वारसदार -२
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वारसदार -२ |
" हे तुम्ही एवढे खात्री ने कसे सांगू शकता ?" त्यावर त्या
म्हणाल्या ," मी त्यांची पत्नी आहे, अर्थात माझ्या पेक्षा दुसऱ्या कुणाला त्यांच्या सवयी जास्त माहीत असू शकतील बरं ? पण तरी देखील खरं काय आहे,मी त्यांच्या तोंडून
वदवून घेईन. फक्त माझ्याशी त्यांची भेट करून द्या."
पोलीस तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. इन्स्पेक्टर
विजय त्याना भेटातला त्यांच्या पत्नीला पाठविले जाते. धोंडीराम आपल्या पत्नीला पाहून समजतो की आपल्या
कडून सत्य वदवून घेण्यासाठी आपल्या पत्नीला पोलीस
स्टेशनला घेऊन आलेत. परंतु त्याना हे सांगितले कुणी की
मी माझ्या पत्नी जवळ खोटे बोलू शकत नाही. कदाचित हे
सुमतीबाई चे काम असावे. पण आता काय करणार ?
पोलीस त्यांच्या पत्नीला सोडून तेथून निघून गेले तसे ते
आपल्या पत्नीवर रागवत म्हणाले ," तू कशाला आलीस इथं?" त्यावर त्या एकदम निर्विकार चरहऱ्याने म्हणाल्या, मी
इथं कशाला आलीय हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, परंतु
तुम्ही आता विचारला आहात तर त्याचे उत्तर मी दिल्या शिवाय राहणार नाही. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऐका.
भाऊजी ना कुणी मारलं ?"
" ते मला काय विचारतेस ? मला काय माहीत कुणी
मारले ते ."
" तुम्ही नाही ना मारलं ?"
" मी कशाला मारेन ?"
" नक्की ?"
" मग काय मी खोटं सांगतो."
" ते तुमचा चेहराच सांगतोय. तेव्हा ते तुम्ही सांगायचे गरज नाही." त्याचा चेहरा घामाघूम झाला. तो चाचरत बोलला ," काय सांगतो माझा चेहरा ?"
" हेच की भाऊजीचा खून तुम्ही केला."
" हां ; पण हे तू पोलिसांना सांगू नकोस."
" मी सांगायच्या अगोदरच त्याना कळलं."
" पण कसं ?" तशी त्या मोबाईल दाखवत म्हणाल्या,
" हे बघा असं !"
" तू बायको आहेस का हडळ आहेस ?"
" बायकोच आहे, म्हणून अद्याप इथं उभे आहात. हडळ
असती तर केव्हाच फाडून खाल्लं असतं मी तुम्हाला. आता
मुकाट्याने आपला गुन्हा कबूल करा नि तुरुंगात जा ! नाहीतर उद्याच्या वर्तमानपत्रात माझा फोटो पाहायला विसरू
नका." तसा धोंडीराम वर आकाशात पाहत बोलला ," अरे, देवा माझ्याच नशिबात असं खुळ घालायची काय गरज होती ?" धोंडीराम ची पत्नी सुशिलाबाई बाहेर येऊन म्हणाली," आता मिळाला ना तुम्हाला हवा असलेला पुरावा."
इन्स्पेक्टर विजय बोलला ," सुशिलाबाई तुमचे आभार
कसे मानावे तेच मला कळत नाही." त्यावर सुशिलाबाई
म्हणाल्या ," त्यात आभार मानण्यासारखे असे काही मी मोठे
महान कार्य केलेले नाही.अपराध्याला त्याच्या कर्माची शिक्षा
द्यायला तुम्हाला थोडी मदत केली इतकेच !"
" पण तरी सुध्दा तुमच्या हिंम्मतिची दाद द्यावीच लागेल.
नाहीतर आपल्याच नवऱ्याच्या विरुध्द साक्षी देणे ही काही
सामान्य बाब नव्हे !" इन्स्पेक्टर विजय उद्गारला.
" घनश्याम माझे धाकटे दिर होते.त्यांचे आमच्याशी काही
वैर नव्हते. दुर्बुद्धी तर माझ्या नवऱ्या ला सुचली. स्वतःची प्रॉपर्टी उधळली शेअर्स बाजारात आणि आता भावाच्या प्रॉपर्टी डोळा होता त्यांचा. म्हणून मला ते अजिबात आवडले
नाही. भले आज माझ्या घरात दारिद्र आहे, मुलांना काही काम धंदा नाही. म्हणून काय दुऱ्याची प्रॉपर्टी हडपायला बघायची ! " सुमतीबाई ला तिची फार दया आली ती
म्हणाली ," जाऊबाई ,असं का बोलता ? आम्ही कुणीच
नाही का तुमचे ?"
" तू आहेस गं परंतु तुला कोणत्या तोंडाने म्हणू की
तुझ्या कंपनीत माझ्या मुलांना नोकरी दे म्हणून."
" अगं मग त्यात काय ? वेळ प्रसंगी आपल्या माणसांच्या
उपयोगी नाही पडायचे तर कधी पडायचे. तू उद्या सकाळी
तुझ्या दोन्ही मुलांना आमच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये
पाठवून दे. " असे म्हणून त्या प्रतापराव कडे वळत म्हणाल्या,
" जावई बापू ! उद्या ह्यांची दोन्ही मुलं ऑफिसमध्ये येतील
त्या दोघांना ही आपल्या कंपनीत चांगल्या पोष्ट वर नोकरीला
ठेवा. " खरे तर प्रतापराव ना म्हणायचं होतं की ,सासूबाई
सापांना दूध पाजू नका. त्यांच्या शेपटीवर पाय पडल्यावर
ते डसल्याशिवाय राहणार नाही. परंतु ते उघडपणे असे काहीही बोलू शकले नाही.कारण सारी प्रॉपर्टी तर त्यांचीच
होती. आपलं त्यांच्या शी नाते केवळ त्यांच्या मुलींमुळे
आहे. म्हणून ते काहीच बोलू शकले नाही. फक्त त्यांनी
होकारार्थी मान डोलावली.सुशिलाबाई समजल्या की जावई
बापूना हा प्रस्ताव आवडलेला दिसत नाही. परंतु त्याला
घाबरायचे काही कारण नाही.कारण राणी चा आपल्या वर
खूप भरवसा प्राप्त केला आहे मी ! म्हणून स्वतःच्या नवऱ्या ला तुरुंगात डांबले ते काय उगाचच ! " असे मनात बोलून
उघडपणे फक्त इतकेच म्हणाली , " जावई बापूना आवडलेले
काही दिसत नाही. अर्थात त्यांची संमत्ती नसेल तर राहू द्या."
" छे छे छे ! जावई बापू तसं काहीही म्हणणार नाहीत.
तू गैरसमज करून घेऊ नकोस." असे म्हणून प्रतापराव कडे
पाहत म्हणाल्या ," काय जावई बापू बरोबर ना ?" तेव्हा प्रतापराव गडबडलेच पण लगेच स्वतः ला सावरून ते चटकन उद्गारले ," हो हो मला कशाचा आलाय प्रॉब्लेम ?
प्रॉपर्टी तुमची आहे, तुम्ही कुणालाही देऊ शकता. माझी
काहीच हरकत नाही."
" जाऊबाई ! तुम्ही नका त्यांची चिंता करू ,मी करेन
सर्वकाही ठीक."
" तुझे फार उपकार झालेत बघ माझ्यावर."
" जाऊबाई ! उपकाराची माझ्या जवळ करायची नाही.
मला ते आवडणार नाही."
" ठीक आहे नाही करणार." त्यानंतर त्या हसत हसत पोलीस स्टेशन मधून बाहेर पडल्या.
सुशिलाबाई घरी आल्यावर तिची दोन्ही मुलं तिच्यावर
नाराज झाली. धनराज बोलला ," तुला काय गरज होती
पोलीस स्टेशन ला जाऊन बाबांच्या विरुध्द साक्षी द्यायची !
बाबांनी एकदम पद्दत शीर खून केला होता काकांचा ! पोलिसांकडे काहीच पुरावा नव्हता." त्यावर सुशिलाबाई
त्यांच्यावर रागवत बोलल्या ," तुम्ही बापावाणी डोक्यावर
पडलेत का रे ? "
" असं का म्हणतेस ?"
" मग अजून काय म्हणू ? तुझ्या बापाने दिवसा ढवळ्या
ऑफिसमध्ये जाऊन तुझ्या काकांचा खून केला. साऱ्या
ऑफिस स्टॉपला ठाऊक होते की खून तुझ्या बापानेच केला.
आज जरी पोलिसांकडे पुरावा नसला तरी लवकरच त्यांनी
तो मिळविला असता. आणि समजा पोलिसांना पुरावा नसता
सापडला नि तुझा बाप निर्दोष सुटला असता तरी उपयोग
काय होता त्याचा. तुझ्या बापाचे जे स्वप्न आहे, धाकट्या
भावाची प्रॉपर्टी हडपायची ते फक्त स्वप्नच राहून गेलं असतं.
परंतु मी जे केलं ते किती फायदेमंद आहे ते पहा. भले तुझ्या
बापाला दहा -पंधरा वर्षाची शिक्षा होईल. परंतु तुम्हां दोघांना
त्या कंपनीत शिरायचा रस्ता तर मिळाला."
" म्हणजे ?" धनराज ने न समजून विचारले.
" तुम्हां दोघांची पण त्या कंपनीत नोकरी पक्की
केली."
" नोकरी ! " दोन्ही भावाना ते आवडलं नाही. त्यातील
एकजण बोलला ," आम्ही नोकरी करायची आपल्याच कंपनीत." त्यावर सुशिलाबाई ती कंपनी तुझ्या बापाची नाहीये. तेव्हा त्या नोकर म्हणून काम करायचं अगोदर.
त्या प्रतापराव चा विश्वास संपादन करायचा. आणि योग्य संधी प्राप्त होताच त्याचा ही काटा काढायचा. पण कसा ?
तर काटा ने काटा काढायचा म्हणजे फार दुखत नाही."
" आई , तू फार ग्रेट आहेस ना ?" धंनजय आपली आईची प्रशंसा करत बोलला. तश्या सुशिलाबाई म्हणाल्या,
" अरे, मुंगी होऊन साखर खायची असते. हत्ती बनून लाकडे मोडायची नसतात. समजलं."
" हो. समजलं." धनराज बोलला.
" जावा आता उद्या पासून कामाला लागा. " काहीतरी
आठवलं तसं त्या उद्गारल्या ," आणखीन एक आपल्या काकीचा विश्वास संपादन करण्यासाठी एक संधी आपोआपच
चालून आली आहे, आणि ती संधी म्हणजे उद्या कोर्टात
खटला उभा राहिला की आपल्या बापाच्या विरोधात साक्षी
द्यायची कळलं ."
" अगं पण आई , आम्ही सुध्दा बाबांच्या विरुद्ध साक्षी दिली तर बाबा नाराज नाही का होणार !"
" होउ दे नाराज झाले तर , मी त्यांची समजूत काढीन.
एवढ्यात ते समजून ही गेले असतील की मी त्यांच्याशी अशी
वागले त्या मागचे कारण फार वेगळे असणार !"
" अगं आई, एवढे डावपेच कुठून शिकून आलीस गं ?"
धंनजय ने विचारले. त्यावर सुशिलाबाई उद्गारल्या ," एका
कुशल बिजनेस में ची मुलगी आहे मी ! "
" मग बाबांना का नाही दिलेस त्यातला एखादं दुसरा धडा !" धनराज उद्गारला.
" दिला असता पण तुझा बाप ऐकत नाही ना माझं ! मग
असा फसतो. कुणालाही जीवानिशी ठार मारून काही प्राप्त
होणार आहे का ? उजव्या हाताने खून केला तर डाव्या हाताला माहीत नाही पडलं पाहिजे . अर्थात जो काम दिमाग
से होगा वो ताकद से नहीं होगा , समाझें !"
दुसऱ्या दिवशी दोघेही भाऊ ऑफिसमध्ये गेले असता
प्रतापराव नी त्या दोघांनाही कामावर ठेवून घेतले. सुरुवातीला
ते दोघेही प्रतापरावांच्या मागे मागे फिरायचे.सर सर म्हणून
त्यांचे तोंड दुखत नसे. प्रतापरावाना वाटले की आपले
मेहुणे चांगले सुधरले. पण तसे काही नव्हते. ते फक्त दिखावा
करत होते. त्यात करून कोर्टात खटला उभा राहिला
तेव्हा धोंडीराम च्या विरोधात त्यांच्या पत्नी नेच नाही तर
मुलांनी सुध्दा साक्ष दिली. शेवटी केस चा निकाल लागला.
धोंडीराम ला १४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा