कुलांगार -१
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुलांगार -१ |
वाडा गावचे एक मोठे जमीनदार, त्यांची अमाप जमीन
दयानंद पुजारी त्यांचे नाव परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते.
लग्न होऊन बारा वर्षे झाली. तरी त्यांच्या घरी पाळणे हलले
नव्हते. आता आजूबाजूचे लोक त्यांच्या पत्नीला वांझ म्हणू
लागले होते. आता तर त्यांची त्याना म्हणू लागली की दुसरे लग्न कर. परंतु ते आपल्या आई चे अजिबात मनावर घेत नव्हते. सांगून सांगून शेवटी कंटाळल्या. अखेर त्यांनी आपल्या सुनेलाच गळ घातली. त्या म्हणाल्या ," सुनबाई , तू
तर बघबाई सांगून. माझं तर ऐकेनासा झालाय. कदाचित तुझं
ऐकेल तो." शेवटी त्यांच्या पत्नी कल्याणी त्याना म्हणाली ," माझं एक ऐकता का ?" त्यावर दयानंद म्हणाली," हो , ऐकेन ना बोल. काय म्हणणे आहे तुझे ?" कल्याणी बोलल्या," तुम्ही सासूबाईचे ऐकत का नाही ?"
" तुला माहितेय ती मला काय करायला सांगतेय ती ?"
" दुसरे लग्नच करायला सांगताहेत ना त्या ?"
" हो !"
" मग काय चुकीच्या सांगताहेत त्या ?"
" तुला दुसरी सवत आणलेली चालेल तुला ?"
" हो . चालेल मला."
" पण मला नाही चालणार."
" पण मी म्हणते तुम्हाला प्रॉब्लेम काय ? प्रॉब्लेम तर
मला असायला हवा ना ?"
" हो . तुला असायला हवा ; पण तुला तो कळत नाहीये."
" मला कळतंय सारं ; परंतु आपल्या प्रॉपर्टी ला कुणी वारीस नको का ?"
" अंग वारीस का होईल.आज ना उद्या. झाल्या शिवाय राहील का ? आणि आपण दोघे इतक्यात म्हातारे का झालोत ? "
" अहो, असं म्हणता म्हणता बारा वर्षे झालीत. अजून किती वाट पहायची मी ?"
" आता नाही होत तर मी तरी काय करू ? आपण
आतापर्यंत थोडे का प्रयत्न केले ? पण नाही झाला त्याला
काय करणार ?"
" म्हणूनच म्हणतेय मी तुम्ही दुसरे लग्न करा."
" आणि तिला पण नाही झालं तर ?"
" असं कसं म्हणता ? मला नाही झालं म्हणून तिला होणार नाही का ? असं कुठं झालंय का ?"
" अगं दुसरं लग्न करायचं म्हटलं तर तुला सोडचिठ्ठी
द्यावी लागेल. आणि मला ते मान्य नाही."
" अहो, सोडचिठ्ठी दिली म्हणजे आपले नाते संपले का ?"
" हो ; कायद्याने तू माझी पत्नी राहणार नाहीस."
" फक्त कायद्याने ना ?"
" म्हणजे काय म्हणायचं आहे तुला ?"
" अहो , आपलं नाते एवढं का कच्चं धाग्याचे आहे जे इतक्या सहजपणे तुटेल. ? केवळ एका कोर्टाच्या कागदाने ?"
" मान्य आहे ; आपले नाते इतक्या सहजी तुटणार नाही.
परंतु दुसरी येणारी पत्नी कशी असेल कोण जाणे ? "
" कशी ही असो मी तिला माझी धाकटी बहिणीच समजेन."
" अगं तू समजशील तिला बहीण. पण समजेल का ?"
" अहो, मी घेईन ना ,सांभाळून तिला."
" नाही नाही ते अजिबात जमणार नाही. "असे म्हणून
ते तडक बाहेर निघून गेले. ते गेलेल्या दिशेकडे पाहत कल्याणीबाई उद्गारल्या ," आता काय करायचं आत्याबाई ह्यांना कसं समजावयाचं बरं ? " त्यावर तिची सासू म्हणाली ," एक युक्ती सांगते. ..ऐकशील."
" हो ; ऐकेन ना !"
" तुझ्या मागची एक लग्नाची बहीण आहे ना , तुझ्या वडिलांना सांगून तुझी धाकटी बहीण च सवत म्हणून का आणत नाहीस या घरात ?" त्यावर कल्याणीबाई
किंचित विचारमग्न झाल्या. नंतर त्याना ही सासूबाईंचे म्हणणे
पटले. त्यानंतर चार दिवस माहेरी जाऊन येते असे सांगून त्या
आपल्या माहेरी गेल्या. सर्वात अगोदर त्यांनी आपल्या बहिणीची काय इच्छा आहे ती जाणून घेतली. तिला एका बाजूला घेऊन त्या म्हणाल्या ," कुमुद तुला एक विचारू ?"
" हां विचार न ताई ?"
" तुझं कुणावर प्रेम तर नाही ना ?"
" असं का विचारतेस ताई ?"
" असंच. पण खरं सांग."
" नाही गं , माझं कुणावरही प्रेम नाही. आणि माझ्या सारख्या सावळ्या रंगांच्या मुलीशी कोण करणार गं लग्न ?
आजकाल सर्वाना गोरी बायको लागते. गोऱ्याना ही आणि
काळ्या माणसांना ही! स्वतः काळे असतात पण त्याना बायको मात्र गोरी पाहिजे."
" बरं, मला एक सांग , तुला नवरा कसा पाहिजे ?"
" अगं ताई माझी तर लय इच्छा आहे की मला सुध्दा
भाऊजी सारखा नवरा पाहिजे."
" मग तुझ्या भाऊजींशी लग्न करशील ?"
" काहीतरीच काय बोलतेस ताई ? मी भाऊजींशी लग्न
करून तू कुठं जाशील ?"
" मी पण तिथंच राहणार तुझ्या सोबत. दोघे एकत्र नाही
राहू शकत ? " तिच्या मनातील जाणून घेण्यासाठी मुद्दामच त्यांनी असं विचारलं. त्यावर ती म्हणाली ," राहू शकतो. पण
तू असं का म्हणतेस ?"
" मला माझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न करायचे आहे, आणि
त्यांची तू दुसरी बायको म्हणून तू बनून यायचे आहेस."
" पण बाबा तयार नाही होणार."
" त्याना राजी करायचे काम माझे. पण तू आधी तयार
आहेस का ते सांग."
" अगं ताई तुझ्या नवऱ्या सारखा देव माणूस मला नवरा
लाभला तर मी माझं भाग्यच समजेन."
" ठीक आहे, आता मी बाबांशी बोलते. " असे म्हणून
प्रथम ती आपल्या आईशी चर्चा केली. प्रथम तिची आई नाहीच म्हणाली. त्या म्हणाल्या ," एका घरात दोन मुली.
नको गं बाई ! सख्ख्या बहिणी असल्या तरी त्या नंतर एकमेकांच्या वैरी बनतात." त्यावर कल्याणी म्हणाली," बघ
आई , दुसरी एखादी येऊन माझ्या उरावर बसण्या पेक्षा माझी
धाकटी बहीण माझ्या उरावर बसली तरी चालेल मला."
" अगं पण का आपला सुखी संसार मोडायला निघालीस ?"
" संसार मोडायला नाही निघाली आई तर जोडायला निघाली. "
" जोडायला. ती कशी काय ?"
" हे बघ. माझ्या पोटी संतान नाही. आणि माझा नवरा दुसरे लग्न करायला तयार नाही."
" अगं मग चांगलं आहे ना ? भाग्यवान आहेस पोरी !
तुला असा देवमाणूस नवरा मिळाला."
" हो . देवमाणूसच आहेत ते. परंतु एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी
ला कुणी वारीस नको का ?"
" होय. ते पण खरं आहे,पोरी पण भाग्या पुढे काय कुणाचे चालते गं ?"
" म्हणूनच सांगते. कुमुद चे लग्न माझ्या नवऱ्यासंग लावायला."
" मग अगोदर बापाला विचार. त्यांची संमत्ती घे.मी काय
सांगणार बापडी !" असे बोलून त्यानी स्वतःवरची जबाबदारी
टाळली. तसे त्यांचे एक मन म्हणत होते. कुमुद चे लग्न कल्याणी च्या नवऱ्याशी झालं तर बरंच आहे, असं पण तिचं
लग्न कुठं जुळत नाहीये. वय वाढत चाललंय. तिच्या मागची
अजून एक मुलगी आहे,तिचं पण आता लग्नाचे वय झालंय.
परंतु मोठीचे लग्न झाल्या शिवाय धाकटी चे कसे करणार ?
पण अनायसे मागणे आलेच आहे तर देऊ टाकू कुमुद ला
असा विचार करून तिने ही गोष्ट आपल्या नवऱ्या बरोबर
शेअर केली. सुरुवातिला ते सुध्दा आपल्या पत्नीवर रागावले
म्हणाले ," आपल्या लेकीचा संसार उध्दवस्त करायला निघालीस का तू ?" त्यावर त्यांनी त्याना समजावून सांगितले
नि इच्छा आपली नसून तुमच्या लाडक्या लेकीचीच आहे, असे सांगितले. तेव्हा मग त्यांनी कल्याणीला त्या संबधी
विचारले. तेव्हा कल्याणी म्हणाली ," होय बाबा. दुसरी एखादी हडळ माझ्या जीवनात येण्या पेक्षा माझी बहिणच
माझी सवत झालेली चालेल."
" अगं पण तुझा नवरा राजी आहे का या गोष्टीला ?"
" त्यांना राजी करायचे काम माझे. पण अगोदर तुमची
मंजुरी आहे की नाही ते सांगा."
" आता तूच आपल्या संसारात विष कालवायला निघालीस तर आम्ही तरी काय करणार ?" त्यानी नाईलाजाने होकार दिला. त्यानंतर ती आपल्या सासरी आली. रात्री एकांत मध्ये असताना तिने ही गोष्ट आपल्या
नवऱ्याला सांगितली. दयानंद तर अगोदर नाहीच म्हणाले.
परंतु तिने खूप नाना प्रकारे त्याना समजाविले. एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी ला कुणी वारीस नको का ? शिवाय माझ्या बहिणीचे लग्न कुठं होत नाहीये. त्यामुळे तिच्या मागचीचे
पण रखडले आहे, तेव्हा तुम्ही जर तिच्याशी लग्न केलात
तर तिच्या मागचीचा रस्ता मोकळा होईल. शिवाय माझी
सवत धाकटी बहिणच असेल त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये ."
" ते ठीक आहे गं ? पण तिला देखील नाही झालं मूल
तर मग काय करायचं ?"
" असं कसं म्हणता माझं नशीब तिला थोडी आहे ?"
" ठीक आहे, तुला तुझे हात आगीत भाजायचेच असतील तर मी तरी काय करणार ?"
शेवटी ना होय करता लग्नाला संमत्ती मिळालीच
लवकरच धुमधडाक्यात लग्न पार पडलं. कुसुद कल्याणीची
सवत बनून आली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा