काय करायचे मला नोकरी थोडीच करायची आहे कुणाची ? माझा बाप बिल्डर आहे, मग मी ही त्यांच्या प्रमाणे बिल्डर होईन. तेव्हा मग त्याचे वडील म्हणाले," तुला कॉलेज नाही करायचे तर आपल्या धंद्याकडे लक्ष दे, साईटवर जा कन्ट्रक्शनचे काम कसे चालले आहे त्या कडे लक्ष दे."
      कमीत कमी बापाच्या व्यवसायात लक्ष द्यायला हवे. पण तेही नाही. दिवसभर रिकामटेकड्या मित्रा सोबत भटकायचं नि रात्री जेवायला घरी यायचे बापाने कधी सांगितले की भाडेकरू कडून भाडे वसुंल करून त्याना भाडे पावती द्यायला सांगितली तर अर्धातल्या लोकांचे भाडे घरी आणून देत असे तर काही भाडेकरू लोकांचे पैसे स्वत: खर्च करून मोकळा होई. आणि कधी बापाने विचारले ," अमुक अमुक माणसाचे या महिन्याचे भाडे का नाही आले, तर म्हणे आबा ह्या महिन्यात त्याना थोडा प्रॉब्लेम आहे, पुढच्या  महिन्यात दोन्ही महिन्याचे भाडे देतील ते." बापाला वाटले की असेल त्याना काही अडचण देतील पुढच्या महिन्यात. असं समजून गप्प राहायचे. परंतु काशीनाथ आपल्याशी खोटे बोलतोय असं त्याना कधी जाणवले नाही. प्रत्येक महिण्याच्या दहा ते पंधरा तारखे पर्यंत सर्व भाडेकरूंचे भाडे यायलाच पाहिजे असा त्यांचा दंडक होता.
     काशिनाथ आपल्या वडिलांशी खोटे बोलून ते पैसे तो
आपल्या मित्रा सोबत तरी उडवत असे किंवा चांदणी बार
मध्ये जाऊन तो एका बुलबुल नावाच्या बारबाला वर ते पैसे
खर्च करत असे. हे कोणाला माहीत नव्हते. त्याचा एक रंगीला नावाचा मित्र होता. रंगीला नावा प्रमाणे रंगीलाच होता तो, त्याला कसले कसले नाद होते. आणि हा त्याचा जिगरी दोस्त म्हटल्यावर हा मागे कसा राहील. बुलबुल दिसायला फारच सूंदर होती. ती ह्याच्या मनात भरली होती. हा तिच्यावर पैसे उडवत असे. एके दिवशी आपल्या मित्रा बरोबर चांदणी बार मध्ये आला. सॉंग सुरू होते आणि त्या गाण्यावर काही बारबाला नृत्य करीत होत्या. तो एक कोपऱ्यातल्या टेबल वर बसला. आणि त्याचा मित्र दुसऱ्या कोपऱ्यात त्याच्या वाली कडे जाऊन बसला नि त्या नृत्य करणाऱ्या बारबाला वर त्याची नजर फिरत होती,परंतु त्या बारबाला मध्ये बुलबुल कुठेच दिसत नव्हती. इतक्यात तिथे एक लैला नावाची मुलगी त्याच्या जवळ आली नि त्याला म्हणाली ," क्यों शेठ किसें ढूंढ रहे  आप ?" काशीनाथ उत्तरला," वो नही क्या ?" झटकन त्याला तिचं नाव आठवले नाही. तिला न कळल्याने तिने पुन्हा विचारले, वो कौन ? नाम नही है क्या उसे ?" तेवढ्यातच त्याला तिचं नाव
आठवले , तसा तो पटकन म्हणाला ," बुलबुल क्या है ?"
    " बुलबुल उड़ गयी दुसरे  पंछी के साथ !"
    " क्या मतलब है तुम्हारा ?"
    " नहीं समझे ! अभी समझा देती हूं ! " असे म्हणून ती
पुढे म्हणाली," बुलबुल अंदर है किसी दूसरे कस्टमर के साथ  !" असे म्हणताच तो आपल्या टेबला वरून उठत म्हणाला," ऐसे कैसे कर सकती हैं वो ? मेरे होते हुए वो किसी और के साथ कैसे जा सकती हैं ?" त्यावर लैला बोली, " क्यों ? तू कौन है उसका मर्द है क्या ? जो मर्द की तरह पूछ रहा है। ए शेठ चुपचाप अपनी जगह पर बैठ जा  और सुन वो किसी के साथ भी जा सकती हैं, क्योंकि वो तुम्हारी बीवी नही है , समझे !" तसा तो तिला ढकलून आंत मध्ये गेला तर बुलबुल कुण्या एका शेठ बरोबर बसलेली होती. तो स्वतःही पित होता नि तिला ही पाजत होता. काशीनाथ तिच्या जवळ जाऊन तिचा हात पकडत बोलला ," तू इधर क्या कर रही इस बूढ़े के साथ चल मेरे साथ !"  तसे पन्नाशीतल्या म्हाताऱ्या माणसाने झटकन तिचा हात पकडला नि उठून उभा राहत म्हणाला," तू कोण रे तिला घेऊन जाणारा ?" म्हताऱ्या जास्त झाली होती. तो असाच लटपटत होता. त्याचा तोल ही जात होता. तरी तिचा तो हात सोडत नव्हता. त्याच्या हातातून तिचा हात सोडवून घेत काशीनाथ म्हणाला ," म्हताऱ्या तोंडात दात आहेत का बघ अगोदर." असे म्हणून त्याला धक्का दिला तसा तो म्हतारा कोलमडून खाली कोसळला. पण त्याची पर्वा न करता काशीनाथ तिचापकडून जबरदस्तीने  घेऊन जाऊ  लागला. तशी त्याला म्हणाली ," तू का पकडलास माझा हात , मी कोण लागते तुझी ?" त्यावर काशीनाथ म्हणाला," तुला माहीत नाही मी कोण आहे ते ?" त्यावर ती म्हणाली ," तू फक्त माझ्यासाठी एक कस्टमर आहेस इतरा प्रमाणे." तशी लैला म्हणाली ," ऐकलेस आता....चल निघ इथून."
तेवढ्यात त्या म्हाताऱ्या ने बार च्या मालकाकडे तक्रार केली. तसा बार मालक तेथे आला नि म्हणाला," काय भानगड आहे ?" मग लैला ने घडलेली हकीकत सांगितली. तसा बार मालक म्हणाला," बार वाल्या मुली कुणाची खाजकी प्रॉपर्टी नाहीये, अधिकार गाजवायला. चल निघ इथून." तसा काशिनाथ म्हणाला ," बुलबुल मी तुझ्यावर फार प्रेम करतो." दोन सिक्युरिटी ने त्याला पकडले नि बार च्या बाहेर काढले. तेव्हा त्याच्या मित्राने बार मालकाची कशीतरी समजूत काढली. तसा तो बार मालक म्हणाला ," ठीक आहे, घेऊन जा तुझ्या मित्राला आणि पुन्हा दिसला नाही पाहिजे इथं काय म्हणतो मी ?" डोळे मोठे करून म्हणाला.
    " हां शेठ !" असे म्हणून रंगीला आपल्या सोबत घेऊन
बार च्या बाहेर आणल्यावर म्हणाला ," वेडा आहेस का रे तू ? अशी जबरदस्ती करतात का कुणावर ?"
      " तू बोलतोस हे ?" काशिनाथ ने विचारले.
      " हां मीच बोलतोय."
      " तू नव्हता गेलास का  तुझ्या वाली कडे ?"
      " हो मी गेलो होतो ना  माझ्या वाली कडे, परंतु मी तिला पटविली आहे. तशी तुझी वाली तुला अजून पटली
नाहीये."
      " मग कशी पटेल ?"
      " अशी एकदम नाही काही पटत ."
      " मग कशी पटते ?"
      " ते मग सांगेन चल आता घरी ! आणि बारबाला कुणा
बरोबर पण जाऊ शकतात. आपण त्यांच्या वर अधिकार
नाही गाजवू शकत. कळलं." त्याला पुढच्या सीटवर बसवले. रंगीला ड्राव्हिंग सीटवर बसला.

     बार मालकाने बुलबुल ला ताकीद दिली. या पुढे असले
प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तुझ्या गरिबी वर
तरस खाऊन मी तुला ही नोकरी दिली. पुन्हा असे प्रकार
चालणार नाहीत. कळलं. " बुलबुल ने होकारार्थी मान डोलावली. बार सुटल्या नंतर बुलबुल च्या मनात एकच विचार सुरू होता. तो हा की , तो खरंच आपल्या वर प्रेम
करत असेल का ? आणि जरी करत असेल तरी आपल्याला
प्रेम करायचा अधिकार आहे का ? कारण आपण एकटे नाही आहोत. आपली कॅन्सर ग्रस्त आई आणि लहान अपंग
भाऊ त्यांना आपल्या शिवाय कोण आहे दुसरे ? जर माझ्या
आईची नि भावाची जबाबदारी घेणारा कोणी भेटला तर मी
तर त्याची दासी पण व्हायला तयार होईन. पण असा कोणी
भेटेल का ? छे एवढ्या मोठा मनाचा कोणी मिळेल असं
वाटत नाही. माझ्या ही इतर मुली प्रमाणे वाटते की आपल्या
वर प्रेम करणारा कोणीतरी  हक्काचा माणूस असावा.जणू स्वप्नातील राजकुमार ! परंतु आपल्या जीवनात असा कोणी
राजकुमार येईल असं वाटत नाही. कारण बारबाला हा शिक्का आपला आता माथी लागला.
      दुसरीकडे नोकरी नाही मिळाली म्हणून ही बारबाला ची नोकरी पकडली. वडील गेल्यावर्षी लोकल मधून प्रवास करत असताना हात सुटला नि खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आई आजारी असते घरात दुसरा कमविणारा कोणी नाही. मग काय मलाच बाहेर पडावे लागले. खरं मला ही तो मुलगा आवडला. परंतु मी बारबाला माझ्याशी लग्न कोण करेल ? आणि समजा एखाद्या ने केले तरी माझ्या आईची नि भावाची जबाबदारी तो घ्यायला तयार होणार आहे  का ? छे शक्यच नाही. म्हणून मला
कोणावरही प्रेम  करायचा अधिकार नाहीये आणि लग्न ही करायचा अधिकार नाहीये. असे  तिच्या मनात विचार सुरू होते तोपर्यंत रिक्षा तिच्या घरा जवळ येऊन उभी राहिली, तशी ती रिक्षातून खाली उतरली नि रिक्षावाल्या ला पैसे दिले नि आपल्या घरा समोर येऊन दरवाजा खटखटविला. तसा तिच्या आईने दरवाजा उघडला. तशी ती आंत शिरली. तेव्हा तिच्या आई ने विचारले ," काय गं किती उशीर केलास आज ? " त्यावर ती म्हणाली ," उशीर कुठं उलट आज लवकर आली. आता घडाळ्यात किती वाजले ते बघ."
    " माझी नजर झाली आहे कमजोर मला काय दिसतेय."
    " बरं ते जेवलीस."
    " हो !"
    " आणि दिपू !"
    " दिपू पण जेवला नि झोपला सुद्धा !"
    " बरं तू पण निवांत झोप आता. औषधे घेतलीस ना बरोबर !"
    " हो गं बाई घेतली." असे म्हणून तिची आई झोपण्यासाठी आतल्या खोलीत गेली. बुलबुल वाश रूम मध्ये गेली नि प्रेश होऊन आली.तिच्या मनात अजूनही तेच
विचार सुरू होते. काशिनाथ आपल्यावर प्रेम करत असेल का ?

 
क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..