Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

विश्वासघात

विश्वासघात
विश्वासघात

विश्वासघात
(सत्य कथेवर आधारीत)



सूर्य मावळती दिशेला हळू हळू सरकत होता.मात्र त्याची किरणे दूर क्षितिजावर अजूनही रेंगाळताना दिसत होती.जणू ती किरणे पृथ्वीतलावरच्या सजीवांना संकेत देत होती की,सूर्य अस्ताला चालला आहे,आता थोडासा अवधी राहिलाय तेव्हा समस्त प्राणी मात्रानी आपापल्या निवास स्थानावर जावे. अर्थात त्यांनी दिलेला संकेत समस्त पशु-पक्षांनी पाळालाच.म्हणजेच रान-पाखरं आपल्या घरट्याच्या दिशेने निघाली.रानात चरायला गेलेली गुरे-वासरे परतीच्या मार्गाला लागली.तशीच शेतातकाम करायला गेलेली शेतकरी माणसं घरच्या रस्त्याला लागले. मात्र प्रमिला अजूनही शेतात वावरत होती. हे वाटेतून जाणाऱ्या लोकांनी पाहिले .म्हणून त्यातील एक महिला म्हणाली, “अगं प्रमिला, घरी यायचं नाही का तुला ? संध्याकाळ झाली बघ. आता ठेव ते काम आणि चल घरी !”


त्यावर प्रमिला म्हणाली, “ हो,येणारच आहे. चला तुम्ही पुढं.मी येतेच तुमच्या मागोमाग.” असे म्हणाली. आणि पुन्हा ओणवी होऊन भाताची रोपं चिखल केलेल्या जमिनीत भर-भर टोचू लागली. म्हणजेच रोपण करू लागली. कोकणात या प्रकाराला लावणी म्हणतात. ती आपण सांगितलेले ऐकत नाही म्हणून लोकांनी सुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष केले. हळू हळू सर्वत्र अंधार पसरू लागला होता.मात्र याची कल्पना सुद्धा प्रमिलाला नव्हती.एवढी ती आपल्या कामात मग्न झाली होती.लवकरात लवकर काम कसं उरकावं या कडे तिचे लक्ष वेधले होते. त्यामुळे दिवस मावळून रात्र कधी झाली हे तिला कळले सुध्दा नाही. काम संपवून जेव्हा ती उठून उभी राहिली. तेव्हा तिचे लक्ष अंधारावर गेले तशी ती दचकलीच आणि मनातून घाबरली सुद्धा आता आपण घरी कसे जाणार याची चिंता तिला आता वाटू लागली. तिने आपल्या आजूबाजूला वळून पाहिलं तर तिच्या व्यतिरिक्त दुसरं कुणीही  नव्हते तेथे. मात्र रात किड्याच्या कीर्र किर्र... असा ध्वनी तिच्या कानावर पडत होता. घरी जायचं होतं परंतु जाणार कसं? कारण सर्वत्र काळोख पसरला होता . पायाखालचा रस्ता सुद्धा दिसत नव्हता. अशा परिस्थितीत
रस्ता चालावा तरी कसा ? असा तिला प्रश्न पडला. पण घरी जाण तितकंच गरजेचे होते. कारण तिचं बाळ आता उठलं असेल नि भुकेने व्याकूळ होऊन रडतही असेल. हे तिच्या जसे ध्यानात आले तसा तिचा जीव वरखाली होऊ लागला.
बाळाच्या ओढीने म्हणा नाहीतर काळजी ने म्हणा तिच्या
पायात ताकद आली नि हिंम्मत ही मग तिनं मागच्या पुढचा विचार न करताच सरळ रस्ता धरला. परंतु पायाखालचा रस्ता दिसत नसल्याने ठेच लागत होती. परंतु पडता पडता स्वतःला सावरत  होती. आणि झप झप पाऊले उचलत होती. क्षणापुर्वीची तिच्या मनात असलेली भीती पार कुठच्या कुठ पळून गेली होती. तिला फक्त नि फक्त आपलं बाळ दिसत होतं .त्यामुळे जंगली जनावराची मनात असलेली भीती तिला आता अजिबात वाटत नव्हती. परंतु परमेश्वराचे नामस्मरण मात्र मुखातून सुरु होते. आणि इतरांना नसली तरी परमेश्वराला प्रत्येक जीवाची पर्वा असतेच म्हणा. याचा
प्रत्यत  तिला आला. ती रस्ता चालत असताना अचानक तिच्या पाया खालची जमीन तिला दिसू लागली. आणि आपल्या पाठीमागून कुणीतरी चालत आहे असा तिला भास होऊ लागला. परंतु मागे वळून पाहण्याचे धाडस मात्र तिला झाले नाही. पण मनात मात्र पक्का निर्धार केला होता की आता काही झाले तरी थांबायचे नाही. जे काय व्हायचे असेल
ते होवो. असा निर्धार केला होता तिने जणू ! परंतु कुणीतरी म्हटलेच आहे ना, मनात निर्धार असेल तर मार्ग आपोआप सापडतोच.



      प्रमिलाच ही तसचं झालं. तिने आपल्या मनात पक्का निर्धार केला कि, घरी जायचंच म्हणून तिची पाठराखण करायला प्रत्यक्ष तिथला राखणदेव आला. तिने त्याला वळून पाहिलं नाही म्हणा.तेच चांगल केलं. कदाचित मागे वळून जर तिने पाहिलं असतं तर भोवळ येऊन ती तिथंच कोसळून पडली असती. कारण पाठीमांग कुणीच नव्हतं.फक्त तिला तसा भास होत होता. पण याचा अर्थ असा नाही की पाठीमागे कुणीच नव्हतं.पाठीमांग सदैव परमेश्वर असतो.
पण तो दिसत नाही. म्हणून आपल्याला तो कळत नाही.

प्रमिला जशी घरी येऊन पोहोचली.तसा पायाखालचा प्रकाशही गायब झाला नि पाठीमागून कुणी येत असल्याचा जो भास येत होता. तो सुद्धा बंद झाला. म्हणून तिने मागे वळून पाहिलं. परंतु तिला कुणीच दिसलं नाही पण आता घरापर्यंत पोहोचली होती ना म्हणून तिला भीती वाटली नाही. आपल्या पाठीमागे देवच होता. असे मनात बोलून तिने देवाचे आभार मानले आणि मागे वळून तिने दरवाजावर थाप मारली. इतक्या रात्री आपल्याकडे कोण आलं असेल असा प्रश्न सगुणाबाईना पडला. पण लगेच त्यांना आठवलं की आपली सून रानातून म्हणजेच शेतातून घरी आलेली नाही. तिचं तर आली नसेल ना ?

पण कसं शक्य आहे ? ती वापस घरी येऊ नये तिला रानातच जंगली प्राण्यांनी खावं म्हणून तर अवघड काम दिलं होतं.असा विचार मनात असताना पुन्हा दरवाजा थाप पडली नि थापेसंगे तिचा आवाजही कानावर पडला. सासू बाई दार उघडा मी आले आहे. तिचा आवाज ऐकूण त्यांना प्रथम धक्का बसला.हिला वाघ सिंहाने खाल्लं कसं नाही ? असा ही मनात प्रश्न उठला. पण क्षणभरच लगेच त्या दुसऱ्याक्षणी भानावर आल्या आणि त्यांनी दरवाजा उघडला नि एकदम साळसुदपणाचा आव आणत त्या म्हणाली, “ काय गं, किती उशीर केलास ? इतक्या वेळ रानात थांबायचं असतं का ? अगदीच कसं कळत नाही गं तुला ? आपलं घरात लहान लेकरू आहे. त्याला भूक लागली असेल  नि तो रडत ही
असेल  असं अजिबात वाटलं नाही का तुला ?”


       प्रमिला समजली होती की, आपली सासू आपल्या नवऱ्याबरोबर चांगल बनण्याचं नाटक करत आहे.पण त्यांना सुद्धा माहित आहेच की आपली बायको बनेल आहे आणि नाटक करण्यात तरबेज आहे.म्हणून त्यांनी स्मित हास्य केलं नि उगाचच चौकशी म्हणून त्यांनी प्रमिलाला विचारले,
        “ सुनबाई का इतका उशीर का केलास ?”
       पण प्रमिला उत्तर देण्यापूर्वी सासूबाई ने आपले डोळे वटारून सुनेकडे पाहिलं. तशी प्रमिला आपला सासूचा संकेत समजली,आणि काही न बोलता चुपचाप मोरीत शिरली
नि आपले हात-पाय धुतले नि लगेच बाळाला उचलून घेतले आणि पटापट बाळाचे पापा घेतले आणि लगेच बाळाला स्तनपान करायला घेतले. तेवढ्यात सासू आतल्या खोलीतून बाहेर आली. तशी प्रमिलावर एकदम खेकसली. म्हणाली, आता बाहेरून आलीस ना आणि बाळाला स्तनपान करायला घेतलेस ? तुला काहीच कंस कळत नाही गं. ? झोपला होता ना तो ? त्यावर प्रमिला नम्रपणे म्हणाली , “सासूबाई , मी मुद्दाम नाही घेतले बाळाला. तो जागा झाला होता आणि मला पान्हा ही आला होता आणि माझ्या छातीत कळाही मारत होत्या. म्हणून घेतलं मी त्याला.”
       " जास्त शहानपणा करू नकोस.-मला माहितेय त्याला जास्त भूक लागली होती की नव्हती ती. उगाच काय पण कारण सांगू नको. असे बोलून ती पुन्हा घरात निघून गेली.”

तेव्हा सासरा तिला हळूच म्हणाला , “ सुनबाई तू काही लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडे. ती अशीच आहे माझं काहीच चालत नाही तिच्यापुढे इतक्या वर्षात . तिथं तुझी काय डाळ गळणार आहे.” प्रमिलाने आपल्या सासऱ्याकडे पितृत्वाच्या वास्तल्याने पाहिले.तसे त्यांनी पुढे विचारले मला एक सांग तू इतक्यावेळ का थांबलीस शेतामध्ये ?” त्यावर प्रमिला म्हणाली ," दुपारला मला शेतात जायला जरा उशीर झाला म्हणून सासूबाईनी मला शिक्षा केली होती की,संपूर्ण चिखल केलेल्या जमिनीची लावणी लावून झाल्या शिवाय  घरी यायचं नाही म्हणून. म्हणून मला उशीर झाला मामंजी.”

“ अगं पण सुनबाई आडरानात तुझ्या जीवाचं काही बरवाईट झालं असते म्हणजे तुझ्या बाळाची काळजी कोणी घेतली असती.”

तेवढ्यात तेथे सगुणाबाई आल्या.त्यांनी बहुतेक त्या दोघांचे संभाषण ऐकले असावे.म्हणूनच की काय ती म्हणाली , “बाळाची चिंता तुम्हा दोघांना नको त्याची आजी खंबीर आहे.तिच्या नातवाची काळजी घ्यायला.” असे बोलून ती आपल्या नवऱ्याकडे रागाने पाहत म्हणाली, “आणि काय हो, तुम्हाला काही काम नाही का ?” तुम्हाला कोणी सांगितले नुसत्या चांभार चौकश्या करायला ? देवाच्या गुणानं गप्प बसवत नाही का ?

त्यावर तिचा नवरा म्हणाला, “मी कुठ काय म्हणालो, मी फक्त तिला घरी यायला उशीर का झाला हे विचारलं बस्स.” त्यावर सगुणाबाई कडाडल्या.म्हणाल्या , “ तिची चौकशी करायला मी आहे ना, इथं काय ?” पुन्हा आम्हा सासू-सुनेच्या भांडणात तुम्हा पुरुषांनी भाग घ्यावयाचा नाही कळलं ? त्यावर प्रमिलाच्या सासऱ्याने मुकाट्याने आपली मान डोलावली. कारण त्यांचे आपल्यापुढे काहीच चालत नसे. एकदम मेणाचे बाहुले करून ठेविले होते त्यांनी आपल्या नवऱ्याचे आणि मुलगा तर मुंबईला राहत होता. त्या बिचाऱ्याला ह्यातले काहीच माहित नव्हते की आपली आई आपल्या पत्नीबरोबर पूर्वीप्रमाणे आता पण अत्याचार करते. त्याला वाटत असे की आपली आई आता खूप सुधरली आहे .परंतु काही दिवसाकरिता तिने फक्त सुधारण्याचे नाटक केले होते . पण प्रत्यक्षात तिच्यात काहीच बदल झाला नव्हता. उलट तिचा अत्याचार पूर्वीपेक्षाही वाढला होता. पण हे सांगणार तरी कसं नवऱ्याला ?

कारण नवऱ्याला पत्र पाठविण्याची तिला बंदी केली आणि वरून धमकी सुद्धा दिली की, होती.जर नवऱ्याला यातल काही कळल. तर तुझी तिरडी स्मशान भूमीत पोहोचलेली असेल. तेव्हा निवांत राहायचं. पडेल ते काम करायचं आणि पुढ्यात पडेल ते घास खायचा.बस्स ! या पेक्षा जास्त डोक वापरायचं नाही.कारण ते तुझ्या नाशाला कारणीभूत ठरेल.राहील न ध्यानात . काय ?

अशी अगोदरच तिच्या सासूने तिला ताकीद दिलेली होती तरी देखील तिच्याकडून नकळत हा अपराध घडला.आता तिची सासू तिला काय शिक्षा देईल ती कोण जाणे ? नेहमीप्रमाणे पाठ शेकते का चुलीत तापलेल्या पालीत्याचा. नितंबावर चटका मिळतो.नुसत्या विचारानेच तिच्या मनात थरकाप झाला.तेवढ्यात तिची सासू तिच्याजवळ आली आणि तिच्या मांडीवरचे बाळ तिने जबरदस्तीने खेचून घेतले नि आपल्या मुलीकडे देत म्हणाली , “धरं गं सांभाळ ह्याला. मी आता हिला दाखवतेच माझा इंगा.असे म्हणताच केसांचा बुचडा पकडला नि खेचतच चुलीपाशी घेऊन गेल्या नि चुलीतील जळतं लाकूड काढून तिला जिभेला बाहेर काढायला सांगितले.तेव्हा प्रमिला समजली की,आता आपल्याला कोणती शिक्षा मिळणार आहे ती.पण नायलाज होता.तिने मुकाट्याने जीभ बाहेर काढली.तसा सासुबाईने जिभेवर आगीचा चटका दिला तशी ती मोठ्याने ओरडली.तशी सासूबाई गर्जली. “आठवण राहील ना आता, की ह्या जिभेने जास्त बोलायचं नसत.नाहीतर मग अशी शिक्षा मिळते.”

बिचारी प्रमिला रात्रभर झोपली नाही.तिच्या जिभेला भयंकर वेदना होत होत्या.पण सांगणार कुणाला ना ? तिचं दु:ख ऐकून घेणारं कोण होत इथं.माहेराही जायची तिची बंदी होती.अशा परिस्थितीमध्ये नशिबाला दोष देण्या व्यतिरिक्त ती काहीच करू शकत नव्हती.ती जशी आपल्या खोलीत तळमळत पडली होती.तशी तिची सासूपण आपल्या खोलीत तळमळत होती.तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते की, एवढ्या रात्री आपली सून रानातून आली कशी ? तिला रानात कुणी जंगली हिंस्त्र प्राण्याने खाल्लं नाही कसं?

आपली योजना तर अशीच होती.मग ती अयशस्वी झाली कशी ? काही कळत नाही ? आता काहीतरी दुसरा मार्ग शोधायला हवा.पण कोणता ? ती विचार करू लागली होती.आणि त्याचवेळी तिच्या शेजारी झोपेचे सोंग करून झोपलेला नवरा मनात विचार करत नि मनातल्या मनात हसतही होता.तो मनात म्हणाला, “तू हाच विचार करत असशील ना, की सुनबाई रानातून एवढ्या रात्री एकटी आली कशी घरी ? मी देतो तुला या प्रश्नाचे उत्तर...”

असे बोलून तो मनातच म्हणाला की, तिला इथपर्यंत सोडायला आपला राखणदेव आला असेल.ज्याच्या पाठीराखा परमेश्वर आहे.त्याला कशाची भीती.पण तुला नाही कळायचे ते. कारण तुम्हा बायांना दुसऱ्यावर अधिकार गाजवायचा माहितेय.पण आपल्या अशा वागण्याने दुसऱ्या माणसांना किती त्रास होतोय याची कल्पना देखील नाही. प्रत्येक स्त्री सासू झाल्यावर आपल्या सूनबाईंशी अशी का वागते.ते मला अद्याप नाही कळालं ? शिवाय ती हे का विसरते की, कधी काळी आपणही सून होतो. त्यावेळी आपल्याला कसा त्रास होत होता.तसा आता आपल्या सूनबाईला पण होत असेल. असं का कळत नाही ये त्यांना ? का कळत असूनही न कळण्याचा बहाणा करतात त्या ? न कळे !

विचार करता करता त्यांना झोप कधी लागली ते कळले सुद्धा नाही पण थोड्याच वेळाने ते दचकून उठले ते ओरडतच – थांब सगुणा एवढा अत्याचार करू नकोस आपल्या सुनेवर . त्यांच्या ओरडण्याने शेजारी झोपलेली पत्नी दचकून उठली नि त्यांच्यावर रागवत म्हणाली,

काय झालं हो , तुम्हाला ओरडायला ?

तसे ते एकदम भानावर येत म्हणाले, “तु इथं झोपली आहेस ?” लगेच सगुणाबाईने प्रश्न केला.

“मग कुठं झोपायला हवं होतं.”

“नाही मला वाटले ? एवढं बोलून ते मध्येच बोलायचे थांबले.पण त्या पातळयांत्रि बाईने त्यांच्या बोलण्यातला आशय ती समजली होती. म्हणूनच की काय ती आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली, “पुढच नाही आठवत ? थांबा. मी सांगते ना पुढंच !” असे बोलून ती किंचित थांबली. नि लगेच पुढे म्हणाली, “तुम्हाला वाटलं असेल की, मी तुमच्या सुनेला जाळलं, पोळलं किंवा विहिरीत ढकलून दिल असेल. होय ना ?”

तसा तिचा नवरा चाचरत म्हणाला, “हां,पण हे तुलाकसं कळले.”

“मला माहित आहे ना , तुम्हा पुरुषांच्या मनात आम्हा बायकांबद्दल काय विचार सुरु असतात ते.पण तुम्हा पुरुषांना काय कळणार म्हणा.आम्हा बायकांचा व्यथा ! त्यासाठी तुम्हाला स्त्रियांचा जन्म घ्यावा लागेल.”

“स्त्रीचा जन्म तर अजिबात नको.”

“का बरं ?”

“एक स्त्री दुसऱ्या स्त्रीवर अत्याचार करते.हे काय चांगल लक्षण आहे ?”

“पण ती तसं का करते. हे नाही ते विचारलात ?”

“का करते सांग बरं.”

“कारण तिन पण तसाच त्रास भोगलेला असतो म्हणून.प्रत्येक सासू आपल्या सुनेला छळतेच.”

“असं नाही हं! कित्येक सासू चांगल्या असतात.त्या आपल्या सुनांना मुलीसारख्या वागवितात.”

“असतीलं,पण बोटांवर मोजण्या इतक्याच.”

“पण सुनांना छळून काय मिळते तुम्हा सासवांना.”

“मानसिक समाधान.”

“ह्यात कसलं आलय समाधान ?”

“ते तुम्हाला नाही कळायचे त्यासाठी तुम्हाला पण सासू बनावे लागेल.”

“असं असेल तर मला स्त्रीचा जन्मच नको.”

“का ?, घाबरलात ?”

“हो.”

“बरं ते जाऊ दे.तुम्ही दचकून उठला.त्याचा अर्थ तुम्ही स्वप्न पाहत होता. काय पाहिलं तुम्ही स्वप्नात.”

मग त्यांनी स्वप्नात जे पाहिलं. ते तिला सांगून टाकले.ते ऐकून ती एकदम खुश झाली.नि हर्षभाराने म्हणाली,

“बस्स ! सापडला मार्ग.”

“काय मार्ग सापडला.न समजून नवऱ्याने विचारले.”

“ते जाणून घेण तुमच्या गरजेचे नाहीये.म्हणून तुम्ही निवांत झोपा आता.”असे ती आपल्या नवऱ्याला बोलली खरी.परंतु तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून काही हटेना.ती आपल्या मनात विचार करू लागली की आपल्या नवऱ्याला असे स्वप्न का बरे पडले असावे? यातून नियतीला काय सुचवायचं आहे ? कदाचित तिच्या नशिबात मरण लिहिलं असावे आणि ते पण माझ्या हातून.म्हणूनच की काय माझ्या नवऱ्याला तसं स्वप्न पडल असाव चला आता पुढच्या तयारीला लागू.संकेत तर मिळालाच आहे.आता योजना कशी सफल करायची या बद्दल विचार करू.पण त्या आधी शांत झोपायला हवं. नाही का ?” असं ती स्वतशीच म्हणाली, आणि प्रसन्न मुद्रेने झोपण्याचा प्रयत्न करू लागली.आणि काही क्षणातच तिला झोप सुद्धा लागली.परंतु तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचे हास्य उमटले.जणू तिचं अनेक दिवसाचं स्वप्न पूर्णत्वास जाण्याचा मार्ग सापडला होता तिला असो.

पण त्याचवेळी दुसऱ्या खोलीत तिची सून म्हणजेच प्रमिला आपल्या बाळासोबत झोपली होती.म्हणजे तिचे बाळ झोपले होते.आणि ती झोपण्याचा प्रयत्न करत होती.पण तिला झोप येत नव्हती.आणि झोप येणार तरी कशी ! कारण तिच्या मनात अनेक प्रश्नाचं वादळ निर्माण झालं होतं ते हे की आपली सासू आपल्याशी अशी का वागते ? मी मुंबईतून गावाला आली तेव्हा माझ्याशी किती प्रेमाने वागायची.त्यामुळे आपल्याला वाटले होते की आपली सासू आता आपला छळ करणार नाही.तिच्यात आता चांगला सुधार झाला होता.असे आपल्याला वाटत होते आणि आपल्या नवऱ्याला सुद्धा असेच वाटले असावे.म्हणूनच ते आपल्या आई सोबत मला पाठवायला तयार झाले.आणि त्यांच्या समोर किती साळसूदपणाचा आव आणत असे. आपल्या मुलाचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून ती त्यांना म्हणाली , “अशोका,आता माझ्यावर विश्वास ठेव.मी आता पूर्वीची काष्ठ सासू राहिली नाही. कारण मला माझी चूक कळून आली की, सूनच खऱ्या अर्थाने लेक असते.पोटच्या पोरी काय आज आहेत उद्या लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्या की कसल्या येतात.मग दुखलं खुपलं तरी सूनच पाहणार ना आपल्याला ? मग तिच्याशी असं वाईट वागून चालेल का ? कदापि नाही.पण हे मला फार उशिरा कळल रे आणि खरं सांगायचं तर मी इतक्या दृष्ट मनाची नाही आहे रे. मी अशी का वागले.ते माहित आहे का तुला.त्यावर ते म्हणाले, ते मला कसं माहित असणार तूच सांग ना.” ह्यांनी म्हटल्यावर त्या पुढे म्हणाल्या, “त्याच असं झालं की माझ्या सासूने पण खूप छळ केला.म्हणून मी पण ठरविलं की, आपण पण माझा असाच आपल्या सुनेचा छळ करायचा, म्हणजे आपल्या जखमांवर फुंकर घातल्यासारखे होईल.पण खरा आनंद कशात आहे. तर सर्वांशी प्रेमाने वागावे.म्हणजे लोक सुद्धा आपल्याशी प्रेमाने वागतात.हे मला आता कळले.म्हणून माझी तुला विनंती आहे की,तू आपल्या बायकोला माझ्या सोबत गावाला पाठव.मी खूप काळजी घेईन तिची.एकदम फुलासारखी जपेन.मी तिला माझ्यावर एकवेळ विश्वास ठेऊन बघ. तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही मी.”

“बघ आई तिला तुझ्याबरोबर पाठवायला माझी काहीच हरकत नाही. परंतु मी तिच्यावर बळजबरी पण करणार नाही. ती तुझ्याबरोबर यायला तयार असेल तर बेशक घेऊन जा तिला.”

असे बोलल्यावर ती समजून गेली की आता सूनबाईची मनधरणी केली पाहिजे.असा विचार करून तिने प्रमिला समोर हात जोडले नि म्हणाली , “सुनबाई , आता तू नाही म्हणू नकोस. मला कल्पना आहे की, मी तुझ्याबरोबर चांगली नाही वागली.पण आता खरंच चांगली वागेन मी.माझ्यावर विश्वास ठेव.”

सासूने तिला हात जोडलेले पाहून तिला एकदम सासूची कीव आली नि लगेच विरघळली. नि मग म्हणाली , “नाही.ते ठीक आहे.पण तुम्ही अगोदर मला हात जोडायचे थांबवा.कारण ते मला कसंतरी वाटतय.”

“म्हणजे, तू माझ्याबरोबर यायला तयार आहेस तर ?” एकदम हर्षभराने ती म्हणाली.त्यावर प्रमिला नायलाजाने म्हणाली , “हो.तुमच्यासोबत यायला तयार आहे मी.”

असं म्हणताच सासूचा आनंद पारावर राहिला नाही.तिने चक्क निर्मलाला मिठी मारली.तेव्हा बघणाऱ्याला असे वाटलं असते की ही मिठी प्रेमाची नि आपुलकीची आहे. पण तसे मुळीच नव्हते. खरे सांगायचे तर ती मिठी तिचं प्लँन यशस्वी झाल्या बद्दलची होती.जशी अफझल खान ने शिवाजी महाराजांना मारली होती.पण त्यात अफजल खानच फसला म्हणा. कारण शिवाजी महाराज त्याचा डाव ओळखून होते.म्हणूनच त्याचा डाव त्याच्यावरच उलटला.पण इथं मात्र तसं नव्हते. गाय होती प्रमिला नि वाघ होती सासूबाई.पण या वाघाने गाईला मिठीत घेतले ते सोडण्यासाठी नव्हे तर हलाल करून मारण्यासाठी ! याचा प्रत्यय आता प्रमिलाला येऊ लागला होता.पण आता उपाय नव्हता.सासूचे हे उग्र ती रूप आपल्या नवऱ्याला सांगू शकत नव्हती.कारण त्या काळी आता सारखी मोबाईलची सेवा उपलब्ध नव्हती.तेव्हा फक्त तार किंवा पत्र पाठवायची सेवा उपलब्ध होती.परंतु प्रमिला आपल्या नवऱ्याला पत्र पण लिहू शकत नव्हती. कारण तिला सगळ्यांचीच बंदी केली होती.

त्यामुळे ती ना आपल्या आई वडिलांना सांगू शकत होती. ना आपल्या नवऱ्याला. अशा दुर्गम परिस्थित सापडली होती ती.तिच्या आई-वडिलांना तर तिच्या घरी यायला सुद्धा बंदी केली होती.काय कराव ते तिला सुचत नव्हत आपण आपल्या नवऱ्याच न ऐकले ही सर्वात मोठी चूक केली होती तिने.असं आता तिला वाटू लागले होते.पण आता त्याचा काही उपयोग नव्हता.विचार करता करता तिचा अचानक डोळा लागला.ती निद्रदेवतेच्या झोपी गेली.सकाळी उठली तेव्हा सासूचा तोंडाचा पट्टा सुरूच होता. ह्या त्या कारणावरून सतत टोचून बोलत होती ती प्रमिलाला. पण प्रमिला बिचारी गरीब गाय बनली. होती. मुकाट्याने सारं सासुच बोलण ऐकून घेत होती.सासूला अजिबात प्रत्युत्तर करत नव्हती.पण तरी देखील तिची सासू तिला लागेल असंच काहीना काही बोलत असे. आज तर ती बोलता बोलता चक्क म्हणाली,आज काल च्या बायांना लग्न झाले की लगेच नवरा कुशीत झोपायला पाहिजे.आमच्यावेळी मात्र तसं नव्हते लग्न होऊन पाच वर्षे झाली. तरी नवऱ्याचा स्पर्श नसे अंगाला. आणि आताच्या बायांना नवरा रोज लागतो कुशीत.असं बरच काही बोलली ती.लग्न झाली की वर्षाच्या आधी घरात पाळणा हलला पाहिजे आमच्यावेळी मात्र असं नव्हत पाच पाच वर्ष नवऱ्याच दर्शनही घडत नसे.मग पाळणा कुठचा हालणार.

पण त्यावेळी प्रमिला काहीच बोलली नाही.निमूटपणे सारे काहीऐकून घेतले तिने.परंतु सासूचा राग काही शांत होईना.ती तोंडात जे येईल ते ते बोलत होती.शेवटी बोलून बोलून थकली.तशी स्वत:च गप्प झाली.पण ही शांतता वादळपूर्वीची होती.तिच्या मनात आता रात्रीच्या स्वप्नाविषयी विचार येऊ लागला.तिच्या नवऱ्याने स्वप्नात जे पाहिलं ते हकीकत मध्ये कसं उतरवायचे याबद्दल आता ती विचार करू लागली.पण प्रमिलाला मात्र सासूच्या मनात काय चालाले याची कल्पना ही नव्हती.तिची सासू तिचा घात करणार याबद्दल तिला काहीच माहित नव्हते आणि समजा तिला माहित असते तरी तिने काय केले असते.फार फार तर तिने सासूची मनधरणी केली असती.मला मारू नका. मी कधीच नवऱ्यापाशी जाणार नाही.तुम्ही सांगाल ते ऐकेन. पण मला ठार मारू नका. फक्त असंच म्हणाली असती.इतकी साधी भोळी होती ती.

पण इतक साध भोळपण असू नये.असं कोण सांगणार होत तिला.आणि उपयोग तरी काय होणार त्याचा कारण साधी माणस कायम साधीच राहतात.म्हणून मग त्यांच्या जीवनाचा शेवट असा भयानक होतो.तिच्या सासूने ताबडतोप आपल्या भावाला तार केली नि त्याला तातडीने बोलावून घेतले.त्याकाळी पत्र किंवा तार पाठवून एकमेकांना संदेश द्यावा लागत असे आणि त्यात करून तातडीचा संदेश द्यावयाचा असेल तर तारच करावी लागे म्हणून सगुणाबाईने आपल्या भावाला तार केली. कारण तिला आपल्या सुनबाईचा लवकरात लवकर काटा काढायचा होता.आणि त्यासाठी तिने पूर्व तयारी सुरु केली.सर्वात अगोदर तालुक्याला जाऊन लहान बाळासाठी दुध पावडरचा डबा आणला आणि त्या बाळाला पावडरचे दुध पाजायला सुरवात केली.

पण ते बाळ पावडरचे दुध पिईना, म्हणून सगुणाबाईने त्या बाळालाही उपाशी ठेवले. प्रमिला आपल्या बाळाला चोरून दुध पाजे म्हणून तिला मारझोड करून एका खोलीत बंद करून ठेवले.आईच्या दुधासाठी ते बाळ रडत असे. परंतु त्या निर्दयी सगुणाबाईना त्या बाळाची कीव येत नसे.प्रमिला आपल्या बाळाला दुध पाजण्यासाठी आपल्या सासूची फार विनवणी करे. पण तिच्या सासूला मात्र अजिबात पाझर फुटत नव्हता.बाहेर बाळ रडून रडून आकांत करे आणि आत त्या बाळाची आई आपल्या बाळासाठी रडत असे.पण तिच्या सासूला तिची अथवा तिच्या बाळाची दया येत नसे.शेवटी रडून रडून बाळ झोपी जाई.परंतु झोपेतून उठल्यानंतर नाईलाजाने पावडरचे दुध पिऊ लागले होते.कुणीतरी म्हटले आहे ना,भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा असे म्हणताच ते काही खोट नाही.सध्या बाळाची अवस्था तशीच झाली होती.प्रमिलेला चार दिवस एका खोलीत बंद करून ठेवले होते.आणि अन्नपाणीही वर्ज केले होते.त्यामुळे तिचा जीव एकदम कासावीस झाला. ती प्यायला पाणी मागत होती. परंतु तिला कुणी पाणीही देत नव्हते. चार दिवस पोटात अन्नाचा कण नाही. त्यामुळे तिला एकदम अशक्तपणा आला होता. शिवाय बाळाला दुध न पाजल्यामुळे स्तनाना गाठी आल्या होत्या.आणि अंगात तापही भरला होता. परंतु तरीही तिचा बाळासाठी जीव तळमळत होता. ती ओरडून फक्त एवढेच म्हणे की,माझ्या बाळाला दुध तरी पाजू द्या परंतु त्या पाषाण निर्दयी बाईला अजिबात दया आली नाही. उलट तिच्या चेहऱ्यावर विकट भेसूर हास्य उमटलं.जणू तिचा मनोदय पूर्ण झाला होता.

पाचव्या दिवशी प्रमिलेला खोलीतून बाहेर काढले.नि तिच्या कमरेला दोरी बांधली नि तिला विहिरीत सोडले अर्ध्यावर जाताच हातातील दोरी सोडून दिली.त्यामुळे आपटत धोपटत ती विहिरीत कोसळली.आधीच पाच दिवसाची उपाशी असल्याने तिच्या अंगात बिलकुल त्राण नव्हता.त्यामुळे जिथे पडली तेथेच ती पडून राहिली.नाका-तोंडात पाणी शिरले.आणि तिचा प्राण तिचे शरीर सोडून अनंतात विलीन झाला.

ती खरोखर मेली आहे की नाही याची खात्री करून घ्यायला सगुणाबाईंचा भाऊ विहिरीत उतरला.मात्र अर्ध्यावर जाताच पाय घसरून विहिरीत कोसळला.त्यामुळे त्याचा एक पाय मोडला.सगुणाबाईने संपूर्ण गावात बातमी पसरवली की माझी सून पाणी भरायला गेली तेव्हा विहिरीत पडली.तिला वाचवायला माझा भाऊ गेला तर तोही विहिरीत कोसळला.तेव्हा माझ्या सूनबाईला आणि भावाला वाचवा.

गावातील लोक धावत आले नि त्यातील काहीजण विहिरीत उतरले.प्रमिलेला नि तिच्या भावालावर काढले.त्यांनतर तिच्या आईवडिलांना आणि काका-काकीला खबर देण्यात आली. तसे ते सर्वजण पळतच तिच्या घरी आले.त्यांनी जशी आपल्या मुलीची झालेली दुर्दशा पहिली तसे त्यांना रडूच कोसळले.मात्र तिचे काका भयंकर चिडले.आणि त्या रागा सरसी त्यांनी मुलीच्या सासऱ्याला थोबाडविले.कारण स्त्रीवर हात उचलता येत नाही.म्हणून त्यांनी आपला राग तिच्या सासऱ्यावर काढला.

त्यानंतर गावकरी तिच्या अंत्यसंस्काराची घाई करू लागले.तसे प्रमिलाचे काका गर्जले

“खबरदार कुणी तिच्या अंगाला स्पर्श कराल तर !”

त्यावर गावकरी म्हणाले, “अहो,अंत्यसंस्कार तर करायला लागणार ना तिच्यावर.”

तेव्हा प्रमिलाचे काका म्हणाले, “जोपर्यंत पोलीस इथं येत नाही आणि घटना स्थळाचा पंचनामा करत नाही तोपर्यंत कुणी स्पर्श करायचा नाही तिच्या अंगाला.असे बोलून त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदिवली.त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.त्यावेळी तिचे फोटो काढण्यात आले.त्यावेळी तिच्या पायावरचे वळ पाहून पोलिसांनी तिचे कपडे ढोपरापर्यंत वर सरकवले तेव्हा तिचे काका म्हणाले, “पहा माझ्या मुलीची काय अवस्था करून टाकली आहे.ह्या निर्दयी माणसांनी.” पोलिसांनी आणखीन वरती कपडे सरकविले तेव्हा तिच्या नितंबावर आगीत पलिता तापवून दिलेले चट्टे दिसले.तसेच कमरेला बांधलेल्या दोरीचे वळ पण स्पष्ट दिसत होते.एकंदरीत त्या मुलीचे काय हाल केले हे स्पष्टपणे जाणवत होते.पण तरीदेखील पोलिसांनी केस निकालात काढली म्हणाले, “ते चट्टे फार जुने आहेत.त्यामुळे मरण्यापूर्वी तिच्या अंगाला सासूने अथवा सासऱ्याने चट्टे दिलेत असा त्याचा अर्थ होत नाही.” असे बोलून त्यांनी पाणी भरत असताना पाय घसरून ती विहिरीत कोसळली. आणि तिला पोहता येत नसल्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.अशी पोलिसांनी तिच्या मृत्यूची नोंद केली.तेव्हा तिच्या काकांनी हरकत घेतली.ते म्हणाले , “नाही इन्स्पेक्टर साहेब,माझी पुतणी पाय घसरून पाण्यात पडली नाही तर ह्या लोकांनीच तिला जबरदस्तीने विहिरीत लोटून दिले.” त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणाला, “वाडेकर हा फक्त तुमचा तर्क झाला.तो पुरावा ठरू शकत नाही.शिवाय आम्हाला मिळालेल्या पुराव्या वरूनच मी हे सिद्ध करतोय की,तुमच्या पुतणीचा पाण्यात बुडूनच अपघाती मृत्यू झालाय.तुमच्या भावना मी समजू शकतो.परंतु जे खरे आहे तेच जगापुढे आणण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो.”

त्यावर प्रमिलाचे काका चिडून म्हटले, “खोटे आहेत हे पुरावे ? माझ्या पुतणीला तिच्या सासूनेच मारले आहे.”

तेव्हा इन्स्पेक्टर चिडून म्हणाला, “मि.वाडेकर तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका.तुमच्यापेक्षा जास्त कायदा कळतो आम्हाला कळले ?”

त्यावर बिचारे काका काय बोलणार.त्यांना गप्पच बसावं लागलं.त्यानंतर पोलिसांनी प्रमिलाला मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठविला.नंतर तिचा तो मृतदेह तिच्या ताब्यात दिला.तेव्हा तिच्या सासरच्या माणसांना तिच्या देहालाही स्पर्श करू दिला नाही.तिचे काका गर्जले, “खबरदार तिच्या अंगाला स्पर्श कराल तर !” त्यांचे ते उग्र आणि चवताळलेले रूप पाहून सासरची माणसे मागे सरकली.नाहीतरी तिच्या सासूला तेच हवं होते.परंतु वरकरनी फक्त नाटक करत होती.इतकच !

तिच्या काकांनी तिच्यावर अंत्यसंस्कार करविले.मात्र तिच्या चितेसमोर एक भिष्मप्रतिज्ञा केली की यापुढे आमच्या घरची मुलगी त्या गावात कुणी देणार नाही.आणि त्यांची ती प्रतिज्ञा शेवटपर्यंत म्हणजे त्यांना मरण येईपर्यंत त्यांनी ती पाळली.त्यांच्या मृत्युनंतर मात्र त्यांची ती प्रतिज्ञा मोडली.आणि ती पण त्यांच्याच एका सूनबाईनं. आता तिन असं का केले असेल त्याला सुद्धा दोन कारणे आहेत.पाहिलं कारण म्हणजे ती सूनबाई त्याच गावाची माहेरवाशीण होती.अर्थात तिला आपल्या गावचा अभिमान असण साहजिकच आहे. म्हणून तिने तसे केले असावे.आणि दुसरे कारण हे की तिला आपल्या सासऱ्याचे नाक कापावयाचे असावे.म्हणुनच की काय तिने स्वत:ची त्या गावात दिली असावी.आता यातल खरे कारण काय आहे.हे बहुतेक करून तिलाच माहित असावे असो.कारण काय पण असो.पण एक गोष्ट मान्य करावीच लागेल की पूर्वीची माणस फार तत्ववादी होती. आणि आपला बोललेला शब्द ते एकदम खरे करून दाखवत माणूस मरून गेला तरी त्याची कीर्ती मात्र अक्षय जिवंत राहते.हे त्यावरून दिसून येते.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे, गुन्हेगाराने आपला गुन्हा कितीही लपविण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो एक ना एक दिवस जगासमोर येतोच ! पण जरा वेळ लागतो. आता हेच बघाना पोस्टमार्टमच्या रिपोर्ट मध्ये प्रमिलाचा मृत्यू बुडून झाला.हे जरी सिद्ध झालं तरी देखील तिच्या कमरेला उमटलेल्या वळावरून लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्याच ना ? भले आरोपीच्या वकिलाने हा युक्तिवाद मांडला की,हा वळ तिला विहिरीतुन बाहेर काढताना तिच्या कमरेला दोरी बांधल्यामुळे पडला.हे जरी सिद्ध केले तरी संशयाला जागा राहतेच ना ? कारण तिच्या कमरेला एक सोडून दोन वळ होते.मग हा दुसरा वळ कुठून आला आणि कसा ? त्यावर फिर्यादीने सिद्ध केले की एक वळ तिच्या मृत्यूपूर्वीचा आहे आणि दुसरा वळ मृत्यूनंतरचा आहे.या वरून हेच सिद्ध होते की,तिच्या कमरेला दोरी बांधून तिला विहिरीत सोडण्यात आले पण तिला पोहता येत नसल्यामुळे ती पाण्यात बसून मरण पावली.

त्यावर आरोपीच्या वकिलाने असा प्रश्न कोर्टासमोर मांडला की,जर आरोपीच्या मनात आपल्या सुनेला मारावयाचे होते तर तिने मयत स्त्रीला म्हणजेच प्रमिलाला सरळ विहिरीत लोटून दिले असते.कमरेला दोरी बांधून आत सोडून ती पाण्यात बुडून मारायची वाट कशाला पाहिलं ना ? जिथ एका धक्याने काम आहे तिथं पोलीसांन आयता पुरावा सापडेल असं कृत्य का करेल.माझा अशील ? न्यायधीश महोदय आता तुम्हीच काय खर आहे ते सांगा.म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते सांगा ?

न्यायाधीश महोदयने सांगितले की, केवळ कमरेला उमटलेल्या वळावरून हे सिद्ध होत नाही की,तिला आधी विहिरीत सोडण्यात आलं.नि मग तिला पाण्यात बुडवून मारण्यात आले.त्यापेक्षा विहिरीतून पाणी काढत असताना तिचा पाय घसरला.नि ती विहिरीत कोसळली.पण तिला पोहता येत नसल्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.अर्थात हा अपघात आहे.आणि तो कोणाबरोबरही घडू शकतो.म्हणून प्रमिलाच्या सासूबाई सगुणाबाई एकदम निर्दोष आहेत.परंतु त्या आपल्या सुनेला छळ करत होत्या.हे तिच्या अंगावर मिळालेल्या डागामुळे सिद्ध होते.

म्हणून आरोपी सगुणाबाई मालाडकर यांना दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे.

असे न्यायाधिशाने जाहीर करून पेन तोडणार इतक्यात शांतपूर्ण कोर्टामध्ये एक आवाज उमटला. “थांबा” तश्या सर्वांच्या नजरा आवाजाच्या दिशेने उमटल्या.दरवाज्यातून इन्स्पेक्टर विनय कदम एका पंचवीस वर्षीय तरुणाला कोर्टात घेऊन येत असलेला दिसला.तेवढ्यात सगुणाबाईची नजर पण त्या तरुणावर पडली.तशी ती एकदम चपापली.नि तिच्या मुखातून आपोआप उद्गार निघाले, “अरे, हा इथं कसा आला ? ह्याला तर मी खोलीत बंद करून ठेवले होते.मग ह्याला खोलीतून बाहेर कुणी काढले ?”

असा विचार तिच्या मनात सुरु असतानाच न्यायमूर्तींनी इन्स्पेक्टरला विचारले, “इन्स्पेक्टर विनय कदम, हा काय प्रकार आहे ? तुम्ही कोर्टाच्या कामात बाधा का आणली ?”

त्यावर इन्स्पेक्टर विनय कदम उद्गारला, “माफ करा न्यायधीश महाशय,पण खऱ्या अपराधिला कोर्टासमोर आणण आमच प्रथम कर्तव्य आहे.”

असे बोलून त्यांनी न्यायाधिशाना अशोक बद्दल माहिती देत सांगितले की,यांनी स्वत: पोलीस स्टेशनला येऊन स्वत:ला कैद करून घेतली. नि स्वत:चा गुन्हाही कबुल केला.तेव्हा न्यायाधिशानी अशोकला फर्माविले की,आरोपीने पिंजऱ्यात येऊन स्वत:च्या गुन्ह्याची कबुली द्यावी.

त्यांनतर अशोक पिंजऱ्यात उभा राहिला नि स्वत:हून कबुल केले की प्रमिलाचे अपघाती निधन नसून मीच ठार मारलं तिला.तिच्या कमरेला रस्सी बांधून मीच तिला विहिरीत सोडलं.नि अर्ध्यावरूनच हातातली रस्सी मी सोडून दिली.त्यामुळे ती विहिरीत कोसळली नि पाण्याय बुडून मरण पावली.तसेच तिच्या अंगावर माराची निशाणी आहेत.त्या सुद्धा मीच दिल्या आहेत.तेव्हा माझी आई एकदम निर्दोष असून खरा अपराधी मीच आहे. तेव्हा मला फाशीचीच शिक्षा द्यावी.

तेवढ्यात सगुणाबाई अशोकजवळ आल्या नि त्याला हळूच म्हणाल्या, “अरे अशोक काय करतोय तू हे ?” त्यावर अशोक तिला हळूंच म्हणाला, “आई, तू आता एक शब्द पण बोलायचा नाहीस.माझी तुला शपथ आहे.” त्यामुळे सगुणाबाईचा अगदीच नाईलाजपणा झाला.त्यानंतर अशोकने स्वत:चा गुन्हा स्वत: कबुल केल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा न होता चौदा वर्षाची तुरांगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

काही दिवसानंतर अशोकची आई अशोकला भेटायला तुरुंगात आली तेव्हा ती अशोकला म्हणाली,

“का केलंस तु असं ?” त्यावर अशोक म्हणाला, “हे करण फार जरुरी होत आई, कारण नाहीतर माझ्या प्रमिलाला न्याय मिळाला नसता.आणि तसं पण मला प्रमिलाशिवाय जगण मुश्कील झालं असतं आणि खर सांगायचं तर ही शिक्षा मला नाही तुला झाली आहे.फरक फक्त इतकाच आहे की, मी तुरुंगात राहून प्रमिलाची आठवण काढत-काढत मरणार आहे.आणि तू बाहेर राहूनही सुखाने जगू शकणार नाहीस कारण तू माझ्याशी केलेला विश्वासघात तुला स्वस्थ बसू देणार नाही.आणि पुत्रवियोगाने तडपडत रहा शेवटपर्यंत.हीच सर्वात मोठी शिक्षा आहे तुझ्यासाठी.”

त्यावर सगुणाबाई एकदम गयावया करत म्हणाल्या , “हे बघ अशोक जे झालं तरी मी पोलिसांना सांगते मी खुनी आहे.मीच माझ्या सूनबाईचा खून केला.तेव्हा शिक्षा काय द्यायची ती मला द्या.”

त्यावर अशोक हसून म्हणाला, “नाही आई,ती वेळ आता केव्हाच निघून गेली. तू आता फक्त एकच कर इथून थेट घरी निघून जा.पण पुन्हा न येण्यासाठी कारण मला आता तुझ्याशी बोलायची पण इच्छा नाही.”

तश्या सगुणाबाई एकदम घायाळ स्वरात म्हणाल्या, “अशोक एवढीकठोर शिक्षा देऊ नकोस रे मला.मी मरून जाईन रे अशी !”

त्यावर अशोक म्हणाला, “आई , या जगात जन्माला येणारामाणूस कधी ना कशी मरणारच आहे. फक्त फरक इतकाच आहे की, कुणी सार सुख भोगून मरतो. तर कुणी माझ्यासारखा बायकोच्या आठवणीने तीळ-तीळ झिजून मरतो. आणि खरं सांगायचं तर माझ्यासारख्या पाप्यांना हीच शिक्षा योग्य आहे. जा तू आता.” असे बोलून त्यानेआपल्या आईकडे पाठ फिरवली तेव्हा सगुणाबाई एकदम कळवळून म्हणाल्या , “ अशोक एवढी कठोर शिक्षा देऊ नकोस रे मला मी पाया पडते तुझ्या.” पण अशोकने तिच्याकडे पाहिले नाही.त्या फक्त विनवतच राहिल्या.शेवटी कंटाळून त्यांनी घरचा रस्ता धरला.घरी आल्यानंतर घरात त्याचं पाउल पडत न पडते तोच त्यांच्या कानावर बाळ कुणाबरोबर तरी खिदळत असल्याचे जाणवले.तेव्हा त्यांनी अंदाज बांधला की बाळाचे आजोबा बाळाला खेळवत असतील.म्हणून त्या मोठ्या कुतूहलाने बाळाच्या खोलीकडे वळल्या. परंतु जसे दरवाज्यातून पाऊल आत टाकले.तसे समोरील दृश्य पाहून त्यांना एकदम धक्काच बसला.बाळ खोलीत एकटाच होता.परंतु तो कुणाबरोबर तरी हसत होता. म्हणून त्यांनी बाळाच्या आजूबाजूलापाहिलं.पण त्यांना कुणीच दिसेना.मग बाळ कुणाबरोबर खिदळतोय.असा त्यांना प्रश्न पडला.तर त्यात नवल नाही.

त्या झटकन पुढे आल्या आणि बाळाला उचलून घेतले.परंतु बाळाची नजर त्या दिशेकडून दुसरीकडे वळली नाही तो अजूनही त्याच दिशेकडे पाहत होता.नि हात पुढे करून तो स्वत:ला घ्यायला सांगत होता.तेव्हा प्रमिलाची सासू समजून गेली की इथे जरूर प्रमिलाचा आत्मा आला असावा.

हा विचार मनात येताच मात्र त्याचे मन भीतीने ग्रासले.आणि त्यांच्या मनात अनेक विचार येऊ लागले.प्रमिला आपल्या बाळाला आपल्या सोबत घेऊन तर जाणार नाही ना ? कारण बाळाच्या बालपणी जर त्याची आई वारली तर ती आपल्या बाळाला आपल्यासोबतच घेऊन जातेच.असे ऐकून माहित तर होतेच.शिवाय असे दोन-तिन प्रकार पाहण्यात पण आले होते.त्यामुळे तो मनातला भ्रम आहे असेही म्हणता येणार नाही.मग काय करावं ? बाळाला कसं वाचवाव हिच्या तावडीतून ? काहीच कळनासं झालाय.परंतु काहीतरी करायला मात्र हवे.पण काय ? असा विचार मनात सुरु असतानाच मोठ्याने हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला.तश्या त्या एकदम दचकल्या.आणि अस्पष्ट उद्गार त्याच्या तोंडातून बाहेर पडले....क....क...कोण ?”

“घाबरलात.....?”

“हो, पण तू कोण ?”

“मला ओळ्खल नाही ? अहो सासूबाई मी तुमची सून प्रमिला.”

“पण तू इथं का आलीस ?”

“हे काय विचारण झालं तुमचं सासूबाई ! अहो, जिथं माझं बाळ तिथं मी !........ तुम्हाला

आवडलं नाही का, मी इथं आल्याचं ?”

“नाही-नाही तसं नव्हतं म्हणायचं मला.”

“मग काय म्हणायचं होत तुम्हाला सासूबाई ?”

पण त्यांना काही उत्तर द्यायचं सुचलंच नाही.त्या नुसत्या भांबावून गेल्या.पण लगेच स्वत:ला सावरून म्हणाल्या, “सुनबाई, मला माफ कर.मी चुकले.पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या बाळाला म्हणजेच माझ्या नातवाला नको देऊस.”

“सासूबाई बाळ माझं आहे.तेव्हा ते माझ्या सोबतच राहणार.”

“नको नको सुनबाई असा अभद्र विचार नको करूस.त्याला तू आपल्या सोबत नको नेवूस.”

“हा विचार तुम्ही मला मारताना केला नाही सासूबाई ! मग मी का करू तो विचार.”

“मी चुकले म्हटले ना ?”

“चुकलात ना तुम्ही ! मग त्याची शिक्षा नको का भोगायला ?”

“तू सांगशील ती शिक्षा मी भोगेन.पण माझ्या नातवाला मात्र काही करू नकोस.मी हात जोडते तुला.”

सासूबाईच्या आवाजाने घरातील सर्व माणस,म्हणजे प्रमिलाचाचा सासरा ननंद तेथे येतात.पण समोरील दृश्य पाहून थक्क होतात.ही कुणाशी बोलतेय ? खरंच प्रमिलाचा आत्मा आलाय का इथं? का हिला वेड लागलय ? असे प्रश्न नवऱ्याच्या आणि त्याच्या मुलीच्या मनात आले तर नवल नाही.कारण प्रमिलाचा आत्मा फक्त तिच्या सासूला आणि तिच्या मुलाला दिसत होता.म्हणून सर्वांना तसं वाटलं होतं खरं ! म्हणूनच की काय सगुणाबाईच्या नवऱ्याने त्यांना विचारले.

“सगुणा, काय झालंय तुला ? कुणासंग बोलतेयस तू ?”

“अहो,ही बया आलीय ना,आपल्या बाळाला न्यायला.”:त्यांनी न समजून विचारले, “कोण बया?”

“अहो, तुमची सूनबाई !”

तसे ते एकदम खूष होत म्हणाले, “सुनबाई, खरच आली आहेस का तू ?”

“होय मामंजी मी खरच आली आहे.”

“मग मला तू दिसत का नाहीस ?”

“असं म्हणताच प्रमिलाची काळी छाया दिसू लागली.तसे तिचे सासरेबुवा म्हणाले, “सूनबाई मी तुला विनंती करतो की, तू बाळाला आमच्यापासून हिरावू नकोस.”

“नाही हिरावून घेणार.परंतु....?”

“परंतु काय ?”

“मी बाळाला भेटायला इथं येत राहणार तुम्ही कुणीही मला अडवण्याचा प्रयत्न करायचा

नाही.हे तुम्हा सर्वांना मान्य असेल तर मी बाळाला काहीच करणार नाही.”

“तेव्हा सर्वांनी ते कबुल केले.पण नंतर सगुणाबाईंच्या मनात एक कारस्थान शिजल.त्या एका मांत्रिकाला जाऊन भेटल्या नि त्याला सविस्तर माहिती दिली. नि शेवटी म्हटले, “महाराज काय पण करा.पण त्या प्रेत आत्म्याचा पक्का बंदोबस्त करा.” त्यावर तो मांत्रिक म्हणाला, “ठीक आहे.मी येतो तुमच्यासोबत तुमच्या घरी ! मग पाहू काय करायचं ते.”

असे बोलून मांत्रिक सगुणाबाई सोबत यायला निघाला.जेव्हा ते दोघ प्रमिलाच्या खोलीत आले.तेव्हा मोठ-मोठ्याने हसण्याचा आवाज संपूर्ण खोलीमध्ये उमटला. पण लगेच हसण्याचा आवाज थांबला.नि उद्गार उमटले.

“सासू बाई तुम्ही तेच केलात जे करायला नको हव होत.पण हरकत नाही.तुम्हाला त्या अपराधाची शिक्षा जरूर मिळेल.”

त्यावर सासू उपहासपूर्व स्वरात म्हणाल्या “तू आता माझी चिंता सोड.आणि स्वत:ची चिंता कर.कारण मी तुझा पक्का बंदोबस्त करायचा ठरविले आहे म्हणून आता तू स्वत:ची चिंता कर.” असे बोलून त्या मांत्रिकाकडे पाहत म्हणाल्या , “महाराज तुम्ही तुमचं काम सुरु करा.”

“सासूबाई मांत्रिकाला इथे बोलावून फार मोठी घोडचूक केली आहे तुम्ही ! आता तुम्हाला माफी कदापि मिळणार नाही.”

असे बोलून तिने मोठ्याने फुंकर घातली.तशी खोलीमध्ये हवा वाहू लागली.दारे,खिडक्या एकमेकांवर आपटू लागली.तेव्हा मांत्रिकाने माणसाच्या कवटीमधले अभिमंत्रित केलेले पाणी तिच्या काळ्या छायाकृतीवर शिंपडले.तशी त्या काळ्या सावलीने हवेचे रूप धारण केले.नि मांत्रिकाच्या हातात असलेल्या बाटली मध्ये शिरली.मांत्रिकाने लगेच बाटलीच झाकण लाविले.आणि सगुणाबाई कडे वळत मांत्रिक म्हणाला, “ही बाटली तेवढी सांभाळून ठेवा.म्हणजे कुणाच्याही हाती लागता कामा नये.कारण एकदा का ह्या बाटलीचे झाकण उघडले की प्रमिलाचा आत्मा एकदम मुक्त होईल.आणि मग पुन्हा त्याला आपण कैद करू शकणार नाही.कारण आता माझी सर्व साधना तिला बंधिस्त करण्यासाठी वापरली आहे.पुन्हा वापरू नाही शकणार मी ! म्हणून सांगतोय या बाटलीची नीट काळजी घ्या.”

तेव्हा सगुणाबाईने होकार्थी मान डोलावली.त्यांनतर मांत्रिक तेथून निघून गेला.तश्या सगुणाबाई ती बाटली आपल्या अलमारीच्या चोर कप्यात ठेवायला गेल्या परंतु कुणास ठाऊक त्यांच्या हातून ती बाटली सुटली नि फरशीवर पडली नि फुटली.तशी प्रमिला मुक्त झाली.म्हणजे बाटलीतून मुक्त झाली.तसे तिने मोठ्याने विकट हास्य केले. नि म्हटले, “काय सासूबाई आता काय कराल ? कोण वाचवायला येईल तुम्हाला ?” असे बोलून ती मोठ्याने विकट हास्य केले. आ हा..हा...हा.SSS” तशी तिची सासू भयभीत होऊन म्हणाली, “म..म..मला माफ कर सुनबाई ! मी पुन्हा असे नाही करणार.”त्यावर प्रमिला म्हणाली, “असे तुम्ही मागच्यावेळी पण बोलला होता.पण दिलेला शब्द पाळला नाही तुम्ही ! म्हणून तुम्हाला या वेळी शिक्षा होणारच आहे.”

“आता फक्त एकदा माफ कर.अगदी शेवटचे !”

“ठीक आहे.आपल्या दिलेल्या शब्दावर कायम राहिली तर वाचशील नाहीतर मरण अटळ आहे.कळल ”असे बोलून प्रमिलाची छाया गायब झाली.



क्रमशः



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.