अपराधी कोण ?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अपराधी कोण ? |
पोलीस स्टेशनची बेल वाजली नि तसा खुर्चीवर बसून पेंगत असलेला इन्स्पेक्टर विशाल खडबडून जागा झाला
नि रिसिव्हर उचलून कानाला लावत म्हंटले," हॅलो कोण
बोलत आहे ?" त्यावर पलिकडून आवाज आला , की, कोण
बोलत आहे हे फार महत्वाचे नाहीये. फक्त मी काय सांगतो.
त्याकडे नीट लक्ष द्या. " त्यावर इन्स्पेक्टर विशाल बोलला,
" ठीक आहे सांगा."
" इथं कुण्या अज्ञात माणसाचा खून झाला आहे."
" इथं म्हणजे कुठं , तिथलं लोकेशन सांगा ."
" इथं एक रेल्वे स्टेशन आहे बघा."
" कोणतं रेल्वे स्टेशन ?"
" माहीत नाही. " असे बोलून लगेच फोन कट केला.
" डँमीट काय माणूस आहे हा ,अर्धवट माहिती देतो.
असे स्वतःशीच बोलून ते कॉन्स्टेबल अजय कांबळे कडे पाहत बोलले,' अजय , ह्या नंबर वरून तिथलं लोकेशन काढ."
कॉन्स्टेबल अजय मोबाईल नंबर घेऊन सिमकार्ड कंपनीशी संपर्क साधला. तेव्हा सिमकार्ड कंपनी कडून कळलं की आपल्या पोलीस स्टेशनच्या समोरच तर रेल्वे स्टेशन आहे. तसे लगेच पोलीस रेल्वे स्टेशनच्या जवळ जाऊन पाहतात एका व्यक्तीचा मृतदेह रेल्वे फाटका जवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. इन्स्पेक्टर विशाल ने
लगेच पोलीस पंचनामा केला नि मृतदेह शवविच्छेदनासाठी
सिव्हिल इस्पितळात पाठविण्यात आला. त्यानंतर इन्स्पेक्टर विशाल दोन कॉन्स्टेबल सोबत मृत व्यक्तीच्या घरी पोहोचतात दरवाजावरील कॉलबेलचे बटन दाबताच दरवाजा
उघडला जातो. आपल्या घरी पोलिसांना आलेले पाहून ती
महिला घाबरते आणि विचारते ," काय झाले साहेब ?
तेव्हा इन्स्पेक्टर विशाल बोलला ," दिवाकरराव इनामदारांचे
घर हेच का ? " त्यावर त्या महिलेने विचारले ," हो ; त्यांचेच
घर आहे हे पण झाले काय ? असं का विचारता तुम्ही "
" त्यांचा खून झाला आहे."
" अहो भलतंच काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ते घरात झोपले आहेत." ते ऐकून इन्स्पेक्टर विशाल आश्चर्य
चकित होत म्हटलं ," त्याना जरा बाहेर बोलवता का ?"
" हो बोलावते ना ?" असे म्हणून त्या आंत मध्ये गेल्या नि
ओरडतच बाहेर आल्या. त्यावर इन्स्पेक्टर विशाल ने विचारले ," काय झाले मॅडम ? का ओरडलात तुम्ही ?"
" अहो ते घरात नाहीयेत."
" अहो पण मॅडम तुम्ही आताच म्हणालात ना की इनामदार झोपले आहेत म्हणून ."
" हो झोपलेच होते ते आंत. पण आता नाहीत ते आपल्या
खोलीत."
" किती वेळा पूर्वीची गोष्ट आहे ही ?"
" अहो आता थोड्या पूर्वी तर पार्टी संपली नि ते झोपायला गेले ."
" कशाची पार्टी होती ?"
" त्याना नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले त्याबद्दल पार्टी होती आज."
" त्याना बाहेर जाताना कुणीच पाहिले नाही का ?"
" नाही."
" तुम्ही आताच्या आता आमच्या सोबत चला नि मृतदेहाची ओळख पटते काय बघा."
" हो चला." त्याची पत्नी आणि घरची इतर माणसं इस्पितळात जाऊन पाहतात तर खरोखर त्याच्याच नवऱ्याचे
ते शव होते. ओळख पटताच त्यांनी मोठ्या ने टाहो फोडला. मृतदेहाचे दुसऱ्या दिवशी भेटेल म्हणून सांगण्यात आला. त्यांच्या घरवाल्यांच्या स्वाधीन करण्यात आला. परंतु शवविच्छेदनचा रिपोर्ट मात्र वेगळेच दर्शवित होता. त्यांचा मृत्यू रात्री आठ वाजता झाला असे सिध्द करत होता तर पार्टी मध्ये लोकांनी त्याला कसे पाहिले ? कसं शक्य आहे ? पोलिसांना एका अज्ञात इसमाचा फोन आला होता तेव्हा घड्याळात अकरा वाजून पंधरा मिनिटं झाली होती. आणि अकरा वाजे पर्यंत तो पार्टीमध्ये होता असे त्यांच्या घरच्या मंडळींचे म्हणणे आहे. आणि आपण त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा बारा वाजले होते नि पार्टी पण संपली होती. आणि तेव्हा ते आपल्या खोलीत झोपायला गेले. त्यानंतर त्याना कुणी पाहिले नाही. असं कसं होऊ शकतं ? कुणी तरी खोटं बोलत आहे पण कोण ? हे जाणून घेण्यासाठी पोलीस दिवाकररावांच्या घरी पोहोचले.
त्यांनी सी सी टीव्ही कॉमेराचे फुटेज चेक केले. पण सुध्दा तेच सिध्द करत होते की नवं वाजल्या पासून अकरा वाजेपर्यंत ते कुठे बाहेर गेलेलेच नाहीत. मग खून झाला तो
कुणाचा ? ते शव दुसऱ्या चे म्हणावे तर मृतदेहाच्या हाताच्या बोटांचे ठसे नि आधार कार्ड वर असलेले ठसे हेच दर्शवित होते की , तो मृतदेह दिवाकररावांचाच आहे. मग अकरा वाजेपर्यंत उपस्थिती मध्ये होता तो कोण होता ? त्याचे भूत होते का ? छे ,छे ,छे कसं शक्य आहे ? नक्कीच काहीतरी
गोलमाल आहे ,परंतु सिध्द कसा करणार ? इन्स्पेक्टर विशाल बोलला ," इतक्या वर्षाच्या कारकीर्दीत ही एक
प्रथमच केस पाहण्यात आली होती. मोबाईल मधले कॉल
रेकार्डिग शेवटचे अकरा वाजून १५ मिनिटांचे आहे. आणि त्या अगोदरच कॉल अकरा वाजण्याचे आहे. ज्या माणसाला कॉल केले होते त्या माणसाला पोलीस स्टेशनला बोलविण्यात आले. तो जसा पोलीस स्टेशनला आला तसे त्याला विचारण्यात आले की, तुम्हांला दिवाकररावांनी फोन
कशासाठी केला होता ? त्यावर तो म्हणाला ," बोर्ड ऑफ डायरेक्टर ची उद्या मिंटींग आहे. सर्व बोर्ड मेंबरानी हजर
राहायला सांगितले. तेव्हा इन्स्पेक्टर विशाल ने विचारले की,
फक्त तुम्हांला च का मिटिंग विषयी सांगितले ? इतरांना का नाही सांगितले ?" त्यावर विनायकराव म्हणाला ," ते काय
मला माहित नाही. संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट बुचकाळात
सापडले. कुणालाच काही सुचेना ? अपराधी कोण ?
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा