वारसदार-३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वारसदार-३ |
३
सुशिलाबाईची चाल यशव्ही झाली. त्यांच्या दोन्ही मुलांना कंपनीत काम मिळाले. आता उंदीर सारखे हळूहळू घर पोकरण्याचे काम सुरू होणार होते. दोघांनी प्रतापरावांचा
लवकरच विश्वास संपादन केला. त्यामुळे त्या दोघांनाही कंपनीत महत्वाच्या पदावर नियुक्त केले. त्यामुळे दोघेही
एकदम खुश होते. काही दिवसानंतर सुशिलाबाई आपल्या
नवऱ्याला अर्थात धोंडीराम ला भेटायला तुरुंगात गेल्या तेव्हा
धोंडीराम तिच्यावर भयंकर चिडला. म्हणाला ," आता कशाला तोंड दाखवायला आलीस मला." त्यावर त्या म्हणाल्या ," असं मी का केले ते नाही का विचारणार ?"
" गरज काय पडली आहे ?"
" तुमचा राग समजू शकते मी पण माझं ऐकून तर घ्याल
का नाही."
" काहीही ऐकायचं नाही मला. चल जा इथून."
" मी जाणारच आहे, तुम्हाला फक्त एक खूषखबरी द्यायला आले होते ; परंतु तुमची ऐकायची तयारी नाही तर
दुसरं काय करणार मी बापडी ! पण एक सांगून ठेवते की जे
काम तुम्हाला नाही जमलं ते काम मी नक्की करून दाखवेन.
आणि त्या नुसार मी पहिली सीडी पार केली. आता दुसरी सीडी पण पार केली की मंजिल दूर नहीं !"
तसा धोंडीराम एकदम उत्सुकतेने बोलला ," काय म्हणालीस तू आता ?"
" तेच जे मी तुम्हाला सांगायला आली होती. पण
तुमची ऐकायचीच तयारी नाही तर काय करणार ना ?"
" नक्की तू काय केलेस ते सांग."
" तुमच्या दोन्ही मुलांना किर्लोस्कर कंपनीत नोकरी
द्यायला भाग पाडले मी !" नोकरी हा शब्द ऐकून धोंडीराम ने
आपले तोंड वेडे वाकडे करत म्हटलं ," नोकरी ! माझी तर
इच्छा होती की किर्लोस्कर कंपनीचा मालकी हक्क मिळावा."
" तोही मिळेल जरा धीर धरा."
" कसा ?"
" ते मी तुम्हाला आताच सांगणार नाही."
" का बरं ?"
" मिस्टर भिंतींना पण कान असतात म्हटलं."
" ठीक आहे,नको सांगूस. पण हे काम कधीपर्यंत होईल."
" ते इतक्यात कंस सांगता येईल ?"
" म्हणजे ?"
" म्हणजे कोणतीही काम पूर्ण सावधगिरी ने करायचे
आहे, त्यात थोडीशी जरी चूक झाली तर प्रॉपर्टी बळकावण्याचे तुमचे जे स्वप्न आहे ना, ते स्वप्नच बनून राहील.
गरमागरम दूध प्यायचं नसतं माहिती आहे ना, त्यानं तोंड
पोळतं म्हणून दूध थंड झाल्यावरच प्यायचं मिस्टर !'
" पण मला इथून कधी बाहेर काढणार आहेस ?"
" तुम्ही इथंच रहा. तुमच्यासाठी हीच जागा योग्य आहे." त्यावर धोंडीराम एकदम चिडून बोलला ," काय
म्हणालीस ? मला इथंच ठेवणार आणि तू तिथं मजा मारणार !"
" मजा मी कशी मारणार ? तुम्ही इथं बंद असताना ?"
" मग मला बाहेर काढ ना ?"
" कसं काढणार तुम्हाला बाहेर ? पंधरा वर्षाची तुरुंगाची शिक्षा झाली आहे."
" मग वरच्या कोर्टात अपील कर ना ?"
" आणि केलेले काम सारे बिघडवून टाकू ? तुम्हाला
कळत कसं नाहीये ? तुमच्या विरुद्ध आम्ही साक्षी दिली
नसती तर सुमतीबाईची सहानुभूती मिळाली असती का ?
आणि तुमच्या मुलांचा किर्लोस्कर कंपनीत शिरकाव झाला
असता का ?" खूप उशिराने धोंडीराम ची ट्यूब पेटली.
तसा उद्गारला ," हूं s s आता आलं लक्षात ."
" म्हणून म्हणते तुम्ही थोडे दिवस इथंच आराम करा."
" प्रॉपर्टी मिळत असेल तर मी आजीवन कारावासात
राहायची तयारी आहे माझी !"
" सारे जीवन नाही फक्त चौदा वर्षे !"
" ओके माय डार्लिंग !" त्यानंतर सुशिलाबाई तेथून
घरी जायला निघाल्या. जेव्हा त्या आपल्या घरी पोहोचल्या.
तेव्हा त्यांचे दोन्ही चिरंजीव घरी परतले होते. घरी येताच
त्यांनी आपल्या मुलांना विचारले ," काम कुठवर होत आलं ?" धनंजय उद्गारला ," आई , काम लवकर होणार
आपलं. कारण भाऊजी चा आमच्या वर पूर्ण विश्वास बसला." सुशिलाबाई उद्गारल्या ," व्हेरी गुड ! आता एक
काम करा. उद्या आहे रक्षाबंधन तेव्हा तुम्ही दोघांनी पण
आपल्या काकी घरी जायचंय राखी बांधायला."
" पण आई , आम्ही एवढं लहानाचे मोठे झालो तर कधी
राखी बांधून घेतलीं नाही तिच्या हातून. आता अचानक राखी
बांधून घ्यायची म्हणजे ? काय म्हणेल काकी ?"
" काहीही म्हणणार नाही. उलट इतक्या वर्षांनी का होईना
बहीण भाऊ एकत्र आले म्हणून आनंदच होईल तिला."
सुशिलाबाई उद्गारल्या.
" पण आई , राखी बांधायला बहीण येते ना भावाच्या घरी ! आणि राखी बांधण्याची इच्छा तर आपली आहे ना ?
तनुजा ला त्या बाबतीत कुठं काय माहीत आहे ? "
" मग मी एक काम करते आमच्या धाकट्या जाऊ बाईला
फोन करते नि ही खूषखबरी देते. " असे म्हणून सुशिलाबाईनी
लगेच सुमतीबाईला फोन केला. बहिणीच्या हातून राखी
बांधून दोन्ही भाऊ येत आहेत असे सुशिलाबाई नी सांगितले
तशी सुमतीबाई हर्षभराने म्हणाली ," राखी बांधायला बहीण
आपल्या भावाच्या घरी येत असते. अर्थात उद्या तनुजा येईल
आपल्या भावाकडे राखी बांधायला." सुशिलाबाई ने विनंती
केली की मग तू पण ये ना तनुजा सोबत." त्यावर सुमतीबाई
हसून म्हणाली ," ठीक आहे, आम्ही दोघेही येऊ !" एवढे
बोलून सुमतीबाई ने फोन आपला खाली ठेवला.
तेव्हा तनुजा उद्गारली ," मम्मी तू कशाला सांगितलेस आम्ही येतो म्हणून."
" अगं उद्या राक्षबंधन आहे, तू आपल्या भावांच्या हातात
राखी नाही बांधणार का ?"
" इतक्या वर्षांनी अचानक त्याना आपली बहीण कशी
आठवली ?"
" जाऊ दे गं ,ते आता स्वतःहूनच म्हणताहेत ना , तर आपण पण मागील साऱ्या कडू आठवणी विसरून नवीन
नात्याला सुरुवात करू ."
" ते ठीक आहे, परंतु तुला असं खरंच वाटतंय का ? ते
लोकं जुने वैर विसरले असतील म्हणून." तनुजा उत्तरली.
" हे बघ सद्या तरी असंच वाटतंय. आणि जर ते स्वतःहून
वैर विसरायला तयार असतील तर आपण उगाचच का ताणून
धरायचं ? आणि वाईटातून मधून काही चांगले घडत असेल तर ते घडू द्यावे असे मला वाटतं."
" ठीक आहे मम्मी तुझी तशी इच्छा असेल तर हरकत
जाईन मी त्या दोघांना राखी बांधायला."
दुसऱ्या दिवशी सुमतीबाई आणि तनुजा दोघीही त्यांच्या
घरी गेल्या. त्यानंतर त्या दोघांच्या हातात राखी बांधून तिने
त्याना ओवाळले. तेव्हा त्या दोघांनी हजार हजार रुपये
ओवाळणीच्या ताटात टाकले. त्यानंतर तेथेच दुपारचे जेवणही केले. नंतर गप्पागोष्टी करत बसले. तेव्हा सुमतीबाई
बोलली ," आज किती बरं वाटतं म्हणून सांगू म्हणजे कित्येक
वर्षा नंतर दोन परिवार पुन्हा एकत्र आले. मी जेव्हा लग्न करुन प्रथमच जेव्हा या घरात आली होती.तेव्हा तूच नाही का ? आरती करून मला घरात घेतले होते."
" हो सासूबाईंचा दारारच होता तसा. त्यांच्या ब्र अक्षर पण
काढण्याची हिंम्मत नव्हती कुणाची ! आणि मला अगोदरच
बजावून ठेवलं होतं त्या मला म्हणाल्या ," सुशीला, तुझी
जाऊ बाई येणार आहे प्रथमच आपल्या घरी ! तिच्या स्वागताची तयारी पहिली कर. नाहीतर नववधू दरवाजात येऊन उभी राहायची नि तुझा पत्ताच नसायचा. मला हे अजिबात चालणार नाहीये. मी काय सांगते ते नीट द्यानात
ठेव. आता ही काय विसारण्या सारखी गोष्ट आहे ...नाही ना ? पण त्याना कोण सांगणार ? " त्यावर सुमतीबाई उद्गारली ," सासूबाई होत्या कडक स्वभावाच्या परंतु तितक्याच प्रेमळ स्वभावाच्या पण होत्या. मला अजूनही त्या
गोष्टीची आठवण आहे, एके दिवशी काय झाले माझ्या कडून
चुकून वरण मध्ये मीठ जास्त पडले. मी फार घाबरले. मला
वाटले सासूबाई माझ्यावर खूप चिडणार. पण त्या अजिबात
चिडल्या नाहीत. उलट म्हणाल्या ,असं होतं कधी कधी ! तू
चिंता करू नकोस.जा. आता लवकरात लवकर काय बनेल
तर पितळं म्हणजे कुळदाची पिटी ! जा बनव."
" हां पण त्या दिवशी मला ओरडणी खावी लागली ना,
सासूबाई माझ्या कडे पाहत म्हणाल्या , काय गं तू काय करत
होतीस ? तुला जरा लक्ष देत येत नाही का ? " तेव्हा मी
गडबडले म्हणाली ," मला वाटलं रोज तीच जेवण बनवते चुकेल कशी ? " त्यावर त्या गर्जल्या ," तरीच वाटलंच होत
मला. जाऊबाई आल्या पासून तू अजिबात स्वयंपाक घरात
जात नाहीये. हे अजिबात चालणार नाही. घरातील सर्व काम
सर्वांनी मिळून करायचं असतं म्हणजे कुणावर जास्त भार
पडत नाही आणि त्याला सुद्धा वाटत नाही की सर्वकामे मलाच करावी लागतात म्हणून."
" हो ; सासूबाई जिवंत असेपर्यंत कुणाचंच काही चाललं
नाही पण त्यांच्या मृत्यूनंतर मात्र सर्वकाही बदललं ."
" हो ; आमच्या ह्यांनी वेगळाचार करून मागितला. आणि
मामंजी नी दिला सुध्दा ! परंतु त्या दिवसापासून आपल्या
दोन्ही परिवाराचे सबंध दुरावले ते दुरावलेच ! "
" ते आज कित्येक वर्षांनी पुन्हा साधले गेले.हे काही थोडे थोडके नाही."
" जाऊ द्या. त्या कडवी आठवणी पुन्हा काढू पण नये.
फार त्रास होतोय मला त्याचा." सुशिलाबाई दुःखी स्वरात बोलल्या.
" चुकलं माझं खरं तर त्या जुन्या आठवणी काढायला
नको होत्या मला." सुमतीबाई म्हणाली.
" अगं तू कशाला मनाला लावून घेतेस ? त्यात तुझं काय
चुकलं म्हणा." पुढचं वक्तव्य मात्र मनात बोलली," खरं चुकलं
तर तुझ्या नवऱ्याचे त्याने मामंजीचे कान भरले की दादा काही काम करत नाही. फक्त शेअर्स मार्केटच पाहतो. त्यावरून झाले दोन भावांचे वाद आणि त्याचे रूपांतर वेगळेचारात झालं.म्हणजे आमच्या ह्यांनी च सांगितले की मला वेगळे व्हायचंय म्हणून. तो दिवस मला आजही आठवतोय. ह्यांनी शेअर्स मार्केट मध्ये सर्वकाही घालवून बसले. आणि आमच्या नशिबी गरिबी आली. परंतु तुझ्या
नवऱ्या ला आमची अजिबात दया आली नाही. म्हणूनच
माझ्या नवऱ्या ने तुझ्या नवऱ्याला ठार मारले. परंतु त्याने
काहीच सद्य झालं नसतं म्हणून मी चांगुपणाचे नाटक केले.
आता हे चांगुपणाचे नाटक तुला किती महागात पडणार आहे
ते तू बघच आता.माझ्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव पाहून
लगेच माझ्या खाद्याला पकडून मला हलवत सुमतीबाई
म्हणाली ," थोरल्या जाऊबाई कुठं हरवल्यात ?"
" अं ss मी लगेच भानावर आले. काय झालं ?"
" म्हटलं कसला गंभीर विचार करताय ?"
" गंभीर काही नाही गं मागील काही घटना मनाला फार
वेदना देतात.म्हणून मागील आठवणी कधी काढू नये. हेच खरे !" सुशिलाबाई उद्गारल्या.
" सॉरी ! खरं तर माझं चुकलं. मला मागील आठवणी
काढायला नाही पाहिजे होत्या ."
" जाऊ दे गं तू मुद्दाम थोडी काढल्यास आठवणी !"
" तो आता विषय इथंच स्टॉप ! पुन्हा चर्चा करायची नाही
त्या विषयाची !" असे म्हणून चर्चा बंद झाली. त्यानंतर सुमतीबाई आणि तनुजा आपल्या घरी परतल्या.
त्या दोघी मायलेकी निघून गेल्यानंतर धनराज बोलला,
" इतकं सारं होऊन गेलंय आई ?"
" हां ! म्हणूनच तुझ्या बापाने हे कृत्य केलं.'
" आई , तू अजिबात चिंता जे दिवस आमच्या नशिबी
आले होते ते दिवस त्या दोघी मायलेकीच्या वाट्याला येतील
आता."
" त्यासाठी काय योजना आखली आहेस का ?"
" हां !"
" काय योजना बनविलीस मला सांग बरं." मग धनराज ने
थोडक्यात योजनेचे वर्णन केले. ते ऐकून सुशिलाबाई त्याच्या
वर चिडल्या. जी चूक तुझ्या बापाने केलं तीच चूक तू देखील
करणार आहेस का ?"
" मग तूच सांग. काय करू मी ? " धनराज बोलला.
मग त्यांनी थोडक्यात आपली योजना ऐकविली. आपल्या
आईची योजना ऐकून तो म्हणाला ," आई तू खरंच ग्रेट आहेस."
मग जमेल ना हे काम ?"
" नक्कीच जमेल. पण एक विचारू ?"
" विचार ना ?"
" तुझ्या डोक्यात एवढ्या सुपीक आयडिया येतात कुठून ?"
" दिमाग भी बर्तन की तरह होता है, उसे जितना रगडोगे
उतना ही वह चमक उठेगा ! "
" खराय तुझं !"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा