Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

पाऊले चालती पंढरीची वाट

 

पाऊले चालती पंढरीची वाट
पाऊले चालती पंढरीची वाट


                 पाऊले चालती पंढरीची वाट

राजाराम हे एक किराणा मालाचे व्यापारी होते.त्याना दोन भाऊ होते,एकाचे नाव शिवराम होते तर दुसऱ्याचे नाव सखाराम होते.शिवराम हा आपल्या मोठ्या भावाच्या पावलांवर पाऊल ठेऊन चालणारा होता,तर धाकटा भाऊ सखाराम हा आतल्या गाठीचा होता.आपल्या मनातील गोष्ट कुणाला सांगत नसे,परंतु दुसऱ्याच्या मनातील गोष्ट गोड बोलून कशी काढून घ्यावी हे त्याला चांगले जमायचे.राजाराम च्या पोटी पुत्र संतान नव्हतें,म्हणून ते फार दुःखी कष्टी होते. सर्व उपाय करून झाले, परंतु त्यांना काही मुलं झालं नाही, शेवटी कंटाळून त्यांनी संन्यास घ्यायचा ठरविले.आणि ही गोष्ट सर्वात प्रथम त्यांनी आपल्या आईला सांगितली.त्यावर त्यांची आई,म्हणाली," अरे,मुलच ना, होईल आज ना उद्या , एवढ्यात म्हातारा झालास का तू ? " त्यावर राजाराम बोलला," आई ,तू आता खोटी आस देऊ नकोस मला.मला आता कळून चुकले की मी आता बाप होऊ शकणार नाही. म्हणून मी संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे."
" अरे,पण संन्यास घेऊन जाणार कुठं तू " त्यावर राजाराम बोलला, सर्व तीर्थ स्थानावर जाणार
" अरे,पण हे काय तुझं वय आहे ? तीर्थक्षेत्र फिरण्याचे ? "
" आई, माझं आता या संसारात मन रमत नाही.तेव्हा मला जाऊ दे,अडवू नकोस तू मला ."
" ठीक आहे,तुला जायचं तर जा,मी तुला अजिबात अडविणार नाही,पण माझी तुला एकच विनंती आहे,की मी मरेन तेव्हा तू जिथे असशील तेथून मला मूठमाती द्यायला तू आवश्य ये नाहीतर माझ्या आत्म्याला शांति लाभणार नाही."
" आई असं का बोलतेस तू ? अजून भरपूर वर्षे जगायचे आहे तुला." त्यावर त्यांची आई म्हणाली," कशासाठी जगू आणि कुणासाठी ? तू हा असा सोडून चालला आहेस."
" अग आई,मी गेलो तरी माझे दोन भाऊ आहेत ना तुझ्यापाशी ! त्यांच्या रूपातच तू मला पहायचा प्रयत्न कर."
" बरं दुकानाचे काय करतो आहेस ?"
" दुकान शिवरामच्या स्वाधीन केले नि सखाराम ला गावची सारी प्रॉपर्टी देऊन टाकली."
" आणि स्वतःसाठी काय ठेविले आहेस ?"
" मला काहीही नको."
त्यानंतर राजाराम आपल्या पत्नीसह तीर्थक्षेत्र निघून गेला,आळंदी, तुळजापूर,अक्कलकोट, करून शेवटी पंढपुर ला आले,तेथे त्यांना एक सतगुरु भेटला.त्यांची त्यांनी मनोभावे सेवा केली. त्यांनी राजारामच्या पत्नीला आशीर्वाद दिला की,अष्टपुत्र भव !"तेव्हा त्यांच्या पत्नीने विचारले," महाराज मला खरंच मुलं होतील."
त्यावर ते योगीराज म्हणाले की,माझा आशीर्वाद कधी खोटा ठरणार नाही.आणि इथून घरी जायचंय.कारण प्रपंच केल्यावाचून परमार्थ साध्य होत नाही.म्हणून पुन्हा स्वगृही जा आणि सुखाने संसार करा. करा.
त्यानंतर ते दोघेही घरी आले,तेव्हा त्यांच्या आईला कोण आनंद झाला.मात्र त्या दोघांना फारसा आनंद झाला नाही.अर्थात त्यांच्या भावांना, कारण त्यांचे दुकान परत करावे लागणार.ही भीती शिवारामच्या मनात निर्माण झाली,परंतु त्याची पत्नी म्हणाली," परत कशाला द्यायचं दुकान ? त्यांनी स्वतःहून दिलं होतं ना दुकान आमच्या ताब्यात,आम्ही काय मागायला गेलो होतो का त्यांच्याकडे ?
"अग पण ...?"
" तुम्ही गप्प बसा हो, तुम्हांला काही कळत नाही."असे म्हणून ती सरळ मोठ्या दिराकडे गेली नि म्हणाली," दादा साहेब ,तुम्ही जरी परत आलात तरी आम्ही तुम्हांला तुमचं दुकान परत देणार नाही हं,सांगून ठेवते.
नाहीतर म्हणाल की आम्ही आता आलोय ना ,आता आमचं दुकान आम्हाला परत द्या.तर मिळणार नाही." असे म्हणून फणकाऱ्याने ती तिकडून निघून गेली.
तसा लगेच धाकटा भाऊ म्हणाला," आणि हां दादा तू मला स्वतःच दिली होतीस ना स्वतःच्या हिस्सा ची जमीन मी मागितली होती का ? नाही ना ? मग आता परत कशी मागतो आहेस ?" राजाराम बोलला," अरे, पण मी कुठं काय मागितले आहे तुझ्याकडे ?" सखाराम बोलला," नाही म्हणजे,तू परत आला आहेस ना,म्हणून मला वाटलं की तू मागशील आपल्या हिस्साची जमीन."
" मला काहीही नकोय मी फक्त नि फक्त माझ्या आईला भेटायला आलोय इथं."
" मग आल्या सारखं रहा दोन चार दिवस मग आपली नि वहिनीची दुसरीकडे कुठेतरी सोय कर." त्यावर आई चिडून म्हणाली," लाज नाही वाटत असं बोलायला ? सख्या भावाशी वैऱ्या सारखे वागताय तुम्ही दोघे ? " त्यावर सखाराम म्हणाला," त्याला काय आम्ही सांगितले होते घरदार सोडून संन्यास घ्यायला ?" तेव्हा राजाराम म्हणाला," बरं बरं मी नाही राहणार इथं फार दिवस पण जरा शांत राहा."
तेव्हा राजाराम ची पत्नी जान्हवी म्हणाली," एवढे तरी उपकार कशाला हवेत तुमचे आम्हाला ? चला हो,माझ्या भावाच्या घरी ! राजाराम आपल्या पत्नी सोबत आपल्या सासरी गेला ,तेथेही तोच प्रकार तिची भावजय नको नको ते बोलू लागली.शेवटी तेथून ते दोघे निघाले.चालून चालून पाय थकले तसे ते दोघे एका झाडाखाली सावलीत बसले.तेवढ्यात तेथे एक भिकारी आला नि म्हणाला," माई ,मला फार भूक लागली आहे,तुझ्याकडे काही खायला असेल तर दे." तिला आता विचार पडला की ह्याला आता खायला काय देऊ ?
तेवढ्यात तिला आठवले तिच्या भावजय ने सकाळी दोन शिळ्या भाकऱ्या दिल्या होत्या खरं तर आपण तेथच फेकून देणार होते, परंतु अन्नचा अपमान करू नये म्हणून त्या भाकऱ्या कपड्यात बांधून घेतल्या.त्याच देऊ या बाबाला." असा विचार करून ती बोलली," बाबा माझ्याकडे दोन शिळ्या भाकऱ्या आहेत खात असशील तर देते. ?" त्यावर तो भिकारी म्हणाला," माई काही पण दे मला. मी खाईन."असे म्हटल्यावर तिने आपले गाठोडे सोडले नि एक भाकरी काढून त्या भिकाऱ्याला दिली.त्या भिकाऱ्याने कांदा नि भाकर मोठ्या आवडी ने खाल्ली नि वरून म्हणतोय कसा माई अजून आहे का भाकरी,मला फारच भूक लागली आहे." तेंव्हा त्या जान्हवीबाईंनी शिल्लक असलेली भाकरी त्या भिकाऱ्याला देऊन टाकली.त्या भिकाऱ्याने ती भाकरी सुध्दा खाल्ली नि मग म्हणाला," माई देव तुमचं भले करो." त्यावर ती म्हणाली," अरे,बाबा देव आमचं कशाचे भले करतोय ? हे बघ रानोमाळ भटकतोय ? कुणी पण आसरा देईना बघ." त्यावर तो भिकारी म्हणाला," देईल देईल देव नक्की देईल."असे बोलून तो भिकारी तेथून निघून गेला.थोड्या वेळाने तेथे एक माणूस आला नि झाडाखाली सावलीत उभा राहिला आणि त्या दोघांकडे पाहत बोलला," काय पावनं खनंच्या गावचं म्हणायचं तुम्ही, आनी कुठं निघालासा ?"
" कुठं जायचं ते आम्हाला माहीत नाही,परंतु हा रस्ता जिथं घेऊन जाईल तिकडे जायचंय आम्हाला." त्यावर तो म्हणाला," याचा अर्थ तुम्ही निराधार आहात असंच ना ?' राजाराम आपली मान हलवून' हो' म्हटले. त्यावर तो मनुष्य म्हणाला," मग एक काम करता का ? " त्यावर राजाराम आणि जान्हवी एकमेकांकडे पाहून खुणेने एकमेकांना विचारू लागले की असं काय काम करायला सांगतोय हा अनोळखी माणूस ? त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव त्या अनोळखी माणसाने ओळखले असावेत म्हणूनच की काय तो पुढे म्हणाला," घाबरू नका.मी काही तुम्हाला तुमच्या मना विरुध्द काम करायला सांगणार नाही." त्यावर राजाराम
म्हणाला," मग काय काम करायला सांगणार आहात ?"
त्यावर तो अनोळखी ग्रहस्त म्हणाला," इथून थोडे दूर चालून गेल्यावर एक गाव लागेल,त्या गावात माझी खूप जमीन आणि एक घर सुध्दा आहे,तेथे तुम्ही जाऊन राहायचं नि तिथल्या जमीनीत शेत पिकवायचं ,एवढं तरी जमेल की नाही तुम्हाला ?
" हो जमेल की,परंतु तुम्ही आमच्यवर एवढी मेहरबानी का करता ? नाही म्हणजे असं कुणी कुणावर विश्वास ठेवत नाही.म्हणून म्हटलं."
" त्याचं काय आहे,माझा गाव आहे,इथून खूप दूर,त्यामुळे मला सारखं सारखं इथं यायला जमत नाही.म्हणून तुम्हांला सांगतोय."
" कुठल्या गावचे तुम्ही ?"
" मी होय...पंढरपुरचा विठोबा" बरं ,बरं."
" मगं येताय न्हवं !"
" व्हयं की ,त्या
" मगं येताय न्हवं !"
" व्हयं की ,त्या पंढरीच्या विठ्ठलवाणीच धाऊन आलायसा त्याचं नाव बी विठ्ठल आणि तुमचं नाव बी विठ्ठलच की."
त्यानंतर ते दोघे त्या माणसासोबत गेले.पाहतात तर खरोखर एक फार मोठं शेताचं आवार दिसले.आणि त्यात सुंदर एक घर ही होते.त्या मानासाने ते घर उघडून दिले नि सांगितले आता तुम्ही दोघे इथं रहा.आणि दारी आलेल्या याचकाला मात्र माघारी पाठवू नका.देव तुमचं लय बरं करील बघा."असे बोलून तो माणूस तेथून निघून गेला.जान्हवी ने सर्वत्र नजर फिरविली.घर तसे ठीक ठाक होते.बरेच दिवस त्या घराचा वापर झलेला दिसत नव्हता.म्हणजे घरातल्या भाड्यावर धूळ सुचली होती,ठीक ठिकाणी कोळीष्टीकांचे जाळे विणलेले दिसत होते.घरात धान्य ही होते.याचा अर्थ सुगीच्यावेळी या घरात कुणीतरी येऊन राहात असावा.असा विचार करून दोघानी मिळून अगोदर घर स्वच्छ झाडून काढलं.त्यानंतर तिथल्याच भांडी वापरून विहिरी वरून पाणी आणलं,जेवण ही बनविले.आणि दोघांनी स्वतःला वाढून घेतले.आणि जेवण सुरू करणार तेवढ्यात एक तेथे भिकारी आला नि म्हणाला," माई म्या लय दिसाचा उपाशी हाय तवा खायला द्याल तर तुमचं लय उपकार होतील बगा." त्यावर राजाराम म्हणाला," लय येळेवर आलास की रं गड्या,आमी आतां जेवायलाच बसणार होतो बगा. असे म्हणून त्याला बसायला पाट दिला नि आपले स्वतःचे जेवणाचे ताट उचलून त्या भिकाऱ्याला खायला दिले.तो भिकारी जेऊन तृप्त झाला नि त्या दोघांना दुवा देत निघून ही गेला.त्यानंतर त्या दोघांनी शिल्लक राहिलेले जेवण जेऊन घेतले.त्यानंतर ते दोघे तेथेच राहू लागले.तेथील शेत नांगरून त्यात धान्य पेरिले.पीकही खूप आले. म्हणून त्यांनी दारी येणाऱ्या याचकाला खाली हाताने कधीे जाऊ दिले नाही.लवकरच तिला दिवस गेले नि त्याना पुत्र संतान झाले. विठ्ठलाच्या आशीर्वादाने झाले म्हणून त्या मुलाचे त्यांनी विठ्ठल हे नाव ठेविले.त्यानंतर अजून दोन मुलं झाली.त्यांची नावे सुद्धा विठ्ठलाच्या नावावरूनच ठेविली.एकाचे पांढुररंग, नि दुसऱ्याचे पंढरीनाथ मुलं हळूहळू मोठी होऊ लागली होती.सर्वकाही सुरळीत सुरू होते.तशी त्याना आपल्या आईची आठवण झाली.ते आपल्या गावाला गेले नि आपल्या आईला आपल्या सोबत घेऊन आले.आपल्या मुलाचा थाटलेला नवीन संसारआणि नातवंड पाहून ती माता धन्य झाली.पण राजारामला एका गोष्टीची चिंता लागून राहिली होती की,इतकी वर्षे झाली तरी घर मालक शेतीची खंडणी घ्यायला येत कसा नाही.म्हणून ते स्वतःच पंढरपूरला जायला निघाले.पंढरपूरला आल्यानंतर खूप लोकांजवळ चौकशी केली की कृष्णा वासुदेव यादव इथं कुणी राहतो का ? तेव्हा गाववाले म्हणाले," या नावाचा कुणीही माणूस इथं राहात नाही.अख्खा गाव पालता घातला पण या नावाचा कुणी माणूस भेटला नाही.शेवटी कंटाळून एका झाडाखाली बसले असताना अचानक त्यांच्या डोक्यात एक विचार आला की,कृष्ण वासुदेव यादव हे नाव तर कुठंतरी ऐकल्या सारखे वाटतंय.आणि त्यांनी सांगितलेली एक एक गोष्ट आठवली तशी लगेच त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली.हे नाव तर पंढरपूर च्या विठ्ठलाचे आहे,म्हणजे स्वतः विठ्ठल माऊली मला भेटायला आला नि मी त्याला ओळखले नाही.तसे ते पळतच विठ्ठलाच्या मंदिरात गेले नि त्याला हात जोडून उभे राहिले तेव्हा त्याना विठ्ठलाच्या जागी तो माणूस दिसू लागला.तेव्हा म्हणाले," विठ्ठला तू दिनांचा कैवारी म्हणतात ते खरेच आहे रे बाबा.त्यानंतर ते घरी आले.नि घडलेली सर्व हकीकत आपल्या पत्नीच्या कानावर घातली.तास तिला ही फार आनंद झाला.त्यानंतर घराच्या शेजारीच त्यांनी विठ्ठलाचे एक भव्य मंदिर बांधले नि येणाऱ्या भक्तांना अन्नक्षेत्र सुरू केले.विठ्ठलाचा महिमा फार आणि त्याच्या भक्तांचाही महिमा फार.

समाप्त



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..