आव्हान -२
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आव्हान -२ |
अंक दुसरा
( स्थळ: विद्याधरपंत कार्लेकरांचे घर विध्याधरपंत मुबंई च्या सिटी इस्पितळात जाऊन आपल्या मुलीला अर्थात
विद्याला परस्पर घेऊन येतात.मात्र तिच्या बाळाला नर्स मार्फत अनाथालयात पोहोचविण्याची व्यवस्था करतात. त्यासाठी दहा दहा हजार रुपयांची दोन नोटांची बंडले देतात.आणि विध्याला सांगतात की तुझं बाळ जन्मतःच
दगावले.त्यामुळे तिच्या डोक्यावर विपरीत परिणाम होतो.
ती खेळण्यातील बाहुलीला आपलं बाळ समजतं.तिची
अवस्था पाहून स्वप्नील माधव चा शोध घेण्यासाठी मुबंई
रवाना झाला. स्वप्नील मुंबईला गेला त्याला दुसरा दिवस असतो आणि सकाळचे अकरा वाजलेले असतात. तेवढयात मुबंईहुन स्वप्नील चा कॉल येतो. त्यावेळी विद्याधरपंत माडीवरचा जीना उतरून खाली येत असतात. मोबाईल कानावर लावला आहे )
विद्याधरपंत : हां, बोल स्वप्नील सापडला का माधव ----काय---नाही sss अरे, मग ते लोक जेथे राहात होते ना , तिथल्या शेजारच्या लोकांना विचारून बघ ना ? काय म्हणालास शेजाऱ्यानाही माहीत नाही, तो कुठं राहायला गेला तो -----अच्छा अच्छा ! म्हणजे त्या दिवसा पासून तो तिकडे फिरकलाच नाही ?----ओ माय गॉड आता कुठं शोधायचं याला ?------बरं. तू एक काम कर ----तिथल्या शेजारच्या लोकांना तुझा मोबाईल नंबर देवून ठेव. ----त्याना म्हणावं पुन्हा जर तो इथं आला, तर त्याला आमच्याशी संपर्क साधायला सांगा ----बरं मग तू तेथे थांबून काय करणार आहेस? त्या पेक्षा घरी निघून ये. [ फोन कट करतात.]
सरस्वती : कुणाचा हो फोन?
विद्याधरपंत : आपल्या स्वप्नीलचा.
सरस्वती : काय म्हणतोय स्वप्नील ? पत्ता सापडला का ते राहात असलेल्या ठिकाणचा ?
विद्याधरपंत : हो, पत्ता बरोबर सापडला. पण तो आता तेथे राहात नाही.
सरस्वती : अरे,देवा! मग आता काय करायच ?
विद्याधरपंत : आता वाट पाहायची ! दुसरं काय आपल्या हाती ?
सरस्वती : हो ! पण विद्याला काय सांगणार आहात ?
विद्याधरपंत : काय सांगावं ते मला पण सुचत नाहीये, बघ.
[ तेवढ्यात आतून विद्याचा आवाज येतो -- मंम्मी माझं बाळ कुठं आहे?
सरस्वती : आता हिला बाळ कुठून द्यायचं ?
[ पुन्हा आतून विद्याचा आवाज येतो- हा बघ इथं लपून बसलाय गुलाम ' असे म्हणतच ,ती बाहेर येते. तिच्या हातात तिच्या बालपणी तिच्या वडिलांनी तिला खेळायला आणलेली प्लस्टिकची बाहुली असते. प्लस्टिकच्या बाहुलीला ती आपली बाळ समजते. हे पाहून दोघांना काही क्षणापुर्वी आलेलं टेन्सन किचिंत दूर झाल्या सारखं वाटलं.]
सरस्वती : बाळ मिळालं तुला?
विद्या : मिळालं. पण त्याचे कपडे बघ. किती मैली झालेत ते. धुवून टाकायला हवे आहेत ते मला ---[ बाहुलीच्या अंगावऱील कपडे उतरवते. ] मंम्मी जरा माझ्या बाळाला घे, गं. मी जरा बाळाचे कपडे धुऊन वाळत घालते.
[ सरस्वतीबाई अस्सयपणे आपल्या नवऱ्याकडे बघतात. तेव्हा विद्याधरपंत आपल्या नजरेच्या खुणेनं विद्या सांगते, आहे. त्याप्रमाणे ते करायला सांगतात. सरस्वतीबाई विद्याच्या हातून बाहुली घेतात. तशी विद्या बाथरूमच्या दिशेने जाऊ लागते. तेव्हा तिच्या पाठमोरीआकृतीकडे पाहून- ]
सरस्वती : अरे, देवा ! का ही परीक्षा आरंभीली आहेस आमची ?
विद्याधरपंत : सरू, अग आपलंच नाणं खोटं निघालं, त्याला देव कार करेल. बरं?
सरस्वती : काहीतरीच काय बोलताय ?
विद्याधरपंत : मग तूच मला सांग असं काय पाहिलं, विद्याने त्या खोट्या शिक्यात?
सरस्वती : अहो, असं काय बोलताय ? कसा असला तरी नवरा आहे तो तिचा !
विद्याधरपंत : हो, मान्य आहे. पण नवऱ्याने नको का त्याचे कर्तव्य पार पाडायला ? का फक्त बायकानीच मक्ता घेतलाय का सर्व कर्तव्य पार पाडण्याचा ? आता हेच बघ ना,आपली विद्या त्या करंट्यावर जीवापाड प्रेम करते. पण त्या हरामखोराला त्याचं आहे का काही?
सरस्वती : अहो, शिव्या काय देताय, जावई आहे तो तुमचा.
विद्याधरपंत :अग, जावई आहे, म्हणूनच गय करतोय मी त्याची ! ज्याला दहा हजार रूपयेही इस्पितळात भरता येत नाही. त्याची लायकी ती काय? बायकोला इस्पितळात ऍडमिट करून स्वतः मात्र पळून गेला. पळपुटा कुठचा ? जर माझ्या तावडीत सापडला असताना, तर चांगलीच खरडपट्टी काढली, असती मी त्याची !
सरस्वती : पळाला नसेल हो, काहीतरी समजण्यात गफलत करताय तुम्ही !
विद्याधरपंत : माझी गफलत मुळीच नाही. तो पळपुटा आणि ढोगी आहे, हेच सत्य आहे.
सरस्वती : बरं, बरं ! आता जरा शांत रहा. विद्या बाथरूम मद्ये आहे, याचं जरा भान ठेवा.
विद्याधरपंत : अग, तिच्यामुळेच तर माझे हात बांधले गेलेत.
[ विषय बदलण्याच्या हेतूने ]
सरस्वती : तुम्हांला आज ऑफिसला नाही, जायचय का?
विद्याधरपंत : जायचं आहे तर ---- जा माझा टिफीन घेऊन ये, लवकर. मला उशीर होतोय.
सरस्वती : हो, भरून ठेवलाय. आलेच घेऊन.
[ सरस्वतीबाई आत स्वयंपाक घरात जातात. आणि टिफीन घेऊन येतात. आणि त्यांच्या हातात देतात. तसे ते बाहेर जातात. सरस्वती स्वयंपाक घरात जायला वळतात. तोच विद्या प्रवेश करते.
विद्या : मंम्मी माझं बाळं कुठं आहे गं ?
सरस्वती : [ टेबलावर ठेवलेली बाहुली उचलून तिच्या हातात देत]
बाळं, हे बघ तुझं बाळ.
विद्या : [ बाहुलीला हातात घेऊन ] हे काय गं मंम्मी बाळाला अजून कपडे नाही घातलेस ? उघडेच ठेवलेस त्याला ?अश्यानं आजारी पडायचं माझं पोरं ! उगी उगी रडू नकोस बाळ, मी तुला कपडे घालते हं ! तुझ्या आजीनं तुला उघडच ठेवलं. पण मी घालते हं कपडे!
[ असं म्हणतच बाहुलीला घेऊन ती आत जायला वळते. पण तेवढ्यातं तिला काही तरी आठवलं तशी ती थांबते. नि आपल्या आईकडे वळून पाहत ]
मंम्मी मघाशी दादाचा फोन आला होता ना, गं ?
सरस्वती : होय बाळ !
विद्या : मग काय म्हणाला दादा ? [ सरस्वतीबाईना काही बोलावं चटकन सुचलं नाही, म्हणून त्या गप्पच राहील्या. ] अग, मंम्मी काय म्हणाला दादा ते सांग ना ? माधव सापडले नाहीत. का?
सरस्वती : नाही अजून!
विद्या : नक्कीच माझ्यावर रागवून गेले असतील, कुठंतरी निघून.
सरस्वती : अग, पण असं का करतील ते ?
विद्या : अगं, मंम्मी मी न सांगताच आले, म्हणून रागवलेत ते माझ्यावर.
सरस्वती : बाळ, नको दुःखीकष्टी होऊस बरं तू ! येतील बरं ते.
विद्या : नाही मंम्मी ! खोटी समजूत काढू नकोस तू माझी ! ते नाही येणार कधीच ,नाही येणार.
[ असं म्हणतच रडत आत निघून जाते. तिच्या पाठमोरी आकृती पाहत -]
सरस्वती : देवा, कशी रे दया येत नाही तिची तुला? का कठोर परीक्षा घेतो आहेस तिची तू ? नको अंत पाहूस रे तिचा आता ! [ असं म्हणतच आत जाणार असते. तेवढ्यातच दारावरची बेल वाजते. तश्या त्या दरवाजाकडे वळतात. आणि दरवाजा जाऊन उघडतात. दरवाजात पराग उभा असतो. त्याला पाहून] ये रे बाबा आत ये.
पराग : [ प्रवेश करून] काकू स्वप्नील आहे का घरात ?
सरस्वती : घरात नाहीये तो, मुंबईला गेलाय.
पराग : [ आश्चर्याने ] मुंबईला गेलाय.
सरस्वती : हो !
पराग : का पण?
सरस्वती : विद्या आलीय ना तेव्हा---
पराग : [ हर्षभराने] विद्या आलीय?
सरस्वती : हो !
पराग : किती दिवस झाले तिला इथं येऊन?
सरस्वती : दोन दिवस झालेत तिला इथं येऊन.
पराग : कशी आहे ती? म्हणजे खुशाल, तर आहे ना?
सरस्वती : कशाची खुशाल बाबा फार वेडी झाली आहे ती!
पराग : वेडी झाली; पण कशी? तिचा नवरा सोडून गेला का तिला?
सरस्वती : नवरा सोडून नाही गेला रे,तर ही सोडून आली नवऱ्याला.
पराग : का ? दोघांचं भांडण वगैरे झालं होतं का?
सरस्वती : नाही रे बाबा, भांडण नव्हते झालं दोघांचं! विद्याला बाळंतपणाच्या वेदना सुरु झाल्या. म्हणून त्यानं तिलां प्रसुदीसाठी इस्पितळात अँडमीट केलं. पण ऑफरेशन करण्यासाठी! त्याच्याजवळे पैसे नव्हते. म्हणून तो पैशांचा बदोबस्त म्हणून जो गेला परतलाच नाही परत.
पराग : पैशांची सोय झाली नसेल किंवा पैसे भरायला जमणार नाही, म्हणून पळून गेला असेल, तो कदाचित !
सरस्वती : ते आता कसं कळणार ? काय खरं नि काय खोटं?
पराग : पण मग विद्याचंऑफरेशन कसं झालं?
सरस्वती : त्याची वाट पाहून शेवटी विद्यानं ह्याना फोन केला.
पराग : अच्छा म्हणजे नंतर काकानी ऑफरेशनसाठी पैसे भरले ?
सरस्वती : हां ! पण विद्याचं बाळ गेलं ना ?
पराग : अरेरे फार वाईट घडलं.
सरस्वती : ते तर घडलंच, पण त्याहून एक वाईट गोष्ट घडली. आणि ती गोष्ट म्हणजे विद्याच्या डोक्यावर परिणाम झाला. तिनं आपल्या नवऱ्याचा ध्यास घेतलाय, शिवाय ती आता बाहुलीलाच आपलं आता बाळ समजू लागली. काय करावं ते मला सुचत नाहीये. पोर माझी हसायचं पण विसरून गेली.
पराग : फार वाईट घडलं.
सरस्वती : काय करायचं आता ----आपल्या नशीबाचे भोग आहेत म्हणायचे ! ते दुसरं काय ?
पराग : मग काय स्वप्नील विद्याच्या नवऱ्याला शोधायला गेला का मुंबईत ?
सरस्वती : हो काय करणार पोरीनं ध्यासच घेतलाय त्याचा !
पराग : पण डॉक्टराचं काय म्हणणं आहे ?
सरस्वती : डॉक्टर हेच म्हणाले की, तिच्या नवऱ्याला शोधून आणा. ती आपोआप ठीक होईल.
पराग: अच्छा! म्हणून स्वप्नील गेला मुबईत.
सरस्वती : हां ! मग दुसरं काय करणार ? एकेक उपाय करून पहायलाच हवा ना?
पराग : हो ! तेही बरोबर, पण एवढ्या मोठ्या मुंबईत शोधणार कसं तो त्याला?
सरस्वती : तेच तर !
पराग : मी विद्याला भेटू शकतो का आता ?
सरस्वती : हां जाऊन भेट --- नको थांब मी अगोदर ती काय करते आहे ते पाहते. नि तिलाच पाठवते बाहेर. आणि तुझ्यासाठी मी चहा पण टाकते करायला. [जातात. पराग तिथल्या टेबलावरील एक मासिक उचलतो नि सोफ्यावर बसून वाचत असतो. तेवढ्यात विद्याचं बाहेर येते. परागला पाहून ]
विद्या : परागदादा कसा आहेस तू?
पराग : [ उठून उभा राहत ] एकदम फाईन ! पण तू कशी आहेस?
विद्या : मी कशी दिसते तुला ?
[ परागला काय बोलावे ते सुचेना. म्हणून विषय बदलण्याच्या हेतूने ]
मी ना तुला एक गंमत सांगणार आहे.
विद्या :गंमत -- आणि ती कसली रे ?
पराग : आहे आपली अशीच ! पण तू हसणार असशील, तर मी नाही सांगणार बुवा !
विद्या : अशी काय गंमत आहे ती, सांग बरं ?
पराग : अग, आज सकाळी आई गेली गाईचं दुध काढायला.
विद्या : मग त्यात काय ? ते तर सगळेच काढतात.
पराग : अग, हो ! पण पुढंची गंमत काय झाली ती तर ऐक.
विद्या: बरं, सांग.
पराग : आईनं, गाईच्या कासेखाली तिचं वासरू सोडायच्या ऐवजी म्हैसीचा रेडा सोडला.
विद्या : काय सांगतोयेस, खरंच का?
पराग : अग हां !
विद्या: मग गाईनं काय केलं ?
पराग : गाईनं काय केलं असेल ,सांग बर तूच !
विद्या : काय केलं असेल म्हणजे ? लाथ मारली असेल. दुसरं काय करणार ती ? पण आईला कळलं नाही रे कसं ?
पराग : अगं गोठ्यात अंधार होता ना? म्हणून दिसलं नाही आईला !
विद्या : तेव्हा खूप मजा आली असेल ना रे ?
पराग : हां ना ! माझं हसून हसून पोट दुखलं.
विद्या : खरंच खूप मजा येत ना असं काही घडलं की !
पराग : हो ना ?
[ सरस्वतीबाई चहा घेऊन येतात. दोघांना हसताना पाहून त्यानाही बरं वाटतं ]
सरस्वती : विद्या तू चहा घेणार का थोडा ?
विद्या : मला नको मंम्मी ! तू परागदादाला दे तो चहा. मी बाळ उठलाय का बघते. [ जाते.]
सरस्वती : थॅक्स पराग !
पराग : थॅक्स कशाबद्दल ?
सरस्वती : आल्यापासून आज जराशी ती हसली.
पराग : तिला हसवण्यासाठी मीही फेकली !
सरस्वती : म्हणून आभार मानते मी तुझे !
पराग : असं नका बोलू काकू ! मी तिला आपली बहीणच मानतो ! तेव्हा तिच्यासाठी मला काही करावं लागलं तर ते मी आनंदाने करेन.
सरस्वती : एवढं म्हटलंस ! त्यातच सर्व भरून पावलं रे बाबा !
पराग : बरं मग मी येऊ आता ?
सरस्वती : असा येत जा रे कधी कधी ! जरा आम्हांलाही बरं वाटेल.
पराग : हो येईन ना ?
[ पराग बाहेर जातो. तश्या देखील स्वयंपाक घरात निघून जातात. तेव्हा रंगमंचकावर प्रकाश मंदावत जातो. आणि काळोख होतो. क्षणभर वेळानं प्रकाश होतो, तेव्हा पंधरा दिवसाचा काळ लोटलेला असतो. विद्याधरपंत विद्याला वैध्यकिय तपासणीसाठी इस्पितळात घेऊन गेलेले असतात. ते तपासणी करून घेऊन येतात. वेळ : रात्रीचे नऊ वाजलेले असतात. दरवाजावरील बेल वाजते. तश्या सरस्वतीबाई जाऊन दरवाजा उघतात. ]
सरस्वती : काय म्हणाले डॉक्टर?
विद्याधरपंत: सांगतो. हिला अगोदर हिच्या खोलीत नेऊन सोड.
विद्या : अगं आई मला काहीच झालंलं नाही पप्पा उगाचच माझी काळजी करत राहातात. मी आता लहान आहे का ?
सरस्वती : हो गं माझ्या लाडक्या लेकी तू लहान नाहीयेस, चल. आराम कर आपल्या खोलीत.
विद्या : अगं , आई मी इथं आल्या पासून आरामच तर करतय. तू मला काही कामच करू देत नाहीयेस. तुला माहीतेय मी मुंबईला लोकांची भांडी घासली. आणि धुणी पण धुतली, पण खरं सांगायचं तर मंम्मी मला ना त्यात फार समाधान मिळे. कारण आपण आपल्या नवऱ्यासाठी काही पण करायला तयार असतो. नाही का ?
सरस्वती : होय बाळ खरांय तुझं !
[ अचानक तिला आपल्या बाळाची आठवण होते तशी-]
विद्या : मंम्मी माझं बाळ उठला होतं का दुध प्यायला ?
सरस्वती : हो, उठलं होतं! पण दुध पिलं तसं लगेच झोपलं.
विद्या : अगं, मंम्मी तसं करतं ते लबाड ! नुसतं झोपून न झोपून राहतं दिवसभर. आता अशीच जाते नि, उठवते मी त्याला. म्हणजे आता थोडा खेळला तर रात्रीचा चांगला झोपेल तरी ! नाही का मंम्मी ?
सरस्वती : होय बाळ. जा उठव त्याला. [ जाते.] हं ! आता बोला, काय सांगितले डॉक्टरनं ?
विद्याधरपंत : डॉक्टर म्हणाले आपली विद्या मनोरूग्ण झाली आहे. औषधाने बरो होणार नाही ती !
सरस्वती : मग कशाने बरी होईल ती?
विद्याधरपंत : डॉक्टरांनी तिच्या नवऱ्याला शोधून आणावयास सांगितले. म्हणजे त्यांचे म्हणणे असं आहे की, ती आपल्या नवऱ्याला पाहताच बरी होईल.
सरस्वती : आता तिच्या नवऱ्याला कुठून आणावयाचं शोधून ?
विद्याधरपंत : हो ना ! तेच तर म्हणालो मी डॉक्टरला.
सरस्वती : मग डॉक्टर काय म्हणाले ?
विद्याधरपंत : मग ती कधीच बरी होणार नाही. कारण या आजारावर दुसरा उपाय नाहीये.
सरस्वती : [ एकाएकी रागवत ] हे सारं ना , तुमच्यामुळे घडलं.
विद्याधरपंत : सरू ss काही वाट्टेल ते आरोप करू नकोस तू माझ्यावर.
सरस्वती : मग खोटं आहे का ते? नाही म्हणजे, तिच्या नवऱ्याला तिच्या पासून दूर कुणी केलं ? तुम्हीच ना ?
विद्याधरपंत : अगं , पण ते मी मुद्दाम केलं का ? तेव्हा माहीत होतं का मला ? की असं पुढं होणार आहे ते.
सरस्वती : मग तिच्या नवऱ्याला शोधून का नाही आणत तुम्ही ?
विद्याधरपंत : अगं, पण त्याला शोधायला कमी प्रयत्न केले का आम्ही ? आणि अजून शोध घेतोयेच आहे, पण नाही सापडत आहे, त्याला काय करणार आम्ही ? मला तर वाटतय की त्याला पैशांची सोय करता आली नाही, म्हणून पळून गेला असेल तो कुठंतरी !
सरस्वती : अहं ! असं नसेल मला वाटतं कुणीही पैसे दिले नसतील त्याना.
विद्याधरपंत : हो ! लोक फुकट वाटत बसले आहेत पैसे रस्त्यावर.
सरस्वती : तुमचं आपलं काहीतरीच हं !
विद्याधरपंत : काहीतरी नाही ----खरं तेच बोलतोय.
सरस्वती : [वैतागून] जाऊ द्या हो, तुमच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये.
विद्याधरपंत : कसा अर्थ नाही ?
सरस्वती : [ विषयातर करत] जाऊ द्या हो, फुकटच वाद घालत बसू नका. त्यापेक्षा त्यांच्या तपासाचं बघा. त्याच्या नुसत्या ध्यासानं पार वाळून गेलीय माझी पोरं! सदानकदा त्याचच नाव तिच्या मुखी !
विद्याधरपंत : अगं , खरं प्रेम केले होतं तिनं त्याच्यावर. पण त्याला त्याचं आहे का काही ? मला तर वाटतं त्यानं प्रेमच नव्हते. तिच्यावर फक्त प्रेमाचं नाटक केलं होतं त्यानं.
सरस्वती : असं कशावरून म्हणता ?
विद्याधरपंत : मग मला सांग, तिला एकदा पण भेटायला का नाही, आला तो? इतके दुभळे प्रेम होते का त्याचे?
[ तेवढ्यातच विद्या बाहेर येते तिला पाहून ते दोघेही गप्प राहतात. ]
विद्या : मंम्मा-पप्पा तुम्ही दोघं बोलायचं बंद का झाले मला पाहून ?
सरस्वती : तसं काहीही नाही बाळ.
विद्या : खरं सांगतेस?
सरस्वती : हो, बाळ!
विद्या : [ तिला अचानक माधवची आठवण होते, तशी -] मंम्मी आले, का गं माधव ?
सरस्वती : नाही ना, बाळ !
विद्या :अजून कसे गं आले नाहीत ?
सरस्वती : निरोप पठवलाय त्याना लवकरच येतील ते.
विद्या : [ हर्षभराने] खरं सांगतेस मंम्मी !
सरस्वती : हो,अगदी खरं !
विद्याधरपंत : [ विरोध करत] अगं, खोटं का सांगते आहेस ? खरं सांगून टाक ना तिला.
विद्या : म्हणजे मंम्मी तू मला खोटं सांगते आहेस तर !
सरस्वती : नाही गं, बाळ मी खोटं का सांगेन तुला ?
[ विद्याला आपल्या आईच्या सांगण्यावर विश्वास होत नाही. तसा ]
विद्या : पप्पा तुम्ही सांगा, बरं! खरं काय आहे ते !
विद्याधरपंत: विद्या बाळ आम्ही शोध घेतोय त्याचा ! पण अद्याप यश आलेलं नाहीये. म्हणजे तो सध्या कुठं राहतोय ते माहीत नाहीये.
विद्या : आम्ही धारावीला राहात होतो,असं मी मागेच सांगितले. होते ना तुम्हांला पप्पा !
विद्याधरपंत : अगं , हो ! पण तू दिलेल्या त्या पत्यावर सुध्दा तुझा भाऊ जाऊन शोधून आलाय. पण तो तेथे आता राहात नाही.
विद्या : कदाचित ते रागवून गेले असतील माझ्यावर, दुसरीकडे रहायला. मी त्याना न सांगताच आले होते ना, त्याचाच राग आला असेल त्याना.
सरस्वती :बरं, बरं ! तो पत्ता शोधून काढू आम्ही ! तू अजिबात चिता करू नकोस, बाळ.
विद्या : मंम्मी ! खोटी समजूत काढू नकोस तू माझी ! ते आता येणार नाहीत कधीच !
[ रडतच आत जाते.]
सरस्वती : रडवलेत ना पोरीला ! काय मिळाले तुम्हांला---- खरे सांगून?
विद्याधरपंत : अगं, पण सत्यापासून अवगत करायलाच पाहिजे तिला. अशी किती दिवस खोटी आश्वासन देत राहाणार ना आपण ?
सरस्वती : दुसरा उपाय आहे का काही ?
विद्याधरपंत : अमेरिकेला घेऊन जातो मी तिला. तेथे मनोरूग्ण रूग्णांनाही सुधारविणारे मोठमोठे स्पेशालिस्ट आहेत.
सरस्वती : काहीही फारदा होणार नाही त्यांचा !
विद्याधरपंत : ते का?
सरस्वती : अहो तिला नवऱ्याचा ध्यास लागलाय. तिला फक्त तिच्या नवऱ्याला भेटवा, आपोआप ठीक होईल ती.
विद्याधरपंत : अगं , पण त्याला सुध्दा शोधावयाचे प्रयत्न सुरु आहेत ना ?
सरस्वती : बक्षीस लावा वर्तमान पत्रात जाहिरात द्या. काही वाट्टेल ते करा. पण तिच्या नवऱ्याला शोधून आणाच !
विद्याधरपंत : हो, तेवढेच आता करायचे बाकी आहे, तेही एकदा करून टाकतो. म्हणजे दोषाला कारणीभूत नको व्हायला. [ स्वप्नील ला हांक मारतात.] स्वप्नील जरा बाहेर ये.
स्वप्नील : [ आतून ] हो, आलो, आलो. [ बाहेर येऊन-] काय पप्पा?
विद्याधरपंत : तू आजच्या वृत्तपत्रात जाहिरात दे. आणि त्या जाहिरातीत असं लिही की, माधव जिथं कुठं असाल, तेथून ताबडतोब विद्याच्या घरी निघून यावे. विद्या आतुरतेने वाट पाहत आहे तुमची ! कुणीही रागवणार नाही आहे तुमच्यावर. आणि दुसरी जाहिरात अशी दे की, जो कोणी माधवची माहिती देईल, त्याला पाच लाखाचे बक्षीस दिले जाईल.
स्वप्नील : ठीक आहे, पप्पा! मी आताच वृत्तपत्रात जाहिरात देवून टाकतो.
[ असं बोलून त्याने आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढला. आणि फोन करण्याच्या निमित्ताने बाहेर गेला.]
विद्याधरपंत : [ आपल्या पत्नीकडे पाहून -] आता झालं ना तुझं समाधान ?
सरस्वती : हो, झालं ना ! किती चांगले आहात हो तुम्ही !
विद्याधरपंत : आता ना,मघाशी तर कसाई वाटलो मी तुला.
सरस्वती: कधी -कधी कसाई सारखेच वागता, म्हणून म्हणावे लागते मला.
विद्याधरपंत : अगं , कसाही असलो तरी, बाप आहे मी तिचा. पोरीची तळमळ मला कळत नाही, असं म्हणायचय का तुला?
सरस्वती : तसं म्हटलं का मी ?
विद्याधरपंत : बरं, जाऊ दे आता !
[ स्वप्नील आत येतो.]
सरस्वती : केलास का रे फोन ?
स्वप्नील : हो !
सरस्वती: आता अजून एक काम कर.
स्वप्नील: काय काम करू ते सांग.
सरस्वती : तू तुझ्या सासूरवाडीला जा. आणि तुझ्या बायकोला घेऊन ये.
स्वप्नील : अगं, पण मंम्मा तिची आई आजारी आहे, म्हणून गेली आहे ना, ती माहेरी आपल्या ?
सरस्वती : तिची आई नेहमीच आजारी असते. मग काय ही कायम माहेरीच राहणार का ?
विद्याधरपंत : अगं राहू दे ना ,तसं पण तिचे दिवसही भरत आलेत बाळंतपणाचे ! बाळंत झाली की येईलच ती आपल्या घरी !
सरस्वती : बाळंतपण आणि तिच्या घरी----अजिबात होऊ देणार नाही मी !
विद्याधरपंत : का होऊ देणार नाहीस ? तसं पण पहीलं बाळंतपण माहेरीच केलं जातं ना ?
सरस्वती : हो, पण मागच्यावेळीची आठवण आहे ना, तिच्या निश्काळजीमुळे माझा नातू दगावला.
स्वप्नील : [ समजावण्याच्या स्वरात] अग मंम्मी ! तो एक अपघात होता, मुद्दाम नाही केलं तिनं.
सरस्वती : तरी पण मी अजिबात धोका पत्करू इच्छित नाही. तू तिला इथं घेऊन ये बस्स !
स्वप्नील : ठीक आहे, मी उद्या जाईन मी तिकडे.
विद्याधरपंत : बरं, आता माझ्यासाठी एक चहा आण जा.
सरस्वती : हो, आणते.
[स्वयंपाक घरात जाते. तसे स्वप्नीलकडे पाहून]
विद्याधरपंत : तू अजिबात लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडे. तू फक्त जाऊन ये तुझा सासरवाडीला.
स्वप्नील : पप्पा तुम्हांला, पण पटतेय ना हे ?
विद्याधरपंत : हो, रे ! पण तिला कसं समजविणार. तुला तर माहीत आहेच ना की, तिच्या मनात काही नसतं. ती फक्त बोलेल,पण तेवढ्या पुरतच.
स्वप्नील : पण पप्पा मी जर तिला घेऊन आलो नाही, तर मंम्मी रागवणार तर नाही ना ?
विद्याधरपंत : नाही रागवणार. आणि समजा रागवलीच, तर मी आहे ना तिची समजूत काढायला. तू एकदम निश्चित रहा. ( माडीवर निघून गेले.)
स्वप्नील : ( स्वतःशीच) कसं सांगू मंम्मी-पप्पा तुम्हाला ? विद्याच्या वेडसरपणामुळे स्वप्नाली या घरी यायलाच तयार नाही. तिचं म्हणणं आहे की, आपल्या बाळावर तिच्या वेडेपणाचा दुष्परिणाम होईल. पण मला हे कळत नाही की, बाळाचा विद्याच्या वेडसरपणाचा संबंध काय? खरंच असं होऊ शकतं का? काही कळत नाही. काय करावं, तेही सुचत नाही. देवा, आता तूच आता मार्ग काढ, यातून ? (आपल्या खोलीत निघून गेला. आणि रंगमंचकावर काळोख होतो.)
( दिगंबरपंत किर्लोस्करांचे घर,घरची सजावट एका श्रीमंत माणसाला शोभेल अशीच पाच वर्षांचा कालावधी लोटलेला असतो.रंगमंचकावर प्रकाश होतो तेव्हा समोरच्या खिडकीच्या पलिकडे एक पाठमोरी स्त्री उभी आहे,
तिच्या सोबत दिगंबरपंत बोलत आहेत असे दिसते.त्याच वेळी तेथे श्याम येतो.वय ३० वर्षे अंदाजे,घरचा नोकर,प्रवेश
करतो खिडकी जवळ उभा राहून आतले संभाषण ऐकण्याचा
प्रयत्न करतो )
देवकी : ( आतून) अहो,ऐकलंत का ?
दिगंबरपंत : हां,बोल काय म्हणणे आहे,तुझं ?
देवकी : बरेच दिवसा पासून तुम्हाला विचारीन असं म्हणतेय
पण ध्यानातच राहात नाही माझ्या.
दिगंबरपंत : असं काय विचारायचं तुला ?
देवकी : आपला श्रीधर राज सारखा कसा दिसतोय?
खरं म्हटलं तर तो तुमच्या सारखा नाहीतर माझ्या सारखा
दिसायला हवा ना , पण तो दिसतोय राज सारखा. हे ,हो कसं घडलं.?
दिगंबर : देवाची करणी दुसरं काय ? ( स्वगत ) आता काय करू बरं ? आता हिला कसं सांगू की तो मुलगा राजचा आहे
तर राज सारखाच दिसणार ना ?
देवकी : काय हो ? अहो,कायम विचारते मी ?
दिगंबर : ऐकलं.
देवकी : मग उत्तर का देत नाहीत तुम्ही माझ्या प्रश्नाचे ?
दिगंबर : काय उत्तर देऊ ? ज्या प्रश्नांचे उत्तर मलाच माहीत
नाही.त्या प्रश्ननांचे उत्तर मी काय बरं देऊ मी तुला ?
देवकी : पण मी काय चुकीचे बोलतेय ?
दिगंबर : असं म्हटलं का मी ?
( तेवढयातच बाहेरून माधव प्रवेश करतो.आणि श्याम भडकतो)
माधव : काय रे भिंतीला कान लावून काय ऐकत होतास ?
श्याम : काही नाही.आपले हे......
माधव : आपले हे म्हणजे काय ?
श्याम : ते जाऊ दे. तुमचं काय काम आहे ते सांगा.
माधव : ( आठवल्यागत ) अरे,हो विसरलोच होतो मी !
( श्यामच्या हातात देत) ही चिठ्ठी मालकांना दे.आणि त्यांना सांगा की मी आज पासून त्यांचे काम सोडलं.
श्याम : काम सोडलं ? पण का ?
माधव : ते जाणून घेणं तुझ्या हिताचे नाहीये. तू फक्त ही चिठ्ठी मालकांना दे बस्स!
श्याम : ती देईनच ,पण काम का सोडलं म्हणून विचारले तर
काय सांगू ?
माधव : ह्या चिठ्ठीत काम सोडल्याचे कारण लिहिलं आहे,
तेंव्हा ते काय समजायचे ते समजतील.येऊ मी.
श्याम : पण मी काय म्हणतो,तुम्ही इथं पर्यंत आलातच आहात तर भेतूनच का जात नाही.
माधव : नाही,नको भेटून अजून प्रश्न गुंता गुंतीचे होतील.
म्हणून त्याना न भेटताच निघून जाणे हेच योग्य !
( बाहेर जातो.नि आतून दिगंबर प्रेवेश करतात.)
दिगंबर : आता कोण बोलत होते तुझ्या बरोबर ?
श्याम : ते होय...
दिगंबर : राज आला होता का ? कारण मला त्याच्या आवाजा
सारखा आवाज ऐकू आला म्हणून..
श्याम : हो,राजच आला होता,आणि तुमच्यासाठी त्याने चिठ्ठी
दिली आहे बघा.
दिगंबर : आन बघू.( श्याम त्यांच्या हातात चिठ्ठी देतो.आणि
ते घेतात ) हे बघ,तिच्या पालंगावरील चादर मेली झाली आहे,ती बदल. मी असलाच ही एवढी चिठ्ठी वाचून. ( श्याम आंत जातो तशी ते चिठ्ठी वाचतात.) पत्रास कारण की मी
हे शहर सोडून जात आहे.परंतु तुम्हाला न सांगताच जात आहे.म्हणून क्षमा असावी.तुम्हाला पुन्हा माझं तोंड दाखविणार नाही.जाण्याचे कारण तुम्हाला माहीत असेलच,
तरी पण सांगतो,श्रीधरचा चेहरा हुबेहूब माझ्यासारखा दिसत
असल्याने लोकां मध्ये म्हणजेच कंपनीतल्या साऱ्या कामगारां मध्यें चर्चेचा विषय बनला आहे.म्हणून मला इथून जाणं भाग
आहे.पुन्हा भेट होईल असे वाटत नाही.म्हणून माझ्या हिस्साचे प्रेम श्रीधरला आपणच द्यावे. आपला विश्वासू सेक्रेटरी राज
शेवटी घडू नये तेच घडले.पण आता एक बरं झालं.राज या पुढे या घरात दिसणार नाहीये.पण देवकी पासून सत्य फार दिवस लपवून ठेऊन चालणार नाही.तिला कधी न कधी
सांगावे लागणारच आहे मग आज का नाही ? ( देवकीच्या खोलीत जातात. तसा श्याम देवकीच्या खोलीत बाहेर येतो.)
श्याम : ( प्रेक्षकांना उद्देशून) आज काल शेजारी पाजारी सुध्दा
मालकीनी बद्दल जे बोलताहेत त्यात काहीतरी तत्य असायला पाहीजेल त्याशिवाय लोक बोलताहेत ? नाहीतर मला सांगा ना,राज हे घर सोडून का गेला.त्या पत्रात काय लिहिलंय ते ऐकायलाच हवं. ( भिंतीला कान लावतो )
देवकीबाई : कुणाचे हो पत्र ?"
दिगंबरपंत : राज चे.
देवकीबाई: काय म्हणतोय राज ?
दिगंबरपंत : ( पत्र वाचून दाखवितात.)
देवकीबाई : पाहिलंत.... मला ज्याची भीती वाटत होती,शेवटी
तेच घडलं.
दिगंबरपंत : हो.
देवकीबाई : मला वाटतं आपण हे शहर सोडावे.
दिगंबरपंत : आणि कोठे जायचे ?
देवकीबाई : पुण्याला जाऊ.तेथे आपले कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे ना ?
दिगंबरपंत : होय.
देवकीबाई : मग तिथं राहायची पण सोय करा.
दिगंबरपंत : हो , मला ही असंच वाटतं. पुण्याला आपली नवीन कंपनी सुरू होणार आहे तिथंच राहायला जाऊ. म्हणजे लोकांच्या तोंडाला आपोआप कुलुपही लागेल. आणि आता राज ही आपल्या सोबत नाहीये.म्हणजे कुणाला कळणार ही नाही की श्रीधर आपला मुलगा नाहीये.हे राज राजच राहील.
श्याम : शेवटी माझा संशय खरा ठरला.श्रीधर राजचाच मुलगा आहे.
(रंगमचकावर काळोख होतो.)
प्रवेश तिसरा
रंगमंचकार प्रकाश होतो, तेव्हा पंधरा वर्षाचा कालावधी झालेला असतो. क्षणभर रंगमंचकावर कुणीच नसतं. क्षणभराने विद्या प्रवेश करते, तेव्हा तिच्या हातात एक प्लस्टिकची बाहुली असते. टॉवेलने त्या बाहुलीचे अंग पुसत बाहेर येते)
विद्या : आंघोळ घातली बाळाला, आता छान-छान कपडे घालू ! ( बाहुलीला पाडडर लावते. आणि कपडे घालत आपल्या आईला हांक मारते.) मंम्मी दूध गरम करून आण लौकर --माझ्या बाळाला भूक लागली आहे फार ! ( बाहुलीला उद्देशून) हो की नाही बाळ ? ( थोड्यावेळ वाट पाहून ) आजी नाही येत दूध घेऊन बाळाला माझ्या ? आजी कामात असेल चल आपणच जाऊ ! नि दूध घेऊ -- चल तुला दूध भरविते. ( स्वयंपाक घराच्या दिशेने आंत जाते. तसा स्वप्नील आतल्या खोलीतून बाहेर येत)
स्वप्नील : वीस वर्षे झालीत ह्या गोष्टीला ! पण विद्या मध्ये काहीच फरक पडलेला नाही तिच्यासाठी जणू ! कालचीच गोष्ट आहे काय करावं तेच कळत नाहीये.
( विद्याधरपंत माडीवरचा जीना उतरत )
विद्याधरपंत : खराय तुझं ! काय करायचं शिल्लक ठेवलं आहे आपण ?
स्वप्नील : हो सर्व प्रयत्न झाले. पण उपयोग काडीभरचाही झाला नाही. माधवराव कुठं गायब झाले. तेच कळनासं झालय.
विद्याधरपंत : अरे, गायब कसला होतोय! फार मजेत असेल तो ! आणि खरं सांगायचं तर त्याचं प्रेमच नव्हतं मुळी विद्यावर. सारं पैशासाठी प्रेमाचे नाटक केलं होतं त्यानं. पण दौलत हाती नाही, आली, तसं प्रेम ओसरलं त्याचंं!
स्वप्नील : तसं नसेल पप्पा !
विद्याधरपंत : अगदी तसंच आहे.
स्वप्नील : नाही, पप्पा ! असं जर असतं, तर तो विद्या बरोबर पळायला तयार झालाच नसता. शिवाय तुम्ही दिलेली ऑपर त्यानं नाकारली नसती.
सरस्वती : बरोबर बोलतोयेस तू ! ह्याना फक्त पैसा दिसतोय. पोरीची तळमळ दिसत नाहीये.
(इतक्यात आतून
विद्याचा आवाज येतो - माधव थांबा मी आले ' असं म्हणतच विद्या पळत बाहेर येताना दिसते. आणि तशीच पळत बाहेर जाते. )
सरस्वती : अरे, स्वप्नील पाहत काय राहीलास, पकड तिला. ( स्वप्नीलही पळतो, तिच्यामागे ! तश्या सरस्वतीबाई सुध्दा त्या दोघांच्या मागे धावतात. विद्याधरपंत मात्र गोंधळून पाहतच रहातात. जसे भानावर येतात. तसे ते बाहेरच्या दरवाजा पर्यंत जातात. पण तेवढ्यातच बाहेरून
सरस्वतीबाईंचा आवाज ऐकू येतो. - अग, विद्या कुणाच्या मागे धावत होतीस तू?
विद्याचा आवाज- अगं, मंम्मी ! माधव आता इथं कॉफी हाऊस मध्ये कॉफी पीताने मला दिसले.'
सरस्वतीबाई विद्याचा
हात पकडून प्रवेश करत-)
सरस्वती : काय सांगतेस खरंच का?
विद्या : हां, मंम्मी ! खरंच तेच सांगतेय.
सरस्वती : बरं बरं त जरा शांत रहा. तुझा दादा गेलाय ना त्यांच्या कारच्या मागे ! तो काय रिपोर्ट आणतोय ते पाहू हं !
विद्याधरपंत : ( विश्वास न होऊन) अग पण तो खरंच माधवच होता का ? का दुसऱ्या कुणाला पाहिलंस तू ?
विद्या : दुसरा कुणी नाही माधवच होते ते.
सरस्वती : अग पण कसं शक्य आहे?
विद्या : का शक्य नाही? आणि मी माझ्या नवऱ्याला ओळखत नाही, असं होईल का गं मंम्मी ?
सरस्वती : नाही. मला तसं नाही म्हणायचंय.
विद्या : मग ?
सरस्वती : मला इतकेच म्हणायचंय की माधव फार गरीब होते ना ? त्यांच्याकडे एवढी महागडी कार कुठूण आली ?
विद्या : हां ! पहील्यांदा गरीब होते. पण आता श्रीमंत झाले असते तर !
विद्याधरपंत : लॉटरी लागली का ?
विद्या : पप्पा तुम्ही नेहमीच अपमान करताय त्यांचा ! मला नाही आवडणार त्यांचा कुणी अपमान केलेला.
विद्याधरपंत : अगं आता आहे का तो इथं उपस्थित ?
विद्या : ते आत इथं नाहीत, म्हणून काय झालं ? मी तर आहे ना ?
विद्या : बरं, बरं चुकलंच माझं ! आय एम व्हेरी व्हेरी सॉरी !
( तेवढ्यातच स्वप्नील प्रवेश करतो. त्याला पाहून )
विद्याधरपंत : स्वप्नील ,बोल बेटा काय खबर आणलीस ?
स्वप्नील : पप्पा तो माधव सारखा दिसतोय. पण तो माधव नाहीये.
विद्या : खोटं बोलतोयेस तू ! ते माधवच होते, त्यांच्या शिवाय दुसरा कुणी असू शकत नाही.
सरस्वती : बरं, बरं! तू अगोदर शांत हो पाहू !
विद्या : कशी शांत राहू मी मंम्मी हां कशी शांत राहूsss
सरस्वती : हे बघ, ते जर खरोखरच माधव असतील, तर त्याना इथं आणायची जबाबदारी माझी ---मी आणान त्याना !
विद्या : ( हर्षभरीत होत ) तू खरं सांगतेस मंम्मी ?
सरस्वती : हां ! पण त्या अगोदर
मी तुला काय सांगते ते
ऐकशील का जरा ?
विद्या : हो, ऐकेन.
सरस्वती : तू माझ्या बरोबर जरा आंत चल.
विद्या : हो, येते. पण माझ्या माधव ना नक्की आणशील ना शोधून ?
सरस्वती : तुझा विश्वास आहे ना माझ्यावर ?
विद्या : हो, आहे.
सरस्वती : मग चल आंत ! ( दोघीही आंत जातात. त्या दोघीजणी आंत गेल्या तसे-) विद्याधरपंत : आता सांग काय प्रकार आहे हा ? म्हणजे खरंच माधव होता का तो?
स्वप्नील : पप्पा तो फक्त माधव सारखा हुबेहूब दिसतोय. पण तो माधव नाहीये.
विद्याधरपंत : असं कशावरून म्हणतोयेस ?
स्वप्नील : मी भेटलोय त्याना. त्यांचं नाव श्रीधर किर्लोस्कर आहे. आणि त्यांची पुण्या मध्ये 'शीतल इंडस्ट्रीयल प्रायव्हेट ली. कपड्याची कंपनी आहे.
विद्याधरपंत : माझ्या डोक्यात एक आयडीया आली बघ.
स्वप्नील : कोणती आयडीया पप्पा ?
विद्याधरपंत : आपण त्या श्रीधरला विश्वासात घेऊन त्यालाच माधव म्हणून विद्या समोर पेश केलं तर !
स्वप्नीर : कल्पना छान आहे. परंतु यशस्वी करणार कशी ?
विद्याधरपंत : त्यासाठी तुला व्यक्तीश: त्याला भेटावं लागेल. आणि त्यारा कन्वेन्स करावं लागेल.
स्वप्नील : पण तो अँग्री होईल का?
विद्याधरपंत : पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ?
स्वप्नील : ठीक आहे. मी आजच जाऊन भेट घेतो.त्याची ! पाहू तर खरं काय म्हणतोय ते.
विद्याधरपंत : प्रयत्न कर बाकी होणं न होनं ईश्वरच्या हाती !
स्वप्नील : ओके पप्पा !
विद्याधरपंत : बेस्ट ऑफ लक !
( स्वप्नील बाहेर जातो. नि विद्याधरपंत माड़ीवर जातात. क्षणभर रंगमंचकावर कुणीच नसतं क्षणभर वेळानं विद्या प्रवेश करते. हातात माधवचा फोटो आहे ती माधवच्या फोटोशी बोलतेय-)
विद्या : कधी येणार तुम्ही ? मी केव्हाची वाट पाहतेय तुमची ! आज इतक्या जवळ येऊनही आलात नाहीत इथं ? का बरं आले नाहीत ? तुम्हांला न सांगता मी इथं निघून आले, म्हणून रागवलेत का तुम्ही माझ्यावर ? पण तुम्हीच विचार करा ना ? तुम्ही पैसे आणायला गेलेत, ते परत आलातच नाही. किती वाट पाहिली मी तुमची ! शेवटी नाईलाजानं आपल्या बाळाचा प्राण वाचविण्यासाठी पप्पाना फोन केला मी ! आता तुम्हीच सांगा. काय चुकलं माझं ? आपल्या बाळाचा जीव वाचविणं, जरूरीचे नवहते का ? सांगा ना ? का गप्पा आहात तुम्ही ? (रडू लागते. तेव्हा दरवाजात उभ्या असलेल्या सरस्वतीबाई पुढे येऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत )
सरस्वती : उगी उगी नको रडूस पोरी ! तुझ्या नवऱ्याला लवकरच शोधून काढू आम्ही !
विद्या : खरं सांगतेस तू मंम्मी ?
सरस्वती : हो अगदी खरं ! तुझा दादा आणि तुझे पप्पा प्रयत्नांची शिकस्त करताहेत.
विद्या : मग का सापडले नाहीत, अजून ?
सरस्वती : अग, ते कुठं राहतात. ते कुठं माहीत आहे आम्हाला ?
विद्या : अग, मंम्मी ! मघाशी तर आले होते ना, ते कॉफी हाऊस मध्ये ?
सरस्वती : हो !
विद्या : याचा अर्थ ते पुण्यातच कुठंतरी राहत असतील. ना गं मंम्मी ?
सरस्वती : पुण्यात राहत असतील. तर एक ना एक दिवस सापडतील ते.
विद्या : पण ते खरंच येतील का गं मंम्मी ?
सरस्वती : येतील ना ? का नाही येणार ?
विद्या : मी त्याना न सांगताच इथे आले ना म्हणून रागवले असतील ते माझ्यावर.
सरस्वती : रागवले असतील, तर आपण त्यांची माफी मागू ! त्यात काय ?
विद्या : हां ! मंम्मी माफीच मागायला पाहीजेल त्यांची !
सरस्वती : चल आता आपल्या खोलीत. ( सरस्वतीबाई तिला तिच्या खोलीत घेऊन जातात. नि रंगमंचकावर काळोख होतो. जेव्हा पुन्हा रंगमंचकावर प्रकाश होतो. तेव्हा दुसऱ्या दिवसाची दुपार झाली आहे. वेळ : 12 वाजले आहेत. सरस्वतीबाई आणि विदयाधरपंत सोफ्यावर बसले आहेत. तेवढ्यात स्वप्नील प्रवेश करतो. स्वप्नीला पाहून)
विद्याधरपंत : ( उठून उभे राहात ) तुला नक्की खात्री आहे ना श्रीधर किर्लोस्कर येतील याची ?
स्वप्नील : मला खात्रीपुर्वक नाही सांगता येणार परंतु ते फसविणारही नाही, याची खात्री आहे मला.
सरस्वती : मग अजून आले का नाहीत?
स्वप्नील : टाईम तर झालाच आहे, बाहेर जाऊन उभा राहतो. ( बाहेर जातो.)
विद्याधरपंत : तुला काय वाटतं, येईल श्रीधर ?
सरस्वती : येण्याचे आश्वासन दिलंय, म्हणजे नक्की येणार जरा धीर धरा.
विद्याधरपंत : पण विद्याला काही सांगितले नाहीस ना ?
नाही, म्हणजे श्रीधर समज, नाही आला, तर तिला समजविणं मुश्कील होईल. म्हणून---
सरस्वती : इतकी मूर्ख का वाटते, मी तुम्हांला ?
( तेवढ्यातच बाहेर मोटार आल्याचा आवाज ऐकू येतो. )
विद्याधरपंत : आला वाटतं ( उठून खिडकीतून बाहेर डोकावून पाहतात. तेवढ्यातच स्वप्नील आवाज कानी पडतो -मि. किर्लोस्कर , वेलकम टू माय हाऊस !
श्रीधरचा आवाज- थॅकस ! (विद्याधरपंत ते पाहून खूष होत) विद्याधरपंत : या, मि.किर्लोस्कर,आपले स्वागत आहे आमच्या या घरात.
( श्रीधर पुढं होऊन त्या दोघांचेही चरणस्पर्श करतो. तसे ते दोघेही खूष होऊन त्याला आशीर्वाद देतात-)
विद्याधरपंत: देव तुझे भले करो !
सरस्वती : वा ! फार चांगले संस्कार घडवले आहेत तुझ्या आई-वडिलांनी !
श्रीधर : हो, माझे पप्पा म्हणतात की, थोरा -मोठ्याचे आशीर्वाद घेतलेले चांगले असतात.
विद्याधरपंत : खराय !
सरस्वती : तुम्ही आधी बसून घ्या. तोपर्यंत मी तुमच्या चहा-नाश्ताची सोय करते.
स्वप्नील : बसा ना ?
(विद्याधरपंत मोठ्या विश्मयतेने त्याच्याकडे पाहत असतात.)
विद्याधरपंत: ( स्वगत )वीस वर्षापूर्वी पाहीलेला माधव. आणि डोळ्यांसमोर असलेला श्रीधर दोघांमध्ये यत्किचीतही फरक जाणवला नाही. हुबेहूब जणू दुसरा माधवच. मग त्याला पाहून विद्या फसली, तर त्यात नवल नाही.( ते काही बोलणार इतक्यात आतून बाहुलीशी खेळत ' माझा छकुला माझा सोनुला ' असे बोलत बोलतच विद्या बाहेर येते. पण जशी नजर श्रीधरवर पडते. तशी पळतच येऊन श्रीधरला मिठीच मारते. आपल्या आजूबाजूला आपले आई-वडील बसले आहेत. याचे तिला भानच राहिले नाही. पण अकस्मात हल्ल्याने श्रीधर पुरता गोंधळलाच ! अचानक असं काही होईल, याची त्याला यत्किचितही कल्पना नव्हतीच ! तो भांबावलाच. पण लगेच स्वतःला सोडवून घेत. )
श्रधर : अहो,अहो बाई ! असं काय करताय ? सोडा मला.
(असं म्हणताच स्वतःहून त्याला दूर लोटत-)
विद्या : काय म्हणालात मला ? बाई ! अहो, बायको आहे मी तुमची ! हे विसरलात वाटतं.
आठवण करून देते. विद्या माझं नाव आहे. तेव्हा मला विद्याच म्हणा !
( पुन्हा लाडानं त्याच्या जवळ जाऊ लागते. तसा तो मागे हटत )
श्रीधर : अहो, विद्याबाई ! जरा दुरून बोला. म्हटलं वडीलधारी माणसं आपल्या समोर.
विद्या : ( एकदम निरभयपणे ) मग असू देत ना , माझा भाऊ आणि पप्पा तर आहेत त्याना काय लाजायच ?
( ती पुन्हा त्याच्या जवळ जाऊ लागते. तसा तो मागे सरकू लागतो. तेव्हा त्याच्या मदतीला स्वप्नील येत-)
स्वप्नील : अग, विद्या त्याना लाज वाटते. आपल्या आई-पंप्पा समोर. तेव्हा एकांत मध्ये बोल त्यांच्याशी !
विद्या : असं का ? मग चला, माझ्या बरोबर माझ्या खोलीत.
( ओढतच घेऊन जाते, आपुल्या खोलीत.तेव्हा त्याच्या पाठोपाठ स्वप्नील जाऊ लागतो. तसे त्याला आडवत-)
विद्याधरपंत : थांब. जाऊ नकोस तू ! त्यांच्या एकांतवासात भयंकर चिडेल, ती !
स्वप्नील : अहो पण---?
विद्याधरपंत : अजिबात चिता करू नकोस तू ! ती असं काहीही करणार नाही.
स्वप्नील : काही नाही करणार ते ठाऊक आहे मला. पण तिच्या सोबत आंत असलेला तिचा नवरा नाहीये. मघासारखी पुन्हा त्याला मिठी मारली, तर ----- विपरीत घडायला एक क्षण पुरेसा आहे, म्हणून जरा सावधनता पाळतोय इतकेच !
(विद्याधरपंत स्वप्नील आंत जाऊ देत नाही, म्हणून तिच्या खोलीच्या बाहेर भिंतीला कान लावून आतील त्या दोघांचे संभाषण ऐकन्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आतून विद्याचा आवाज ऐकू येतो- आता मला सांगा कुठे होता तुम्ही इतके दिवस ?
तेवढ्यात श्रीधरचा आवाज- कामामुळे वेळ मिळाला नाही. )
स्वप्नील : वा ! छान ! उत्तर दिले श्रीधरने.
विद्याचा आवाज : माझ्या पेक्षा काम जास्त प्रिय आहे का तुम्हाला ?
श्रीधर : तसं नाही. पण काम तर करावेच लागेल ना? नुसत्या प्रेमाने पोट भरेल का आपले ?
विद्या : ( आतून ) पण तुम्ही तर पैशांचा बंदोबस्त करायला गेले, होते ना ?
स्वप्नील : अरे, विद्याच्या ह्या प्रश्नाचे उत्तर श्रीधर नाही देऊ शकणार. मला आंत जायलाच हवं.
( स्वप्नील आंत जातो, तशी विद्या त्याच्यावर रागावत - तू का आलास आंत ? आणि पती-पत्नीच्या एकांतात दुसऱ्या कुण्या माणसानं व्यत्यय आणावयाचा नसतो. हा साधा शिष्टाराही माहित नाहीये तुला ?
स्वप्नील : विद्या मला माफ कर. मी तुझ्या एकातांत व्यत्यय आणला म्हणून. पण माझं आत येणं फार जरूरीचे हाते. जरा बाहेर येशील ?
विद्याधरपंत : आता आणि हा काय घोळ घालतोय, ते देवच जाणे !
विद्या : ( आतूनच) त्यांना तू आता बाहेर कशाला नेतोयेस, इथेच सांग ना काय सांगायचं ते.
स्वप्नील : ( आत मधून ) इथं सांगण्यासारखा नाहीये ते. जरा बाहेर चला ना ?
विद्या : ( आतूनच) बरं, चल. ( दोघेही बाहेर येतात, तसा श्रीधरही बाहेर येतो, तसा स्वप्नील त्याला डोळे मिचकाऊन संकेत देतो की, आता जे काय सांगणार आहे, ते सर्व खोटं आहे. परंतु ते जरूरीचे आहे.)
विद्या : हं ! सांग आता.
स्वप्नील : माधव भावोजी ना मागील जीवनाचे काहीच आठवत नाहीये. कारण मोटार अपघातात त्यांचा स्मृतीभ्रश झाला होता.
विद्या : ( धक्का बसल्यागत ओरडते.) अगबाई ! कुठे ,कधी आणि कसा ?
फार मार तर लागला नाही ना ,?
( त्याला चाचपुन पाहू लागली. )
स्वप्नील : अग विद्या जखमा कधीच भरल्या त्या --आता कशा दिसती त्या ?
श्रीधर : अहो, कार्लेकर
माझ्या विषयी का खोटं सांगता आहात तुम्ही ?
स्वप्नील : पाहीलंस आता त्याना स्वतःचं नावही आठवत नाहीये.
श्रीधर : का नाही आठवत-- माझं नाव श्रीधर आहे.
स्वप्नील : बघीतलेस, त्याना त्याचं खरं नावही आठवत नाही.
( हळूच गप्प राहण्याचा संकेत देतो.)
विद्या : अरे, मग त्याना आठवून द्यायला हवं आपण !
स्वप्नील : हो, पण लगेच नाही. हळूहळ आठवण करून द्या. असं डॉक्टरानी सांगितले आहे.
श्रीध : [ चिडून] अहो, कार्लेकर हा काय प्रकार आहे ? का खोटे सांगताय त्याना तुम्ही, माझ्याबद्दलं ? का खरे सांगून टाकत नाहीयेत त्याना ?
स्वप्नील : ( एका बाजूला घेऊन एकदम हळू आवाजात) सांगणार आहे. पण तुम्हा जरा शांत रहा. प्लीज !
विद्या : काय सांगणार आहेस ?
स्वप्नीला : ( तिला एका बाजूला घेऊन ) मग सांगतो मी तुला सारं ; पण आता जरा शांत रहा. प्लीज !
( श्रीधरकडे पाहून ) बाहेर चला, मी तुम्हांला सारं समजावून सांगतो.
( दोघेही बाहेर जाऊ लागतात. तशी विद्या मध्ये आड येत )
विद्या : त्याना कुठं नेतोयेस इतक्यात ? मी त्यांच्याशी पुर्ती बोलली पण नाही, अजूून !
स्वप्नील : अग मग येतील ते, तेव्हा बोल पाहिजे तेवढे !
विद्या : नाही. आता नेऊ नकोस तू ! त्याना मग सांग, काय सांगायचं ते. मला जरा त्यांच्याशी गप्पा- गोष्टी करू देत. जा तू बाहेर. ( त्याचा हात धरून त्याला दरवाजा बाहेर ढकलून देते. नि दरवाजा बंद करुन घेते. तसा श्रीधर घाबरून पटकन -)
श्रीधर : अहो, विद्याबाई मी जाणार नाही कुठे ! नको दरवाजा बंद करून घेऊ.
विद्या : प्रॉमीस !
श्रीधर : माय प्रॉमीस !
विद्या : मग ठीक.आहे. ( दरवाजा उघडते. स्वप्नील आंत येतो, तशी त्याला सांगते- ) 'पण तू इथं थांबू नकोस. मंम्मी-पप्पा जसे आत गेलेत, तसा तू पण जा आंत ! ( स्वप्नील गेल्या सारखे करतो. नि दरवाजाच्या मागे लपून राहतो. विद्या श्रीधरला सोफ्यावर बसवून )
विद्या : तुम्हांला माहीतेय आपल्याला एक छोटसं बाळ आहे . ( बाहुलीला ती शोधू लागते. ) कुठं आहे माझं ते बाळ ?( तेवढ्यात तिला ते दिसलं श्रीधरला पाहून ती आपलं भान हरपली. नि त्यातच ती बाहुली तिच्या हातून खाली पडली होती, ती पुन्हा उचलून घेते. आणि श्रीधरकडे ती देते. )
विद्या : हे बघा, आपलं बाळ !
श्रीधर : ( स्वगत ) अरे, बाप रे ! कुठ आलोयं आपण वेड्यांच्या बाजारात ? अजून थोड्यावेळ बसलो आपण, तर आपल्याच वेड लागायची पाळी येईल. त्या पेक्षा हिला खरं काय आहे ते सांगून टाकतो, म्हणजे सुंटी
वाचून खोखला जाईल.कसं ? ( उघड) हे बघा, विद्याबाई ! आता मी काय सांगतो ते नीट ध्यान देवून ऐका.
विद्या : काय सांगणार आहात ?
श्रीधर : हे बघा विद्याबाई मी तुमचा माधव नाहीये. माझं नाव श्रीधर आहे. आणि तुमच्या भावाने माझ्याबद्दल मघाशी जे काही सांगितले ते सर्व खोटे आहे. माझा कार अपघात वगैरे काहीही झालेलं नाहीये.
विद्या : ( खुदकन हसली ) खोटे ! साफ खोटे ! माझ्यावर
रागवलात ना तुम्ही ? म्हणून बोलताय ना हे सगळं ?
श्रीधर : ( काकुळतीला येऊन ) छे, हो ! खरं तेच सांगतोय मी माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही !
विद्या :( लाडाक स्वरात) नाव बदलून मला फसवू पहाताय, ना तुम्ही ! पण मी फसणार नाही. ( त्याला अधिकच बिलगुन बसली.)
श्रीधर : ( स्वगत) आता काहीतरी उपाय करून इथून निस्टायला हवे, नाहीतर ही बया सोडेल, असं काही वाटत नाही. ( उघड) ठीक आहे. मीच तुमचा माधव आहे. पण माझा हात सोडा. आणि जरा दुर बसा. ना ,प्लीज!
विद्या : आता मागच्या सारखे सोडून जाणार नाही ना मला ?
श्रीधर : नाही जाणार.
विद्या : खरं सांगताय ना हे ?
श्रीधर : ( उठून उभा राहात) अगदी खरं ! पण मी सांगतो तसे ऐकावे लागेल तुम्हांला, तरच मी राहीण इथं --कबूल.
विद्या : कबूल सांगा काय करावे मी ?
श्रीधर : या बाहुलीला आधी बाजूला ठेवा. आणि ही बाहुली आहें बाळ नाही हे जाणून घ्या. अगोदर.
विद्या : ही बाहुली आहे, तर मग आपले बाळ कुठे आहे ?
श्रीधर : आपले बाळ जन्मताच देवाघरी गेलं.
विद्या : ( मोठ्यानं किंचाळली. ) नाहीsss ( रागाने) खोटं बोलताय तुम्ही! साफ खोटे !
श्रीधर : मी खोटे बोलत नाही, तर तुम्ही खोटं समजत आलात आजपर्यंत !
विद्या मोठ्याने ओरडल्याने सर्वजण पळत बाहेर आले. )
सरस्वती : काय बाळ, का ओरडलीस तू ?
श्रीधर : काही नाही आपल्या बाळा विषयी सत्य ऐकून जरा धक्का बसला.
विद्याधरपंत : म्हणजे तुम्ही तिला खरं सांगून टाकलात ?
श्रीधर : हो, कधीतरी सांगावेच लागले असते, ते त्याना. ते आज कळाले.
स्वप्नील : अहो, पण आजच कशाला सांगितलेत तुम्ही ?
विद्या : ( चवताळून) तुम्ही सगळेजण, खोटारडे आहेत. सर्वानी माझी फसवणूक केली. माझं बाळ देवाघरी गेले, तरी मला कळू दिले नाही, फार वाईट आहेत तुम्ही सारे!
श्रीधर : ( स्वगत ) हिला सत्य सांगून आपण कोणती चूक तर केली नाही ना ?
पण कधी ना कधी सत्य सांगायलाच लागले असते ना ?
विद्या : पण देवाने तरी असं का करावं ? का असा हा अन्याय केला त्याने माझ्यावर ? काय गुन्हा केला होता मी ? कोणत्या अपराधाची शिक्षा, ही मला मिळाली ?
( तिचे सांत्वन कसे करावे हे क्षणभर सुचलंच नाही कुणाला. पण लगेच स्वतःला सावरून -)
श्रीधर : रडू नका, तुम्ही विद्याबाई ! बाळचं ना, दुसरं होईल की आपल्याला.
विद्या : ( डोळे पुसून खूष होत ) खरं ?
श्रीधर : हो, अगदी खरे ! पण----
विद्या : पण काय ?
श्रीधर : मी सांगेन, तसं वागावे लागेल.
विद्या : चालेल. --सांगा. कशी वागू मी ?
श्रीधर : आतापासून असा वेडेपणा करायचा नाही, मंम्मी- पप्पा सांगतील तसंच वागायचं ! कबूल ?
विद्या :कबूल. पण तुम्ही मला सोडून जाणार तर नाही ना ---- पुन्हा ?
श्रीधर : नाही जाणार.
विद्या : मग रोज येणार ना ? तुम्ही मला --भेटायला इथं ?
विद्या : होय. रोज येईन मी !
विद्या : म्हणजे तुम्हांला आता सारे आठवू लागलय ना ?
श्रीधर : होय.
विद्या : ( इतरांकडे पाहत-) पाहीलंत मंम्मी-पप्पा आता ह्याना सारं आठवू लागलय.
सरस्वती : होय बाळ.
विद्या : बघितलेस दादा--- त्याना आता सारे आठवलं.
स्वप्नील : होय. फार छान झाले.
विद्या : हो ना ! झाले ना फार छान !
श्रीधर : मी आता जाऊ ?----माझं थोडसं काम आहे बाहेर.
विद्या : हो जा ! पण संध्याकाळी नककी याल ना ? विसरणार तर नाही ना ?
श्रीधर : नाही विसरणार, बरं येऊ मी ?
( श्रीधर जायला वळला. तसा स्वप्नील त्याला हळूच बोलला-)
स्वप्नील : फार आभारी आहे मी तुमचा !
श्रीधर : त्यासाठी आभार मानन्याची काही गरज नाहीये. मी जे काही केलं ते माणूसकीच्या नात्याने केलं. येतो मी ! (जातो. त्यानंतर रंगमंचकावर काळोख होतो. पुन्हा प्रकाश होतो. तेव्हा चार-पाच दिवसाचा कालावधी लोटलेला असतो. वेळ संध्याकाळची ! विद्या दरवाजाकडे नजर ठेवून माधवची आतुरतेने वाट पाहत असते. पण जशी येण्याची वेळ निघून जाते. तसा तिचा धीर सुटत जातो, तसं तिला रडू येते. तेवढ्यात तेथे सरस्वतीबाई येतात. तिला रडताना पाहून -)
सरस्वती : काय झालं बाळ ? का रडतेस तू ?
विद्या : अग, बघ ना मंम्मी ! चार-पाच दिवस झाले तरी आले नाहीत ते. फसविले त्यानी मला.
पुन्हा टाकून गेले ते मला.
सरस्वती : नाही बाळ, येतील ते.
विद्या : नाही. मंम्मी खोटी समजूत काढू नकोस तू माझी ! मी आता काही कुक्कुल बाळ नाही.
( तेवढ्यात दरवाजावरील बेल वाजते. तशी धावतच दरवाजा जवळ पोहोचते. दरवाजा उघडून पाहते, तर तिचा भाऊ आणि वडील आंत येतात.
विद्याचा रडवेला चेहरा पाहून)
स्वप्नील : काय झालं विद्या भावोजी नाही आलेत का आजपण ?
विद्या : नाही ना रे , बघ ना येतो, म्हणून सांगून गेले नि परत आलेच नाहीत ते --
स्वप्नील : बरं बघतो, हं !--- मी कंपनीत फोन करून -----कुठं आहेत ते ?
विद्या : तुला माहित आहे का रे , कुठंल्या कंपनीत काम करताहेत ते ?
स्वप्नील : होय माहितेय मला.
विद्या : मग मला दे ना रे,त्यांचा फोन नंबर मी फोन करून विचारते त्याना !
स्वप्नील : ( स्वगत ) अरे, बाप रे,हिला जर त्यांचा नंबर दिला तर ही सारखी फोन करत बसेल. त्याला मग काय एवढ्या मुश्किलीने घडवून आणलेले काम बिघडून जाईल. नाही. असं होताकामा नये. ( उघडपणे ) अगं भावोजींचा मोबाईल नंबर कुठं आहे माझ्याजवळ.
विद्या : अरे, पण तू आताच म्हणालास ना,की कंपनीत फोन करून विचारतो म्हणून.
स्वप्नील : अग, हो पण तो कंपनीचा फोन नंबर आहे.
विद्या : मग कंपनीत फोन करून विचार ना ,त्याना !
स्वप्नील : हो, आता विचारतो.
सरस्वती : बघ. बाबा तू तरी फोन करून मघापासून सारखी टाकसनी लावली आहे तिनं.
विद्याधरपंत : म्हणजे श्रीधर आपलं काम करणार नाही बहुतेक ! पण असं जर झालं तर फार पंचाईत होईल ? एवढ्या वर्षा नंतर तिच्यात झालेला बदल पुन्हा नाहीसा होईल. आणि कोण जाणे ती पुन्हा नॉर्मल होईल की, नाही ती. छे छे छे ! असं होता कामा नये. कसंही करून त्याला राजी करायलाच हवा.
सरस्वती : काय हो तुम्ही कोणता विचार करताय एवढा ?
विद्याधरपंत : तू अगोदर माझ्यासाठी चहा आण. मग मी तुला सांगतो सारं. ( असं बोलून माडीवर जातात. तोपर्यंत स्वप्नील एका कोपऱ्यात जाऊन श्रीधरला फोन करतो. )
स्वप्नील : ( हळू आवाजात) हॅलोsss
फोनमधून : हां मी श्रीधरं बोलतोय, बोला.
स्वप्नील : तुम्ही आले नाहीत ? विद्या वाट पाहतेय तुमची !
फोनमधून : ते काम आपल्याला जमणार नाही बुवा !
स्वप्नील : का बरं ?
फोनमधून : अहो, तुमची ती बहीण घट्ट मिठीच मारते. सोडतच नाही. अहो, मी सुध्दा एक माणूसच आहे की नाही ? किती संयम पाळणार ? आणि एखाद्या दिवशी माझ्याकडून संयम सुटला. आणि ----;पुढंची कल्पनाच कलवत नाहीये.
स्वप्नील : आज या तुम्ही ती असं काही करणार नाही,याची दक्षता मी घेईन.
फोनमधून : ठीक आहे. येतो मी ! ( फोन कट केला.)
विद्या : काय म्हणतात रे ते ? नाहीतर दे, माझ्याकडे फोन. मी
बोलतय त्यांच्याशी !
स्वप्नील : अग येणार आहेत ते.
विद्या : खरं !
स्वप्नील : होय.
विद्या : मग तू असं का म्हणालास ? की ती म्हणजे मी ---असं काही करणार नाही म्हणून.
स्वप्नील : अग सर्वा समोर मिठी मारतेस ना त्याना ते आवडत नाही, त्याना ती मारू नकोस. बस्स ! दुसरं काहीही म्हणणे नाही त्यांचे !
विद्या : अरे, पण मी त्यांची बायको ना ? मग तसे केले, तर त्यात काय बिघडले ?
स्वप्नील : कबूल. पण वडीलधाऱ्या माणसांसमोर मिठी मारणं, शिष्टाचारात बसत नाही त्यांच्या! म्हणून तू असं काहीही करू नकोस. बस्स !
विद्या : ठीक आहे, सर्वा समोर नाही मारणार, मी मिठी! पण एकांतात तर मी मिठी मारू शकते ना ?
स्वप्नील : तो तुमचा पती-पत्नीच्या आपसातला मामला आहे, त्यात मी पडू इच्छित नाही. परंतु संगळ्यासमोर मात्र स्वतःला आवरायचं. समजलं !
विद्या : हो रे समजलं.
स्वप्नील : मग मी जाऊ आता ?
विद्या : कुठं जातोयेस आता ?
स्वप्नील : बाहेर कुठं जात नाही घरातच आहे फक्त आपल्या खोली मध्ये जातोय बस्स ! काही काम असल्यास हांक मार मला.
विद्या : ठीक आहे, जा तू ! ( जातो. श्रीधरला म्हणजेच माधवला उद्देशून) तुम्ही मला भेटायला येणार या नुसत्या भावनेनच माझं मन किती उंचबळून आलंय काय तुम्हाला मी सांगू ! अजिबात धीर धरवत नाही आता या ना लौकरी !
(गाणं)
किती आनंद झालाय मज कसं सांगू तुज राया
तुझ्या मायेचा स्पर्श मज लाभला
फूलूनि आली मज काया
नको सोडूनि जाऊस मजला व्याकुळ होते मन मजरे कसे कळेना तुजला रे धावत ये लवकरी आता नाही धीर धरवेना मज हे कसं सांगू तुज राया
किती आनंद झालाय मज कसं सांगू सजना तुला रे !
[ गाणं संपते ना संपते तोच दरवाजावरची बेल वाजली, तशी विद्या पळतच दरवाजापाशी जाते. नि दरवाजा उघडते.समोर श्रीधरला पाहून त्याला मिठी मारायला जाते . पण स्वप्नीलने सांगितलेली अट ध्यानात येताच जागीच थांबली. क्षणभर श्रीधर घाबरलाच होता.आता ही आपल्याला मिठीच मारते की काय असं समजून तो दोन पाहुलं मागेच सरकला.]
विद्या : का दूर पळता माझ्यापासून ? मी आता तुम्हाला आवडत नाही का ? का दुसरी कुणी सटवी आली का तुमच्या जीवनात ?
श्रीधर : दुसरी कुणी नाही ही माझ्या आयुष्यात नाही. परंतु विद्याबाई,एक विचारू तुम्हांला ?
विद्या : हंsss विचारा. काय विचारणार होता ?
श्रीधर : तुम्हाला आता पूर्वीचे आठवते का सारे ? म्हणजे लग्नापूर्वीचे ?
विद्या : हो का ?
श्रीधर : मग ठीक आहे.( गंभीर होत) आता मी काय सांगतो ते ध्यान देऊन ऐका.
विद्या : (गंभीर होत) म्हणजे काय सांगणार आहात ?
श्रीधर : मी माधव नाहीये.
विद्या: (दचकून ) काय ? ( लगेच स्वतःला सावरून पण किंचित रागावून ) मग कोण आहात तुम्ही ?
श्रीधर : मी श्रीधरपंत दिगंबरपंत किर्लोस्कर.
विद्या : (विश्वास न होऊन )
खोटे ! साफ खोटे ! तुम्ही मला फसवताय ना ? तुमचा चेहरा ओळखत नाही का मी ? अस का वाटते तुम्हाला ?
श्रीधर : माझा फक्त चेहरा तुमच्या नवऱ्यासारखा आहे.बाकी तुमचा आणि माझा काहीही संबंध नाहीये.
विद्या: नाहीssकदापि शक्य नाही हे. खोटं बोलताय तुम्ही !
श्रीधर : पण विद्याबाई हेच सत्य आहे.तुम्ही जेवढ्या लवकर हे सत्य स्विकाराल तेवढेच तुमच्या आणि माझ्या हिताचं होईल.
विद्या: ( चिडून) मग हे तुम्ही मला अगोदर का नाही सांगितले ? का अंधारात ठेवलेत मला ?
श्रीधर: मी नाही फसविले तुम्हाला,तुमच्या बंधुराजनी तसे नाटक करायला सांगितले होते मला.
विद्या: खोटे बोलू नका.तो कशाला करील असे ?
श्रीधर : ते आता आपल्या बंधूराजानाच विचारा ना ? तेच तुम्हाला खरं काय ते सांगतील.
विद्या : हो,आताच विचारते.(हाक मारते.) दादा जरा बाहेर ये.
( विद्याच्या आवाजाने तिचे आई-वडील आणि भाऊ बाहेर आले.)
स्वप्नील : काय झाले विद्या ?
विद्या : हे कोण आहेत ?
स्वप्नील : माधव.
श्रीधर : अहो,खरं सांगून टाका.त्यांना सत्य कळलं आहे.
विद्या : हां,दादा एकदम खरं सांगायचं.खोटं अजिबात नाही.
विद्या : श्रीधरपंत दिगंबरपंत किर्लोस्कर ---- श्रीधर टेक्स्टाईल कंपनीचे मालक.
विद्या : दादा का केलेस तू असं ?
विद्याधरपंत : आमचा नाईलाज होता.तुला माणसात आणण्यासाठी दुसरा उपाय नव्हता आमच्याजवळ,म्हणून हे नाटक करावे लागले आम्हाला.
सरस्वती : हां पोरी !
विद्या : मम्मी तू सुध्दा !
सरस्वती : दुसरा उपायच नव्हता पोरी !
विद्या : म्हणजे,तुम्ही सारे माझ्या भावनांशी खेळत होता इतके दिवस ?
स्वप्नील: दुसरा इलाजच नव्हता विद्या !
विद्या : दुसरा उपाय नव्हता, तर तसेच राहू द्यायचे होते मला.मी माझ्या विश्वात तरी फार खुश होती की नाही ? कमीत कमी या यातना तरी भोगाव्या लागल्या नसत्या ना मला.
श्रीधर : विद्याबाई ,तुमच्या भल्यासाठी केलं त्यांनी.
विद्या : (रागाने) तुम्ही तर बोलूच नाका . फार राग आलाय मला तुमचा !
श्रीधर : अपराध्याला क्षमा असावी . हवे तर पाया पडतो. ( तो पाया पडायला खाली विकतो. तशी ती मागे सरकत- )
विद्या : काही गरज नाहीये. त्याची ! आणि या क्षणापासून दूर व्हा,माझ्या नजरे समोरून .
श्रीधर : ( हात जोडून ) येतो मी ! ( जातो. )
विद्या : ( आईला घट्ट मिठी मारत ) आई माधव कधीच भेटणार नाही का मला ?
विद्याधारपंत : अग त्याला शोधण्याचे थोडे का प्रयत्न केले आतापर्यंत.पण व्यर्थ ..... सारे प्रयत्न वाया गेले, मला वाटते, त्याने दुसरं लग्न केले असावे.
विद्या : नाही.मला कधीच दगा देणार नाहीत ते बाबा ?
विद्याधारपंत : मग का बर न्यायला आले नाहीत ते तुला. त्यांचे प्रेम एवढे कमजोर होते का ?
विद्या : मी त्यांना न सांगता निघून आले ना , म्हणून रंगवले असतील ते माझ्यावर.
श्रीधर : पण विद्या पत्नीवर एवढा राग राहात नाही कुणाचा! माझी पूर्ण खात्री आहे . त्याने जरूर दुसरं लग्न केले असावे , म्हणून एक दिवसही फिरकले नाहीत, ते इथे .
सरस्वती : हां, बाळ ! मलाही असाच वाटतं.
स्वप्नील : मला वाटत तू सुद्धा दुसरे लग्न करावेस.
विद्या : काय ? नवरा जिवंत असताना दुसरं लग्न ! तुला बोलवले तरी कसे ?
विद्याधरपंत : ते तुझे लग्न नव्हते . नुसता पोरखेळ होता तो .
विद्या : नाही. तो पोरखेळ नव्हता. आम्ही मंदिरात भटा ब्रह्मणासमोर लग्न केले होते.
विद्याधरपंत: कोणी पाहिले ते?
विद्या : कोण कशाला पाहायला हवे ?
विद्याधरपंत : त्या शिवाय का समाज मान्य करतो?
विद्या : त्याची गरज काय?
विद्याधरपंत : तुला जरी नसली तरी समाजाला गरज आहे.आणि त्यासाठीच समाजाने काही नियम बनविले आहेत. आणि त्या नियमाचे पालन सर्वानाच करायला हवे.
विद्या : पप्पा, समाज,नियम यातले मला काहीही कळत नाहिते.मला फक्त एवढे कळतंय की आम्ही एकमेकांशी निस्सीम प्रेम केले आहे.आणि त्याचं फलस्वरूप म्हणून आम्ही देवाच्या साक्षीने लग्न केले आहे.
विद्याधरपंत : ज्या समाजात आपल्याला राहाचयना, त्याला समाजाने बनविलेले नियम पाळायलाच लागणार बाळ. त्यातून कुणाचीही सुटका नाही.मग तो राव असो वा रंक....नियमन सर्वानाच लागू राहतात.
विद्या : पण पप्पा मी त्यांना नाही विसरू शकत.
विद्याधरपंत : मी कुठे म्हणतोय तुला की तू त्याला एकदम विसर म्हणून.प्रयत्न कर .यश येईल, आपोआप !
विद्या : पप्पा मला थोडा विचार करायला वेळ द्या.
विद्याधरपंत : तुला हवा तेवढा अवधी घे.पण पूर्ण विचार करून निर्णय घे.
विद्या : आता सर्व जा इथून,मला जरा विश्रांतीची गरज आहे.
विद्याधरपंत : ठीक आहे.( तिला सोडून बाकी सर्वाना उद्देशून) तिला एकटीला राहू दे इथं.चला, तुम्ही सर्व.( जातात.)
विद्या : ( स्वगत) माधवना विसरणं म्हणजे,स्वतःला विसरण्यासारखे आहे.कसं शक्य आहे ते मला? छे, छे, छे ! कदापि शक्य नाही ते ? पण मग मी श्रीधरला माधव समजली कशी ? का ओळखू शकली नाही मी श्रीधरचा स्पर्श ? तो स्पर्श मधवचा नसून परपुरुषाचा आहे.हे कसे जाणवले नाही मला ? खरंच माधवना विसरले, तर नाही ना ? छे, छे, छे ! माधव ना कसं विसरेन मी ? मग का घडलं माझ्याकडून हे पाप ! परमेश्वरा क्षमा कर मला. (एकदम विषण्य मनाने सोफ्यावर बसते.नि रंगमंचकवर काळोख होतो. पुन्हा रंगमंचावर प्रकाश होतो, तेव्हा दोन दिवसांचा कालावधी लोटलेला असतो.क्षणभर रंगमंचकावर कुणीच नसतं. क्षणभराने विद्या प्रवेश करते.)
विद्या : दोन दिवस झाले. श्रीधर इकडे फिरकला नाही. अर्थात मीच त्याला इथं यायला मनाई केली होती.पण मी का श्रीधर न आल्याने बेचैन होत आहे ? आणि श्रीधरचा चेहरा.माझ्याडोळ्यासमोर का येतो ? मी श्रीधरवर प्रेम तर करू नाही, लागली ना ? काहीच कळत नाहीये.एक काम करते, श्रीधरशी अगोदर मैत्री करू. आणि त्याला अजमाऊ की, माझ्याप्रमाणे तो सुध्दा आपल्यावर तेवढेच प्रेम करतो का ? मगच लग्नाचा निर्णय घेऊ.कसं ? येस ! हेच योग्य ठरेल.
( स्वप्नीलला हाक मारते.)ए दादा sss
स्वप्नील : दादा तुझ्या जवळ श्रीधरचा फोन नंबर आहे का ?
स्वप्नील : हो आहे का ग ?
विद्या : मला दे तो नंबर.
स्वप्नील: कशाला ग ?
विद्या : मला त्याला इथं बोलवायचा आहे.
स्वप्नील : कशासाठी ?
विद्याधरपंत : मला मैत्री करायची आहे त्यांच्या बरोबर.
स्वप्नील : अरे ,श्रीर जवळ माझ्या माधवरावांचा चेहरा आहे. माधवराव माझ्यापासून दूर गेलेत, तर काय झालं ? त्यांचा चेहऱ्याचं माझ्यासाठी खूप आहे.
स्वप्नील : मग लग्नच का करत नाही श्रीधर बरोबर.
विद्या : अरे कसं शक्य आहे ? त्याचं वय काय आणि वय काय ?
दोघांच्या वयात काही फरक आहे की नाही ?
स्वप्नील : फारसा फरक नाही,दोघांच्या वयात. त्याचं वीस असेल, तर तुझं छत्तीस !
विद्या : मग हे काय कमी झालं का ?
स्वप्नील : प्रेमात सर्वकाही क्षम्य असतं विद्या !
विद्या : प्रेम----कुणाचं प्रेम ---मी प्रेम वगैरे काही करत नाही त्याच्यावर. मी प्रेम फक्त माधवरावांशी केलं आहे.
स्वप्नील : मला वाटतं विद्या माधवनं दुसरं लग्नही केलं असेल. कारण कोणताही पुरूष फार काळ एकटा राहू शकत नाही. त्याला जोडीदारीन ही लागतेच ! आणि म्हणूनच या वीस वर्षात एकदाही फिरकले नाहीत ते. इथं आणि मला काय वाटतं माहीतेय. त्यानं तुझ्यावर खरं प्रेम केलं असतं, तर ते तुला न्यायला आले नसते का ? प्रेम फक्त तू केले आहेस माधववर. अगदी खरे प्रेम !
विद्या : नाही रे,त्यांचही माझ्यावर खूप प्रेम केलं होतं.
स्वप्नील : मग ते तुला एकदा पण कसे बघायला का नाही आलेत ? तू कशी आहेस याची साधी चौकशीही करू नये ?
विद्या : अरे, त्यात पण माझीच चूक आहे. मी त्याना न सांगता पप्पा सोबत निघून आली, ही माझी चूक नव्हती का ?
स्वप्नील : विद्या तू नेहमी स्वतःचीच चूक काढत असतेस, पण खरं सांगायचं तर तुझी चूक नाहीये त्यात ?
विद्या : अरे, नाही कशी ? त्याना न सांगताच मी इथं निघून आली ही चूक नव्हती का माझी ?
स्वप्नील : म्हणून काय झालं ? त्यानी तुझी साधी चौकशीही करू नये. इतक्या हलक्या दर्जाचं प्रेम होतं का त्यांचं प्रेम ?
विद्या : उगाच राईचा पर्वत करू नकोस. झाल्या गोष्टी विसरून जायच्या असतात, माणसानं.
स्वप्नील : मग मीही तेच म्हणतोय ना की, तुही माधवला विसरून श्रीधरशी नव्यानं संसार थाट !
विद्या : अरे, पण लग्न कर म्हणजे काय ? भातुकलीचा खेळ वाटला का तुला? लग्न करायला दोन्ही पक्षाकडून सारखीच समत्ती असावी लागते. मी ढीग श्रीधरशी लग्न करायला असेन, पण तो माझ्याशी ! लग्न करायला तयार आहे का ? हे बघायला नको का अगोदर ?
स्वप्नील : अग विद्या ,तू फक्त हो, म्हण ! मग बघ तो एका पायावर लग्न करायला तयार होईल, तुझ्या बरोबर.
विद्या : कशावरून सांगतेस तू हे ?
स्वप्नील : तुझ्यासाठी प्रेम पाहिलं, मी त्याच्या डोळ्यात.
विद्या : (हर्षभराने) खरंच का रे ?
स्वप्नील : हो ताई ,खरंच सांगतोय मी --त्या दिवशी तू त्याला घरातून निघून जायला सांगितलंस, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जी उदाशी दिसली. ती माझ्या नजरेतून काही सुटली नाही.
विद्या : तर मग ठीक आहे, मी अगोदर त्याची परीक्षा घेते. त्या परीक्षेत तो जर उत्तीर्ण झाला, तर मी त्याच्याशी लग्न करेन. मला त्याचा फोन नंबर दे. ( स्वप्नील आपल्या हँन्डसेटमधला नंबर डायल करून विद्याच्या हातात मोबाईल दिला. ) हॅलोsss
फोनमधून : हँलो sss
विद्या : मी विद्या बोलतेय.
फोनमधून : हां, बोला.
विद्या : आज तुमच्याकडे वेळ आहे ?
फोनमधून : हो, आहे
विद्या : मला तुमच्याशी काहीतरी महत्तवाच्या विषयावरं बोलावयाचे आहे, आमच्या घरी याल ?
फोनमधून : अवश्य !
विद्या : ठीक दहा वाजता या, वाट पाहते मी तुमची !
फोनमधून : ओके !
( फोन कट करते. )
विद्या : आज मी श्रीधरची परीक्षा घेऊन पाहते.
स्वप्नील :(स्वगत) मला माहीतेय त्यात तू नक्की पास होणार.
विद्या : हॅलो sss
श्रीधर : हां बोला विद्याबाई !
तुमच्याजवळ वेळ आहे का माझसाठी?
श्रीधर : हो आहे ना !
विद्या : मग तुम्ही मला भेटायला येऊ शकता का ?
श्रीधर: हो, पण कुठे? घरी का ?
विद्या : घरी नको बाहेर कुठेतरी !
श्रीधर : बाहेर कुठे ?
विद्या : कॉफी हाऊस मध्ये येता का ?
श्रीधर : कुठल्या?
विद्या : आमच्या बंगल्यासमोरच्या .
श्रीधर : हो,चालेल.
विद्या : नक्की याल ना?
श्रीधर: हो,नक्की येतो.
विद्या : बाय.
श्रीधर : बाय.
विद्या : ( फोन कट करून ) झाले काम.
स्वप्नील : जा आता एक चांगलीशी साडी नेस.जो रंग श्रीधरला पसंत असेल.
विद्या : त्याची पसंती मला कशी माहीत असणार ?
विद्या : मग माधवच्या पसंततीच्या रंगाची साडी नेस.कदाचित चेहऱ्याप्रमाणे दोघांची पसंती पण एक असेल.कुणी सांगावे ?
विद्या : असं म्हणतोयस,तर मग तसेच करते.
( विद्या कपडे बदली करायला आत जाते.आणि रंगमंकावर काळोख होतो ,क्षणभराने प्रकाश होतो.तेव्हा विद्याधरपंत,सरस्वतीबाई आणि स्वप्नील दिवाणखान्यात विद्याची वाट पाहत असतात.तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली.स्वप्नीलने जाऊन दरवाजा उघडला.विद्याच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून स्वप्नील समजला की काम फत्ते झाले.)
विद्या : काय रिपोर्ट आहे तुझा ?
विद्या : रिपोर्ट ओके !
स्वप्नील : मी काय म्हणालो होतो तुला ?
विद्या : ते खरं रे,पण....?
स्वप्नील : पण काय ?
विद्या : श्रीधरने मला स्वतःहून प्रपोज केलं.पण त्याच्या वडिलांना मी पसंत पडेन की नाही ते मात्र सांगता येत नाही.
विद्याधरपंत : मियाँ बिवी राजी तो क्या करेंगा काझी ! आणि तसं पण श्रीधर त्यांचा एकुलता एक मुलगा
आहे ते शक्य तो विरोध करणार नाहीत.
सरस्वती : कशावरून सांगता ? नाही म्हणजे,तुम्ही संमती दिली होती का विद्या आणि माधवच्या लग्नाला ?
विद्याधरपंत : अग तो आमच्या तोलामोलाचा नव्हता,शिवाय तो अनाथ होता,म्हणून आम्ही दिली नाही परवानगी.
स्वप्नील : मम्मी आता तो मागचा विषय कशाला काढतेस ?
विद्या : दादा मम्मी म्हणते ते पण खरं आहे. जोपर्यंत त्याच्या वडिलांची संमती मिळत नाही तोपर्यत पक्के समजणं मूर्खपणा आहे.
विद्याधरपंत : मग मी विचारु का त्याच्या वडिलांना ?
विद्या : तुम्ही नका विचारू.....
त्यालाच विचारू दे अगोदर.
स्वप्नील : पण तो कधी विचारणार ?
विद्या : उद्याच ! कारण उद्या आम्ही पिक्चर बघायला जाणार आहोत.त्यानंतर त्याच्या घरी मीही जाणार आहे,तेव्हा उद्याच निर्णय लागेल.पसंतीचा आणि लग्नाचा !
( त्यावर कुणीच काही बोलले नाही.रंगमचकावर काळोख होतो,आणि प्रकाश होतो. तेव्हा वेळ संध्याकाळची. दुसऱ्या दिवशी ती दोघे पिक्चरला गेली.घरी आली तेव्हा-)
विद्या : मंम्मी - पप्पा एक खुषखबर आहे.
सरस्वती : खूष खबर ---
विद्या : हां मंम्मी !
सरस्वती : कोणती ?
विद्या : आज मी श्रीधरच्या घरी गेले होते.
विद्याधरपंत : बरं मग ?
विद्या : श्रीधरच्या वडिलांनी आमच्या लग्नाला ग्रीन सिग्नल दिला.
विद्याधरपंत }
सरस्वतीबाई } काय सांगतेस ?
विद्या : हो, पप्पा ! श्रीधर आणि त्याचे पप्पा आज आपल्या घरी येणार आहेत, आपलं घर पहायला.
सरस्वती : तू खूष आहेस ना?
विद्या : हो मंम्मी ! मी फार खूष आहे आज !
विद्या : बस्स ! दुसरं आम्हाला काय हवे-
सरस्वती : काहीतरी फराळाचं करून ठेवते.
विद्याधरपंत : आता येणार आहेत का?
विद्या : होय.
विद्याधरपंत : मग जा ग तू फराळाचं बघ.आणि तू एक सुंदरसा पोषाख परिधान कर.विद्या होकारार्थी मान डोलविते. आणि आपल्या खोलीत निघून जात तिच्या पाठोपाठ. सरस्वतीबाई सुध्दा स्वयंपाक घरात निघून जातात.]
विद्याधरपंत : अरे स्वप्नील sss
स्वप्नील : काय पप्पा ?
विद्याधरपंत : विद्याला पहायला आज श्रीधरचे वडील येणार आहेत आपल्या घरी ! त्यांच्यासाठी काही बाहेरून कोल्डीक वगैरे घेऊन ये.
स्वप्नील : ठीक आहे.
[स्वप्नील बाहेर जातो.]
विद्याधरपंत : [ स्वतःशीच] आज विद्याला पाहुणे येणार बघायला अखेर मीच जिकलो. विद्याचं लग्न कुणा उद्योगपतीशी व्हावे ! ही माझी अंतरीक इच्छा आज पूर्ण होणार. अर्थात विद्याच्या बाळाला विद्या पासून त्याच्या जन्माच्या वेळेला तिच्या पासून दूर केले ते एका अर्थी योग्यच केलं. त्यामुळे तिला खूप त्यास सहन करावा लागला. पण हरकत नाही म्हणतात ना दुःख सरलं की आपोआपच सुख येतं. विद्याचही तसंच झालं. इतक्या वर्षा नंतर का होईना. पण सुख तर आलंच तिच्या पदरात. पण जर का मी त्यावेळी विद्याच्या बाळाला अनाथलात सोडण्याचा निर्णय घेतला. नसता तर विद्या आजही त्या भिकारड्या माधव सोबत वनवास भोगत असणार होती. आणि तिचा तो कारटा आज विद्याच्या लग्नाला अडसर ठरला असता, पण ठीक आहे जे झालं ते चांगलेच झालं म्हणायचं !
[ आपल्या आजूबाजूला कुणीही नाही, याची खात्री करून घेतात. ] सावध राहायला हवय भींतीला. पण कान असतात. म्हणे !
[ इकडून तिकडे येर-झाऱ्या घालतात. आणि अधून मधून खिडकीतून बाहेर डोकावून पाहतात. तेवढ्यातच श्रीधर आपल्या वडिलां सोबत येताना दिसतो. तसे हर्षभरीत होऊन बाहेरचा दरवाजा उघतात. तेव्हा श्रीधर आणि त्याचे वडील म्हणजेच दिगंबरपंत प्रवेश करतात. वय 50 च्या आसपास दिसायला गोरेपान, हातात वाकड्या मुठीची काठी , अंगात काळा कोट,गळ्यात टाय ,एकंदरीत एका उद्योगपतीला शोभेल अशीच वेशभुषा ]
विद्याधरपंत : या किर्लोस्कर साहेब,नमस्कार !
दिगंबरपंत : नमस्कार.
विद्याधरपंत : खरं सांगायचं, तर आम्ही तुमचीच वाट पाहत होतो.
दिगंबरपंत : आपल्या कन्येने आम्ही येण्याची अगोदरच सूचना दिली तर !
विद्याधरपंत : हो !
[ स्वप्नील बाहेरून कोल्डीकची बाटली घेऊन येतो. ]
विद्याधरपंत : स्वप्नील पाहुण्यासाठी पाण्यात घेऊन रे बरं.
स्वप्नील : हो, आणतो. [ जातो.]
विद्याधरपंत : बसा ना ! उभे का?
दिगंबरपंत : हे आपले चिरजीव का ?
विद्याधपंत : हो ! मोठा मुलगा.
[ स्वप्नील पाणी घेऊन येतो. ते दोघेही पाणी पितात.]
दिगंबरपंत : जरा मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम लौकर आटपा ---माझ्या जवळ वेळ फार कमी आहे.कारण मला एका महत्त्वाच्या मिटींगला जायचं आहे तेव्हा-
विद्याधरपंत : स्वप्नील
जाऊन बघ. जरा विद्या तयार झाली का ?
स्वप्नील : हो ! [आत जात.]
विद्याधरपंत : किर्लोस्कर साहेब ,मला माझ्या मुलीच्या भुतकाळा बद्दल सांगायचंय.
दिगंबरपंत : हा तिचा दुसरा विवाह आहे, आणि ती वयाने श्रीधरपेक्षा 15 ते 16 वर्षानी मोठी आहे, हेच सांगायचंय ना तुम्हांला?
विद्याधरपंत : ( आश्चर्याने) हो; पण--
दिगंबरपंत : हे मला कसे कळाले ? हाच प्रश्न पडला असेल, ना तुम्हांला ?
विद्याधरपंत : होय.
श्रीधर : मी त्या विषयीची पूर्ण माहिती !
दिली आहे पप्पाना !
दिगंबरपंत : हो, श्रीधरनं पूर्ण कल्पना दिली आहे मला, त्या विषयी !
विद्याधरपंत : म्हणजे, तुम्हांला आमची विद्या पसंत आहे तर !
दिगंबरपंत : होय. आमच्या मुलाची पसंती, तीच आमची पसंती ! ( सरस्वतीबाई विद्याला घेऊन येतात. विद्याच्या हातात चहाचा स्ट्रे आहे, विद्या सर्वाना चहा देते. आणि खाली वाकून दिगंबरपंताच्या पाया पडते. )
दिगंबरपंत : उदंड आयुष्य लाभु दे.
( विद्या सोफ्यावर बसायला जाणार, तोच टेबलावर ठेवलेला विद्या आणि माधवच्या लग्नाचा फोटो विद्याचा धक्का लागून खाली पडला. तेवढ्यात दिगंबरपंताची त्या फोटोवर नजर पडली. तसे ते खाली वाकून तो फोटो उलतात. आणि ते तो फोटो निरखून पाहतात. )
दिगंबरपंत : ( गोंधळून) विद्या आणि श्रीधरचा फोटो ?
विद्याधरपंत : हा फोटो मधील माणूस श्रीधर नव्हे ! हा विद्याचा पहिला नवरा.
दिगंबरपंत : म्हणजे हा राजचा फोटो आहे ?
विद्या : तुम्ही राजला ओळखा ?
दिगंबरपंत : हो ! चांगलाच आमच्याकडेच कामाला होता तो.
विद्या : म्हणजे आता नाहीयेत. का ?
दिगंबरपंत : नाही. पंदरा वर्षा पूर्वीच आमच्या कडून त्याने काम करायचं सोडलं.
विद्या : म्हणजे आता कुठे आहेत ते ? तुम्हांला माहित नाही असंच ना ?
दिगंबरपतं : माहित आहे.
विद्या : ( हरषभराने)
खरेच ?
दिगंबरपंत : हो.
विद्या : मग त्यांचा पत्ता तेवढा द्या बरं.
( सर्वजण गोंधळून त्या दोघाकडे पाहत असतात. श्रीधर तर फार गोंधळलेल्या अवस्थेत असतो. विद्याधरपंत मात्र समजून चुकले. की आपले स्वप्न उद्ध्वस्त होणार तसे ते पटकन )
विद्याधरपंत : आता कशाला हवाय त्यांचा पत्ता ? तुझं लग्न ठरलय ना आता ?
विद्या : पप्पा लग्न फक्त ठरलंय झालं नाही अजून.
दिगंबरपंत : आणि आता होणार सुध्दा नाही.
विद्याधरपंत : का होणार नाही ?
दिगंबरपंत : आईचं मुलासंग लग्न होतं का कधी ?
( सरस्वतीबाई सह सर्वानाच एकदम धक्का बसतो. सर्वाच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडतो- काय ? आई आणि मुलगा ?
दिगंबरपंत: होय हा श्रीधर विद्या आणि राजचा मुलगा आहे.
सर्वजण : काय ? श्रीधर विद्या आणि राजचा मुलगा ?
दिगंबरपंत : होय
विद्या : ( हरषभराने) म्हणजे माझा मुलगा जिवंत आहे ?
दिगंबरपंत : होय.
विद्या : मग तो तुमच्या जवळ कसा ?
दिगंबरपंत : ती फार मोठी कहानी आहे.
विद्या : सांगा. मला ऐकायची आहे ती.
श्रीधर : पप्पा हा सारा काय प्रकार आहे ? मी तुमचा मुलगा नाहीये का ?
दिगंबरपत : तू माझाच मुलगा आहेस रे, पण तुला जन्म मी दिलेला नाही.
विद्या : ( त्याच्या जवळ जाऊन ) तू माझा मुलगा आहेस. ( वात्सल्याने त्याच्या तोंडावरून हात फिरविते.)
स्वप्नील : एक सेंकद हा श्रीधर जर माझ्या बहीणीचा मुलगा आहे, तर तो तुमच्या जवळ कसा पोहोचला. आणि कुणी पोहोचविला ?
दिगंबरपंत : ते तुम्ही तुमच्या तिर्थरूपानाच विचारा. आता राहिला प्रश्न तो माझ्याकडे कसा आला ? तर तेही सांगतो ऐका. --- माझी पत्नी देवकी बाळंत झाली. आणि तिला मुलगा झाला. परंतु जन्मताच मृत पावला. आणि त्यावेळी माझ्या पत्नीची प्रकृर्ती फार चिंता जनक होती. आणि डॉक्टरांचे म्हणणे होते की हिच्या पुढ्यात मुल दिसलं नाही, तर ही स्त्री काही जगणार नाही. तेव्हा कुठूनही एका नुकतच जन्मलेल्या बाळाचा बदोबस्त करा. मग काय मी अनाथलयात पोहोचलो. तेव्हा एक नर्स एका बाळाला अनाथालयात सोडून गेली होती. बस्स ! तेच बाळ मी दत्तक पुत्र म्हणून घेतला. तोच हा श्रीधर-
श्रीधर : पण पप्पा तुम्ही अनाथालयातूनआणलेला मुलगाच ह्यांचा मुलगा आहे, हे कशावरून सांगताय तुम्ही ?
दिगंबरपंत : एकदम योग्य प्रश्न विचारलास तू ---आता त्याचं उत्तर ऐक. सर्वात मोठा पुरावा, म्हणजे, तुला मिळालेला आपल्या बापाचा चेहरा आणि दुसरा पुरावा तुझा म्हणजे तुझा बाप ! तुझ्या बापानेच सांगितले की, तू त्याचा मुलगा आहेस.
विद्या : म्हणजे माधवना हे सर्व माहित आहे ?
दिगंबरपंत : होय. कारण माझ्या मागोमाग राज त्या अनाथालयात पोहोचला. त्याने अनाथालयाच्या संचालिकाला आपली ओळख सांगितली. आणि आणि कोणत्या इस्पितळातून आलोय ते सांगितले. आणि त्या नर्स बद्दलही सांगितले. तेव्हा संचालिकेला त्याची दया आली पण तिनं त्याला समजाविलं की, मुलगा ज्या घरात गेलाय तेथे त्याचे उज्ज्वल भविष्य आहे, पण तुमच्याकडे राहिला तर त्या मुलाचे भविष्य मातीमोल होईल. कारण तुमच्याकडे चांगली नोकरी सुध्दा नाहीये. कसं संगोपण करणार त्या मुलाचं ? तेव्हा राजला तिचं म्हणणे पटले. नि मग राजने तिच्या जवळ एक इच्छा प्रगट केली, की मला एक वेळ त्या मुलाला दाखवा बस्स ! संचालिकेनं त्याची ही विनंती मान्य केली. मग मला त्या संचालिकेनं फोन केला. नि अनाथालयात बोलवून घेतलं मी ! तेथे आल्यावर राजनं आपली दुःखभरी कथा ऐकविली, तेव्हा मला पण त्याची दया आली. पण माझी अडचण लक्षात घेऊन त्याने आपला मुलगा मला द्यायचं कबूल केलं.
म्हणूनं मी खूष होऊन राजला पैसे देऊ केले. पण त्याने ते घेतले नाहीत. पण त्या बदल्यात त्याने माझ्या जवळ नोकरी मागितली. त्याचा हेतू इतकाच होता की मुलाच्या सानिध्यात राहायचं होतं. त्याला. आणि त्या प्रमाणे राहिला. देखील माझा प्रायव्हेट सेक्रेटरी असल्यानं त्याचं माझ्या घरी येणं-जाणं असायचं. पण त्यानं मला दिलेलं वचन मात्र पाळलं.
श्रीधर : वचन ----कोणतं वचन पप्पा ?
दिगंबरपंत : मी त्याच्याकडून वचन मागून घेतलं होतं की,ल काही झालं, तरीही त्यानं कुणा समोर जाहीर करू नये, की श्रीधर आमचा मुलगा नसून त्याचा आहे. हे कुणालाही कळता कामा नये, म्हणून. आणि त्याने ते वचन पाळलंही ! पण नियतीला ते मंजूर नव्हते, म्हणूनच की, काय राजच्या मुलाला राजचाच चेहरा नियतीने देऊन टाकला. त्यामुळे झालं काय आमचे शेजारी-पाजारी माझ्या पत्नीकडे संशयाने पाहूं लागले, इतकेच नव्हे ! तर आमच्या कंपनीतले कर्मचारी सुध्दा माझ्या पत्नीच्या चरित्रावर बदनामीचे शिंतोडे उडवू लागले, हे जसे राजला समजले, तसे राजने कुणालाही न सांगता सेक्रेटरीची नोकरी सोडून कुठंतरी निघून गेला. त्यानंतर आम्ही सुध्दा मुंबईतली कंपनी बंद करून पुण्याला स्थाईक झालो. त्यामुळे बदनामी पासून वाचलो. परंतु राज पासून दुरावलो. आणि राजने सुध्दा आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र हल्ली दोन महीन्यापुर्वी मी कंपनीच्या कामा निमित्ताने मुंबईला गेलो होतो,) तेव्हा अचानक रस्तामध्ये त्याच्याशी भेट झाली. तेव्हा कळाले की तो माझ्या एका मित्राच्या कंपनीत काम करतो, म्हणून.
विद्या : वा ! माधवराव वा ! फार मोठे काळीज आहे तुमचं ! स्वतःच्या हृदयाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन करताना तुमचं काळीज कसं नाही थरथरलं ? पण तुम्ही पडलात बाप ! तुमचं हृदय पाषाण असेल कदाचित ! परंतु मी पडली आई रे ,माझं हृदय तुमच्या इतके विशाल नाही. मी नाही करू शकत तुमच्या इतका मोठा त्याग ! [श्रीधर जवळ जात ] बाळ क्षमा कर तुझ्या आईला. [ त्याच्या तोडावर ममतेने आपला हात फिरविते. किवा कोपरापासून हात जोडते. ]
श्रीधर : नाही आई,मला स्वतःलाच स्वतःची लाज वाटू लागलीय. आता ज्या स्पर्शात आईचं वात्सल्य पहायचं असतं. त्याच स्पर्शात मी वासना पाहिली धिक्कार असो. माझ्या सारख्या मुलाचा !
विद्या : नाही रे, बाळ त्यात तुझा काहीच दोष नाही बरं.
श्रीधल : नाही कसा ? जन्मदात्या आई सोबत लग्न करायला निघालोय. मी ज्या साच्यातून मी घडलोय त्याच साच्यातून मी इतरांना घडवायला निघालोय. अरे बाप रे ! केवढं मोठं घोर पाप घडणार होते माझ्याहातून ! तरी बरं झालंं ! पप्पाना माझी जन्म कथा ठाऊक होती. नाहीतर आज या जगाला तोंड दाखविण्याचीही जागा शिल्लक राहिली नसती मला. आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेला असता आज ! आणि हे सर्व या नियतीनं घडविलं. जनमताच, आई-वडिलां पासून दूर केलं. आणि पुन्हा आईची भेट घडवली.
पण कोणत्या रूपात एका प्रेमिकेच्या ! शी sss कल्पनाच करवत नाही या गोष्टीची ! आई-मुलाचं पवित्र नातं अपवित्र केलं या नियतीने. का करावं तिनं असं ? काय अपराध केला होता, मी तिचा ? म्हणून तिनं असा सुड उगविला माझ्यावर.
विद्या : बाळ शांत हो,नको त्रास करून घेऊ स्वतःला. जे काही झालं त्यात ना तुझा दोष आहे ना माझा ! जर दोष असेलच कुणाचा, तर तो आपल्या नशीबाचा असेल. कारण जर आपल्या नशीबातच तसं लिहालं असेल. तर त्याला तू आणि मी तरी काय करणार.
श्रीधर :( संतापाने)नशीब ,कुणी लिहलं हे नशीब ? या नियतीनं का भाग्य देवतेनं ? काय अधिकार होता त्याना ? असं नशीब लिहिण्याचा ! यातून काय सुचवायचक तिला ? की येणाऱ्या काळात असंच काहीतरी घडणार आहे म्हणून ? आई - मुलाचं ,बहीण-भावाचं, नातंच राहणार नाही. म्हणजे, माणसंही पशू सारखी वागायला लागतील. कदाचित ! असंच काहीतरी नियतीच्या मनात असावं. पण असं होता मात्र कामा नये, नाहीतर माणूस माणूस राहणार नाही. पशू होतील पशू ! मग या जगाचा विनाश झाल्या खेरीज राहणार नाही, म्हणून माझी या नियतीला विनंती आहे. की असा अभ्रद्र विचार मनात आणू नकोस. यातच तुझं सौजन्य लपलेलं आहे. आणि जर का असा अभद्र विचार पुन्हा केलास, तर याद राख ! तुझा तो अभद्र विचार हानून पाडल्या शिवाय मी राहणार नाही. हे माझे तुला आवाहन आहे.
दिगंबरपंत : श्रीधर हा वेडा विचार डोक्यातून काढून टाक. बरे !
श्रीधर : नाही. पप्पा हा वेडा विचार नाही. आणि खरं सांगायचं, तर हे मला सहन होत नाही. असंख्य यातना होताहेत या वेदनावर एकमेव औषध आहे. आणि ते औषध म्हणजे आत्महत्या !
सर्व व्यादी पासून मुक्तता होय.
विद्या : नाही बाळ,आत्महत्या हा त्या वरचा उपाय असू शकत नाही. आणि असं जर असतं, तर मी नाही का केला, असता हा उपाय ?
श्रीधर : आई ,तुझी गोष्ट वेगळी होती. आणि माझी गोष्ट त्याहून वेगळी आहे. मी मनात ठरविले, तरी ते मला शक्य होणार नाही.
विद्या : का बरं ?
श्रीधर : आई,ज्या ज्या वेळी तू माझ्या समोर येशील. त्या त्या वेळी मला मागील साऱ्या प्रसंगाची आठवण होईल. आणि मग माझेच मन मला धिक्कारेल. म्हणेल,नालायक माणसा ,अजून का जगतो आहेस तू ? ज्या वेळी तुला सत्य समजलं. त्याच वेळी मरायला हवा होतास तू ! का जगतो आहेस,निर्लजा सारखा ! म्हणून हे कलंकीत झालेले जीवन संपवायलाच पाहिजे आई !
[ इतके बोलून श्रीधर बाहेरच्या दरवाजाच्या दिशेने पळत सुटला. ]
विद्या: थांब -थांब बाळ, असं अभ्रद्र विचार करू नकोस बरं ?[ त्याच्या माग धावते. तेव्हा सरस्वतीबाई ,
विद्याधराकडे पाहत ]
सरस्वती : अहो, तुम्ही बघत काय बसलाय, आडवा त्याला. [ सर्वजण त्याच्या मागे धावतात. तोच श्रीधरची करून किंकाळी ऐकू आली- आई गं मेलो sss त्याच्या पाठोपाठ विद्याचीही किंचाळी कानी पडते- नाही sss थोड्यावेळ निरव शांतता पुन्हा आवाज- अरे, उचला त्याला. -( आणि थोड्या वेळात स्वप्नील बेशुध्द अवस्थेत विद्याला उचलून आणतो. आणि त्याच्या पाठोपाठ कुणीतरी श्रीधरला जखमी अवस्थेत उचलून घेऊन येतो. श्रीधरला भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारने धडक दिली. श्रीधरच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे.
दिगंबरपंत : कुणीतरी अँम्बूलन्स बोलवा रे !
श्रीधर : नको पप्पा माझ्या जवळ फार वेळ नाहीये.
[ कुणीतरी स्वयंपाक घरात जाऊन पाणी घेऊन आला. आणि विद्याच्या चेहऱ्यावर शिंपडले, तशी विद्या हळूहळू शुध्दीवर येऊ लागते. शुध्दीवर येताच उठून बसली. तेव्हा तिची नजर श्रीधरवर पडली, तशी ती त्याच्या जवळ जाऊन.]
विद्या : बाळ काय केलेस तू हे ?
श्रीधर : योग्य तेच केलं मी आई ! माझ्या सारख्या पाप्याला हीच शिक्षा योग्य आहे. पण तू चिंता करू नकोस आई ! मी लवकरच पुन्हा जन्म घेणार आहे. आणि तो पण तुझ्याच पोटी ! तुझं बाळ म्हणूनच ! पण या वेळी मात्र तुम्ही दोघांनी पण मला तुमच्या पासून दूर करु नका. हीच विनंती करतो, मी तुला.
विद्या : पोरा,काय करून बसलास तू हे ? तुला माझी जरा सुध्दा दया आली नाही ना ? वीस वर्ष कशी काढलीत मी, तुझ्यावीना हे ठाऊक होतं ना तुला ?
श्रीधर : होय आई ,सारं ठाऊक आहे मला.
विद्या : तरी देखील हे धाडस केलेस तू ! जरा सुध्दा विचार केला नाहीस तू आपल्या आईच्या मनाचा ज्या आईला तू माणसात आणलेस, त्याच आईला कायमचा सोडून चाललास तू ! कसे जगू मी ? काय करू मी ? सांग बाळा सांग. [ रडू लागली. )
श्रीधर : आई रडू नकोस तू मी दूर कुठं चाललो आहे, फक्त थोड्या दिवसांची विश्रांती घ्यायला चाललो आहे, परत येण्यासाठीच ! नवं रूप आणि नवं नाव मिळविण्यासाठीच !
विद्या : अरे, पण तुझे बाबा सापडले नाहीत. आणि तू असा हा चाललास, मला सोडून मी कुणाच्या तोंडाकडे पहावं बरं. आणि कसं जगावं ? पुन्हा तेच एकाकी जीवन आलं माझ्या नशीबी ! वीस वर्षानं का होईना, पण एक क्षण आला होता सुखाचा ! पण तो देखील हिरावून घेतलास तू ! असा काय गुन्हा केला होता मी रे ? म्हणून ही शिक्षा दिलीस मजला तू !
श्रीधर : आई क्षमा कर मला नाहीतर तेथेही शांती मिळणार नाही मला.
विद्या : ( लगेच डोळ्यातील अश्रू पुसून ) नाही बाळ, असं बोलू नकोस तू ! मी नाही रागवली तुझ्यावर. पण एक आज्ञा मात्र जरूर आहे.
श्रीधर : कोणती आज्ञा आई?
विद्या : तू माझ्याच पोटी जनम घे. मी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे, असं समज.
श्रीधर :(श्वास अडकळतो आहे.) पप्पा मला एक वचन द्याल ?
दिगंबरपंत : हां, बेटा बोल. बाळ काय वचन देऊ तुला ?
श्रीधर : माझ्या बाबांचा शोध घेऊन त्याचं माझ्या आईसंग लग्न लावा. आणि माझ्या बाबाना आ-प-ला मु-ल-गा मा-ना क-रा-ल ना ए-व-ढं मा-झ्या-सा-ठी !
दिगंबरपंत : होय, बाळ. मी वचन देतो तुला की, मी सारं तुझ्या इच्छे प्रमाणेच होईल.
श्रीधर : आ-ई-ss( प्राण सोडतो. आणि सर्वजण दुःखाच्या सागरात बुडतात. तेव्हा दिगंबरपंत राजला म्हणजेच माधवला मोबाईल वरून दु:खत घटनेची माहिती देतात.आणि ताबडतोब पुण्याला येण्याचा आग्रह करतात.आणि रंगमचकवर काळोख होतो.पुन्हा प्रकाश होतो तेव्हा रंगमंचकावर माधव बाहेरून प्रवेश करतो आणि विद्याला हांक मारतो.)
माधव : विद्या बाहेर ये .
विद्या : ( आतून) आले.(प्रवेश करून) एवढ्या दिवसांनी आज आलात ? मी तुमच्यावर फार रागावली आहे.
माधव : ते का ?
विद्या : इतक्या दिवसात तुम्हाला एकदा पण माझी आठवण नाही आली ना ?
माधव : रोज यायची आणि खूप यायची; पण करणार काय ?
विद्या : करणार काय म्हणजे ? का नाही आले तुम्ही मला भेटायला ? हेच का तुमचं माझ्यावरचं प्रेम ?
माधव : मला वाटलं की तू माझ्या गरिबीला कंटाळून मला सोडून पुण्याला निघून आलीस. म्हणून मी तुला भेटायचा कधी प्रयत्न केला नाही .शिवाय इस्पितळातल्या डॉक्टरांनी तुझ्या बद्दल मला खोटी माहिती दिली होती.
विद्या: काय माहिती दिली डॉक्टरांनी माझ्या बद्दल तुला ?
माधव : हीच की तू आपल्या बाळाला स्वतःच्या मर्जीनेच अनाथलयात सोडून गेली.आणि माझ्यासाठी हा मेसेज सोडून गेलीस की या पुढे मला भेटायचा प्रयत्न करू नये.ह्याचा अर्थ काय होतो, ते तूच सांग बरं.
विद्या : मी असं काहीच केलं नाही रे,खरं तर मला माहित देखील नाही की माझा बाळ जिवंत आहे.कारण तो जन्माला आला तेव्हा मी बेशुद्ध होते आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला सांगितले गेले की माझं बाळ जन्मताच मृत पावलं.
माधव : काय सांगतेस ?
विद्या : खरं तेच ! आणि आपल्या दोघांची ताटातूट करणारे पण माझे वडीलच! खरं तर मला त्यांच्यावर विश्वास करायला नको होता.पण घडायचे ते घडून गेलं आता त्याचा प्रश्चाताप करून काय फायदा ?
माधव : खरंय तुझं ! पण आता आपण पुढं काय करायचं ते विचारायला आलो आहे मी !
विद्या : लग्न करायचं ! आणि या पुढं आपण दोघांनी
एकमेकांपासून दूर व्हायचं नाही.कारण आपला श्रीधर पुन्हा माझ्या पोटी जन्माला येणार आहे.असं तो मला सांगून गेलाय.
माधव : हो ना,मग लवकरच तयारीला लागूया .
विद्या : हो,पण अगोदर लग्न तर व्हायला पाहीजेल ,ना ?
विद्याधरपंत : ( प्रवेश करून) लग्नच ना,ते सुद्या होईल. पण
काही दिवसा नंतर. कारण श्रीधरला जाऊन फार दिवस नाही झालेत अजून.
विद्या : आम्हाला कल्पना आहे त्याची पप्पा ! पण त्याची अखेरची इच्छा पूर्ण करायला हवी ना ?
विद्याधरपंत : होय बाळ . ती तर करायलाच हवी. नाहीतर त्याच्या आत्म्याला शांती लाभणार नाही.
सरस्वती : ( आतून बाहेर येत ) म्हणूनच मी म्हणते आपण पुढील महिन्यातला मुहूर्त धरू या ? ( मधवकडे पाहत) चालेल ना हो जावई बापू ?"
माधव : पप्पाना विचारून सांगतो.
विद्याधरपंत : हो.दिगंबरपंतांना विचारूनच आम्हाला सांगा.
माधव : बरं मग मी येऊ ?
सरस्वतीबाई : ,हो या .
( विद्या आणि माधव दोघे खाली वाकून त्या दोघांच्या पाया पडतात.आणि अखेरचा पडदा पडतो.)
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा