Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

काळपुरुष -३

काळपुरुष -३
काळपुरुष -३


 

                                 ३

आवाज बंद झाल्यावर इन्सपेक्टर विजय ने त्या अरबाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठविला .नि स्वाती ने सांगितलेल्या पत्त्यावर बाबरच्या अड्यावर धाड टाकली.
पण त्या अगोदरच बाबर ने सर्व मुलींना तेथून दुसरीकडे
सुरक्षित ठिकाणी हलविले होते. परंतु एक रूम आतून बंद होता. ज्या रुम मध्ये तो अरब स्वाती सोबत होता. तो रूम मास्टर  किल्लीच्या मदतीने उघडला गेला. परंतु आतील दृश्य पाहून सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले,अर्थात रूमच्या आंत मध्ये ना अरब होता ना स्वाती होती . त्यामुळे सर्वना प्रश्न पडला की  कुठं गेलीत हे दोघेही ? पळून गेले म्हणायचे तर दरवाजा आतून  बंद होता. खिडक्या ही बंद होत्या. बाथरूम ,सौचालय चेक केले असता तेथेही संशयास्पद असं काहीही  आढळलेले नाही. मग हे दोघेही गेले कुठे ? म्हणजे त्या दोघांना जमीन ने गिळले का आकाशात उडून गेला. काही कळायला मार्ग  नाही . आता काय करावं बरं ? असा विचार मनात सुरू असतानाच तेथे पोलिसांची धाड पडली. आणि त्यानी त्या रूम ची कसून तपासणी केली; परंतु संशयास्पद असे तेथे काहीच आढळले नाही. म्हणूनच इन्सपेक्टर विजय ने सी. सी. टीव्ही कॅमेरा चे फुटेज मागितले. तेव्हा त्या फुटेज मध्ये असे दिसले की तो अरब ज्यावेळी त्या रुम मध्ये आला तेव्हा  तेथे स्वाती नव्हती. म्हणून त्याने तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्व प्रथम त्याने सौचालय मध्ये आंत डोकावू  पाहिले पण आंत कोणीच नव्हते. त्यानंतर त्याने  तिचा बाथरूम मध्ये शोध घेतला. तेव्हा त्याला  ती बाथरूम मध्ये बेशुध्द अवस्थेत सापडली. त्याने
तिला उचलून बेडरूम मध्ये आणली नि तिला कॉटवर नीट झोपवून तिच्या तोंडावर पाणी मारले. तशी ती शुद्धतीवर आली नि अरबाला पाहून ती घाबरली. आणि त्याला गववया करू लागली की मला अपवित्र करू नकोस असे ती बोलू लागली.
      पण अरबावर तिच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट तो  तिला हसून म्हणाला ," जानेमन हम तुमको कुछ नही करेगा . सिर्फ प्यार करेगा. और तुमने हमको खुश किया तो हम तुमको मालामाल करेगा .आओ हमारे बाहो में  असे बोलून तो तिला आपल्या मिठीत घेण्याचा तो प्रयत्न करू लागला. तो जसा तिच्या जवळ जाऊ  लागला तशी ती
हळूहळू  मागे सरकू लागली ; परंतु कॉटला अडकून बिस्तरावर पडली. बस्स!  अरब तिच्या अंगावर उडी मारून तिच्या अंगावर स्वार होतो. आणि जवरदस्तीने तिच्या अंगावरील कपडे फाडतो नि बाजूला फेकून देतो. आणि जसा तो तिच्यावर अतिप्रसंग करू लागला. आणि अचानक स्वतःच किंचाळू लागला नि बाजूला कोसळून पडला. नि  तडपडून  लागला. नि थोड्याच वेळात शेटवचा श्वास पण घेतला. थोड्या वेळानंतर स्वाती बिस्तरावर उठून बसत म्हणाली , " कैसी रही सेक्स की मजा बहुत   मजा आया होगा ना तुम्हें ? वैसे तो मैंने तुम्हें पहलेही कहा था की  मुझसे दूर रहो. लेकिन तुम नही माने, नजीजा सामने हैं ! चलो अब हमें यहाँसे निकलना चाहिए .  पुलिस की भी तो मदत करनी   है  हमे ? असें म्हणून स्वाती ने त्याला सहज उचलले नि बाथरूम मध्ये घेऊन गेली. तेथून पुढे कुठे गेली ते काही कळायला मार्ग नाही. शिवाय पहिली आश्चर्य कारक गोष्ट म्हणजे एक स्त्री, एका जाड जुड असलेल्या माणसाला सहज कशी उचलू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने काहीच प्रतिकार न करता तो अरब एकाकी कसा ओरडू लागला ? नेमके काय झाले असेल त्यांच्या  सोबत. इन्स्पेक्टर विजय खूप करतो त्यावर पण काहीच उत्तर मिळत नाही. विचार करता-करता एक गोष्ट त्याला प्रकर्षाने जाणवली आणि ती गोष्ट म्हणजे स्वाती ने त्याला मारले नसून  तिच्या शरीरात नक्कीच  प्रेमात्माचा वास  असावा. म्हणून तिला बेशुध्द होई पर्यंतचेच आठवते. त्या पुढचे काहीच आठवत नाही. शिवाय तिच्या अंगात असलेला प्रेतात्मा म्हणालाच की, त्याला स्वातीने नाही तर मी मारले म्हणून ."
     जाता जाता मात्र बाबरला वार्निग मात्र जरूर दिली  की
मुली सप्लाय करायचे काम तू जर करशील तर मी तुला तुरुंगात डांबल्या शिवाय राहणार नाही. तुझ्या विरुध्द फक्त एक   पुरावा सापडायला पाहिजे. मग बघ मी तुझी कशी वरात काढतो ती." त्यावर बाबर उपहास पूर्ण स्वरात बोलला,
हां मी विदेशी लोकांना मुली सप्लाय करतो हे खरं आहे, परंतु
कायद्याला पुरावा पाहिजे आणि  आम्ही पुरावा मागे ठेवत नाही. तेव्हा अगोदर पुरावा घेऊन या मगच आम्हाला अटक
करायला या, आम्ही स्वत: येऊ तुमच्या सोबत , हे माझे वचन आहे."
  पोलीस पथक पोलीस स्टेशनला आल्यानंतर पो. इन्स्पेक्टर विजय कोचरेकर बोलला ," कॉन्स्टेबल अजय तू एक काम
कर."
     " काय सर ?"
     " तू आताच्या आता स्वाती च्या घरी जा नि तिला आणि
तिच्या आईला पोलीस स्टेशनला बोलविले म्हणून सांग."
     " येस सर !" असे म्हणून त्याने एक सैल्युट् मारली नि तेथून निघाला. सब इन्स्पेक्टर  जयदेव बोलला ," पण सर,
तिच्या विरोधात पुरावा तर काहीच सापडला नाहीये."
      " सापडेल. ती खरं बोलते का खोटे ते लवकरच कळेल."
      " कसे ?"
      " डॉक्टराकडून तिची तपासणी करून घेतली म्हणजे
कळेल तिच्या सोबत शारीरिक संबंध झालेत की नाहीत."
     " अहो,पण आपण फुटेज मध्ये पहिलेच ना .काय झाले ते ."
     " हो पाहिले. म्हणूनच तिची मेडिकल चाचणी करणे आवश्यक आहे, कारण तिचे म्हणणे आहे की, बाथरूम
मध्ये बेहोश पडली होती मग त्या अरबा च्या सोबत शारीरिक
सबंध केले ती कोण ? शिवाय इथ पोलीस स्टेशनला ज्याने
साक्षी दिली तो तर पुरुष आवाज होता. ज्याने आपले नाव
काळपुरुष सांगितले. हे काय गौडबंगाल आहे ,ते कळायला
पाहिजे."
      " मी काय म्हणतो साहेब, हा भानामतीचा प्रकार आहे."
       " म्हणजेच भूत ना ?"
       " हो ."
       " मला नाही वाटतं तसं."
       " का ?"
       " भूत ह्या भूतलावर आहेत,हे मला मान्यच नाही मुळी !"
      " मग मला सांगा दरवाजा बंद असताना दोघे बाहेर गेलेच
कसे ?"
      " तेच शोधावयाचे आपल्याला."
      " पण कसं शोधणार ?" तेवढ्यात स्वाती नि आई पोलीस
स्टेशनला आली तेव्हा तिला आणि आईला फक्त ते फुटेज दाखविण्यात आले . स्वतःचे नग्न अवस्थेत असलेले फोटो पाहून तिला एकदम लाज तर वाटली. पण करणार काय ?
आपले नग्न शरीर या इन्स्पेक्टर ने सुध्दा पाहिले असेल असे
जाणवल्यावर तिला मेल्याहून मेल्या सारखे वाटले. पण त्याच
क्षणी आपण घरी बेशुध्द अवस्थेत होतो तेव्हा तर आपल्या
अंगावर संपुर्ण कपडे होते. ते कसे काय ? असा तिला प्रश्न
पडला तेव्हा तिची आई म्हणाली ,"  पण साहेब ,हे कसं शक्य
आहे ?  ती घरात बेशुध्द अवस्थेत सापडली ना, तेव्हा तिच्या
अंगावर पूर्ण कपडे होते. ते कसे ? "
      " ते नंतर तिने ठीक केले असतील."
      " मग मला सांगा दरवाजा न उघडता ती घरात कशी आली ?" स्वेताच्या आई ने विचारले. पो. इन्स्पेक्टर विजय
किंचित विचारात पडला पण क्षणभरच. लगेच तो दुसऱ्या
क्षणी बोलला ," तुम्ही जे काय सांगताय ते खोटं पण असू शकतं. "
     " नाही साहेब. जे मी सांगतेय तेच खरं आहे."
     " ठीक आहे,मग आपण एक काम करू "
     " कोणतं सर ?" स्वाती ने न समजून विचारले.
     " तुम्ही  स्वतःची वैधकीय तपासणी करू घ्या."
     " कशासाठी ?"
     " तुमचे त्या अरबशी शाररिक सबंध झाले आहेत की नाही हे पाहण्यासाठी !"
      " ते मी सांगते नाहीत झाले म्हणून."
      " ते फक्त तोंडाने सांगून सत्य ठरत नाही. पक्का पुरावा
आणि तो पुरावा तुमची मेडिकल टेस्ट केल्यानंतर च समजेल."
      " ठीक आहे,मी करायला तयार आहे." स्वाती बोलली.
मग कॉन्स्टेबल अजय तिला घेऊन इस्पितळात गेला. तेवढ्यात पोष्टमार्टम रिपोर्ट घेऊन एक कॉन्स्टेबल आला.
त्या रिपोर्ट पाहून तर सर्वांचे दाबे दणाणले. कारण रिपोर्ट
मध्ये जे होते ते अद्याप कुठंच ऐकलेलं नाही. म्हणजे त्या
अरबाचा मृत्यू त्याचे गुप्त इंद्रिय एकदम चपाती सारखे चपटे
झाले म्हणून. जसे दोन चक्कीच्या जात्या मध्ये पडलेल्या
धान्याचे दळून पीठ होते. तसेच हे इंद्रिय दबून चपटे झाले त्यामुळे की काय तो मोठ्या ने  किंचाळला नि तेथेच मरून पडला. हे कसं शक्य आहे ? सर्वांना हा घोर प्रश्न पडला. आता फक्त एकच रिपोर्ट यायचा बाकी होता आणि तो म्हणजे
त्या रात्री स्वाती मध्ये आणि त्या अरबाशी शाररिक सबंध झाले किंवा नाही ,या वरून सिध्द होईल. थोड्या वेळाने तो
सुध्दा रिपोर्ट  आला. त्या रिपोर्ट वरून सिध्द झाले की त्या
दोघां मध्ये शारीरिक संबंध झालेच नाहीत.  त्यावर पो. इन्स्पेक्टर विजय कोचरेकर म्हणाले,
  " डॉक्टर, काहीतरी गफलत झाली आहे,पुन्हा चेक करा."
   डॉक्टर म्हणाले ," काही ही गफलत झालेली नाही. मी एक
वेळा नाही तर अनेक वेळा पुन्हा पुन्हा चेक केलं. पण रिपोर्ट
तोच येतो." त्यावर पो. इन्स्पेक्टर विजय म्हणाला," पणअसं कसं होऊ शकतं ? " सी. सी. कॉमेरा च्या फुटेजमध्ये  सरळ
सरळ दिसतंय की त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध झालेत.
आणि डॉकर तुम्हीच म्हणालात की,हे गुप्त इंद्रिय स्त्री च्या
योनीच्या आंत शिरल्यानंतरच चपटे झाले म्हणून."
     " हो ; परंतु चपटे कसे झाले ते मला नाही सांगता येणार ?" त्यावर कॉन्स्टेबल अजय म्हणाला ," सर मला
काय वाटतं माहितेय ज्या स्त्री ही अरबाचा शाररिक सबंध झाला ती स्त्री नसून आत्मा आहे."
     " तू पण वेड्या सारखं बोलतोयस ? आत्मा बरोबर कसा
शारीरिक सबंध होईल ? आणि आत्मा असतो हे मुळात मला मान्य नाही."
     " नसेल पटत तर राहू द्या. माझं काय जातंय म्हणा."
    " तसं नाही रे,म्हणायचं होत मला,परंतु .....? पण मनाला
माझ्या पटत नाही बघ."
    " पण जे घडलंय ते तर समोर आहे ना, शिवाय त्या शिवाय
तो प्रत्यक्ष आत्म्यानेच स्वत: पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की त्याने मारले म्हणून."
     " हो ; परंतु तो पुरुषी आवाज होता.  आणि सी.सी. कॉमेरात तर एक स्त्री दिसतेय. मग त्याच्या वक्तव्यावर कसा
विश्वास ठेवायचा ? तूच सांग बरं."
     " अहो,साहेब भूत कोणतेही रूप घेऊ शकते."
     " पण मला नाही पटत हे ."
     " मला तरी कुठं पटतंय ; परंतु शेवटी मान्य करावेच लागते." सब इन्स्पेक्टर जयदेव बोलला."
      " मग आता हीच काय करायचे ?"
      " काय करायचे म्हणून काय विचारता ? सोडून द्या तिला."
     " केस स्वाल्फ न होता ?"
      " तिला पकडून ठेवून तरी केस स्वाल्फ होणार आहे का ? उलट पोलिसांची बदनामी होईल. तिच्या विरुध्द काही
एक पुरावा नसताना पोलिसांनी तिला बंधीस्थ करून ठेवले
म्हणून."
    " हो तेही खरंच आहे." असे बोलून त्या दोघी मायलेखी
ना घरी जाण्याची परवानगी मिळाली. पण त्याच बरोबर एक
वार्निग पण मिळाली खरा खुनी पकडला जाईपर्यंत हे शहर
सोडून बाहेर कुठं ही जाऊ नये. जास्तच गरजेचं जाणे असेल
तर पोलिसांची परवानगी घेऊनच मग जावे."
     स्वातीने होकारार्थी मान डोलविली नि आपल्या आई सोबत घरी परतली.

क्रमशः
    

  
 
     



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..