Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुलांगार -२

कुलांगार -२
कुलांगार -२


    कुमुदचे नाव बदलून सुमती ठेवण्यात आले. दोन्ही बहिणी
एकदम खेळीमेळीने राहत होत्या. कुमुद आपल्या नवऱ्याच्या
जीवनात आल्यानंतर कल्याणी ने आपली झोपण्याची
खोली बदलली. परंतु दयानंद एक दिवस आड करून तिच्याही खोलीत येत असत. तिने त्याना आपल्या खोलीत
येण्यास मनाई केली. म्हणाली ," तुम्ही आता माझ्या शयनगृहात येत जाऊ नका."
    "  का ? आता मी तुझा नवरा नाही राहिलो ?"
    " असं म्हटलं का मी ?"
    " तुझ्या खोलीत यायचं नाही याचा अर्थ काय होतो ,मला सांग बरं."
     " तुमचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे,परंतु माझ्या पेक्षा ही कुमुद चा तुमच्यावर नि तुमचा तिच्यावर जास्त अधिकार
आहे, शिवाय तुम्ही जर असे माझ्या खोलीत येत राहिलात तर ,तिला काय वाट्टेल बरं ? तिचा विश्वासघात केल्या सारखा
नाही होणार का ?"
    " तुला माहितेय मला इथं कुणी पाठविले ?"
    " कुणी पाठविले ?"
    " सुमती ने ."
    " काय सांगता ?"
    " खरं तेच."
    " कुमुद ने पाठविले तुम्हाला ?"
    " हो. "
    " तिला समजवायला पाहिजे की हे योग्य नाहीये."
     " तुला काय वाटतं मी नाही समजाविले असेल तिला ?"
    " तुम्ही समजविलात तरी ती असं म्हणाली."
    " हो !"
    " मी उद्या समजविते तिला."
    " ठीक आहे,जशी तुझी मर्जी !" असे म्हणून ती त्याच्या खुशीत शिरली. तेव्हा तिने तिला आपल्या मिठीत घेतले.

     दुसऱ्या दिवशी तिने कुमुदला समजाविले की आता त्यांच्यावर पूर्ण तुझा अधिकार आहे, तेव्हा तू त्याना या पुढे माझ्या खोलीत पाठवू नकोस." त्यावर ती म्हणाली," नाही
ताई ! हे होणार नाही. ते आपल्या दोघींचेही पती आहेत. अर्थात आपल्या दोघींचाही त्यांच्यावर तेवढाच अधिकार राहील."
     " अंग पण ...?
    " ताई , एक आंबा दोघी मिळून खाऊ शकत नाही का ?"
    " ठीक आहे,तुझी जर तशीच इच्छा आहे,तर माझं काही
म्हणणे नाही."
     " अंग ताई ,पूर्वीच्या काळी एका राज्याच्या किती राण्या
असायच्या राजा सर्व राण्यांना सारखं प्रेम द्यायचा की नाही ?
त्या  भांडत होत्या का ? नाही ना ? मग आपण पण त्यांच्या
सारख्या राहू या ना ?"
      " बरं, बाई ! तू म्हणशील तसं होऊ दे." दयानंद दोन्ही
पत्नींना सारखेच प्रेम देऊ लागला. त्या दोघांनी कधी तक्रार केली नाही. हे पाहून दयानंद ना वाटायचे की आपण फार
नशीबवान आहोत. आपल्याला इतक्या सुंदर विचारांच्या
पत्नी मिळाल्या. परंतु दैवाने त्यांच्या नशिबात संतान सुख
लिहिलंय की नाही कुणास ठाऊक ? दुसरीच्या लग्नाला दोन
वर्षे व्हायला आलीत तरी तिच्या पोटी संतान जन्मले नाही.
आता तर दयानंद ची खात्रीच पटली की आपल्या नशिबी
मूल नाही. तेव्हा अनेक लोकांनी सल्ला दिला की डॉक्टर
कडून वैधानिक तपासणी करून घ्या. त्या दोघी मध्ये दोष
आहे का तुमच्यात दोष आहे ? " दयानंद ला त्यांचे म्हणणे
पटले. त्यांनी प्रथम त्या दोघींची वैद्यकीय तपासणी करून
घेतली. त्या दोघी मध्ये ही दोष आढळला नाही. त्यावरून
त्यांनी असा समज करून घेतला की आपल्यात दोष आहे,
परंतु कल्याणीबाई चे म्हणणे होते की , तुम्ही स्वतःला दोषी
समजू नका. कदाचित तुमच्यात ही दोष नसेल. दोष असेलच
तर आपल्या दैवाचा पण असू शकतो. " त्यावर ते म्हणाले,
      " कल्याणी लहान बाळासारखी माझी समजूत काढू नकोस. दोष माझ्यातच आहे, त्यामुळे वैद्यकीय तपासणी
करून मी लज्जेचे कारण बनू इच्छित नाही."
      " त्यात लज्जित होण्याचे काय कारण ?"
      " अंग आतापर्यंत कुणाला माहीत नव्हतं की माझ्यात
दोष आहे म्हणून. पण आता सर्वाना माहीत पडलं की मी
नामर्द आहे म्हणुन. ही माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट नाही का ? "
      " असं का वाटतं तुम्हांला ?"
      " आता तुम्हां दोघी मध्ये जर दोष नाही तर मग माझ्यातच असणार ना ?"
      " नाही. असं नसतं. थोडा फार दोष दोष असलाच तर
डॉक्टरी इलाज ने दूर होतो तो."
     " असं कुणी सांगितले तुला ?"
     " असं डॉक्टरांनी सांगितले."
     " अग त्यांचे काय ऐकतेस तू ते काहीपण सांगतात."
     " काहीपण नाही सांगत ते. खरं तेच सांगतात."
     " म्हणजे तुला म्हणायचं आहे की माझ्यात काही दोष
असला तर डॉक्टर दूर करतील ते."
     " हो "
    " पण असं का वाटतं तुला ?"
    " कारण आमचं समाधान करण्यात तुम्ही कुठंही अपुरे पडत नाहीत. आता राहिला प्रश्न आम्हाला गर्भधारणा का होत नाहीत . तर त्याला अनेक कारणे असू शकतात."
      " पण तुला एवढं कसं माहीत ?"
      " अहो, आमच्या शेजारच्या बाईच्या नवऱ्याचे झाले असे."
    " म्हणून तुला वाटतं की माझं ही तसेच झाले असेल."
    " पण मी म्हणते तपासून घ्यायला काय हरकत आहे, रिपोर्ट जो काय येईल तो आम्हां दोघींना पण मान्य असेल , मग तर झालं."
     " ठीक तुमची जर इच्छाच असेल की मी देखील तपासून
घ्यावे तर घेतो बापडा. " असे म्हणून शेवटी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास तयार झाले. आणि त्याप्रमाने यांनी
वैधकीय तपासणी करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
अर्थात त्यांच्या मध्ये ही दोष नाही. मग घोडं घडतंय कुठं ?
काही कळायला मार्ग नाही. मग सारा त्यांनी नशिबाचा दोष
काढला. कदाचित आपल्या नशिबी संतान सुख नसेल.
असा विचार करून त्या दोघी नशिबाला दोष देऊ लागला.
        एके त्या गावात एक ज्योतिषी आला . गावातील
अनेक लोकांनी त्याच्याकडून आपले ज्योतिष जाणून घेतले. आणि ती खरी देखील झाली. म्हणून ह्या दोघींनी सुध्दा
आपला हात ज्योतिषाला दाखविला. त्या ज्योतिषा ने  त्या दोघींचा हात पाहून सांगितले तुम्ही दोघी सख्ख्या बहिणी सवती आहेत ना ? " त्यावर त्या दोघीना मोठे आश्चर्य वाटले. आपण दोघीजणी सख्ख्या बहिणी आहोत हे ह्याला कसे समजले ? याचा अर्थ ह्या ज्योतिषाला सर्वकाही कळते. असा विचार मनात करून त्या ज्योतिषाला म्हणाल्या ," ज्योतिषी बुवा , आमचा दोघींचा हात पाहून सांगा. आमच्या नशिबात संतान सुख आहे किंवा नाही . त्यावर तो ज्योतिषी म्हणाला,
      " तुमच्या दोघींच्याही जीवनात सन्ताण सुख आहे, परंत...."
    " परंतु काय महाराज ?"
      " तुमच्या लहान बहिणीचे लग्न तुमच्या नवऱ्याशी होईल
तेव्हा !"
     " आँ s s s हे आणखीन काय भलतंच."
    " भलतंच नाही.तसं विधी लिखितच  आहे."
    " असं कसं विधी लिखित आहे ? एकाच घरात तिन्ही
बहिणी कशी येतील बरं ."
     " कशी येतील ते मला माहीत नाही. परतु विधी लिखित
तसंच आहे. कदाचित मागील जन्माचे कर्म आहे हे."
      " मागील जन्माचा ह्या जन्माशी काय संबंध ?"
      " सबंध कसा नाही.  आपल्याला  मागील जन्माच्या
कर्मा वरून हा जन्म मिळाला."
      " असे खरंच असतं ?"
      " कारण आत्मा अमर आहे तो कधीही मरत नाही.फक्त
तो आपले शरीर बदलतो. जसे की,कपडे जुने झाल्यानंतर
आपण ते फेकून देतो. आणि नविन कपडे परिधान करतो.
अगदी तसेच आत्म्याचे सुध्दा आहे.आत्मा जुने शरीर त्यागून
नवीन शरीर धारण करतो."
       " म्हणजे तुम्हाला म्हणावयाचे आहे की मागील
जन्मी सुध्दा ह्यांच्याशीच लग्न केले होते."
      " हो ! पण त्यावेळी तुम्ही सख्ख्या बहिणी नव्हत्या."
      " मग ?"
      " सवती होत्या ; परंतु वेगवेगळ्या घरातून आलेल्या."
      " म्हणजे मागच्या जन्मात ही आम्हा दोघीना मुलंबाळं
नव्हते."
      " तुम्हां दोघींना होतं ; परंतु त्या तिसरीला नव्हते. म्हणून
मरतेवेळी तिने इच्छा ठेवली की पुढील जन्मी ह्या दोघीच माझ्या सवती असाव्यात. आणि ह्या दोघीना मूल होऊ नये
जोपर्यंत मी त्यांची सवत बनून येत नाही." त्यावर कल्याणी
म्हणाली ," तुम्ही जे म्हणताय हे जरी सत्य असले तरी ती
आमची सवत कदापि बनणार नाही.'
     " का ? बनू शकणार नाही ?"
     " तिचं दुसऱ्या एका मुलाशी प्रेम आहे, शिवाय आमचे हे
कदापि तिच्याशी लग्न करायला तयार नाही. कारण कुमुद शी
लग्न करायला राजी नव्हते. मोठ्या मुश्किलीने मी त्याना राजी केलं .परंतु आता शक्य नाही."
     " तिचे लग्न तुमच्या नवऱ्याशीच कसं होईल. ते आता मी सांगत नाही. परंतु  विधिलिखित कदापि टळणार नाही. इतकेच सांगू शकतो मी! " असे बोलून तो तेथून  जायला
निघाला तशी कल्याणी त्याला म्हणाली ," थांबा. महाराज
आपली दक्षिणा घेऊन जा. त्यावर तो म्हणाला ,' माफ करा.
मी निपुत्रिकांच्या घरचे पाणी सुध्दा पीत नाही. जेव्हा तुम्हां
दोघीना बाळ होईल तेव्हा मी नक्की येईन इथं. खास जेवण
करण्यासाठी !" असे म्हणून तो चालता झाला. त्या दोघी
विचारमग्न झाल्या. नि स्वतः लाच त्या प्रश्न करू लागल्या की
हे सत्य असेल का ? कुणास ठाऊक ! पण सत्य ठरलं तर !
परंतु हे होणार कसे ? धाकटी तर दुसऱ्या मुलाच्या प्रेमात
पडलिय तिला कसे राजी करायचे ? आणि समजा आम्हां बहिणीच्या सुखाचा विचार करून ती ह्यांच्याशी लग्न करण्यास तयार झाली तरी हे थोडीच तिच्याशी लग्न करायला तयार होणार ? छे :! काहीच कळेनासे झालंय.
शेवटी त्या दोघीनी विचार केला की, एक वेळ ह्यांच्याशी बोलून बघू काय म्हणतात ते. आणि त्या नुसार रात्री एकांत
मध्ये असताना मोठीने म्हणजेच कल्याणी ने त्यांचे मूड पाहून
हा विषय काढला. परंतु दयानंद तिच्यावर जाम भडकले.
म्हणाले ," मागच्या वेळी मी तुझं ऐकून तुझ्या धाकट्या बहिणीशी लग्न केले ,काय साधले आपण त्यात ? मूल तर
नाहीच झाले. उलट तिचे पूर्ण आयुष्य बरबाद झाले. तरी
तुझे डोळे उघडत नाही. तिसऱ्या बहिणीचे पण जीवन उध्दवस्त करायला निघालीस.  परंतु यावेळी मी तुझं काही
ऐकणार नाही. आपल्याला मुलंच नाही ना ? हरकत नाही.
समजायचं की आपल्या नशिबात नाहीये. "
      " नशिबात आहे,परंतु तुम्ही धाकटीशी लग्न केलात
तर आम्हां दोघीनाही मूल होईल."
      " असं कोण म्हणाले ?"
      " ज्योतिषी बुवा !"
      " अगं त्या ज्योतिषांचे काय ऐकतेस ते एकदम खोटारडे
आहेत काही पण सांगतात. म्हणे मागील जन्मातही माझ्या
तीन बायका होत्या. कसं शक्य आहे ? "
      " का ? राजे लोकांच्या कितीतरी राण्या असायच्या !"
      " हो .मान्य आहे , परंतु राज्या लोकांचे ना ? आपण काय
त्यांच्या सारखे राजे आहोत का ?"
      " हो. आपल्या जमीनदार लोकांचा थाट काय राज्या लोकां पेक्षा काही कमी आहे का ? " कल्याणी बोलली," शिवाय आपल्या ह्या साऱ्या प्रॉपर्टी ला कुणी वारीस कुणी
नको ?"
     " वारीस स हवा असेल तर आपण एखादे अनाथालयातून
मधून दत्तक मूल घेऊ या . कसं ?"
     " अजिबात नाही. आम्हां दोघीना तुमच्या कडूनच वारीस
हवाय. "
     " पण तुला माहीत आहे ना ,की मी साठी असमर्थ आहे."
     " नाही. तुम्ही समर्थ आहात. फक्त एकच काम करायचं
आहे, आणि ते काम म्हणजे ,आमच्या धाकट्या बहिणीशी
लग्न करा."
      " अजिबात नाही. मी तिसरे लग्न अजिबात करणार नाही. हा माझा अखेरचा निर्णय आहे " असे म्हणून ते सरळ
तिच्या खोलीतून बाहेर निघून गेले, ते सरळ सुमतीच्या शयनगृहात पोहोचले. परंतु तेथे सुध्दा तोच विषय निघाला.
तेव्हा ते भयंकर चिडले नि तुम्हां दोघीना झालेय तरी काय ?
       सुमती म्हणाली ," आम्हाला मूल हवंय."
       " ते देऊ शकत नाही."
       " तुम्ही देऊ शकता. पण  त्यासाठी तुम्हांला आमच्या
धाकट्या बहिणीशी लग्न करावे लागेल."
       " ते होणे नाही. लक्ष्यात ठेवा तुम्ही दोघीनी पण ."  असे बोलून ते तिच्याही खोलीतून बाहेर पडले ते सरळ गच्चीवर
जाऊन बसले नि विचार करू लागले की काय करावे बरं.
बराच वेळ विचार केल्या नंतर त्याना एक उपाय सुचला. तसे
त्या दोघीना पण हॉल मध्ये बोलवून घेतले नि  त्या दोघीना
हा उपाय सांगितला, परंतु त्या गोष्टीस नकार देऊन टाकला. टेस्ट ट्यूब बेबी च्या मार्फत मूल होईल आम्हाला . परंतु ते दुसऱ्या चे ना ? फक्त शाररिक सबंध त्या पुरुषाशी  होत नाहीत. इतकेच."
     " मग काय हरकत आहे ? " दयानंद बोलले.
     " हरकत आहे, आम्हाला आमच्या नवऱ्यापासून मूल
हवंय."
      " का हा वेडा हट्ट करताय तुम्ही दोघी ? "
      " हो हा हट्टच आहे आमचा." कल्याणी उद्गारली.
      " हा हट्ट पुरविला जाणार नाही." असे म्हणून ते थेट आपल्या खोलीत निघून गेले. परंतु त्या दोघी कुठे हार माणन्यातल्या होत्या. एके दिवशी त्या आपल्या माहेरी गेल्या नि त्या दोघीनी आपल्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली.
त्या दोघींचे म्हणणे त्यांच्या वडिलांना पटले नाही. परंतु त्या
दोघीच्या आईला मात्र ही गोष्ट पटली. त्या आपल्या नवऱ्याला समजावत म्हणाल्या की धाकटी मुळे जर त्या दोघींचे भले होत असेल तर काय हरकत आहे, तिचं देखील
जावई बापूशी लग्न  लावून दिलं तर !"
     " बरं या संदर्भात मी प्रथम जावई बापूंशी चर्चा करिन
आणि मगच काय तो निर्णय घेईन. त्या दोघांचे संभाषण
धाकटी ने ऐकले तशी विरोध करत म्हणाली ," मी अजिबात
लग्न करणार नाही भाऊजींशी !"
      "अगं , पण का ?"
      " माझं प्रेम आहे, दुसऱ्या मुलाशी !"
      " कोण आहे तो मुलगा ?" वडिलांनी विचारले.
     तिने त्याचे नाव सांगताच तिचे वडील म्हणाले, " तो
मुलगा फार गरिब आहे, शिवाय त्याचा बाप आमच्याशी
वैर करून राहिला आहे, तो अजिबात आपल्या मुलाचे
लग्न तुझ्याशी होऊ देणार नाहीये. त्यावर ती म्हणाली ,
   " म्हणूनच आम्ही पळून जाऊन लग्न करायचे ठरविले
आहे."
    " आणि भीक मागणार आहे का त्याच्या बरोबर ?"
    " भीक कशाला मागायला पाहिजे ! आम्ही कुठंतरी
काम करू नि स्वतःचे पोट भरू!"
     " काही गरज नाही त्याची ! आम्ही तुझं लग्न जावई बापू शी करून  देणार आहोत."
     " मी अजिबात त्या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही."
     " म्हातारा कशाने आता पस्तीस वय झाले असावे. मोठीच
त्याच्याशी लग्न तेव्हा वीस वर्षाचे होते. दुसरी बरोबर लग्न
केले तेव्हा बत्तीस वय झाले होते. आता पस्तीस झाले असेल.
पस्तीस वयात कुणी म्हातारा होतो का ?"
      " माझ्या पेक्षा पंधरा वर्षानी मोठे आहेत ते."
      " चालते . काही नाही होत." तिची आई म्हणाली.
      " पण मला नाही करायचे त्यांच्याशी लग्न ."
      " कशी करत नाहीस तेच मी बघतो." तिचे वडील म्हणाले. तेव्हा ती समजली की आता पळून जाण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. आणि एके दिवशी ती त्या
मुला सोबत पळून गेली.

क्रमशः




टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..