बिन फेरे हम तेरे २
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बिन फेरे हम तेरे २ |
छे उगाच काहीतरी मी विचार करते आहे, माझ्यावर
कशाला करेल तो प्रेम ? बारबाला वर कुणी प्रेम करतं का ?
रस्त्यावरील धूळ घरात कोण कसं आणील ? आणि समजा
तो जरी तयार झाला असला तरी घरातील माणसे तयार व्हायला हवीत ना ? जाऊ दे उगाच स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाहीये. एक वर्षांपूर्वी आपलं जीवन किती उल्हासपूर्ण होतं. बाबांची मी लाडकी मुलगी फार प्रेम होते बाबांचे माझ्यावर. म्हणूनच आई नको म्हणत असतानाही बाबांनी मला कॉलेजला टाकले. आईचे ही प्रेम फार होते माझ्यावर परंतु घरची आर्थिक परिस्थिती फार बिकट असल्याने तिचे म्हणणे होते, पोर दहावी पर्यंत शिकली ना , बस झालं तिचं आता शिक्षण ,परंतु बाबांचे म्हणणे होते की , मुलगी पुढे शिकायचे म्हणते तर तू उगाच खो कशाला घालतेस मध्ये ? त्यावर आई म्हणाली ," अहो , हो पण शिकायला पैसा पाहिजे तो कुठून आणणार ?" त्यावर बाबा म्हणाले," मुलींना पदवीधर होईपर्यंत शिक्षण फ्री असते "
" अहो हो, पण बाकी चा खर्च नाही आहे का ?"
" वह्या पुस्तके, ट्युशन वगैरे.....त्यांना कुठून आणणार पैसा ?" तशी मी म्हणाली ," बाबा, मला ट्यूशन वगैरे काही
नको, मी घरी अभ्यास करून पास होईन."
" बघ तुझ्या ट्युशन चे पैसे वाचले. आता तरी हो म्हण." त्यावर किंचित रागात आणि नाराजीच्या स्वरातआई म्हणाली ," बाप अन लेक काय हवं ते करा. माझे बाबा कानावर हात आहेत." असे आई म्हणताना म्हणाली खरी , परंतु कॉलेज ला ऍडमिशन घेण्यापासून च्या सर्व कामात ती
माझ्या सोबतच होती. टिळक नगर ज्युनिअर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. परंतु प्रवेश फी पाच हजार होती. आता हे पाच हजार आणायचे कोठून हा सर्वात मोठा प्रश्न होता. आई घरी येताच बाबांवर भडकली. तुम्हीच म्हणाला होता ना मुलींना फ्री शिक्षण असते म्हणून." त्यावर बाबा म्हणाले," हो मग खोटं काय सांगितले मी !" आई माझ्याकडे पाहत म्हणाली ," सांग गं ह्यांना किती पैसे भरायचे आहेत ते. " मी भीत भीतीच म्हणाली," बाबा पाच हजार पण ते नंतर मिळतात फी माफ झाल्यावर !" तशी आई लगेच म्हणाली , " फी माफ झाल्यावर.....म्हणजे ?" त्यावर बाबा तिला समजावत म्हणाले," अगं म्हणजे सेतू केंद्रातून मधून आपले कमी उत्पन्नाचा दाखला काढायला लागतो. तो मी काढेन तू त्याचे अजिबात टेन्शन घेऊ नकोस."
" ते ठीक आहे, पण आता पाच हजार आणायचे कुठून ?" आई ने पुन्हा तोच प्रश्न केला. त्यावर बाबा म्हणाले," तुझी कुणीतरी मैत्रीण आहे ना, ती व्याजावर
पैसे देते ना, तिच्या कडून घे सध्या." तसा आईने प्रश्न
केला की, तिचं व्याज किती घेते ते माहीत आहे का ?"
तेव्हा बाबांनी विचारले ," किती घेते ?"
" पाच टक्यांनी देते ती पैसे."
" हरकत नाही , घेऊन टाक."
" आणि देवू कसे ते पैसे ?"
" देऊन टाकू थोडे थोडे !"
" काही नको. त्या पेक्षा आपण असे करू ...
" कसे ?"
" मी महिला बचत गटाकडून घेते पैसे."
" आणि त्यांचे व्याज किती असते ?"
" फार थोडे ! म्हणजे एक रुपया वीस पैसे !"
" वा फारच छान , घेऊन टाक."
" पण ते लगेच नाही मिळत."
" मग सर्व पॉसीजर होईपर्यंत एक महिना तरी जाईल."
" हरकत नाही, तुझ्या मैत्रिणी कडून घे अगोदर नि फी
भरून टाक. नि बचत गटाचे पैसे मिळाले की व्याजासाहित
देऊन टाक तिचे."
" हम म असंच करते." आणि आई ने अगदी तसेच केले , आपल्या मैत्रिणीकडून पैसे घेतले नि कॉलेज मध्ये भरले. त्यानंतर महिला बचत गटाकडून दहा हजार रुपयांचे कर्ज घेऊन आपल्या मैत्रिणीचे पैसे देऊन टाकले आणि एकदाचे माझे कॉलेज सुरू झाले. बाबांनी सेतू केंद्रात जाऊन प्रथम एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढला नि त्यावर मागील तीन वर्षाचे उत्पन्नाचा म्हणचे नाँनक्रीमनल चा दाखला मिळविला.
मी कला शाखा निवडली होती. कारण माझे इंग्लिश
विषय फार कच्चा होता. कारण सातवी पर्यंत चे शिक्षण मी
महानगरपालिकेच्या शाळेत मोफत शिक्षण घेतले.
कारण माझ्या बाबांना पगार फार कमी असल्याने ते मला
प्रायव्हेट स्कुल मध्ये नाव टाकू शकले नाहीत. त्यामुळे
महानगरपालिकेच्या शाळेतच सातवी पर्यंत शिक्षण घेतले.
सातवी पास झाल्यानंतर बाबांनी माझं ऍडमिशन शिशु
विहार मित्रा टाईप म्हणून रेल्वेची शाळा होती.त्या हायस्कुल
मध्ये ऍडमिशन घेतले. कारण त्या हायस्कूलची प्रवेश फी फक्त साडे पाचशे रुपये होती म्हणून बाबांनी माझे त्या शाळेत ऍडमिशन केले. ती शाळा आमच्या घरा पासून खूपच दूर होती. पण करणार काय पैशा पायी बाबांनी त्या दूरच्या शाळेत माझे ऍडमिशन केले. तेव्हा त्या शाळेच्या मुख्याध्यापिका माझ्या बाबांना म्हणाल्या ," आमच्या शाळेत बाहेरून येणाऱ्या मुलांना एक वर्ष आम्ही त्याच वर्गात ठेवतो. अर्थात नापास करतो. कारण एस.एस.सी ला
त्यांना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. बाबांना वाटले की , त्या मुद्दाम असे बोलत आहेत. पास झालेल्या मुलांना नापास कसे करतील ? मी जेव्हा त्या शाळेत जाऊ लागली. तेव्हा तिकडच्या मुलींकडून कळले की खरंच एक एक वर्ष बाहेरून आलेल्या मुलांना नापास करतात. आता काय करणार ऍडमिशन घेऊन झाले नि शाळा ही सुरू झाली. आणि तसेच झाले आठवी मध्ये मला त्यांनी नापास केले. एक वर्ष माझे वाया गेले. त्यानंतर नववी आणि एस. एस. सी. उत्तीर्ण झाल्यावर अकरावीला इथं ऍडमिशन घेतले. बाबांच्या पगारात घरखर्च भागे ना म्हणून आई ने धुण्याभांड्याचे काम करू लागली. मी अकरावीतून बारावीत गेली. आता बोर्डाची परीक्षा म्हणजे खूप अभ्यास करायला लागणार, दिपू म्हणजे दीपेश माझा धाकटा भाऊ तेव्हा एस.एस.सी. ला होता. त्याला अभ्यासा पेक्षा खेळ फार आवडे. अभ्यास म्हणचे कंटाळा करायचा. त्यामुळे हायस्कुल मधून मुख्यधापकांनी पालकांना शाळेत बोलविले. बाबांना टाईम नसल्याने आईच गेली नि मुख्यधापकाना भेटून आली. मुख्यधापकांनी सांगितले की तुमच्या मुलाचा अभ्यास फारच कच्चा आहे, त्याला बाहेरून ट्युशन लावा.. आई घरी आल्यावर त्याच्या वर फार रागावली, परंतु त्याच्या वर काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा मी आईला म्हणाले," मम्मा तो काही अभ्यास बिभ्यास करणार नाहीये. त्याला ट्युशन ला टाक." त्यावर आई म्हणाली ," ट्युशन ला टाक म्हणतेस खरे ,पण ट्युशन साठी एवढे पैसे कुठून आणायचे." त्यावर मी आईला म्हणाले, " ते सगळं खरं पण एस.एस.सी. ला जर पास झाला नाहीतर ह्याच्या पुढच्या करिअरचे काय होणार ?" त्यावर आईने खूप विचार केला. शेवटी आईला ही माझे म्हणणे पटले. तशी ती मला म्हणाली, " संध्याकाळी तुझे बाबा कामावरून आले ना , मग त्यांच्या कानावर ही गोष्ट घालते, पाहू काय म्हणतात ते." आणि संध्याकाळी बाबा घरी आल्यानंतर अगोदर आई त्यांना काही बोलली नाही. बाबा आले नि कपडे बदलून फ्रेश झाले नि कॉट वर येऊन बसले. तेवढ्यात आई त्यांच्या साठी गरमा गरम चहा घेऊन आली नि चहाचा कप बाबांच्या हातात दिला नि त्यांच्या शेजारी ती बसली. तसे बाबा म्हणाले ," मधू तू चहा प्यालीस ?"
" तुम्ही प्या मी नंतर घेईन."
" नंतर का ?"
" आमचा एकदा झालाय चहा,तुम्ही प्या !"
" नाही. अगोदर तू गोड कर मग मी पितो." असे म्हणून
बाबांनी आपल्या हातातील कप आईच्या तोंडापाशी नेला.
तशी आई आपल्या डोळ्यांच्या नजरे ने बाबांना सांगू लागली की मुलं पाहताहेत ना ? त्यावर बाबा हसून म्हणाले,
" मुलंच पाहताहेत ना , पाहू दे." असे म्हणून बाबांनी आईच्या तोंडाला कप लावलाच. नाईलाजाने आई ने एक
घोट घेतला. त्यानंतर बाबांनी चहा प्याले नि मग आई कडे
पहात म्हणाले ," मला काही सांगायचं आहे का तुला ?"
" तुम्ही कसे ओळखलंत ?"
" त्या शिवाय का तू इथं बसलीस."
" ऐका ना मी काय म्हणत होते."
" बोल ना ?"
" दिपू ला ट्युशन लावायला लागेल."
" का गं ?"
" अभ्यास कच्चा आहे त्याचा, आज त्याच्या सरांनी
बोलविले होते मला शाळेत."
" पण ट्युशन ला टाकायचं म्हटलं तर पैसे पाहिजे ना ?"
" हो पैसे तर लागणारच. ते पण कमी नाही वर्षाचे वीस
हजार."
" काय ? " शॉक बसल्यागत म्हणाले ," वीस हजार !"
" हां !"
" अगं पण वीस हजार कोण देईल आपल्याला ?"
" महिला बचत गटातून काढावे लागणार."
" पण आधी काढलेले पूर्ण फेड झाले का ?"
" हो, ह्याच महिन्यात पूर्ण होतंय."
" मग ठीक आहे, पण हप्ता मोठा असेल ना ?"
" दोन हजार प्रतिमाहिना. "
" दोन हजार....कसं जमणार गं ?"
" जमेल. मी अजून एक दोन ठिकाणी काम बघते मिळते
का ?"
" अगं किती कस्ट करणार तू ?"
" काय करणार कष्ट केल्या शिवाय फळ मिळणार आहे का ?"
" नाही. ते खरं !" त्यानंतर रात्रीची जेवणे झाली.भांडी
घासून फुसून स्वच्छ केली आणि प्रत्येक जण झोपायची
तयारी करू लागले. आई-बाबा एका बाजूला नि आम्ही
दोन भावंड एका बाजूला. मी आई-बाबांकडे पाठ करून
झोपली होती. आणि दिपू तर पडल्या पडल्या झोपी गेला.
मी बाहेरून झोपी गेल्या सारखी वाटत होती तरी पोटात
जागी होती. बाबा आईला हळूच म्हणाले ," दिवसभर काम
करून थकत असशील ना गं ?"
" हुं थकली तरी कोणाला सांगणार ?"
" का ? मी आहे ना , पाय चेपून देवू !"
" चल्ला भलतेच काय ? तुम्ही माझे पाय चेपणार
उलट मी चेपायला पाहिजे तुमचे पाय."
" आणि मी तुझे पाय चेपले म्हणून काय बिघणार आहे ? "
" काही गरज नाही त्याची !"
" अगं तुला नसली तरी मला गरज आहे ना ?"
" कोणाची ?"
" तुझी ! तुझ्या मदती शिवाय काय मी संसाराचे गाडे
एकट्याने ओढणार आहे काय ?"
" असं म्हणताय होय ?"
" मग तुला काय वाटलं ?"
" काही नाही.झोपा आता सकाळी लवकर उठायचं आहे."
" का बरं ?"
" का म्हणजे तुमचा डबा नको का तयार व्हायला ?"
" एकाद्या दिवस नाही दिलास डबा तर काही बिघणार
नाही."
" बिघणार नाही कसं ? तुम्ही तिथं उपाशी म्हटल्यावर
इथं माझ्या घशातून घास उतरणार आहे का ?" आई-बाबांचे एकमेकांवरचे प्रेम पाहून मला इतका आनंद झाला की मी
त्याचे शब्दात वर्णन करू शकणार नाही.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा