Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

काळपुरुष - २

काळपुरुष - २
काळपुरुष - २


 

       इन्स्पेक्टर विजय विचारच करत होते एवढ्यात फोन ची
बेल वाजली. विजयने लगेच रिसिव्हर उचलून कानाला लावत हॅलो म्हटले , तेव्हा पलीकडून स्वातीच्या आईचा आवाज आला. त्यांनी आपली मुलगी सहीसलामत घरी परतल्याची फोनवरून माहिती दिली. तक्रार मागे घेण्यासाठी त्यानी फोन केला होता. परंतु त्यांनी दिलेली माहिती मात्र कोड्यात टाकणारी होती. इन्स्पेक्टर विजय ने त्याना त्यांच्या
मुली सोबत पोलीस स्टेशनला यायला सांगितले. आणि थोड्याच वेळात स्वाती नि तिची आई पोलीस स्टेशनला पोहोचले. तेव्हा इन्स्पेक्टर विचारले की, तुमच्या सोबत नेमके
काय घडले ते सविस्तर सांगाल का ? " त्यावर स्वाती म्हणाली," मी बस स्थानक वर बस येण्याची वाट पाहत होते. एवढ्यात तेथे एक कार येऊन उभी राहिली. आणि  कार मध्ये बसलेल्या  व्यक्ति ने पुढील दरवाजाची काच खाली  करून माझ्या कडे पहात म्हटले ," हॅलो स्वाती कशी आहेस तू  ?" मी  त्याच्याकडे पाहिले नि त्याला लगेच ओळखले. तो प्रशांत होता. माझ्या सोबत कॉलेज मध्ये शिकत होता.मी लगेच हसून उत्तर दिले, फाईन ! तू कसा आहेस ?
     " मी कसा दिसतो तुला ?"
     " हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही झाले."
     " ओके ओके ! आय एम फाईन ! आता तुझं सांग. म्हणजे तू कुठं निघालीस ?"
      " मी ऑफिस मध्ये  चालली आहे, त्यामुळे बस ची वाट पाहतेय."
      " बैस गाडीत मी नेऊन सोडतो तुला."
      " नको रे,मी जाईन बस ने."
      " बस कधी येणार ?  कुणास ठाऊक ?"
      " आज उशीरच झाला जरा."
      " म्हणूनच सांगतोय बस गाडीत नेऊन सोडतो तुला."
      ना हो ना हो करता शेवटी बसली त्याच्या मोटार मध्ये
तशी त्याने मोटार स्टार्ट केली नि तिच्याकडे पाहत बोलला,
किती पगार मिळतो  तुला ?"
      " फार नाही पण दहा -बारा हजार पर्यंत आहे."
      " बस्स ! दहा बारा हजारात भागतं तुझं ?"
      " काय करणार भागवते  कसेतरी ! "
      " मी सांगेन तेथे काम करशील ? "
      " कुठं ? "
     " आहे एक कंपनी ."
      ° पगार किती मिळेल."
      " पंचवीस ते तिस हजार रुपयांपर्यंत सहज मिळेल.?"
      " काम काय आहे ?"
     " अगं बाहेर गावचे लोक येताना आपल्या देशात त्या लोकांचे गळ्यात हार घालून स्वागत करायचे. बस्स !"
       " पण मी डॉक्युमेन्ट काहीच आणले नाहीत."
       " त्याची काही आवश्यकता नाही, म्हणजे उद्या दिले तरी
चालतील. आज फक्त तुझी त्यांच्याशी ओळख करून देतो."
       " कुठं आहे ती कंपनी ?"
      " इथं जवळच आहे."
      " ठीक आहे,करेन ना ."
      " मग आता येतेस का ?"
      " आता लगेच ?"
      " हो शुभ कामास वेळ कशाला ?"
      " अरे,पण मी कंपनीत सुट्टी नाही सांगितली."
      " मग आता सांग ना ?" मला त्याचे हे म्हणणे पटले नि मी कंपनीत फोन केला ;  पण  फोन लागत लागत नव्हता. कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असा मॅसेज येत होता. मग मी विचार केला की थोड्यावेळाने पुन्हा फोन करू. असा विचार
करून मी त्याला म्हणाली ," प्रशांत एक विचारू का तुला ?"
        "अवश्य !" माझ्याकडे न पाहताच तो म्हणाला.
मी त्याला म्हटले," तुझ्याकडे एवढी महागडी गाडी कुठून आली ? नाही म्हणजे  , तू कॉलेज ला जेव्हा यायचास तेव्हा सायकल वरून तरी यायचास किंवा  रंगरावच्या मोटारी मधून तरी यायचास ?  म्हणून विचारते हो ? लॉटरी वगैरे लागली की तुला ?"
     " हो लॉटरीच लागली  अस समज."
     " म्हणजे ?"
     " अगं मी आयात  निर्यात चा बिझनेस करतो "!
     " रिअली ?"
     " तुझा विश्वास   नाही ना बसत  ? पण हे खरं आहे."
     " काय आयात करयोस नि काय निर्यात ...?"
     " काहीही ! जे आपल्या कडे नसते ते बाहेरून मागवायचे
आणि जे आपल्या कडे विपुल प्रमाणात ते बाहेरच्या देशात
पाठवायचं."
     " छान. बाकी रंगराव ची संगत सोडलीस की नाही ?"
     " ती कधीच सुटली. म्हणजे जसे कॉलेज सुटले तशी त्याची संगत पण सुटली."
     " फार छान केलेस, रंगराव ची संगत सोडलीस ती." तेवढ्यात मोटार एका गल्लीत शिरली. तसे स्वाती ने त्याला विचारले ," अरे ,इथं कुठं आणलेस तू मला ?"
      " अगं इथंच ऑफिस आहे त्यांचे ?"
      " इथं ? पण ही तर बदनाम वस्ती वाटतंय. "
      " अगं ही मुबंई आहे, आणि प्रतिष्ठित माणसं इथंच तर
सापडतात. " लगेच विषय बदलून पुढे बोलला ," म्हणजे मुबंईत जागेचा अभाव ना,मग काय मिळेल तिकडे जागा घेतात शेठ लोक."
     " तरी पण मला वाटतं इथं नकोच यायला हवं होतं आपण."
     " अग रोज थोडी यायचं आहे,आजच्या दिवस."
     त्याने मोटार उभी केली नि खाली उतरला. तशी मी ही खाली उतरली. नि त्याच्या मागोमाग चालू लागली. तो
एका आलिशान फ्लॅट मध्ये घेऊन गेला.  तिला केबिन च्या बाहेर बसवून तो केबिनमध्ये शिरला. तेथे बाबर नावाचा मनुष्य बसला होता. व्हील चेअर बसून सी. सी. कॉमेरा मध्ये
पाहून  मग त्याच्याकडे पाहत म्हणाला ," आज
बहुत खूबसुरत माल लाया रे,कहाँ से उठाकर लाया ?"
     " तुम आम खाओ ना पेड़ क्यों गिन रहे हो ?"
     " ठीक है ठीक है उसकी कीमत बोल."
     " पचास हजार."
     "मंजूर है , यह लो." असे म्हणून त्याने मेजचा खण उघडला नि त्यातून पन्नास हजार रुपयांच्या  नोटांचे बंडल
काढून त्याच्या समोर फेकत म्हणाला ," लड़की को अंदर भेज दो." त्याने होकारार्थी मान डोलविली नि केबिन च्या बाहेर पडला. नि स्वाती जवळ येत म्हणाला," तुला बॉस बोलवतोय. ती उठून केबिन जवळ गेली नि  नाँक  करून
मे आय कमिंग सर !"  तसा बोलला, " येस कम इन."
     तिने जसा आंत प्रवेश केला तसा तो म्हणाला ," प्लिज सीट डाऊन." बसली. तास तो म्हणाला ,"  काय काम आहे,ते
माहीत आहे ना ?"
      " जे बाहेरच्या देशतून गेस्ट येतील त्यांचे फक्त स्वागत
करायचे ना ?"
     " येस. आणि पगार ची काय अपेक्षा ?"
     " पंचवीस तीस हजार तरी मिळायला पाहिजे ."
     " पस्तीस हजार देऊ , चालेल."
     " थँक्यू सर !"
     "  ११ नंबर के रुम   जाकर बैठ जाओ ! " ती केबिन मधून बाहेर पडली नि ११ च्या रुम मध्ये प्रवेश केला मात्र तिने रुम मध्ये समोरील दृश्य पाहून ती समजून गेली की
आपली फसवणूक झाली आहे, तशी ती रागाने मागे वळली
ती बाबरच्या केबीन मध्ये जाऊन म्हणाली ," सर,मला हे काम
नाही करायचे." त्यावर बाबर म्हणाला," हे तू इथं येण्यापूर्वी
ठरवायला हवं होतंस ना, आता तुझी इथून सुटका नाहीये."
     "  सर मला माहित नव्हते. की इथं शरीर विकायचा धंदा होतो."
     " परंतु आता माहीत पडलं ना ? मग कर ना काय अवघड आहे त्यात ?"
      " मी वेश्या नाहीये. "
      " वेश्या अगोदर कोणीच नसते, नंतर होते इथं आल्यावर."
       " पण मला नाही व्हायचे आहे वेश्या."
       " ये तुला काहीतरी दाखवितो असे म्हणून तो तिला गच्चीवर घेऊन गेला नि खालून जाणाऱ्या रस्त्याकडे बोट
करून म्हणाला," हा बघ वनवे रस्ता आहे, इथे येण्याचा
मार्ग तर आहे, परंतु वापस जायचा नाही. इथून गेलं तर तुझं
मृत शरीरच जाईल. जिवंत नाही. म्हणूंन सांगतोय जवानी आहे ,तोपर्यंत खूप एन्जॉय कर नि पैसे पण घे. आहे की नाही डबल मजा." तशी ती चिडली नि म्हणाली ," आग लागू दे तुझ्या त्या पैशाना."  असे म्हणून ती तेथून पळण्याचा प्रयत्न करते पण तो तिला पकडून त्या खोलीत बंद करतो. आणि दरवाजा बंद करून घेतो. स्वातीला काय करावे ते सुचत नाही. ती खिडकी उघडून पाहते तर पण खूप उंचावर तो फ्लॅट असतो. खाली उतरण्याचा प्रयत्न केला तर पाय घसरून खाली पडण्याची शक्यता अधिक होती , अश्या वेळी
काय करावं   ते सुचत नाही. बेडवर उपडी पडून स्फुंदत स्फुंदत रडू लागली. आणि स्वतःलाच दोष देऊ लागली की मी का ऐकले प्रशांतचे ? तेवढ्यात दरवाजा चा आवाज आला तशी ती सावध झाली नि कुठे लपायला जागा आहे का ती पाहू लागली ;परंतु छोट्याशा रुम मध्ये लपायला जागा कुठे असणार ?तेवढ्यात तिची नजर बाथरूम कडे गेली तशी पळत बाथरूम मध्ये शिरली नि बाथरूम चा दरवाजा बंद करून घेतला.
     तेवढ्यात बाहेरची व्यक्ती आंत शिरली . परंतु त्या व्यक्तिला  आंत मध्ये कोणीच नाही हे त्याला जाणवले. क्षणभर त्याला वाटले की पोरगी पळाली की काय ? अशी मनात शंका आली. पण क्षणजभरच .लगेच
दुसऱ्या क्षणी  त्याला जाणवले की येतून पळून जाण्याचा मार्ग अजिबात नाही. मग गेली कुठे ? तेवढ्यात त्याची नजर बाथरूम कडे गेली तेव्हा त्याच्या द्यानात आले  , तसा त्याने बाथरूमचा दरवाजा लोटून पाहिला. तसा तो समजला की ती आंत आहे, त्याने मोठ्या ने ओरडून म्हटले ," स्वाती बाहेर ये लपण्याचा काही फायदा होणार नाही. पण तरी देखील ती बाहेर येत नाही. तशी त्याने दरवाजावर धडक मारायला सुरुवात केली. लागली. तशी  ती समजली की आता आपण काही यातून  वाचत नाही. या भीतीनेच ती मूर्च्छित झाली.  थोड्याच वेळात बाथरूम चा दरवाजा  तोडला . त्यानंतर काय झाले ते माहीत नाही. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा घरात असल्याचे जाणवले. तेथून मी माझ्या घरी कशी आली त्याबद्दल मला काहीच माहीत नाही.
      " असं कसं होईल ? तु आपोआप घरी कशी पोहोचशील ? कोणी आणलं तुला ?"

      तेवढ्यात एक मोटार पोलीस स्टेशन  समोर थांबली नि त्या मोटोरीतून  एक मृतदेह बाहेर फेकला गेला. नि मोटार पुढे निघाली. त्या मोटारीचा पोलिसांनी पाठलाग केला.
आणि बाईक मोटारीचा पुढे नेऊन उभी केली नि मागे वळून
पाहिले तर त्या मोटारी मध्ये चालक कोणीच नव्हता. मग
मोटार चालत कशी होती ?  ते काही कळले नाही. शेवटी कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनला आला नि घडलेली हकीगत इन्स्पेक्टर विजयला सांगितली . तेव्हा  विजय बोलला ," असं कसं होईल ? मोटार चालवत कोण होता ?"
    " बरं तो मृतदेह कोणाचा आहे ? ओळख पटते काय बघा." तेवढ्यात कॉन्स्टेबल अजय बोलला ," त्याच्या पेहराव वरून तो अरब वाटतोय." अरब म्हटल्या बरोबर त्या अरबाचा
चेहरा स्वातीच्या डोळ्या समोर आला. जो तिने दरवाजाच्या बारीक बिळातून पाहिला होता. ती पट्कन उठून बाहेर आली
तर तो मृतदेह त्या अरबाचाच होता. तिने तो ओळखला नि
इन्स्पेक्टर विजय ला सांगितले की ,हा साहेब  हाच तो अरब."
     " मग ह्याला कोणी मारलं ?"
     " माहीत नाही का तूच त्याला मारून मग घरी पळालीस ?"
     " खरं तेच सांगतेय साहेब,मी नाही मारले त्याला."
     " प्रत्येक खुनी असंच म्हणतोय. कॉन्स्टेबल अजय  टाक
हिला आंत . " असे म्हणता क्षनिच फोन ची बेल वाजू लागली. तसा.इन्स्पेक्टर विजय ने रिसिव्हर उचलून कानाला लावत हॅलो म्हटलं. तसा पलीकडून एक आवाज आला की, इन्स्पेक्टर, ती मुलगी खरं बोलत आहे, तिने नाही मारले त्याला."
    " मग कोणी मारले ?"
    " मी मारले त्याला."
    " तू कोण ? नाव आहे की नाही तुला."
    " काळपुरुष."
    " कोण काळपुरुष ?"
    " ते मला देखील माहीत नाही."
    " तू काय मला मूर्ख समजतोयस काय रे ?"
     " ते समजायला कशाला पाहिजे ,दिसतंय."
    " यु ब्लडी रास्कल समोर तर ये मग दाखवतो तुला."
    " ये लो मैं आ गया ।" एकदम समोरून आवाज आला.
पण कुणीच दिसत नाही. ते पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीची चिन्हे उमटली. इन्स्पेक्टर विजयची पण पाचार धारण बसली. तरी पण भीतभी च  म्हणालो," कोण आहेस
तू ?" तसा आवाज ऊमटला ," तुम भुलक्कड़ हो क्या ? अभी
तो कुछ देर पहले कहा था  मैने । कोई बात नहीं  फिर बता रहा हूं अब ,याद रखना,मेरा नाम कालपुरूष है ।"
  " लेकिन तुम हो कौन ?"
"  यही तो पता नही. पता चलतेही आकर बताऊंगा ! तब तक इंतजार करो ।" असे बोलून आवाज बंद झाला.

क्रमशः

 

    



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..