Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

यह इश्क नहीं आसान ४ (अमर प्रेम )

यह इश्क नहीं आसान ४
यह इश्क नहीं आसान ४

 


    " मग तुला तो होणारी बायको का म्हणाला ?"
   " तो आणि त्याचा बाप तशी स्वप्न पाहतोय."
   " पण चुलत भावाशी कसं लग्न ?"
   " आमच्यात करतात. फक्त सख्खा बहिणी शी करत
नाहीत."
    " अरे बाप रे ! फार विचित्र प्रकार आहे हा !"
    " विचित्र तर आहेच पण आपल्याला काय त्याच्याशी !"
   " अग पण आपलं लग्न होऊ देतील का ते ?"
   " निश्चितच नाही आणि तसं पण प्रेम करणाऱ्यांचे लग्न
आई-वडिलांच्या समत्ती ने झाले आहे का ? नाही ना ?
आणि झालं असलं तर क्वचितच ! आणि आपल्या दोघांचा तर धर्मच वेगळा आहे म्हटल्यावर इथं तर धर्मयुध्द सुरू होईल."
    " याचा विचार मी केलाच नाही आधी !"
    " नाही केलास ना, ते उत्तम झालं. आता आपण दोघांनी
मिळून लढायचं आहे हे युध्द !"
    " ते ठीक आहे, पण घरच्यांना कसं समजवायचं ?"
    " आणि तुला काय वाटतं घरचे समजून घेतील आपल्याला ? कदापि नाही."
     " मग काय करायचं म्हणतेस ?"
     " समजावून पाहायचं समजले तर ठीक नाहीतर शेवटी
एकाच पर्याय उरतो ?"
     " कोणता पर्याय ?"
     " घरातून पळून जाऊन लग्न करायचं. बस्स !"
      " थांब.इतक्यात हा निर्णय नको.हा शेवटचा पर्याय
आहे.अगोदर आपण प्रयत्न तर करू दोन्ही परिवाराना
समजवायचा."
     " ठीक आहे, तू म्हणतोस तर तेही करून पाहू !"
     " चल आता निघायला हवं खूप उशीर झाला.त्याने
आणि घरी जाऊन काय आग लावली असेल ती कोण
जाणे !"
    " त्याची तू चिंता करू नकोस. त्यासाठी मी समर्थ आहे."  त्यानंतर दोघेही गार्डन मधून बाहेर पडले नि
बोलत बोलत घरी जायला निघाले.

     सलीम घरी आला नि त्याने आपल्या बापाला नि आजोबाला सर्वकाही सविस्तर सांगितले नि निलोफर ने
आपल्या कानाखाली चपराक मारल्याचे ही सांगितले. आपली नात एका हिंदू मुलाच्या प्रेमात पडली आहे, हे
ऐकून जफर खान भयंकर चिडले नि त्यांनी लगेच इब्राहिम ला आपल्या पाशी बोलविले नि विचारले ," इब्राहिम मी जे ऐकलंय ते खरंय का ?" त्यावर इब्राहिम ने न समजून विचारले," काय ऐकलंय तुम्ही ते मला कसं कळणार ?"
     " माझ्या कानावर आलंय की तुझी मुलगी एका हिंदू
मुलाच्या प्रेमात पडलीय."
      " मला त्या बद्दल काहीही माहीत नाहीये अब्बू !"
      " बाप आहेस ना तिचा मग आपली मुलगी बाहेर काय
करतेय यावर लक्ष नको का ठेवायला  ?"
     " पण असं केलंय काय तिने ?"
     " काय केलंय .. काय नाही केलंय ते विचार."
    " अब्बू असं कोड्यात बोलू नका.माझ्या मुलीने
केलंय काय ते सांगा."
    " तुझ्या मुलीने प्रेम केलंय  ?"
    " प्रेमच केलंय ना, त्यात काय सर्वच करतात."
    " पण कोणाशी केलंय ते माहीत आहे का ?"
    " कोणाशी का करिना एका मुलाशीच केलं असेल ना ?"
    " हां पण तो मुलगा कोण आहे तो माहीत आहे का तुला ?" जफर खान.
     " अब्बू सरळ सांगून टाका ना, तुझ्या मुलीने एका
हिंदू मुलाशी प्रेम केलंय म्हणून." अनवर मध्येच बोलला
     " मग त्यात काय विशेष ? मुस्लिम युवक हिंदू मुलीशी
प्रेम करतात नि तिच्या बरोबर लग्न ही करतात.मग हिंदू  मुलाने मुस्लिम मुलीशी प्रेम केलंय तर बिघडलं कुठं ?"
    " तू स्वतःवरून सांगतोस काय हे ?"
    " मीच कशाला ? अशी अनेक उदाहरणे सापडतील."
    " बघा अब्बू कसा बोलतोय ते." अनवर मध्येच बोलला.
    " त्यात मी चुकीचे काय बोललोय रे ?" इब्राहिम उद्गारला
  तसे जफर खान चिडून म्हणाला," चुकीचे नाहीतर बरोबर बोललास का तू ? हां मुसलमान आपली मुलगी हिंदू मुलाला देतो का कधी ? दिली तर त्या मुलाला मुस्लिम
धर्म स्वीकारावा लागतो." तेवढ्यात दरवाजा आडून ऐकत
असलेली सायरा पुढे येत म्हणाली ," अब्बू हे चुकीचे नाहीये का ?" तसा जफर खान बोलला ," तू मध्ये बोलू
नकोस. तुला कोणी बोलविले आहे का इथं ? का आलीस
तू इथं ?" तेव्हा सायरा एकदम निर्भयपणे म्हणाली," का
बोलू नको इथं विषय माझ्या मुलीचा विषय चालला आहे, अर्थात मला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे." सायरा ने अधिकाराची भाषा वापरल्याने जफर खान अधिकच चिडला. तो इब्राहिम ला म्हणाला ," इब्राहिम तुझ्या बायकोचे तोंड आधी बंद कर." तेव्हा इब्राहिम सायरा बानूला म्हणाला ," सायरा तू जा इथून मी समजवतो त्यांना." तशी सायरा बानू तेथून बाहेर पडली परंतु
दरवाजा आड उभी राहून आंत होणारा वार्तालाप ऐकू
लागली. ती बाहेर गेली असे समजून जफर खान म्हणाला,
   " इब्राहिम दरवाजा बंद कर , नाहीतर परत येईल तुझी
बायको कायदा मांडायला." इब्राहिम ने दरवाजा बंद करून घेतला. तसा जफर खान म्हणाला," हे बघ तू तुझ्या मुलीला समजव की एका मुस्लिम मुलीचा निकाह हिंदू मुलाशी होत नाही कधी तेव्हा तिला त्याचा नाद सोडायला सांग."
    " बरं सांगतो."
    " आणि जर ती नाही ऐकली तर माझ्याकडे पाठवून दे
तिला."
    " बरं." असे म्हणून इब्राहिम मागे फिरला तशी सायरा
बानू स्वयंपाक घरात येऊन स्वयंपाक घरात काम करत
असल्याचे तिने भासविले. परंतु तिने आपल्या पतीला
प्रश्न केलाच - काय म्हणाले तुमचे अब्बू ?"
    " काही नाही म्हणाले आपल्या पोरीला समजवून सांग
की एका मुस्लिम मुलीचे लग्न हिंदू मुलाशी होऊ शकणार
नाही. आणि जर तिला रुद्राशीच लग्न करायचं असेल तर
त्याला इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल."
   " मग  आपलं काय मत आहे या विषयी ? "
    " माझं मत दुसरे काय असणार, जर रुद्र इस्लाम धर्म
स्वीकारायला तयार असेल तर कोणाची हरकत असण्याचा
प्रश्नच उद्भवत नाही." तेवढ्यातच निलोफरचे आगमन
झाले. बहुधां तिने त्या दोघांचे संभाषण ऐकले असावे. म्हणूनच की काय ती म्हणाली ," पण माझी हरकत आहे
पप्पा !" असे म्हणताच. ते दोघेही वळून तिच्याकडे पाहू
लागतात. त्यानंतर इब्राहिम ने विचारले ," का बेटा तुझी
का हरकत आहे याला ?"
      " धर्म बदलला म्हणजे माणूस बदलतो का ? म्हणजे
त्याचे संस्कार , रक्त , काया वगैरे ...?"
     " ते कसं बदलणार ? ते तर सारखेच असते सर्वाना."
     " हो ना ? म्हणजे जन्म देणाऱ्याने फरक नाही केला
मग आपण का फरक करतोय ?"
      " ते मला काही माहीत नाही. जे पूर्वी पासून चालत
आलंय ते तसेच पुढेही चालत राहणार ?"
     " म्हणजे पूर्वी च्या लोकांनी ज्या चूका केल्या त्याच
चुका आपणही करत राहायच्या असेच ना ?"
    " हो बरोबर आहे तुझं. हे बदलायला हवं पण एकाएकी बदलू शकत नाही आपण."
    " माहिती आहे ते मला पण कोणी तरी सुरुवात करायलाच हवी ना ? जशी आपण केली. आणि खरं सांगू
मला आपला फार अभिमान वाटतो. कारण आपण मम्मी ला तिचा धर्म बदलू दिला नाही. इतकंच नाहीतर तिला घरात देव्हारा सुध्दा करून दिला."
     " अगं पोरी हळू बोल. कोणी ऐकलं तर महा भयंकर
तुफान येईल  आपल्या घरात. "
     " पप्पा जे काही करायचं ते खुलेआम करायचं. कोणाला कशाला घाबरायचं ?"
     " असं नाही करता येत पोरी आपलं खायचं असलं तरी
लोकांपासून लपवून खावं लागतं. जमाना खराब आहे पोरी ! समाजात राहायचं म्हटलं तर समाजाचे नियम
पाळावे लागतात पोरी !"
    " ते चुकीचे असले तरी !"
   " हो. त्याला पर्याय आहे का काही ?"
   " पर्याय आहे, परंतु आपण तो स्वीकारत नाही."
   " पोरी पटतंय मला तुझं पण आपण समाजाशी लढू
शकत नाही."
     " का पण ?"
     " समाज आपल्याला वाळीत टाकेल. हुक्का पाणी
सर्वकाही बंद करतील ते आपलं."
     " कोणत्या युगात जगताय तुम्ही पप्पा ! हे २१ व्या
शतक आहे. हुक्का पाणी बंद करायला का त्यांच्या बापाचा नळ आहे ? आणि आता काय पूर्वीचा जमाना
राहिला नाही. मुली शिकल्या सवरल्या त्यामुळे त्यांना ही
आता कळायला लागलं की धर्माच्या नावाखाली मुस्लिम
स्त्रियांचे शोषण केलं जातं. त्यांच्यावर अनेक अत्याचार
केले जातात. स्त्रियांनी का अत्याचार सहन करायचे ? "
    " ते सारं खरं पण समाजाच्या ठेकेदाराना कोण
समजविणार ?"
    " कोण समजविणार म्हणजे ? आताच्या नवीन पिडीने
हा पुढाकार घेतला पाहिजे. तरच ते होईल."
    " होणार."
    "  पण कधी होणार ?"
    " हळूहळू होणार, आता बघ तीन तलाक च्या विरुध्द
काही स्त्रियांनी आवाज उठविलाच की नाही तसेच हे सुद्धा
होईल."
     " तलाक ची पद्दत तर चुकीचीच आहे, म्हणजे बघा
निकाह करताना स्त्री ची मर्जी विचारली जाते मग तलाक
घेताना का नाही तिची मर्जी विचारली जात ? हिंदू धर्मात
तर तसे नाहीये.घटस्फोट घेताना दोघांची संमती असेल
तरच घटस्फोट होतो. मग मुस्लिम धर्मातच असं का नाही ?"
   " अगं त्यांचा धर्म वेगळा आहे नि आपला धर्म वेगळा
आहे." 
   " तुम्ही म्हणता की अल्ला ने ही सृष्टी निर्माण केली आहे
असे जर आहे तर सर्व मानवजात पण अल्ला नेच निर्माण
केली असेल होय ना ?"
    " हां !"
    " हां ना, मगच एकच धर्म का नाही ? वेगवेगळे धर्म
का निर्माण केले ? शिवाय प्रत्येक धर्माचे नियम ही वेगळे
हे कसे काय ? "
     " हे बघ मला तुझ्या प्रश्नांचे उत्तर देता येणार नाही. म्हणून तू जरा शांत राहा."
    " शांत कशी राहू ? धर्माच्या नावाखाली स्त्री जातीचे
शोषण केलं जातं. पुरुषाने कसे ही वागावे ? त्यांना कोणताही नियम नाही. बाकी सर्व नियम जे आहेत ते
स्त्रियांनाच मुस्लिम स्त्रियांनी आपला चेहरा दाखवायचा
नाही कोणाला ? बुरखा घ्यायचा. स्त्रियांनी आपल्या
नवऱ्या विरुध्द आवाज ही उठवायचा नाही. तो ठेवील तसे
राहायचे जणू स्त्री म्हणजे त्यांच्या पायातील चप्पलच !
उचला नि कुठंही फेका ! होय ना ? म्हणून मी ठरविले
आहे की असल्या धर्मात मला राहायचंच नाही. रुद्र धर्म
बदलू नकोय म्हणतोय परंतु मी धर्म बदलणार. मला नाही
ह्या धर्मात राहायचंय ज्या धर्मात स्त्रियांना न्याय नाही.
बोलण्याचा अधिकार नाही.असला धर्म काय कामाचा !
त्यापेक्षा हिंदू धर्मात तर स्त्रियांना फार मान आहे. स्त्रीला लक्ष्मी चा दर्जा दिला आहे .परंतु मुस्लिम धर्मात लक्ष्मी कुठली साधी स्त्री पण समजली जात नाही तिला."
    " म्हणून मी काय सांगतोय तू रुद्र सोबत कुठंतरी दूर
पळून जा नाहीतर आमचा मुस्लिम समाज तुम्हां दोघांना
जगू देणार नाही."
  " नाही पप्पा पळून जाणे हा त्यावरचा उपाय नव्हे ! "
" मग काय करायचं तुझा विचार आहे ?" इब्राहिम ने
विचारले.
   " चुकीच्या गोष्टी विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे."
   " अगं तू एकटी समाजा विरुध्द नाही लढू शकणार
माझं ऐक तू. तुम्ही दोघांनी पण इथून पळून जा हा एकच
मार्ग आहे तुम्हां दोघांसाठी !"
   " नाही पप्पा आम्ही पळून नाही लग्न करणार , लग्न
करायचंच तर सर्वांच्या साक्षीनेच होणार."
   " तू नाही ऐकणार , तुला समजविणे फार अवघड आहे,
तेव्हा आता ही गोष्ट रुद्राला सांगून पाहायला पाहिजे."
    " पप्पा रुद्राचे मत माझ्या पेक्षा वेगळं नसणार बघाच
तुम्ही !"
    " बरं बरं मी प्रत्यक्ष बोलेन त्याच्याशी !"
    " तुम्हाला खरे नाही वाटत तर व्यक्तिशः बोलून पहा.
हातच्या कांकणाला आरसा कशाला ?" असे बोलून ती
सरळ आपल्या रूम मध्ये निघून गेली. तिच्या पाठमोरी
आकृतिकडे पाहत ते म्हणाले," कसं होणार आहे तुझं
ते अल्लालाच माहीत." असे म्हणून त्या खोलीत निघून
गेले. निलोफर आपल्या खोलीत जाऊन विचार करू
लागली की पप्पा आज असं का म्हणाले ? नक्कीच
आज घडलंय आज. बहुतेक त्या सलीमचीच करामत
असेल ही पण हरकत नाही मी लग्न करेन तर रुद्राशी
अन्यता अविवाहित राहीन.पण आपल्याला रुद्रा शिवाय
राहता येईल का ? छे छे छे कल्पनाच करता येत नाही
मला. परंतु आजोबा आमचं लग्न होऊ देतील असं काही
वाटत नाही.मग काय करावं ? पप्पा सांगतात तसे करावे
का ? छे छे छे ! ती तर सपशेल हार आहे आपल्या प्रेमाची
मग काय करावं ?  पाहू काय करायचं ते.उद्या रुद्राला
भेटल्यावरच काय तो निर्णय घेता येईल. असा विचार करतच तेवढ्यात सायरा तेथे आली तशी आपली आईला
पाहून निलोफर समजून गेली की आपल्या आईला देखील
आपल्या प्रेमा विषयी कळलं असणार , म्हणूनच की काय
मला ती जाब विचारायला आली वाटतं.नक्कीच पप्पानी
सांगितले असणार किंवा सलीम ने आग लावलेली दिसतेय. येऊ दे खरं आहे ते सांगून टाकायचं बस्स ! तसा
मला पूर्ण विश्वास आहे की आई मलाच पाठींबा देणार
नाहीतर तिने मला देवाची पूजा कशी केली जाते हे
शिकविले नसते. तसे मला नमाज पण पडता येते म्हणा.
असे स्वतःशीच बोलून स्मित हास्य केले.तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून सायरा म्हणाली," निलू
तू आज फार खुश दिसतेस.आज काही विशेष घडलंय का ?" त्यावर निलोफर म्हणाली," हो. विशेष म्हणजे काय
मी एका मुलाच्या प्रेमात पडली." तिने पण आपल्याला
माहीत नसल्याचा बहाणा करत विचारले ," हो का ? कोण
आहे तो मुलगा ?"
    " तो मुलगा ब्राम्हण समाजाचा आहे."
    " आणि तू मुसलमान कसं होणार तुम्हां लोकांचे लग्न ?"
    " जशी इतर लोकांची लग्ने होतात.तसेच आमचं ही
होईल लग्न."
     " मुश्किल आहे थोडंस."
    " मुश्किल तर आहेच पण अशक्य नाहीये."
    " कशावरून सांगतेस ? "
    " प्रेम-विवाह म्हटलं की तिथं विरोधक असणारच.त्यात
काय ?"
    " अग हे विरोधक साधे सुधे नाहीत.धर्मकांड लोक आहेत हे."
    " माहितेय मला."
     " तरी पण हे साहस केले.?"
      " हो कारण स्त्रियांना जाचक असणारा धर्म नकोय
मला. ह्या धर्मात स्त्रीला कवडीचाही मान नाही."
     " बरं ते जाऊ दे." विषयांतर त्या म्हणाल्या," मला हे सांग.त्या मुलाचे आई-वडील तुला सून म्हणून स्वीकारतील का ?"  निलोफर लगेच उत्तर दिले की , हो आई ,  त्याचे आई-वडील निश्चितच स्वीकार करतील कारण ते आधुनिक विचारांचे आहेत शिवाय त्यांचा स्वतःचाही
प्रेम-विवाह च आहे.परंतु ....?"
     " परंतु भीती आहे ती फक्त त्याच्या  आजीची त्या फार कर्मठ आहेत आणि कडक स्वभावाच्या आहेत. त्या नाही मान्य करणार."
     " मग कसं होणार तुझं ? सांग बरं."
     " आई, मी आणि रुद्राने पुरता विचार केलाय की आमच्या लग्नाला दोन्ही कडून मान्यता मिळाली नाहीतर आम्ही पळून जाऊन लग्न करायचं ठरविलं आहे , परंतु लगेच नाही. अगोदर दोन्ही कडच्या मंडळींना आम्ही समजविण्याचा प्रयत्न करू ऐकलं तर ठीक नाहीतर आहेच शेवटचा पर्याय !"
    " मला नाही वाटत तुमच्या लग्नाला होकार मिळेल
असा. पण एक उपाय आहे."
    " कोणता ?"
    " आम्ही जसं केलं तसं तुम्ही लोकांनी केलं तर शक्य
आहे."
    " तुम्ही कसं केलंत लग्न ?"
    " मी इस्लाम धर्म स्वीकारायला तयार आहे असे फक्त
भासविले. म्हणजे ही सारी आयडिया तुझ्या पप्पांचीच !"
     " पप्पा एकदम ग्रेट आहेत ना ? तुझं फक्त त्यांनी नाव
बदललं आणि कोणाला कळू पण दिलं नाही आपल्या
घरात देव्हारा आहे तो."
     " म्हणूनच तुला सांगतेय तुम्ही पण असंच करा. रुद्राला
सांग इस्लाम धर्म स्वीकारायला तयार कर , एकदा लग्न झालं की मग जायचं दुसरीकडे राहायला. कोणाला
कळणार आहे तुम्हां दोघांचा धर्म कोणता आहे तो."
    " वाव काय उपाय सांगितलंस  तू आई, मी रुद्राशी बोलून पाहते मी !"
    " त्याला अगोदर विश्वासात घे नि मगच सांग."
    "  हो ग आई, एवढं कळतंय मला."
    " बरं बरं आता जरा किचनमध्ये चल मला मदत करायला."
      " हो येते चल." निलोफर उठली नि आपल्या आईच्या
मागोमाग किचनमध्ये गेली.नि आपल्या आईला स्वयंपाक
करायला मदत करु लागली.

     क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..