यह इश्क नहीं आसान ३ (अमर प्रेम )
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
यह इश्क नहीं आसान ३ |
ते लोक निघून पण रुद्र बांधलेल्या अवस्थेत होता.
त्यामुळे त्याला बाळाकडे पण धाऊन जाता आलं नाही. हळूहळू अंधार दाटू लागला होता. कोठेतरी लहान मुलांचा
रडण्याचा आवाज त्याला ऐकू येत होता.तेव्हा त्याच्या
मनात एक विचार आला की ते रडणारे बाळ आपले तर
नसेल ना ? पण क्षणभरच.लगेच दुसऱ्या क्षणी त्याच्या
मनात विचार आला की कसं शक्य असेल ? इतक्या
उंचावरून खाली पडल्यानंतर बाळ वाचण्याची शक्यता तरी आहे का ? मग हे रडंतय ते बाळ कोणाचे असेल बरं ? असेल कोणाचे तरी किंवा आपल्याला तसा भास होत असावा. भास वरून त्याला चटकन आठवलं म्हणजे मनात एक शंका आली ह्या इमारतीत भूत बित तर नसेल ना ? कारण या कंत्राटदार लोकांचा काही नेम नाही. त्यांचे कोणी ऐकलं नाही तर एखाद्या बिगारी माणसाची हत्या करून गाडून पण टाकतात. त्यांचा काही नेम नाही.कारण अश्या घटना बऱ्याच ठिकाणी घडतात. बिल्डर आपली बिल्डिंग बांधून विकून मोकळा होतो नि मग रुम घेणारा मग पस्तावतोय. कारण ज्या माणसाची त्या रुम मध्ये हत्या झालेली असते. त्याचा आत्मा त्याच खोलीत भटकत असतो. आणि मग त्या रुम मध्ये राहायला येणाऱ्या ला
माणसाला तो त्रास देऊ लागतो. पण नंतर करणार काय ?
फ्लॅट तर घेऊन झालेला असतो. आणि नंतर फ्लॅट विकायचा म्हटला तरी तो विकला जात नाही.कारण
आजूबाजूच्या राहणाऱ्या माणसांना माहीत पडतेच की
ह्या फ्लॅट मध्ये आत्म्याचा निवास आहे.मग तो फ्लॅट
घ्यायला कोणीच तयार होत नाही.तसा इथं पण काही
प्रकार नसेल ना ? असेलही कुणास ठाऊक ? छे छे छे ! तसं काही नसेल इथं मी आपला उगाचच घाबरतोय. असे
म्हणून तो आपल्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न
करतो पण ती निष्पळ ठरते. कारण एकदा मनात भीतीने
घर केले ना, मग ती काही केल्या पिच्छा सोडत नाही.
असा विचार मनात सुरू असतानाच अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज बंद होतो. अचानक रडण्याचा
आवाज बंद झाल्याने तो अजूनच घाबरला. आणि मनात
म्हणाला , नक्कीच या बिल्डिंग मध्ये भूत बाधा असणार, पण आता करणार काय ? आपण तर इथं बांधलेले आहोत. आपली इथून सुटका होणार नाही ? कारण
इतक्या रात्री कोण येईल इथं ? पण आता काय करायचं म्हणजे आपली सुटका इथून होणार कशी " त्याने कोणाकडून तरी ऐकलं होतं रामाचा जप केल्याने भूत,
पिच्छाचं आपल्या जवळ येत नाही म्हणे ! हे जसे त्याला
आठवले तसे त्याने राम जप सुरू केला. जप जप करताच
त्याला झोप लागली ते त्याला कळलेच नाही. पटकन सा
डोळा लागला. आणि जेव्हा त्याला जाग आली तेव्हा सकाळ झालेली होती सर्वत्र सूर्याचा प्रकाश पसरला होता. त्याने आपल्या आजूबाजूला मान वळवून पाहिले कोणी माणूस दिसतोय का ? पण एवढ्या सकाळीच कोण येणार तिथं ? दहा वाजले तशी कंत्राटदाराची माणसे इमारतीचे काम करण्यासाठी तेथे आली तेव्हा कोणाचे तरी वर लक्ष गेले तसा तो मोठ्या ने ओरडून म्हणाला , ते बघा कोणाचेतरी बाळ जाळ्यात अडकलेले आहे." तेव्हा सर्वांचे लक्ष वरती गेले. तसे ते आपसात कुजबुजू लागले की परंतु हे बाळ कोणाचे आहे ? आणि ते इथं कसं आले ?" तेव्हा मुकादम ने विचारले ," आपल्या कामगारांपैकी कोणाचे आहे का ते बाळ ?" प्रत्येक जण एकमेकांकडे पाहू लागले. शेवटी महिला कामगारांना विचारले," तेही नाही म्हणाल्या. तसा मुकादम आपल्या कामगारांना म्हणाला की वरती जा नि त्या बाळाला अलगद काढून घ्या. तसे काही कामगार वर चढले नि त्या बाळाला अलगद काढले. आणि काही कामगार गच्चीवर जेव्हा गेले तेव्हा त्यांना बांधलेल्या अवस्थेत रुद्र दिसला. तेव्हा त्यांनी ती गोष्ट मुकादमला सांगितली. तसा मुकादम गच्चीर गेला त्याला त्यांनी विचारले ," तू कोण आहेस ? आणि इथं तुला कोणी
बांधून ठेवले ?" तेव्हा रुद्र ने घडलेली घटना सविस्तर त्यांना सांगितली. तसा तो मुकादम म्हणाला," म्हणजे ते
बाळ तुझं आहे तर !"
" हो माझंच आहे ते बाळ ! कुठं आहे बाळ ? आणि
त्याला काही झालं तर नाही ना ?"
" देव तारी त्याला कोण मारी ! माणसाने किती जरी
प्रयत्न केला तरी देवाच्या इच्छे पुढे त्याचे काहीही चालणार नाही." असे म्हणून त्याने त्या बाळास आणायला
सांगितले. त्याचा एक कामगार त्या बाळाला घेऊन आला.
मुकादम ने ते आपल्या हातात घेतले नि रुद्र कडे देत म्हणाला," हे घे तुझं बाळ." रुद्राने आपले बाळ घेतले नि पटापट त्याचे मुके घेतले. त्यांचे आभार मानून तेथून चालता झाला. प्रथम राहत्या घरी गेला नि मालकाला आपण खोली खाली करत असल्याचे सांगितले. तेव्हा मालकाने विचारले की असं काय झालं ? खोली का खाली करतो आहेस आणि तू एकटाच कसा आलास इस्पितळातुन ? तुझी बायको कुठं आहे ?" रुद्राला चट्कन काय उत्तर द्यावे ते सुचतच नाही पण काहीतरी कारण
सांगावेच लागणार म्हणून किंचित विचार करून तो जे
सुचलं ते बोलून गेला की , बायको माहेरी गेली म्हणून.
परंतु पुढे काय बोलावे ते न सुचल्याने गप्प झाला. पण मालक कोठे गप्प बसल्या मधला होता त्याने न समजून विचारले ," माहेरी गेली पण अशी कशी लहान बाळाला टाकून माहेरी गेली ती " किंचित विचारुन त्यांनी विचारले की तुम्हां दोघांचे भांडण वगैरे तर नव्हते ना झालं ?" रुद्र पुरता गोंधळला त्यांनी लागोपाठ इतके सारे प्रश्न विचारले होते की रुद्राला एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. रुद्र विचार करू लागला की काय उत्तर देऊ ? कारण खरे कारण तो सांगू शकत नव्हता. म्हणून त्याने मालकांनी विचारलेल्या प्रश्नाचे सूत्र पकडून म्हणाला ," हो आम्हां दोघांचे भाडण झाले नि नीलिमा रागाने निघून गेली माहेराला."
" परंतु भांडण्याचे करण्याचे कारण काय ?"
" भांडण्याला कारण लागते होय. तुम्हांला तर माहीतच
आहे, बायकांना जरा काही बोलले तर लगेच राग येतो."
" ते ठीक आहे रे, पण छोट्याश्या बाळाला टाकून कशी
जाऊ शकते ती ? म्हणजे कोणतीही स्त्री आपल्या बाळाला टाकून जाऊच शकणार नाही. हे प्रकरण काही
वेगळंच दिसतंय." मालक उद्गारला. रुद्राला कळत नव्हतं
की मालकाला पटेल असं कोणतं कारण सांगावं ? असा
मनात विचार करत असतानाच मालक म्हणाला," बरं ते
जाऊ दे, नवऱ्या बायकोच्या भांडणात मी पडू इच्छित
नाही. मला फक्त एक कधी करतोस खोली खाली."
" आजच."
" मग इथून कोठे जाणार ?"
" आपल्या घरी !"
" म्हणजे बायकोची समजूत काढायला जाणार नाहीस
तर !"
" जाणार ना, ती आणि मी एकाच गावचे आहोत आम्ही!"
" असं का ? तरीच म्हटलं असं कसं ?"
" काय गावाचं नाव म्हणाला ?"
" मी कुठं गावाचं सांगितले."
" नाही सांगितले ना , मग आता सांग."
" सोनारपडा !"
" कुठं आलं हे गाव ?"
" डोंबिवलीला."
" ठीक आहे, सर्व तुझं सामान खाली कर, मग चालू
महिन्याचे भाडे कापून बाकीची रख्खम देऊन टाकतो तुला. तसे नियमानुसार अकरा महिन्याचे भाडे कापायला
पाहिजे. पण जाऊ दे, मला तुझी ही अवस्था पाहूनच
मला कसंतरी वाटतंय. खरं सांगायचं म्हणजे तुझ्या बायकोनं असं नाही करायला हवं होतं. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला टाकून जी आई माहेरी जाते तिला
काय म्हणावे ? " रुद्राला फार राग येत होता मालकाचा.
पण करणार काय सांगणार होता तो चाळीतील सर्व लोकांना. तसे सर्वाना माहीत होते म्हणा. त्या दोघांनी
पळून लग्न केलं आहे ते. पण अचानक दोघांमध्ये वाद
होईल नि नीलिमा आपल्या छोट्याश्या बाळाला सोडून
जाईल असं कोणालाही वाटले नव्हते. एकदा रुद्राच्या
मनात आले होते की खरे कारण सांगून टाकावे लोकांना.
पण का कुणास ठाऊक खरे सांगण्यास त्याचे मन रोखत
होते. इतक्यात त्याच्या धाकट्या भावाचा अर्थात प्रेम चा
फोन रुद्र ने लगेच रिसिव्ह केला.
" हॅलो sss "
" अरे दादा, हे असं कसं झालं ?"
" कदाचित त्याने किंवा त्याच्या बापाने तुम्हां दोघांचे
बोलणे ऐकले असावे."
" कसं शक्य आहे, आम्ही तर पूर्ण खबरदारी घेतली
होती."
" मग काय त्याला आपोआपच कळले ?"
" नाही.तू म्हणतोस ते पण बरोबरच आहे म्हणा !
बरं ते जाऊ दे , तू पुढे काय करायचं विचार केला आहेस ?"
" पुढे काय करायचे ते नंतर पाहू ! अगोदर मी घरी
माझ्या बाळाला घेऊन."
" हां हां घेऊन ये मग पाहू काय करायचं ते." रुद्राने फोन कट केला नि कामाला लागला. तोपर्यंत त्याने बाळाला शेजाऱ्याकडे सांभाळायला दिला होता. त्याच्या
शेजारची माणसे स्वभावाने चांगली होती.त्यांनी त्या बाळा
मॉलिश वगैरे करून त्याला आंगोळ घातली.तेव्हा शेजारच्या राधाबाई म्हणाल्या," नीलिमा ने असं नाही
करायला पाहिजे होते." तेव्हा राधाबाई ची मुलगी विमल
म्हणाली ," आई, मला नाही वाटत की नीलिमा वहिनी ने
असं काही केलं असेल ?" त्यावर राधाबाई उद्गारला," मग
काय रुद्र खोटं बोलतोय ?"
" माहीत नाही , पण काहीतरी गडबड आहे, हे निश्चित
अशी एकाएकी टोकाचा निर्णय घेणारी वाटत नाही नीलिमा
वहिनी !"
" हुं ss तुझं म्हणणं देखील बरोबर आहे.पण मला
अजून हे कळत नाही की दोघांमध्ये असं काय घडलं असेल की ज्यामुळे नीलिमा वहिनी आपल्या बाळाला
पण टाकून गेली. कारण ती दोघे इथं राहायला आल्या
पासून एकदा सुद्धा त्या दोघांना भांडताना पाहिलं नाही मी ! "
" म्हणूनच तर शंका येते कारण भांडण न करणारी आणि कमी बोलणारी माणसं फार खतरनाक असतात
कधी काय करतील हे सांगता येणार नाही."
" खरंय तुझं. ह्या छोट्याश्या बाळाची पण तिला दया
आली नाही बघ."
" जाऊ दे, आपल्याला काय करायचं म्हणा. वाईट
फक्त एकाच गोष्टीचे वाटते की इतक्या छोट्याश्या बाळाचा
कसा रुद्र सांभाळ करणार ना ?"
खोली खाली करून द्यायला असा कितीसा वेळ लागणार होता. नवीन संसार थाटला होता दोघांनी
आवश्यक तेवढी भांडी खरेदी केली होती.कपडे ठेवायला
एक अलमारी घेतली होती.बस्स ! रूद्र ने आपले नि निलोफर चे कपडे एका बॅगेत भरले होते.बाकी अलमारी
नि भांडी शेजारच्या राधाबाई ना देऊन टाकली. तेव्हा
राधाबाई ने रुद्रला विचारले ," खरं तर हा तुम्हां नवरा-बायकोचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला त्या बद्दल विचारायचा
अधिकार नाही, परंतु इतके दिवस तुम्ही आमचे शेजारी
होता, म्हणून तुमच्या दोघा बद्दल आमच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला होता, म्हणून विचारते की , तुम्हां
दोघांमध्ये असे काय घडलं ते तुम्ही दोघांनी एकदम टोकाची भूमिका घेतली.म्हणजे मला असं म्हणायचंय की
प्रत्येक घरात नवरा-बायकोची भाडणं होतात, म्हणून कोणी घर सोडून जात नाही."
" काकू , आम्हा दोघांत काहीच भांडण वगैरे झालेलं
नाहीये."
" मग नीलिमा का घर सोडून गेली. आणि ती पण
आपल्या तान्ह्या मुलाला टाकून."
" ती आपल्या बाळाला नि मला स्वत: सोडून गेली
नाही तर जबरदस्तीने तिला नेण्यात आलं."
" कोणी नेलं तिला ?"
" तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं. ?" असे रुद्राने बोलताच
त्या फार गोंधळून गेल्या." त्यांनी नीट समजून घेण्यासाठी
पुन्हा तोच प्रश्न केला की, काय म्हणालास तू मला कळलं
नाही." रुद्राच्या लक्षात हो गोष्ट आली तसा तो म्हणाला,"
" सॉरी ! माझ्याकडून सांगण्यास थोडीशी चूक झाली
आता तुम्हांला पहिल्या पासून सविस्तर सांगतो." असे
म्हणून रुद्राने आपली नि तिची भेट कशी झाली तिथपासून
कथा सांगण्यास सुरुवात केली. झाले असे की मी आणि
नीलिमा म्हणजेच निलोफर एकाच कॉलेजमध्ये शिकत
होतो.
साहजिकच आम्हा दोघांची अगोदर मैत्री झाली नि लवकरच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. आम्ही दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागलो होतो.निलोफरच्या आई-वडिलांनी सुद्धा प्रेम- विवाह केला होता , म्हणून त्यांचा आमच्या दोघांच्या प्रेमाला विरोध नव्हता. कारण निलोफर ची आई साऊथ ची होती तर निलोफरच वडील महाराष्ट्रीन होते. परंतु इब्राहिम म्हणजे निलोफर चे वडील जफर खान पक्के कट्टरपंथी होते. शिवाय त्यांचा दुसरा मुलगा अनवर त्यांच्या फार मर्जीतला होता. म्हणजे
त्याना असं वाटायचं की अनवर आपल्या आज्ञेच्या बाहेर
जात नाही. कारण त्याने त्यांच्या पसंतीच्या मुलीशी निकाह
केला. तिचं नाव होतं शबाना आणि त्या दोघांना एक मुलगा सलीम आणि सलीम चा डोळा होता निलोफर वर तशी निलोफर त्याची चुलत बहीण परंतु मुस्लिम धर्मात सख्खी बहीण सोडून सावत्र बहीण सुध्दा चालते. त्यामुळे ती लहान असल्यापासूनच अनवर ने ठरवून टाकलं होतं की निलोफर चे लग्न होईल तर आपल्या सलीमशीच.
कारण इतकेच होते की निलोफर तिच्या आई-वडिलांची
एकुलती एक मुलगी अर्थात तिच्या आई-वडिलांच्या
मृत्यूनंतर ही त्यांची सारी प्रॉपर्टी निलोफरलाच अर्थात तिच्या होणाऱ्या नवऱ्याला. म्हणून निलोफर चे लग्न
आपल्या मुलाशीच लावून देऊ इच्छित होता. परंतु तिचे
प्रेम माझ्यावर असल्याचे कळल्यावर त्यांच्या तळ पायाची
आग मस्तकाला भिडली. त्यात करून मी हिंदू म्हटल्यावर
अजून आगीत तेल ओतल्या सारखे झाले.
एके दिवशी सलीम ने त्या दोघांना गार्डन मध्ये एकत्र
बसलेले पाहिले. तशी त्याच्या तळ पायाची आग मस्तकाला भिडली.तो तसाच त्याच्या अंगावर चाल करून गेला नि सरळ रुद्राच्या शर्टाची कॉलर त्याने पकडली नि म्हणाला, " उठ हरामखोर, तुझी हिंमत कशी झाली माझ्या होणाऱ्या बायको सोबत टाईमपास करण्याची !" तशी निलोफर म्हणाली ," सलीम अगोदर त्याच्या शर्टाची कॉलर सोड."
" नाही सोडणार."
" सोड म्हणते ना ?"
" नाही सोडणार , काय करशील ? " रुद्राच्या शर्टाची
कॉलर न सोडताच तो म्हणाला. तशी ती संतापाने बोलली,
" काय करीन ते पाहायचंय का तुला ?" असे म्हणून क्षणाचा ही विलंब न करता सटकन त्याच्या कानाखाली खेचली. तशी त्याने त्याची कॉलर सोडली नि आपला गाल चोळत म्हणाला," निलू हे तू चांगले केले नाहीस. एका हिंदू मुलासाठी तू माझ्यावर हात टाकलास ? आता तू घरीच ये
बघ मी तुझी कशी लावतो ती वाट " असे म्हणून सलीम तेथून चालता झाला. त्यावर रुद्र ने विचारले ," हा तुझा चुलत भाऊ ना ?"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा