वारसदार -१
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वारसदार -१ |
१
प्रतापराव एक प्रसिध्द उद्योगपती , त्यांच्या पुण्यात
कपड्याच्या चार मिल्स आहेत. एवढे मोठे उद्योगपती असूनही त्यांचे राहणीमान साधेच सामान्य माणसासारखे ! याचे कारण ते गरिबीतून वरती आलेले. त्यांच्या वडिलांचे एक कपड्याचे दुकान होते. प्रतापरावाणी मात्र तेवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी मोठे बनण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात ते यशव्ही सुध्दा झाले. आणि त्यात त्यांच्या पत्नी चा शिंहाचावाटा आहे. ती एका उद्योगपतीची एकुलती एक मुलगी होती परंतु तिचे प्रेम प्रतापराव वर होते. हे जेव्हा तिच्या वडिलांना कळले तेव्हा त्यांनी त्यांच्या लग्नास नकार दिला. परंतु मुलीच्या हट्टापायी त्याना शेवटी माघार घ्यावी लागली. परंतु त्यांनी त्याच्या पुढे एक अट ठेवली. की मी हवे ते तुला साह्य करीन परंतु तू एका कपड्याच्या दुकानाचा व्यापारी बनून न राहता मिल्स चा मालक व्हायला पाहिजेस. त्यासाठी लागेल ती मदत मी करीन. आणि जर त्यात तू यशव्ही नाही झालास तर तुला माझ्या मुलीचा नाद सोडला लागेल."
या गोष्टीस तो लगेच तयार झाला. परंतु सुमित्रा मात्र तयार नव्हती. ती आपल्या बापाला म्हणाली," पप्पा, तुम्ही
ही मुद्दाम अट ठेवली आहे ती मला मान्य नाही." परंतु प्रताप
चे म्हणणे होते की, सुमित्रा तुझा माझ्यावर विश्वास नाही का ?" त्यावर ती म्हणाली ," माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु तू समजतो आहेस तेवढं हे सोपे नाहीये."
" हे जर सोपे असते तर तुझ्या पप्पानी मला करायला
सांगितले असते का ? नाही ना ?"
" पण तू त्यांची अट का मान्य करतो आहेस ? मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ना ? मग त्यांची संमत्ती
असो वा नसो आपल्याला काहीही फरक पडणार नाहीये."
" फरक कसा पडणार नाही म्हणतेस ? अगं आपल्या
आई- वडिलांना दुःखी करून आपण सुखी होऊ शकणार
नाही. तेव्हा त्यांच्या आशिर्वाद आपल्याला मिळायलाच हवा
आहे."
" मला कळतंय की आपल्या आई-वडिलांना दुःखी करून
आपण सुखी नाही होणार. परंतु त्यांनी तुझ्या पुढे ठेवलेली अट तू पूर्ण नाही करू शकलास तर काय होईल याचा विचार
केला का तू ?"
" हो त्याचा ही विचार केला."
" काय केलास विचार तो सांग बरं मला."
" मी जर अपयशी ठरलो तर इथं तुला तोंड दाखवायला
येणार नाही. परंतु दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात बातमी जरूर येईल की एका प्रेमविराने आत्महत्या केली म्हणून."
" तू आत्महत्या केलीस तर मग मी काय करायचं ?"
" ते तू ठरवायचे आहेस. कारण तो तुझा अधिकार आहे."
" वा ! तो माझा अधिकार आणि हा अधिकार कुणाचा
तुझा ? म्हणजे तू शेवटी स्वत: पुरतेच पाहिलेस माझा विचार
केलासच नाही. हेच काय तुझं माझ्यावरचे प्रेम !"
" तसं नाही गं !"
" तसं नाही कसं ?"
" मग तू सांग काय काय करायचं मी ?"
" माझं ऐकशील ?"
" नक्कीच !"
" मग जो काय निर्णय घ्यायचा तो आपण दोघांनी
मिळून घ्यायचा. मग तो आत्महत्या करण्याचा असो वा लग्न
करण्याचा असो ! "
" ओके ! " परंतु ह्या दोघांचे बोलणे तिचे वडील घनश्याम
चोरून ऐकत होते हे ह्या दोघांना ही माहीत नव्हते. त्या दोघांचे प्रेम पाहून त्यांचे हृदय पिघळले. त्यांनी प्रतापराव ला
स्वतःच्या क्रेडिट वर फक्त कर्ज च मिळवून दिले नाही तर
आपली स्वतःची काही विश्वासू माणसे त्याच्या मदतीसाठी
पाठविली. परंतु दिखावा असा केला की त्याना त्यांनी कामावरून काढून टाकले. त्यांना आपल्या कंपनीत कामाला
ठेवून दे असे सुमित्रा ने प्रतापराव ला सांगितले. अर्थात त्यांनीच प्रतापला पार्ट्या मिळवून दिल्या. आणि प्रतापराव ने चांगली मेहनत घेतली. आणि कंपनी उभी करून दाखविली
म्हणून घनश्याम कार्लेकर यांनी आपल्या मुलीचे लग्न प्रतापराव शी करून दिले. त्यानंतर मधुचंद्रासाठी स्वित्झर्लंड ला गेले असता इथे घनश्याम कार्लेकर यांचा खून झाला. तसे
ते दोघेही आपल्या मायदेशी परतले, पण झाले असे
की घनश्याम ना एक भाऊ होता. धोंडीराम त्याने आपली
सारी प्रॉपर्टी शेअर्स मार्केट मध्ये घालवून बसला. आता त्याचा डोळा भावाच्या प्रॉपर्टी वर होता. त्याने एक दोन दा
आपल्या भावा समोर बोलून ही दाखविले. तो म्हणाला, " घनश्याम मी तुझा मोठा भाऊ आहे, परंतु सद्या कंगालपती
आहे,तर माझं असं म्हणणं होतं की तुला एकच मुलगी आहे, आणि मला दोन मुलगे आहेत. तेव्हा तुझ्या चार कंपनी मधील दोन कंपनी माझ्या मुलांच्या नावाने कर." त्यावर घनश्याम म्हणाला , " दादा तुझ्या हिस्साच्या दोन कंपनी
तुला मिळाल्या होत्या. परंतु झटपट पैसे मिळविण्याच्या नादात तू त्या दोन्ही कंपनी घालवून बसलास. आणि मी या
दोन कंपनी माझ्या मेहनतीने मिळविल्या आहेत. त्या तुझ्या
मुलांना मी का बरं देऊ ?" त्यावर तो म्हणाला ," अरे का देऊ
म्हणजे आम्ही तुझे कुणीच नाहीत का ?" त्यावर घनश्याम
बोलला," आपलं रक्ताचे नाते केव्हाच संपले आहे, आहे ते फक्त व्यवहारिक नाते. तेव्हा तुला मी कंपनीच काय पण फुटी
केवढी सुध्दा देणार नाहीये. जा तू इथून." तेव्हा तो मनात
बोलला ," मी इथून जाण्यासाठी नाही आलोय तर तुला
घालविण्यासाठी आलोय. " पिस्तुल काढले नि दोन डोळ्याच्या मध्ये बरोबर निशाणा साधून गोळी झाडली. नि
गोळी बरोबर तेथेच लागली नि घनश्याम कार्लेकर जागच्या जागीच ठार झाले.
पिस्तुल ला सायलेन्सर लावल्या मुले गोळीचा आवाज केबिन च्या बाहेर आला. घनश्याम ठार झाल्याची खात्री पडताच तो केबिन मधून बाहेर पडला निघून गेला.
थोड्या वेळानंतर काही कामा निमित्त एक कर्मचारी सरांच्या
केबिन मध्ये गेला असता रक्ताच्या थारोळ्यात साहेबांना पाहताच तसाच बाहेर ओरडत आला को, घनश्याम सरांचा
खून झाला. लागेच पोलीस स्टेशन ला फोन करून खून
झाल्याची खबर पोलिसांना देण्यात आली. थोड्याच वेळात
तेथे पोलिसांची जीप आली नि घटना स्थळाचा पंचनामा केला
मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठविण्यात आले.
ऑफिसमध्ये सर्व कर्मचाऱ्यां जवळ कसून चौकशी करण्यात
आली. त्यात फक्त एवढे कळले की घनश्याम कार्लेकरना भेटायला फक्त त्यांचा फक्त मोठा भाऊ आला होता. मग त्यांचा तो मोठा भाऊ कोठे राहतो या बद्दल चौकशी केली असता तो राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता पोलिसांना देण्यात आला. पोलीस त्याच्या घरी गेले असता तो घरीच होता ; परंतु साळसूद पणाचा आव आणत बोलला ," तो माझा धाकटा भाऊ होता. मी कशाला मारेन त्याला ?" तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने विचारले ," पण आज तुम्ही त्याना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते की नाही ?" त्यावर धोंडीराम उद्गारला ," आफकोर्स गेलो होतो ; परंतु त्याचा अर्थ कदापि असा होत नाही की मी त्याला मारायला गेलो होतो . ती आमची सदिच्छेची भेट पण तर असू शकते." इन्स्पेक्टर विजय बोलला ," ती भेट कशाची होती याचा आम्ही शोध घेऊच परंतु या क्षणीतरी तुम्हाला आमच्या सोबत यावे लागेल. कारण मरण्यापूर्वी त्याना भेटणारी म्हणजे त्यांच्या केबिनमध्ये जाणारी व्यक्ती मात्र तुम्हीच आहात ,म्हणून संशयी व्यक्ती म्हणून तुम्हाला अटक करण्यात येत आहे." असे म्हणून इन्स्पेक्टर विजय ने त्यांचा हातात बेड्या ठोकून त्याना पोलीस स्टेशन ला आणण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चांगलीच पिटाई केली ; परंतु त्यांनी प्रत्येक वेळी एकच उत्तर दिले की मी माझ्या भावाला मारले नाही. मार खाऊन खाऊन ते शेवटी बेशुद्ध झाले. तेव्हा इन्स्पेक्टर विजय बोलला ," ह्याला शुध्दीवर आल्यानंतर परत मारा ." असे म्हणून ते आपल्या केबिन मध्ये आले. तेव्हा घनश्याम कार्लेकर यांच्या केबिनमध्ये कोण कोण गेले होते ही माहिती करण्यासाठी त्यांच्या ऑफिस चे सी सी टीव्ही कॅमेरा फुटेज आणण्यात आले ; परंतु त्यात धोंडीराम त्यांच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी पासून चे फुटेज गायब होते. अर्थात ते कॅमरा खराब तरी झाले असेल किंवा कुणीतरी जाणूनबुजून ते फुटेज गायब केले असावेत. याचा अर्थ कंपनीतील कुणीतरी व्यक्ती यात सामील असावी असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला. त्यानंतर ऑफिस मधल्या सर्व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली ; परंतु पोलिसांच्या हाती काहीच धागा दोरा लागला नाही. शिवाय घनश्याम कार्लेकर ना मारण्यासाठी जे पिस्तुल वापरण्यात आले ते देखील चोरीचे होते. त्यामुळे ते कुणाचे आहे कळू शकले नाही.
अखेर घनश्याम कार्लेकर यांच्या पत्नी सुमतीबाई यांना
विचारण्यात आले की तुमचा संशय कुणावर आहे ?" तर त्या
म्हणाल्या ," माझा संशय माझ्या दीरावरच आहे, तेच असं
करू शकतात. " त्यावर इन्स्पेक्टर विजय ने विचारले की ,
असं तुम्हाला वाटायचं कारण ?" तेव्हा त्यांनी सांगितले की,
माझे दिर अनेकवेळा माझ्या घरी यापूर्वी आले आहेत आणि
अनेक वेळा त्याना मारण्याची धमकी दिली आहे. पण नंतर
येऊन माफी ही मागितली आहे." हे ऐकून इन्स्पेक्टर विजय
गोंधळात पडले. नि उद्गारले ," व्हॅट्स असं कसं होऊ शकतं ? जो मनुष्य मारण्याची धमकी देतो तो पुन्हा येऊन
माफी कसा मागेल ? काहीतरी गडबड आहे , परंतु काय ?"
त्याना अजून काही प्रश्न विचारले तेव्हा एक उपयुक्त माहिती
मिळाली की , धोंडीराम ची पत्नी जी होती. ती फार चांगल्या
स्वभाची होती. तिला तिच्या पती चे वागणे अजिबात मान्य नव्हते. ती त्याला माफी मागायला भाग पाडायची ! धोंडीराम
बाकी भले कुणाचे ऐकत नसे.परंतु आपल्या पत्नी चे तो जरूर ऐकत असे. आणि ती त्याला माफी मागायला घेऊन
यायची आपल्या धाकट्या दिराच्या घरी !
एवढी उपयुक्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपला
इन्वेस्टीगेशन चा मोर्चा आता धोंडीराम च्या घरी वळविला.
धोंडीराम ची पत्नी सुशिलाबाई याना पोलीस स्टेशन ला
बोलविण्यात आले. त्या जश्या पोलीस स्टेशन ला हजर झाल्या. तश्या इन्स्पेक्टर विजय ने घनश्याम च्या खूना संबंधी
चौकशी केली असता त्या म्हणाल्या ," माझा नवरा इतर सगळं करील पण खून नाही करणार कुणाचा ?"
" हे तुम्ही एवढे खात्री ने कसे सांगू शकता ?" त्यावर त्या
म्हणाल्या ," मी त्यांची पत्नी आहे, अर्थात माझ्या पेक्षा दुसऱ्या कुणाला त्यांच्या सवयी जास्त माहीत असू शकतील बरं ? पण तरी देखील खरं काय आहे,मी त्यांच्या तोंडून
वदवून घेईन. फक्त माझ्याशी त्यांची भेट करून द्या."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा