Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

प्रेम-लीला १

प्रेम-लीला १
प्रेम-लीला १

                                
        एका काळचे दोन जिवलग मित्र . पण सध्या ते एकमेकांचे हाडवैरी बनलेत. ते पण असे तसे वैरी नव्हते. एकाच्या घरातून दुसऱ्याच्या घरात विस्तव सुद्धा जात नव्हता. शिवाय इतकेच नाही तर दुसरा मित्र जर समोरून येत असेल तर दुसरा मित्र लगेच आपला रस्ता बदलतो. त्या मागचा  उद्देश हाच की,आपल्याला आपल्या वैऱ्याचे तोंड पाहायला लागू नये. कोण बरं होते हे दोन मित्र ? ठाऊक  आहेत का ते तुम्हांला   ? नाही ना ? मग मी सांगतो. ऐका ." असे म्हणून मी त्या दोन मित्रांची कथा सांगायला सुरुवात केली.
       मोहन आणि सुंदर  हे दोन मित्र त्यांची मैत्री आज कालची नाही तर अगदी लहानपणापासूंनची ! म्हणजे जेव्हा चड्ड्या ओल्या केल्या जातात ना त्या वेळापासूंनची ! शिक्षण सुद्धा दोघांनी एकाच शाळेत घेतले. पुढे कॉलेज जीवनात सुध्दा ते दोघे मित्र एकाच कॉलेजात नि एकाच शिक्षण घेत होते. पण आता दोघांत तिसरा मित्र -सॉरी ! मित्र नव्हे मैत्रीण सामील झाली होती. तिचे नाव होते राधा. अर्थात दोघेपण तिच्या प्रेमात पडले. पण तिचे प्रेम मात्र मोहनवरच होते. शिवाय सर्वात अगोदर मोहननेच तिला प्रपोज केले. सुंदरला मात्र तिला प्रपोज करणं जमलं नाही. तो फक्त मनातल्या मनात प्रेम करत राहिला आणि जेव्हा त्याने तिला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राधाने त्याला स्पस्टशब्दात सांगून टाकले की , माझं प्रेम फक्त नि फक्त मोहन वर आहे. मी तुझ्यावर प्रेम करत नाही. तेव्हा तुझ्या मनात माझ्या बद्दल काही गैरसमज झाला असेल तर तो दूर कर.  ही तुला माझी नम्र विनंती.
       त्यावर सुंदर  बिच्चारा काय बोलणार ना ? त्याला आपली हार मानून गप्प बसावं लागतं. पण जेव्हा त्याला त्याच्या लहान बहिनीकडून म्हणजेच मीरा कडून  समजते की मीरा सुद्धा मोहनवर प्रेम करते. तेव्हा त्याला एकदम धक्काच बसला. पण लगेच स्वतःला सावरून तो आपल्या बहिणीला बोलला ," अगं मीरा , तुझं प्रेम मोहनवर आहे हे तू कधी सांगितले आहेस का त्याला ?" त्यावर मिराने नकरात्मक मान डोलावत म्हटले," नाही रे, दादा मला त्याच्या समोर आपले प्रेम व्यक्त करण्याची हिंम्मतच झाली नाही कधी ! पण कारे तू असं का विचारतो आहेस मला ?" तेव्हा सुंदरच्या मनात एक विचार आला की, सांगून टाकावं मीरा ला सत्य काय आहे ते. पण त्याला धिरच झाला नाही. कारण ज्या यातना आपण भोगतोय त्याच यातना आपली बहीण सुद्धा भोगणार. त्यापेक्षा तिचे मन दुसरीकडे  कुठेतरी वळवायला हवे. असा मनात विचार करून तो तिला म्हणाला," नाही म्हणजे त्याचं असं आहे की,आपण जर एखाद्याला सांगितले नाही की मी तुझ्यावर प्रेम करतेय तर त्याला ते कसे कळणार ना ? शिवाय आपण त्याला सांगण्याच्या अगोदर  तो जर  दुसऱ्या कुण्या मुलीवर प्रेम करून बसला तर मग पंचाईत होईल ना आपली !"
" अंss खरं आहे तुझं. पण मला ना हिंम्मतच होत नाही रे,त्याच्या समोर बोलण्याची ! मी खुप हिम्मत करते रे, पण शक्यच होत नाही रे मला." तेव्हा सुंदर मनात म्हणाला ," शेवटी माझीच बहीण ना तू ,कसं जमणार तुला ? पण काही हरकत नाही. माझ्या बाबतीत जे घडले तेच तुझ्या बाबतीत घडू नये,म्हणून मीच आता ते सांगणार आहे त्याला. पाहू तर खरं मोहन आपल्या दोस्तीची लाज राखतो की  नाही ती ! असा मनात विचार करून मी तिला म्हणालो," मी सांगू का त्याला , तुझ्या प्रेमा विषयी ?" त्यावर ती लगेच म्हणाली ," नाही, नको. आधी मी एकदा प्रयत्न करून पाहते. मला जर नाहीच जमलं तर मात्र तू प्रयत्न अवश्य कर."
मी मानेने हो म्हटले. त्यानंतर मीरानेच स्वतः मोहनला नदीच्या पुलावर बोलविले. तेंव्हा मोहन फार गोंधळला. त्याला काही कळेना की आज अचानक मिराने आपल्याला भेटायला नदीच्या पुलावर का बोलविले ते. पण नंतर त्याच्या मनात एक विचार आला की,कदाचित मीरा चे कुणावर तरी प्रेम जडले असावे आणि ते सुंदरला सांगण्याची तिला हिंम्मत होत नसेल बहुतेक, म्हणून तिला आपली मदत हवी असेल. कारण मी सुंदरच जिवलग मित्र आहे, अर्थात माझ्या सांगण्याने तो ऐकेल असं तिला वाटत असावे. हरकत नाही,सुंदरची बहीण ती माझी सुद्धा बहिनच ! नाही का ? असा विचार करून मी तिला भेटायला नदीच्या पुलावर गेलो. ती माझ्या अगोदर तेथे आली होती, मी तिला पाहून म्हणालो,"   हां बोल मीरा,का बोलविलेस मला इथं ?" त्यावर ती मला म्हणाली," अरे,माझं काम आहे, तुझ्याकडे. उगाच कुणी कुणाला बोलविते का ?" तेव्हा मोहन बोलला," बरं, बरं. सांग तुझं काय काम आहे ते." मीरा बोलली," मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलावयाचे आहे." त्यावर मोहन हसून म्हणाला," अग मग बोल ना,काय बोलावयाचे ते, उगाच सस्पेंस कशाला वाढवितेस ?" त्यावर मीरा म्हणाली," तोच तर प्रयत्न करतेय ना, मघापासून. पण बोलायला जमत नाहीये मला." मोहन ने विचारले," असा काय अवघड प्रश्न आहे,जो तुला सांगायला जमत नाहीये." तेव्हा मोठया मुस्किलीने हिम्मत करून मीरा बोलली," मला ना ......" पुढच शब्द तोंडातच विरले. ती पुढे बोलायलाच फावली नाही. तसा मोहन एकदम त्रासिक मुद्रेने बोलला," अग बोल ना, तुला काय बोलायचे ते ...?" तेव्हा ती जराशी हिम्मत करून म्हणाली," मला ना, प्रेम झालंय एका मुलावर."
त्यावर मोहन मोठयाने हसून म्हणाला," बस्स ! इतकेच ना ! "
त्यावर तिने आपली मान डोलवत " हो. " म्हटले. मोहन एकदम स्मित हास्य करून म्हणाला ," तू काही काळजी करू नकोस मी समजूत काढेन तुझ्या भावाची ! पण मला अगोदर हे सांग,कोण भाग्यवान आहे तो मुलगा ?"
तेव्हा ती चटकन बोलून गेली की तो भाग्यवान मुलगा तूच आहेस मोहन." हे ऐकल्या क्षणी मोहनला धरणी दुभंगुण आपण त्यात ओढले जात आहोत असा भास झाला त्याला जणू ! पण क्षणभरच ! लगेच दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरून तो बोलला," मीरा आपल्याला आवडली बरं का ? तुझी ही मस्करी !" त्यावर ती निश्चयपूर्ण स्वरात बोलली," मी
मस्करी करीत नाही आहे तुझी ! मी खरंच तुझ्यावर प्रेम करते,अगदी मनापासून." त्यावर काय बोलावे ते क्षणभर सुचले नाही मोहनला. पण क्षणभर वेळानंतर तो तिला म्हणाला," मीरा माझं ऐक . मी तुझ्यावर प्रेम करत नाही. तेव्हा तु ही तुझ्या मनातील हा वेडा विचार मनातून काढून टाक. कळलं." त्यावर मीरा बोलली," अरे,असं कुणाला करता येतं का कधी ?" मोहन एकदम सहानुभूतीच्या स्वरात बोलला,  " माहितेय मला. असं करणं फार कठीण आहे, पण दुसरा इलाज नाही त्याला." त्यावर ती एकदम कळवळून म्हणाली," असं का बरं म्हणतोयेस तू ? मी तुला आवडत नाही का ? मी दिसायला सुंदर नाही का ? माझ्यात काय कमी आहे ते सांग ना मला ?" तेव्हा मोहन तिला समजावत बोलला," तुझ्यात काहीही कमी नाही. पण मी तुला त्या दृष्टीने कधी पाहिलेच नाही. शिवाय माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे." मीरा चिडून बोलली," त्या राधावरच ना ?"
      " हो." मोहन बोलला.
      " माझ्यापेक्षा सुंदर आहे का ती राधा ?" त्यावर मोहन तिला समजावत बोलला," प्रश्न सुंदरतेचा नाहीये मीरा,आम्हां दोघांचे प्रेम आहे एकमेकांवर."
   "आणि माझं प्रेम आहे ते तुझ्यावर. त्याचं काय ?"
   " तुझं प्रेम आहे ते एकतर्फी आहे मीरा,असं एकतर्फी प्रेम यशस्वी नाही होत कधी !" तेव्हा मीरा बोलली," मग ठीक आहे,तू बस तुझ्या राधाला कवटाळून , मी निघून जाते तुझ्या जीवणातूनच, नाहीतर या जगातूनही !" असे म्हणून तिने सरळ स्वतःला नदीत झोकून दिले. ती असा काही वेडा विचार करील असे मोहनला स्वप्नातही वाटले नव्हते. तिच्या पाठोपाठ मोहन ने सुद्धा नदीत उडी मारली. पण तोपर्यंत नदीच्या जोरदार प्रवाहाबरोबर ती वाहत गेली. मोहन ने पोहून शेवटी गाठलेच तिला. आणि तिला धरून किनाऱ्याला घेऊन आला. त्यानंतर तिला पालथी घालून तिच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करू लागला. पोटातून थोडे पाणी निघाले सुद्धा. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिला मृत्यू ने गाठलेच शेवटी ! आता काय करावे, सुंदरला काय सांगावे ? असा प्रश्न मोहनला पडला. तर त्यात नवल नाही. आणि तेवढ्यातच गावातील एक मुलगा तेथे आला नि तो मोहनला विचारू लागला की हिला काय झाले ? तेव्हा मोहन खरे काय झाले ते सांगून टाकले. तसा तो मुलगा पळतच गावात गेला नि साऱ्या गावाला त्याने ओरडून सांगितले की,मिराने नदीत जीव दिला. तशी गावातील सारी लोकं नदीच्या दिशेने पळत सुटले.  मीराच्या आईने तर मीरा ला घट्ट मिठी मारून हंबरडाच फोडला. मोहन आपल्या डोक्याला हात लावून बसला होता. मीरा असे काही करेल याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे आता आपल्या मित्राच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावे हे  त्याला सुचत नव्हते. तो हत्तप्रभ होऊन फक्त पाहतच राहिला. परंतु सुंदर गप्प बसण्यातला नव्हता. त्याने सरळ मोहनच्या शर्टाची कॉलर पकडली नि म्हणाला," हरामखोर मोहन मी तुला आज जिता सोडणार नाही. माझ्या निष्पाप बहिणीचा नाहक बळी घेतलास तू. आता बघच तू-....मी तुझं काय करतो ते ." असे म्हणून त्याने त्याचा गळा दाबला. तसा मोहनचा श्वास कोंडला गेला. पण दोघां तिघांनी मध्ये पडून त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले. नाहीतर आज मोहन मेलाच असता. त्या तिघांमधील एकजण म्हणाला," अरे,सुंदर हा काय वेडेपणा ? त्याचा कशापाई गळा पकडतोयेस ?" त्यावर सुंदर म्हणाला," ह्या हारामखोरामुळेच माझी बहिण आज मला सोडून गेली कायमची !" तेव्हा दुसऱ्याने न समजून विचारले ," काय ss ह्याच्यामुळे ?....ह्याने काय केले तुझ्या बहिणीचे ? ह्याने तिला नदीत उडी मारायला सांगितली काय ?" तेव्हा सुंदर म्हणाला," ह्याच्यावर ती फार मनापासून प्रेम करत होती. पण ह्याने तिचे प्रेम लाथाडले असणार ,म्हणूनच तिने त्यावर तिसरा खेडूत म्हणाला,"हे बघ तुझ्या बहिणीने आत्महत्या का केली आहे,हे कुणाला सुध्दा माहीत नाहीये. मग तू कसा काय सांगू शकतोस ? तुला सांगून गेली होती का ती की,मी आत्महत्या करायला चालली आहे नदीवर म्हणून." त्याच्या ह्या वक्तव्यावर सर्वजण खळखळून हसले. सुंदरला त्या गोष्टीचा भयंकर राग आला तो मोठ्याने ओरडून म्हणाला," दात बाहेर काढायचे बंद करा अगोदर." असे बोलताच सर्वजण चिडीचूप झाले. त्या क्षणी सुई जरी जमिनीवर पडली असती तरी तिचा आवाज आला असता. सर्वत्र निरव शांतता पसरताच सुंदर बोलला," मी जे बोलतोय ते एकदम सत्य बोलत आहे,पण तरीही कुणाला खोटे वाटत असेल तर त्याने ह्यालाच त्याचा जाब विचारावा." तेव्हा एकाने विचारले," मोहन तू सांग खरे काय आहे ते ?" तेव्हा मोहन ने घडलेली हकीकत जशीच्या तशी सर्वा समोर सांगितली. आणि शेवटी म्हणाला," माझं अजिबात प्रेम नव्हते तिच्यावर. माझं खरं प्रेम राधावर आहे." तेव्हा कुणीतरी एकाने विचारले," कोण राधा ? दामल्यांची का ? " मोहन बोलला," होय तीच !" तेव्हा एकाने राधाला विचारले," राधा,हे खरे आहे ?" तेव्हा राधा म्हणाली," होय. आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतोय ."
त्यावर एकजण बोलला," म्हणजे एकतर्फी प्रेम होते तर !" तसा सुंदर बोलला," पण होतं ना तिचं तुझ्यावर प्रेम ...मग का नाही स्वीकार केलास तिच्या प्रेमाचा ?"
" वाहवा ! तुझ्या बहिणीसाठी मी
त्या बिच्चाऱ्या राधाला धोका देऊ ? " मोहन उपहासपूर्ण स्वरात बोलला," म्हणजे राधाने आत्महत्या केली असती तर ह्याला चाललं असते. किती हा स्वार्थीपणा !"
" उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस. तू जर मीराशी लग्न केलं असतेस तर मी राधा बरोबर लग्न केले असते . मग कुणाला आत्महत्या करण्याचा प्रश्न उरला नसता." बोलण्याच्या ओघात सुंदर चटकन नको ते बोलून गेला.
त्यावर मोहन उपहासपूर्ण
स्वरात बोलला," घ्या. ऐका. ह्याच्याच तोंडून ह्याला
आपली बहीण मेल्याचं दुःख नाहीये. तर  राधा ह्याच्यावर प्रेम करत नाही हे हयाचे खरे दुःख आहे." त्यावर सारवा-सारव करत तो बोलला," नाही, नाही, मला तसं नव्हते म्हणायचं होतं. मला इतकेच म्हणायचं होतं की......" त्याला पुढे न बोलू देता एक वृद्ध व्यक्ती म्हणाला," ,हे बघा तुमचा जो काय विषय आहे तो नंतर मांडा. अगोदर भांडण थांबवा रे,तुमची ! अगोदर तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करा. मग बसा आयुष्यभर भांडत." त्या म्हाताऱ्या माणसांचे म्हणणे सर्वांना पटले. मग सर्व गावकऱ्यांनी मिळून मीरा च्या अंत्यसंस्काराची तयारी केली. त्यानंतर तिची प्रेतयात्रा निघाली. मोक्षधाम भूमीत येताच तिच्यावर पुढील सर्व विधी पूर्ण करण्यात आले. मात्र मोहनला तिच्या देहाला स्पर्श सुद्धा करू दिला नाही. म्हणाला , " खबरदार, माझ्या बहिणीच्या मृतदेहाला स्पर्श करशील तर ! " त्यावर मोहन बिच्चारा काय प्रतिक्रिया करणार,मुखाट्याने गप्पच बसला. सर्व विधी संपन्न झाल्यावर चितेला अग्नी दिला गेला. तेव्हा जळणाऱ्या धगधगत्याआगीच्या ज्वाळा समोर सुंदर ने प्रतिज्ञा केली की,ज्याच्या मुळे तुला प्राण गमवावा लागला तो आज पासून माझा पक्का वैरी ! आणि त्याना मी सुखाने जगू देणार नाही.
आणि त्या दिवसापासून दोघां मध्ये जे वैर सुरू झाले ते कायमचे. पण त्यावेळी सुंदर ने बोलले शब्द अजूनही मोहनच्या कानात घुमताहेत. सुंदर ,मोहनला म्हणाला होता की, मोहन आज पासून तू माझा एक नंबरचा शत्रू-कारण तुझ्यामुळे माझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे,अर्थात या पुढे मी तुला सुखाने जगू तर देणार नाहींच,परंतु जिच्यासाठी तू माझ्या बहिणीचे प्रेम नाकारलेस त्या राधाला मी जीवनातून उठवेन. आणि तिला सुध्दा आत्महत्या करायला भाग पाडेन, तेव्हाच खऱ्या अर्थाने माझ्या मनाची शांती होईल." असे म्हणून तेथून तो निघूनही गेला. मोहन  मात्र काही न बोलता त्याच्या पाठमोरी आकृती कडे पाहतच राहिला . पण थोड्या वेळाने तो भानावर आला. तेव्हा त्याच्या ध्यानात आले की,आपला मित्र फार रागात आहे,म्हणून तो आपल्याला असं बोलला असेल, राग थंड झाल्यावर त्याच्या द्यानात येईल की,माझी त्यात काहीच चूक नाहीये. परंतु तसे मात्र घडले नाही. त्यानेच नाही तर त्याच्या घरच्यांनी सुद्धा मोहनच्या घरच्यांशी संबंध तोडले. दोघेही एकाच गावात राहात होते,परंतु एकमेकांशी हार्ड वैर होते. ते एकमेकांचा चेहरा ही पाहत नसत . येता जाता रस्त्यात योगायोगाने भेट जर झालीच दोघांची तर आपला रस्ता बदलणे किंवा ते शक्य नसल्यास मान वळवून दुसरीकडे पाहत चालणे वगैरे....... असे प्रकार वारंवार होऊ लागले. मग मोहन ने सुद्धा विचार केला की गावात राहायचं नाही.
         असा विचार करून मोहन ने गाव सोडला तो कायमचाच. तो मुंबईला आला नि एका टूथब्रशच्या कंपनीत कामाला लागला. कारण लवकरात लवकर त्याला राधाशी लग्न करावयाचे होते. पण त्या अगोदरच सुंदर ने तिचं अपहरण केले नि मग तिच्यावर बळजबरी केली. नि आपल्या मनाची आग शांत केली. त्यामुळे राधाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला,परंतु योग्यवेळी आणि योग्य त्या ठिकाणी मोहन तेथे पोहोचला नि त्याने राधाचे प्राण वाचविले. तेव्हा राधा त्याला म्हणाली," मोहन माझं शील भ्रष्ट झाले रे,मी आता तुझ्या लायक राहिली नाही." तेव्हा मोहन तिला म्हणाला," तू लायक आहेस किंवा नाहीस हे तू कोण ठरविणार ना ? ते मला ठरवू दे ना !" त्यावर ती त्याला म्हणाली," एकदा निर्माल्य झालेले 
फुल देवाच्या चरणावर चढविले जात नाही." त्यावर मोहन हसून म्हणाला," पण ते देवालाच मान्य असेल तर !" त्यावर ती त्याला बिलगली नि म्हणाली," मग तर माझ्यापेक्षा  भाग्यवान या जगात नाही कुणी दुसरी!" मोहन तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला," भाग्यवान फक्त तूच नाहीस मी पण तेवढाच भाग्यवान आहे." असे म्हटल्याने राधाचं मन एकदम भावुक झाले. ती त्याला म्हणाली," किती रे,करतोयेस प्रेम माझ्यावर. खरंच भाग्यवान आहे मी ! नाहीतर तुझ्याजागी दुसरा कुणी असता तर त्याने स्वीकार केला नसता माझा. तर उलट त्याने माझा तिरस्कारच केला असता." मोहन बोलला," खरे प्रेम करणारे,पवित्र-अपवित्र याचा कधी विचार करत नाहीत. आणि तुला एक खरं सांगू ?" तिने न समजून खुणेनेच विचारले, ते काय ? तेव्हा मोहन पुढे बोलला," राधा,दोन जीवांचे मिलन आत्म्याशी असते,नाही शरीराशी असते. म्हणून तू कधी ही स्वतःला अपवित्र मानू नकोस." राधाने एक शंका व्यक्त केली की, तुझे आई-वडील माझा स्वीकार करतील का ?" मोहन बोलला," अग माझे आई-वडिलांनी तू सून म्हणून कधीच स्वीकार केला आहे तुझा!"
       " हो,पण अगोदर ना,आता माझ्या बरोबर घडलेला अतिप्रसंग समजल्यावर माझा पहिल्या सारखा स्वीकार करतील का ते ?" त्यावर मोहन म्हणाला," म्हणजे माझ्या वडिलांना पुर्ती ओळखले नाहीस तू अजून. अग माझे वडील फार नवीन विचारांचे आहेत त्याना जुन्या लोकांचे बुरसटलेले विचार पटत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की,आत्मा पवित्र असतो. आणि शरीर हे नाशिवंत आहे,ते कधी न कधी मातीत मिसळणारच ! तेव्हा त्याची चिंता कशाला करायची ! वगैरे-वगैरे......तेव्हा तिची खात्री झाली की आपली निवड लाखात एक आहे,असा विचार करून तिने लगेच लग्नास होकार दिला. त्यानंतर मोहन ने आपल्या आई-वडिलांना राधा विषयी सांगितले. तेव्हा त्यानी सुध्दा मोठ्या मनाने राधाचा सून म्हणून स्वीकार केला. लवकरच त्या दोघांचे लग्न सुध्दा झाले. आणि त्या दोघांचा संसार सुरू झाला. त्यानंतर त्यांच्या संसार वेलीवर दोन फुले उमलली . एक मुलगा आणि दुसरी मुलगी, मुलीचे नाव आपल्या आजीच्या नावावरून लिला ठेविले. त्यांच्या आजीचे नाव लिलावतीबाई असे होते. त्यात बदल करून फक्त लिला ठेविले.आणि मुलाचे नाव राज ठेविले. दोन्ही मुलं  जशी मोठी होत गेली  तशी त्या दोघांना इंग्रजी शाळेत दाखल करण्यात आले. मुलं देखील एकदम मन लावून अभ्यास करत होती.
           दुसरीकडे म्हणजे गावाला सुंदर ने सुध्दा मधुरा नावाच्या मुलीशी लग्न केले. त्याना सुध्दा दोन अपत्ये झाली . दोन्ही मुलगेच होते. मुलांची नावे,अनुक्रमे सुधीर नि प्रेम अशी ठेवण्यात आली. शिवाय मधुराचे वडील राजकारणात असल्याने जावयाचा म्हणजेच सुंदरचा राजकारणात प्रवेश मिळायला सहज शक्य झाले. त्याने प्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढविली आणि त्यात तो निवडून ही आला. लवकरच त्याची सरपंच पदासाठी निवड झाली. त्यामुळे सारा गाव त्याच्या अधिकारी क्षेत्रात आला. त्यामुळे तो आता मोहनच्या वडिलांना नाहक त्रास देऊ लागला. म्हणजे पीकलेल्या शेतात गुरे सोडून शेताची नासाडी करणे वगैरे तो करू लागला होता.
     मोहन मुंबईला एका टूथब्रश बनविण्याचा कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याला सारखे सारखे गावाला जाता येत नव्हते. आणि त्याचाच फायदा सुंदर घेत होता. त्याने आता आपल्या नावापुढे राव ही उपादि सुध्दा लावली होती. मोहन आपल्या आई-वडिलांना होणारा त्रास उघड्या डोळ्यांनी पाहत होता. पण करणार काय ? त्याना सुध्दा मुंबईला आपल्या सोबत ठेवायच म्हटलेे तर पैशांची कमतरता होती. त्याला मिळणाऱ्या पगारातून त्याचे घर जेमतेम चालत होते. त्यात आणखीन आपल्या आई-वडिलांची भर पडली तर त्याला खर्च परवडण्या सारखा नव्हता. त्यामुळे तो आजकाल सारखा विचार करू लागला की,आपल्याला जास्तीत जास्त पैसे कसे मिळविता येतील. विचार करता करता त्याला एक कल्पना सुचली. आणि ती कल्पना म्हणजे काहीतरी व्यवसाय करणे होय. पण कोणता व्यवसाय करणार ? आपल्याला तर कोणत्याच बिझनेस बद्दल काही माहिती नाही. फक्त टूथब्रश कसे बनविले जाते एवढेच फक्त ज्ञान.
टूथब्रश चे नाव मुखात येताच त्याच्या मनात एक विचार आला की,आपण सुद्धा अशी छोटीशी फँक्ट्ररी सुरू केली तर ! कारण त्याच्या मालकाची कंपनी सुद्धा मोठया नावाजलेल्या कंपनीला माल पूर्वत होती. म्हणजे माल बनायचा त्यांच्या फँक्ट्ररीत मात्र त्यावर लेबल लावले जायचे मोठया नावाजलेल्या कंपनीचे.
मग त्याने सुध्दा ठरविले की,आपण सुद्धा असा माल तयार करून मोठया कंपन्यांना सप्लाय करू शकतो. हा विचार मनात येताच त्याने आपला हा विचार आपल्या एका जिवलग मित्राला बोलून दाखविला. अर्थात तो मित्र सुध्दा त्याच कंपनीत काम करत होता. त्याला सुध्दा ही कल्पना फार आवडली. मग दोघांनी मिळून लघु उद्योग सुरू करावयाचे ठरले. पण त्यासाठी एक मोकळी जागा हवी होती. आणि ती सोय त्या मित्रा कडून झाली. कारण त्याच्या दोन खोल्या होत्या. एका खोलीत तो स्वतः राहात होता तर दुसऱ्या खोलीत त्याने एक भाडोत्री ठेविला होता. त्या भाडोत्र्याला त्याने खोली खाली करायला सांगितली. त्यानंतर त्या दोघांनी बँकेतून पाच लाख कर्ज घेतले. आणि त्या खोलीचे कागदपत्रे बँकेत तारण म्हणून ठेविले. आणि मोहन ने गावची सारी जमीन विकून ते पैसे  धंद्यांत गुंतविले.

व्याप जसा वाढत गेला तसा त्यांनी आपल्याच कंपनीत फुलटाईम द्यायला सुरुवात केली. आणि नवीन नवीन मशीन येत गेल्या. आता कारखान्याला जागा कमी पडू लागली. म्हणून त्या दोघांनी भाड्याने दुसरीकडे जागा घेतली. आणि त्यात फँक्ट्ररी सुरू केली. नशिबाने सुध्दा त्याना साथ दिली. नि त्यांची फँक्ट्ररी भरभराटीस आली. पुढे त्यांनी कंपनीसाठी स्वतःची जागा विकत घेतली. आणि त्यात कंपनी सुरू केली. आणि खरे म्हटले तर भागीदारीत कोणताही धंदा फार काळ ठिकत नाही. परंतु हे दोघे त्यात अपवाद ठरले. दोघांची दोस्ती इतकी घनिष्ठ झाली की,त्या दोघांनी एकमेकांना नात्यात बांधावयाचे  ठरविले. जशी मोहनला दोन अपत्ये होती. तशीच त्याच्या मित्राला सुध्दा दोन अपत्ये होती. मुलाचे नाव होते अनय तर मुलीचे नाव होते अनया आणि त्याच्या पत्नीचे नाव होते भाग्यश्री आणि नावा प्रमाणे विनायकरावासाठी त्या भाग्यलक्ष्मी ठरली. तिचे पाऊल त्याच्या घरात पडताच त्यांचे भाग्य फळफळले. एका छोट्याशा कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराचे आता एका मालकात रूपांतर झाले. हा सारा पत्नीचाच पायगुण नाही का ? आणि कुणीतरी म्हटलेच आहे ना,पत्नी जर लक्ष्मीच्या पावलाने घरात आली तर तिच्या पतीचा भाग्योदय होतोय.आणि खरंच आहे ते. आणि त्यामुळेच की काय दोन्ही मित्राच्या पत्नी भाग्यलक्ष्मी ठरल्या.च की काय दोन्ही मित्राच्या पत्नी भाग्यलक्ष्मी ठरल्या.

क्रमशः



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.