Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

अपराधी कोण ? 4

अपराधी कोण ? 4
अपराधी कोण ? 4

 


                    अपराधी कोण ?

     पोलीस स्टेशनची बेल वाजली नि तसा खुर्चीवर बसून पेंगत असलेला इन्स्पेक्टर विशाल खडबडून जागा झाला
नि रिसिव्हर उचलून कानाला लावत म्हंटले," हॅलो कोण
बोलत आहे ?" त्यावर पलिकडून आवाज आला , की, कोण
बोलत आहे हे फार महत्वाचे नाहीये. फक्त मी काय सांगतो.
त्याकडे नीट लक्ष द्या. " त्यावर इन्स्पेक्टर विशाल बोलला,
      " ठीक आहे सांगा."
     " इथं कुण्या अज्ञात माणसाचा खून झाला आहे."
     " इथं म्हणजे कुठं , तिथलं लोकेशन सांगा ."
     " इथं एक रेल्वे स्टेशन आहे बघा."
     " कोणतं रेल्वे स्टेशन ?"
     " माहीत नाही. " असे बोलून लगेच फोन कट केला.
      " डँमीट काय माणूस आहे हा ,अर्धवट माहिती देतो.
असे स्वतःशीच बोलून ते कॉन्स्टेबल अजय कांबळे कडे पाहत बोलले,' अजय , ह्या नंबर वरून तिथलं लोकेशन काढ."
     कॉन्स्टेबल अजय मोबाईल नंबर घेऊन सिमकार्ड कंपनीशी  संपर्क साधला. तेव्हा सिमकार्ड कंपनी कडून कळलं की आपल्या पोलीस स्टेशनच्या समोरच तर रेल्वे स्टेशन आहे. तसे लगेच पोलीस रेल्वे स्टेशनच्या जवळ जाऊन पाहतात एका व्यक्तीचा मृतदेह रेल्वे फाटका जवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. इन्स्पेक्टर विशाल ने
लगेच पोलीस पंचनामा केला नि मृतदेह शवविच्छेदनासाठी
सिव्हिल इस्पितळात पाठविण्यात आला. त्यानंतर इन्स्पेक्टर विशाल  दोन कॉन्स्टेबल सोबत मृत व्यक्तीच्या घरी पोहोचतात दरवाजावरील कॉलबेलचे बटन दाबताच दरवाजा
उघडला जातो. आपल्या घरी पोलिसांना आलेले पाहून ती
महिला घाबरते आणि विचारते ," काय झाले साहेब ?
तेव्हा इन्स्पेक्टर विशाल बोलला ," दिवाकरराव इनामदारांचे
घर हेच का ? " त्यावर त्या महिलेने विचारले ," हो ; त्यांचेच
घर आहे  हे पण  झाले काय  ? असं का विचारता तुम्ही "                     
      " त्यांचा खून झाला आहे."
     " अहो भलतंच काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ते घरात झोपले आहेत."  ते ऐकून इन्स्पेक्टर विशाल आश्चर्य
चकित होत म्हटलं ," त्याना जरा बाहेर बोलवता का ?"
    " हो बोलावते ना ?" असे म्हणून त्या आंत मध्ये गेल्या नि
ओरडतच बाहेर आल्या. त्यावर इन्स्पेक्टर विशाल ने विचारले ," काय झाले मॅडम ? का ओरडलात तुम्ही ?"
    " अहो ते घरात नाहीयेत."
    " अहो पण मॅडम तुम्ही आताच म्हणालात ना की इनामदार झोपले आहेत म्हणून ."
    " हो झोपलेच होते ते आंत. पण आता नाहीत ते आपल्या
खोलीत."
     " किती वेळा पूर्वीची गोष्ट आहे ही ?"
     " अहो आता थोड्या पूर्वी तर पार्टी संपली नि ते झोपायला गेले ."
    " कशाची पार्टी होती ?"
    " त्याना नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले त्याबद्दल पार्टी होती आज."
   " त्याना बाहेर जाताना कुणीच पाहिले नाही का ?"
  " नाही."
  "  तुम्ही आताच्या आता आमच्या सोबत चला नि मृतदेहाची ओळख पटते काय बघा."
    " हो चला." त्याची पत्नी आणि घरची इतर माणसं इस्पितळात जाऊन पाहतात तर खरोखर त्याच्याच नवऱ्याचे
ते शव  होते. ओळख पटताच त्यांनी मोठ्या ने टाहो फोडला. मृतदेहाचे दुसऱ्या दिवशी भेटेल म्हणून सांगण्यात आला. त्यांच्या घरवाल्यांच्या स्वाधीन करण्यात आला. परंतु शवविच्छेदनचा रिपोर्ट मात्र वेगळेच दर्शवित होता. त्यांचा मृत्यू रात्री आठ वाजता झाला असे सिध्द करत होता तर पार्टी मध्ये लोकांनी त्याला कसे पाहिले ? कसं शक्य आहे ? पोलिसांना एका अज्ञात इसमाचा फोन आला होता तेव्हा घड्याळात अकरा वाजून पंधरा मिनिटं झाली होती.  आणि अकरा वाजे पर्यंत तो पार्टीमध्ये होता असे त्यांच्या घरच्या मंडळींचे म्हणणे आहे. आणि आपण त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा बारा वाजले होते नि पार्टी पण संपली होती आणि तेव्हा ते आपल्या खोलीत झोपायला गेले. त्यानंतर त्याना कुणी पाहिले नाही. असं कसं होऊ शकतं ? कुणी तरी खोटं बोलत आहे पण कोण ? हे जाणून घेण्यासाठी पोलीस  दिवाकररावांच्या घरी पोहोचले.
      त्यांनी सी. सी. टीव्ही. कॉमेराचे फुटेज चेक केले. पण सुध्दा तेच सिध्द करत होते की नवं वाजल्या पासून अकरा वाजेपर्यंत ते कुठे बाहेर गेलेलेच नाहीत. मग खून झाला तो
कुणाचा ? ते शव दुसऱ्या चे म्हणावे तर मृतदेहाच्या हाताच्या बोटांचे ठसे नि आधार कार्ड वर असलेले ठसे हेच दर्शवित होते की , तो मृतदेह दिवाकररावांचाच आहे. मग अकरा वाजेपर्यंत उपस्थिती मध्ये होता तो कोण होता ? त्याचे भूत होते का ? छे ,छे ,छे कसं शक्य आहे ? नक्कीच काहीतरी
गोलमाल आहे ,परंतु सिध्द कसा करणार ? इन्स्पेक्टर विशाल बोलला ," इतक्या वर्षाच्या काकीर्दीत ही एक
प्रथमच केस पाहण्यात आली होती. मोबाईल  मधले कॉल
रेकार्डिग शेवटचे अकरा वाजून १५ मिनिटांचे आहे. आणि त्या अगोदरच कॉल अकरा वाजण्याचे आहे. ज्या माणसाला कॉल केले होते त्या माणसाला पोलीस स्टेशनला बोलविण्यात आले. तो जसा पोलीस स्टेशनला आला तसे त्याला विचारण्यात आले की, तुम्हांला दिवाकररावांनी फोन
कशासाठी केला होता ? त्यावर तो म्हणाला ," बोर्ड ऑफ डायरेक्टर ची उद्या मिंटींग आहे. सर्व बोर्ड मेंबरानी हजर
राहायला सांगितले. तेव्हा इन्स्पेक्टर विशाल ने विचारले की,
फक्त तुम्हांला च का मिटिंग विषयी सांगितले ? इतरांना का नाही सांगितले ?" त्यावर विनायकराव म्हणाला ," ते काय
मला माहित नाही. संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट बुचकाळात
सापडले. कुणालाच काही सुचेना ? अपराधी कोण ?

   

      दुसऱ्या दिवशी दिवाकररावांचा मृतदेह त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला. परंतु त्यांच्या खुनाचे
गूढ अजून उकलले नाही. कोण असेल बरं हा खुनी ? प्रत्येक
अपराधी काही ना काही पुरावा मागे सोडतोच परंतु ह्या खुन्या ने एक पण पुरावा कसा सोडला नाही. इन्स्पेक्टर विशाल म्हणाले ," अजय त्या मोबाईल वर मिळलालेल्या
ठशांचा रिपोर्ट आला का ? "
    " आला ना साहेब ."
    " कुणाच्या हाताच्या ठसे सापडले ?"
    " साहेब , दिवाकरच्या हाताचेच ठसे आहेत."
    " असं कसं होऊ शकते ? काहीतरी गडबड घोटाळा आहे."
    " मला काय वाटतं माहिती आहे साहेब ?  खुन्याने हात मौजे वापरले असावेत."
    " शक्यता आहे. तुम्ही एक करा. त्याचे बाकीचे जे पार्टनर आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलवून घ्या. आणि त्यांच्या कडून काही माहिती मिळते का बघा. म्हणजे एकट्या
विनायकरावणाच मिटिंग बद्दल सांगण्यात आले ?  म्हणजे
इतरांना का नाही सांगण्यात आले ?"
    " मला काय वाटतं साहेब , तो त्या दिवशी गैरहजर असेल.
आणि बाकीचे ऑफिसमध्ये हजर असतील म्हणून त्याला
फोन करून सांगितले गेले असेल."
  " हूं ! शक्य आहे. पण ते आता ते सर्वजण पोलीस स्टेशनला
आल्या नंतर च कळेल."
    एकेकाला फोन करून पोलीस स्टेशनला बोलवून घेण्यात
आले. आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या खोलीत नेऊन चौकशी
करण्यात आली. परंतु कुणाकडून ही समाधान कारण उत्तर
मिळाले नाही. फक्त विनायकराव कडून इतकेच समजले की
ते त्या दिवशी गैरहजर होते. म्हणून त्याना फोन करून बोर्ड
ऑफ डिरेक्टर ची मिटिंग असल्याची सूचना देण्यात आली होती. आणि त्याचा पुरावा म्हणून इतरांनी ही तेच सांगितले.
तेव्हा इन्स्पेक्टर विशाल ने विचारलेे की तुमच्यात काही मतभेद होते का ? तर सर्वांकडून एकच उत्तर मिळाले की
आमच्या मध्ये कसले मतभेद नव्हते आणि नाहीत. तेव्हा इन्स्पेक्टर विशालने विचारले ," तुमची  कुणाशी दुश्मनी वगैरे ? " तेव्हा विनायकराव म्हणाले ," तशी दुश्मनी आमची कुणा बरोबर ही नाही. परंतु ...?
   " परंतु काय ?"
   " व्यवसायाकांचे दुश्मन अनेक असतात. आता कुणाचे नाव
घ्यावे ?"
   " तुमचा कुणावर संशय आहे ?"
   " आमचा कुणावरच नाही." मदनलाल बोलला.
   " तुमच्याकडून कुणावर अन्याय झालाय असा कुणी आहे का ?" किंचित सर्वजण विचारात पडले. पण कुणालाही काही आठवेना. तेव्हा सर्वांकडून नकारात्मक उत्तर आले . तेव्हा इन्स्पेक्टर विशाल म्हणाले ," खुन्या चे पुढील पाऊल कायआहे ,याची काही कल्पना नाही. तेव्हा तुम्ही सर्वांनी सावध राहा. जोपर्यंत खुनी पकडला जात नाही." तेव्हा सर्वांच्या चेहऱ्याचे भयकींत झालेले दिसले.

    दुसऱ्या दिवशी भीत भीत का होईना सर्वजण ऑफिसला पोहोचले. पण विपरीत असं काहीच घडले नाही. आणि त्यानंतरही काही दिवस कुठंच काही घडले नाही.म्हणून
सर्वांची खात्री झाली की, दिवाकरराव ची पर्सनल कुणा बरोबरी दुश्मनी असावी. त्या दुश्मनी खातीर त्या माणसाने
त्यांचा खून केला असावा. असाच सर्वांचा समज झाला नि एके दिवशी म्हणजे नेहमी प्रमाणे संध्याकाळी साडेपाच
ला ऑफिस सुटते तसे आज सुध्दा साडेपाच वाजता ऑफिस
सुटले . तसे सर्व कर्मचारी घरी जायला निघाले. मात्र विनायक राव अध्याप आपल्या केबिन मध्ये बसून संगणक वर काहीतरी पेंडीग काम सुरू होते. सहा वाजायला दहा मिनिटं शिल्लक होती तेव्हा प्यून त्यांच्या केबिनचा दरवाजा ठोठावला. तसा आतून आवाज आला की, येस कम इन .
केबिन चा किंचित दरवाजा उघडून प्यून ने विचारले ," साहेब , तुम्हांला निघाला वेळ आहे का ?"
   " हो ; थोडंस काम शिल्लक आहे,ते पूर्ण करतो नि मग
निघतो."
     " मग साहेब मी थांबू का जाऊ ?"
     " तू कशाला थांबतोयेस , तुझा टाईम झालाय ना ? मग
तू जा."
       " ओके सर ! " असे बोलून प्यून तेथून निघून गेला. परंतु
लगेच १० मिनिटांनी परत माघारी येऊन सिक्युरिटी ला म्हणाला ," मी माझा मोबाईल विसरलोय तो घेऊन येतो. असे सांगून तो आंत गेला नि थोडया वेळाने परत आला नि सिक्युरिटी ला म्हणाला ," अर्ध्या तासाभराने साहेबांच्या केबिनमध्ये जा नि साहेबांना काही हवे नको ते विचारा. " असे सांगून तो निघून गेला.
      " ठीक अर्ध्या तासानंतर सिक्युरिटी त्यांच्या केबिनमध्ये
गेला नि पाहतो तर काय विनायकराव रक्ताच्या थारोळ्यात
पडलेले सापडले. त्याने लगेच पोलीस स्टेशनला फोन केला नि विनायकरावांचा खून झाल्याची खबर दिली. तसे थोड्याच वेळात पोलिसांची जीप विनायकरावांच्या ऑफिस ला पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळाचा पोलीस पंचनामा केला.
आणि तिथल्या सिक्युरिटी जवळ चौकशी केली असता. सिक्युरिटी संतोष काळे बोलला की, सर्वात शेवटी ऑफिस प्यून विजय जाधव  ठीक पाच वाजून ५० मिनिटांनी ऑफिस
मधून बाहेर पडला नि पुन्हा दहा मिनिटांनी ऑफिस मध्ये आला आणि आपला विसरलेला मोबाईल घेऊन लगेच निघून
गेला. तेव्हा पोलिसांचा तर्क झाला की परत जेव्हा तो आपल्या ऑफिस मध्ये आला तेव्हाच तो विनायकरावांचा खून करून गेला. इन्स्पेक्टर विशालने मृतदेह शवविच्छेदनासाठी  इस्पितळात पाठविण्यात आला.
नि ऑफिस च्या प्यून ला पोलीस स्टेशनला पाचारण करण्यात आले. त्याच्या कडून मिलेल्या माहिती अशी की
पाच वाजून ५० मिनिटांनी ऑफिस मधून बाहेर पडला तो परत ऑफिसला परत आलाच नाही. तर मग विजय जाधव
ऑफिस मधून बाहेर पडल्यानंतर विजय जाधव सारखाच
हुबेहूब दिसणारा तो माणूस कोण होता ? कारण ऑफिस च्या
सी सी टीव्ही कॉमेरा मध्ये फुटेज पाहिले असता  त्यात दिसणारी व्यक्ती विजय जाधवच आहे. आणि विजय जाधव चे म्हणणे आहे की मी एकदा ऑफिस मधून बाहेर पडलो तो
पुन्हा वापस आलोच नाही.  इन्स्पेक्टर विशाल विचारात पडला की असं कसं होऊ शकतं ? ऑफिसमध्ये सापडलेल्या
पिस्तूलावर हाताच्या ठशांचा रिपोर्ट आला .त्यावर सापडलेले
ठसे नि विजयच्या हाताचे ठशे एकदम मॅच होतात. अर्थात खुनी विजय जाधवच आहे असे समजून विजय जाधवलाच
पोलीस कोडरीत बंद केले.
     त्यानंतर विनायकरावांच्या घरी जाऊन विनायकरावांचा
खून झाल्याची खबर देण्यात आली. तेव्हा विनायकरावांच्या
पत्नी कडून मिळालेली माहिती काही वेगळंच सांगत होती .
त्यांचे म्हणणे होते की विनायकराव आज पाच वाजताच घरी
आले नि ऑफिस मध्ये पुन्हा बोलविले आहे असे सांगून पुन्हा ऑफिस ला जायला निघून गेले.
     आता मात्र पोलीस सम्रमात पडली की विनायकराव ऑफिस मधून घरी गेलेच नाही तर विनायकरावांच्या घरी विनायकराव बनून गेलेला माणूस कोण होता ? आणि त्या
मागचा त्याचा उद्देश काय असावा बरं ? बहुधा पोलिसांना हे त्याने केलेले खुले चॅलेंज होते की खऱ्या खुन्याला पकडून
दाखवा. पोलिसांना तपासाची नक्की दिशा सापडत नव्हती.
  खुनी कोण असावा बरं ?  आता बाकी राहिले दोन पार्टनर त्यांचे मात्र धाबे दणाणले. त्याना आता घरातून बाहेर पडायला पण भीती वाटू लागली. इतकेच नाही तर ऑफिसमध्ये आणि राहत्या बंगल्यावर पोलिसांचा पहारा बसविला . शिवाय त्यांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर
नजर ठेवली गेली. ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर एकदम बारीक नजर तर ठेवली गेलीच शिवाय
आधारकार्ड चेक करून आंतमध्ये सोडले जाऊ लागले.
परंतु एके दिवशी मदनलाल चा मृतदेह त्यांच्या मोटार मध्येच सापडला. आणि त्यांचा ड्रायव्हर बेशुध्द अवस्थेत ड्रायव्हर सीटवर आढळला. आणि मोटार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर आदळलेली सापडली. परंतु मोटार एकदम सुरक्षित होती. याचा अर्थ मोटारीला अपघात झाला
नसून फक्त तसा दिखावा केला गेला. पोलिसांना कुणीतरी सूचना दिली  . पोलीस घटना झालेल्या ठिकाणी पोहोचले.
पोलीस पंचनामा केला. मदनरावांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. तेव्हा कळले की त्यांच्याच मोबाईवरून
पोलिसांना खबर देण्यात आली. अर्थात हे खुन्याचेच काम
असणार. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. आता राहिला शेवटचा नि चौथा पार्टनर तो तर इतका
घाबरला की त्याने ऑफिस जाणेही टाळले. आणि घरातून ही
बाहेर कुठं जाईना ? ऑफिस च्या काही जरुरी कागदपत्रावर हस्ताक्षर हवे असल्यास प्यून त्यांच्या घरी यायचा. परंतु त्याला आत मध्ये सोडले जात नसे. कारण मागचा विनायकरावा सोबत घडलेल्या प्रकाराची सर्वांना कल्पना होती. त्यामुळे त्याला बाहेरच थांबवून बंगल्याच्या बाहेर पहारा देत बसलेल्या कॉन्स्टेबल कडे ते कागदपत्रे दिली जात
आणि मग त्या कागदपत्रावर किंवा चेक वर अशोकरावांचे हस्ताक्षर करून आणले जात होते. एवढी दक्षता घेतली जात
होती.
     एके दिवशी मात्र विपरीत घडले. झाले असे की कंपनीचा
प्युन कंपनीचे काही चेक घेऊन आला. त्यावर असोकरावांच्या
हस्ताक्षर करुन आणावयाचे होते. नेहमी प्रमाणे एक कॉन्स्टेबल ते चेक घेऊन अशोकरावांच्या बंगल्यात गेला नि
हस्ताक्षर करून वापस आला सुध्दा. थोड्यावेळाने मात्र बंगल्यात आरडाओरडा सुरू झाला म्हणून एकजण कसली
ओरड चालली आहे म्हणून पहायला आंत गेला तर आतून
मोठ्या ने रडण्याचा आवाज येत होता. अर्थात अशोकरावांना कुणीतरी गोळी मारून गेले होते. हे पाहताच त्या कॉन्स्टेबल ला आपल्या साथीदारांचा संशय आला. कारण तोच थोड्या वेळापूर्वी अशोकरवकडे चेक वर हस्ताक्षर करायला आला होता. तो पळतच बाहेर आला. पाहतो तर काय दुसरा कॉन्स्टेबल आपल्या स्थानावरून गायब होता. याचा अर्थ खुनी त्या कॉन्स्टेबल चा वेश धारण करून आला होता.
त्याने लगेच मोबाईल वरून पोलीस स्टेशनशी संपर्क साधला
नि घडलेलेल्या घटने बद्दल सविस्तर माहिती दिली.
    आणि थोड्याच वेळात घटना स्थळी पोलीस पोहोचले.
घटनास्थळाचा पोलीस पंचनामा केला. अशोकरावांचा मृतदेह
शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठविण्यात आला.
अजय कॉन्स्टेबल चा शोध घेण्यात आला तेव्हा तो अशोकरावांच्या बागल्यापासून थोड्याच अंतरावर बेशुध्द
अवस्थेत आढळला. त्याच्या तोंडावर पाणी मारून शुध्दीवर
आणले असता. त्याने दिलेली माहिती.पोलिसांना गोंधळात
टाकणारी तर होतीच पण त्यापेक्षा पोलिसांना शोध कामात उपयुक्त ठरणारी पण होती. अशी काय माहिती दिली होती
कॉन्स्टेबल अजय कांबळे ने ?

         इन्सपेक्टर विशाल ने विचारले की, तू बेशुध्द कसा झालास ? तेव्हा कॉस्टेबल अजय कांबळे म्हणाला मी घरून निघालो आणि बाईक वर बसत होतो, तेव्हा पाठीमागून कुणीतरी माझ्या नाकाला क्लोरोफार्म लावला आणि मी लगेच बेशुद्ध झालो . त्या पुढचं मला काही माहीत नाही. इन्स्पेक्टर विशाल विचारात पडतात. की कोण असावा हा बरं ? तेवढ्यात पोलीस स्टेशनच्या समोर कुणीतरी बाईकवाला सीडी कॅसेट फेकून गेला. बाईकवाल्याचा चेहरा
काही दिसू शकला नाही. कारण त्याने डोक्यात हेल्मेट घातलेली होती. परंतु त्या बाईकचा नंबर घायला मात्र तो कॉन्स्टेबल घ्यायला विसरला नहीं. आरटीओ ऑफिस ला फोन करून चौकशी केली असता असे समजले की तो नंबर
अस्तित्वात ही नाही. त्यानंतर ती सीडी कॅसेट म्युझिक स्पेअरला लावली असता त्या सीडी कॅसेट मध्ये खुन्याने आपला आवाज रेकॉर्डिंग करून पाठविला होता. तो असा ," इन्स्पेक्टर विशाल तू व्यर्थच आपला अमूल्य वेळ वाया घालवितो आहेस. आणि तू ज्यां लोकांना  संशयी आरोपी म्हणून पकडले आहेस ते सर्वजण निर्दोषी आहेत. त्यांनी खून केलेला नाही. असली खुनी मी आहे. अर्थात  यमराज माझे नाव आहे. आणि हां  माझा उद्देश पूर्ण होताच मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करीन. पण त्या अगोदर मी त्या चार जणांना का मारले ते ऐक.  ते चार ही जण निरपराधी तर मुळीच नव्हते. कायद्याच्या  तावडीतून सहीसलामत  सुटलेले  महा अपराधी होते ते .
        कदाचित  तुम्हाला ते माहीत नसेल. कारण तुम्ही ह्या पोलीस स्टेशनला आलेले नवीन ठाणेदार आहात ; परंतु तुमच्या अगोदर जो इन्स्पेक्टर होता तो फार  लालची इन्स्पेक्टर होता. त्याने आपल्या पदाचा गैर वापर केला. त्याने त्या चार गुन्हेगारा कडून लाच घेतली नि त्या चार जणां विरुद्ध काही कार्यवाही न करता त्याना मोकाट सोडून दिले. म्हणून माझ्या सारख्या सज्जन माणसाला कायदा हातात घावा. अर्थात मी सुध्दा अपराधीच ; परंतु माझा अपराध वेगळा नि त्या जणांचा अपराध वेगळा. जर कायद्याने त्यावेळी त्या चार नराधमांना शिक्षा दिली असती तर मला हा अपराध करावा लागला  नसता. आता त्या चार जणांचा अपराध काय ते ऐकून घे.
     दहा विर्षांपूर्वी एका अपंग मुलीची त्या चार  नराधमांनी
अब्रू लुटली होती. नि तिला ठार मारून रस्स्यावर फेकून दिले.
तिच्या भावाने पोलीस स्टेशनला तक्रार केली तर त्यालाच
गुन्हेगार ठरवून तुरुंगात डांबले गेले , म्हणून मला अन्याया विरुध्द शस्त्र उचलावे लागले. तसेच अजून काही अपराधी आहेत. आणि ते मोकाट फिरताहेत त्या सर्वांना त्यांनी केलेल्या अपराधाची शिक्षा मी देणार तेव्हाच मी स्वत:ला  तुमच्या स्वाधीन करणार. पण तोपर्यंत मी तुमच्या हाती येणार नाही. मग इन्सपेक्टर विशाल ने त्या संबंधीची माहिती कॉन्स्टेबल अजय कांबळे ला विचारली असता कॉन्स्टेबल अजय कांबळे ने स्पस्ट केले की ,ही गोष्ट एकदम सत्य आहे. त्यावर इन्स्पेक्टर विशाल म्हणाले ," त्या वेळी नेमके काय घडले याची सविस्तर माहिती सांग. तेव्हा कॉन्स्टेबल
अजय ने त्या घटने विषयी माहिती दिली ती अशी-
कांचन नावाची मुलगी विनायकरावांच्या ऑफिसमध्ये काम
करायची एका एका पायाने अधू होती. पण ती दिसायला फार सुंदर होती. कांचनला  एक विजय नावाचा भाऊ होता आणि
कांचन ची इच्छा होती की आपल्या भावाने खूप शिकावे नि डॉक्टर व्हावे. त्यासाठी ती नोकरी करत होती. पण त्याच्या
बॉस ची नजर तिच्या सुंदर शरीरावर होती.
     एके दिवशी काहीतरी काम सांगून तिला ऑफिसमध्ये थांबहुन ठेवले. जेव्हा ती ते काम संपवून ती बॉस च्या केबिनमध्ये गेली तेव्हा त्याने तिला बसायला सांगून आपल्या
खुर्चीवरून उठून तिच्या जवळ आला नि तिच्या खांद्यावर हात ठेवताच ती पटकन उठून उभी राहात म्हणाली ," सर हे काय करता आपण ?" त्यावर तो हसून म्हणाला ," आपली किंमत वसूल करत आहे." त्यावर ती रागाने म्हणाली ," काय म्हणायचंय आपल्याला ? " त्यावर निर्लज्जपणे म्हणाला,
" अजून समजली नाहीस तू कांचन ? मला काय हवंय ते ."
    " सर मी तशी मुलगी नाहीये. जाऊ दे मला."
    " तसं कुणीच नसतं डार्लिंग पण पैसा ते करायला भाग पाडतो. आणि तुला काय वाटतं तुला मी एवढा पगार देतोय
तो काय तुझं टॅलेंट बघून देत नाही. मला तू हवी आहेस."
     " सर प्लिज जाऊ दे मला."
     " माझं काम कर. मी खुशाल जाऊ देईन तुला."
     " सर मला अपवित्र करू नका प्लिज !"
     " अग वेडी आहेस का तू ? अपवित्र बिपिवित्र असं काही
नसतं. जे परमेश्वराने आपल्याला बहाल केले आहे त्याचा उपभोग घ्यायचा असतो. शिवाय तुला तुझ्या भावाला डॉक्टर
बनवायचं ना ? त्यासाठी खूप पैसा आणि तो सारा पैसा मी तुला देईन. तुझं काम एवढंच की मला खुश करायचं."
      " नाही सर मला नकोत पैसे. मला जाऊ दे.प्लिज !"
      " तू आता माझ्या मर्जी शिवाय जाऊ शकत नाही. आणि
तुला वाचवायला सुध्दा कुणी येणार नाही इथं. तेव्हा हे सर्व नकरे करायचे सोड. आणि म्हणतोय तशी वागलीस तर तुला
काही कमी पडणार नाही. पण तशी नाही वागलीस तर मात्र
तुला सोडणार तर नाहीच परंतु दुसरीकडे नोकरी मिळणार नाही याची सुध्दा व्यवस्था करीन."
     कांचन समजून चुकली होती की तिची आता या नराधमा
पासून काही सुटका नाही. शिवाय ऑफिसमध्ये सुध्दा त्या दोघां शिवाय तिसरा कुणी नव्हता. शेवटी नाईलाजाने तिला शरणांगती पत्करावी लागली. त्यानंतर जेव्हा विनायकराव
तिला जिथं बोलवत असे तेथे तिला जावे लागत असे. नंतर
नंतर तर तो तिला आपल्या पार्टनर सोबत ही शेअर करू लागला. तिने नकार देताच तिच्यावर बळजबरीने चौघांनी मिळून आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला त्यामुळे ती
बेशुध्द झाली. म्हणून तिला रस्त्यावर फेकून दिली. परंतु कांचन शुध्दीवर आली तशी तिने पोलीस स्टेशनला आली नि
आपल्या वर झालेल्या अमानुष अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली. परंतु त्यावेळी पोलीस स्टेशनला ड्युटीला
उपस्थित असलेला इन्स्पेक्टर रंगराव यांनी तिची तक्रार लिवून न देता उलट तिचाच दमबाजी करून पोलीस स्टेशन मधून तिला घालवून दिले. आणि विनायकरावाना फोन करून
कांचन विषयी माहिती दिली.
    आता आपण जगाला तोंड दाखवायला सुध्दा लायक
नाही असं समजून तिने घरी गेल्यानंतर एका चिठ्ठी मध्ये त्या सर्वांची नावे लिवून ठेवली. घरातच गळपाश लावून आत्महत्या केली. त्यानंतर त्याचा भाऊ घरी आला त्याने ती वाचली नि रागाने लालबुंद झाला. आणि चिठ्ठी घेऊन तो पोलीस स्टेशनला पोहोचला. परंतु इन्स्पेक्टर रंगराव ने ती चिठ्ठी त्याच्या कडून घेतली नि म्हणाला ," तुम्ही अजिबात
चिंता करू नका. तुमच्या बहिणीच्या खुन्याना आम्ही लवकरच गजाआड करू . " असे म्हणून  जशी विजयची त्याच्याकडे पाठ होताच दिवाकररावांना फोन केला
नि त्या चिठ्ठी विषयी सविस्तर माहिती दिली. तेव्हा विजय
समजला की आपण इन्स्पेक्टर च्या हातात चिठ्ठी देऊन फार
चुकी केली असा विचार करून ती चिठ्ठ वापस मिळविण्यासाठी तो माघारी वळला. परंतु इन्स्पेक्टर रंगराव ने
ती चिठ्ठी राजेशच्या समोर माचीसची कांडी पेटवून जाळून टाकली नि म्हणाला ," हा बघ तू आणलेला एकमेव पुरावा पण नष्ट केला. आणि पुढे म्हणाला ," आता बोल तुझ्याकडे
काय पुरावा आहे की तुझ्या बहिणीवर अत्याचार झाला. उलट मी अशी केस तयार करीन की तुझी बहीण चारित्र्यहीन होती. तिचे अनेकांशी अनैतिक संबंध होते. असे म्हणताच विजय भयंकर चिडला नि त्याने त्या इन्स्पेक्टर रंगराव ह्याने इन्स्पेक्टर ची गंचण्डि पकडली. लगेच कॉन्स्टेबल त्या इन्स्पेक्टर रंगरावच्या मदतीला धावले. दोघां तिघांनी मिळून त्या दोघांना वेगवेगळे केले. तेव्हा इन्स्पेक्टर रंगराव बोलला ," बस्स ! आता तुझी केस अशी तयार करितो की सहा- सात वर्षासाठी तुझी रवानगी कारावासात करतो. आणि त्याने तेच
केले . विजयला एका खोट्या केस मध्ये अडकवून त्याला सात वर्षाची कारावासाची शिक्षा द्यायला लावली. या कामी
त्या इन्स्पेक्टर ची मदत करणारे म्हणजे सरकारी वकील आणि न्यायाधीश अर्थात त्या चौघांनी न्यायादीशला पैसे चारले होते. हे सर्व ऐकल्यावर इन्स्पेक्टर विशाल बोलला,
  " तिच्या भावाला सात वर्षाची शिक्षा झाली होती तर सुटला ही असेल. तेव्हा सध्या तो आहे कोठे याची चौकशी करा."
कॉन्स्टेबल अजय कांबळे बोलला ," सुटण्या अगोदर तो नाशिक कारावासात होता. परंतु त्यानंतर तो कोठे गेला हे
कुणालाच माहिती नाही. तेव्हा इन्स्पेक्टर विशाल बोलला, हे काम तिच्या भावा व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचे नाहीये. तेव्हा त्याचा शोध घ्या. कारण त्याचे पुढील शिकार इन्स्पेक्टर रंगराव ,वकील आणि न्यायाधीश असू शकतील. तेव्हा त्या
तिघांना सूचित करा. आणि विजयच्या काही जुन्या मित्रांकडे
विजय बद्दल काही माहिती मिळते का ते बघा. तेव्हा विजय
राहायला होता तेथे विजय बद्दल चौकशी केली असता असे
कळले की ह्या सात वर्षात विजय ची काहीच माहिती नाही.
   परंतु विजयच्या केस च्या फाईल मध्ये विजयचे फोटो मिळाले. त्या फोटो वरून विजयची सर्वत्र चौकशी सुरू केली.
परंतु हाती काहीच माहिती मिळाली नाही. शिवाय विजय खून
करतेवेळी वेगवेगळ्या चेहऱ्याचे मास्क तयार करतो म्हणून
आसपासच्या साऱ्या मास्क तयार करणाऱ्या कडे खून करताना वापरलेल्या माणसाचे फोटो दाखवून ह्यां माणसाचे
मास्क तयार करून घेण्यासाठी तुमच्यापाशी कुणी व्यक्ती
आला होता का ? अशी चौकशी केली. परंतु काहीच माहिती
मिळू शकली नाही.
     त्यानंतर इन्स्पेक्टर रंगराव सध्या कोणत्या पोलीस स्टेशनला आहे याची माहिती मिळवून त्याला विजय बद्दल
माहिती दिली असता . तो हसून म्हणाला," तुम्ही त्याची चिंता
करू नका. मी अगोदर च त्याचा बंदोबस्त केलेला आहे."
तेव्हा इन्स्पेक्टर विशाल ने विचारले ," कसा ?" त्यावर रंगराव
बोलला ," आला होता तो आमच्यावर सुड घ्यायला. परंतु आम्ही त्याची रवानगी  स्वर्गात करून टाकली. तेव्हा इन्स्पेक्टर विशाल म्हणाला ," तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर
केला. खरं तर तुमची रवानगी कारावासात व्हायला हवी. परंतु सध्या माझ्याकडे तुमच्या विरुध्द कोणताही पुरावा नाहीये. पण ज्या दिवशी तो माझ्या हाती लागेल तेव्हा तुम्ही
इथं नाही तर तुमची रवानगी कारावासात होईल." त्यावर
इन्स्पेक्टर रंगराव बोलला ," इन्स्पेक्टर विशाल मी सुध्दा एक
इन्स्पेक्टर आहे , हे विसरू नका. कायदा काय आहे हे मला
सुध्दा चांगले ठाऊक आहे , तेव्हा आपल्या हद्दी मध्येच रहा. कारण ते तुमच्या हिताचे असेल. आमच्या भानगडीत विनाकारण पडू नका. त्यानंतर काही दिवसानंतर सरकारी वकिलाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी सापडला. पोलिसांना खबर मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
       घटना स्थळाचा पंचनामा केला. तेव्हा त्याच्या पत्नीला
विचारले असता त्यांच्या पत्नीने सांगितले की , सकाळी
दरवाजाची बेल वाजली म्हणून दूधवाला असेल म्हणून दरवाजा उघडला तर चेहऱ्यावर मुखवटा घातलेली एक व्यक्ती घरात शिरली.  नि त्याने तिला पिस्तूलाच धाक दाखवून सरकारी वकील कुठे आहेत अशी विचारणा केली.
पिस्तुल पाहून त्या घाबरल्या नि त्यांनी आपला बेडरूम दाखविला. बेडरूम मध्ये येऊन त्याने सरकारी वकील
वर दोन गोळ्या झाडल्या नि आला तसा निघून ही गेला.
आता प्रश्न असा निर्माण झाला की विजय जर जिवंत नाही आहे तर हा दुसरा खुनी कोण आहे ?


   इन्स्पेक्टर विशाल ने छान बिन केली असता. एक गोष्ट समोर आली की , शवघरात मृतदेह आहे तो विजयचाच आहे , मग वकील ला कुणी मारले ? वकिलाची आणखीन कुणा सोबत दुश्मनी होती का ? याची चौकशी करता हाती
काहीच पुरावा लागला नाही. पण तरी सुध्दा दक्षता म्हणून
न्यायाधीश आणि इन्स्पेक्टर रंगराववर कडक बंदोबस्त ठेवला. इन्स्पेक्टर विशाल ने सर्वाना ताकीद देऊन ठेवली होती. कोणत्याही माणसाला त्याना भेटू द्यायचं नाही. साध्या
वेशात पोलीस इन्स्पेक्टर रंगराव आणि न्यायाधीश सोपानराव
ह्यांच्या निवास स्थानी पोलिसांचा भक्कम बंदोबस्त होता.
त्यांच्या घरात कुणाला ही शिरता येण्या सारखे होते. अश्या वेळी खुनी जर तिथं आला असता तर नक्कीच पोलिसांच्या
सापळ्यात अडकला असता.
   दोन दिवस झाले चार दिवस ही झाले. परंतु खुनी येण्याचे
चिन्ह दिसेना. तेव्हा सर्वांनी असा तर्क केला की, खुनी विजयच होता नि तो आता या जगात नाहीये.अर्थात केस
निकालात काढायला हवी. परंतु सावधगिरी म्हणून पाचव्या दिवशी ही पोलीस बंदोबस्त सुरूच राहिला.
    आणि एके दिवशी अचनक एक खुनी स्वत:हून पोलीस स्टेशनला हजर झाला. त्याचे सारे अंग रक्ताने माखले होते.
हातात रक्ताने माखलेली फरशी ( कुऱ्हाड होती )
पोलीस स्टेशनला येताच त्याला पोलिसांनी अटक केली नि
इन्सपेक्टर रंगरावच्या समोर उभा केला. तेव्हा रंगराव ने विचारले ," कोण आहेस ? "  त्यावर तो म्हणाला ," मी एक खुनी आहे.
   " कुणाचा खून केलास ?"
  " माझ्याच बायकोचा ? "
  " का ?"
   " तिचे एका परपुरुषाशी अनैतिक संबंध होते.'
   " ह्या अपराधाची शिक्षा काय आहे ,हे माहीत आहे का तुला ?
    " हो .फाशीची शिक्षा होईल मला."
    " तरी सुध्दा भीती वाटली नाही तुला ?"
    " कशी वाटणार जगण्याची इच्छाच मरून गेली तर ?"
     कॉन्स्टेबल बबन ह्याचा कबुली जवाब लिहून घे. इन्स्पेक्टर रंगराव बोलला. त्यानंतर कॉन्स्टेबल बबन ने त्या माणसाचा  कबुली जवाब लिहून घेतला. त्यानंतर पोलीस पथक त्याने सांगितलेल्या पत्त्यावर गेले नि एका स्त्री चा मृतदेह ताब्यात घेतला. तिच्या मुंडकं फरशी तोडले होते. शिवाय चेहऱ्यावर ऍसिड टाकून ते विद्रुप केले होते म्हणून ओळख ही पटत नव्हती. पण तरी पोस्टमार्टेम करायला पाठविले.  पोष्टमार्टमच्या रिपोर्ट ने सगळ्यांना संम्रमात पाडले. त्या मयत स्त्री चा मृत्यू तिची मान तोडल्याने झाला नसून हृदय बंद पडल्याने मृत्यू  झाला. हे जर खरे आहे तर मान तोडण्याचे काय कारण ? प्रत्येकाने आपले वेगवेगळे मत
दर्शविले. कुणी म्हणे तिच्या नवऱ्याला तिच्या बद्दल झालेला
तिरस्कार त्याला कारणीभूत असेल. तर कुणी म्हणे की, कुऱ्हाड पाहून भीतीने तिचे हृदय बंद पडले असावे. परंतु
तिच्या नवऱ्याचा राग इतका अनावर झाला होता की ,कुऱ्हाडीने राग शांत झाला नाही म्हणूनच की त्याने तिचा
चेहरा ऍसिड टाकून विद्रुप केला असावा. आणि तिचा मृतदेह
खाडी त नेऊन टाकला होता तर स्वतः पोलीस स्टेशनला येऊन कबुली जबाब देण्याचे काय कारण असावे ? " असे कॉन्स्टेबल अजय कांबळे ने शंका व्यक्त केली. त्यावर इन्स्पेक्टर विशाल बोलला की, कदाचित त्याला रिलाईज झाले असावे. की पोलीसांच्या तावडीतून आपण सुटू शकणार नाही . म्हणून स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. हे एक कारण असावे. आणि दुसरे कारण हे असावे की ही पोलिसांच्या डोळ्यात धूळ चारण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण असं का कुणी करील ? कींवा तो तर नसेल ना ?
जो आतापर्यंत पोलिसांना चकमा देतोय. पण तो असे का करेल ? हा प्रश्न सुध्दा पडतोच . न्यायाधीश नि इन्स्पेक्टर रंगराव अजून जिवंत आहेत. त्याना मारण्याचे त्याचे हे नवीन
प्लॅन तर नसेल ना ? पण तसं असतं तर त्याने तेव्हाच इन्स्पेक्टर रंगराव ला मारले असते. जेव्हा तो स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला. कारण पकडलेल्या व्यक्तीचे कांचन शी काही नाते असण्याची शक्यता नाहीये. बहुधा विजय नेच
सर्वांचे खून केले असावेत. आणि वकील साहेबांचा खुनी कुणी दुसराच आहे. आणि तो पोलिसांची दिशाभूल करत आहे. पण तसं नसेल तर ? म्हणून कांचन च्या मित्र मंडळीला भेटून त्या खुन्या चा फोटो दाखवून त्याची ओळख पाठवा.
जर तिचे   त्याच्याशी काही संबंध असतील तर उघडकीस येतील नि मग खरा गुन्हेगार कोण आहे सिध्द होईल. त्यानंतर कांचन च्या मित्रांना पोलीस स्टेशनला बोलविण्यात
आले. त्यांनी त्या आरोपीचा फोटो त्याना दाखविला. तेव्हा तिच्या सर्व मित्रांनी त्याला ओळखत नसल्याचे सांगितले.
परंतु त्याच बरोबर एक नवीन माहिती मिळाली की तिचा एक
डॉक्टर प्रेमिक होता. पुढील शिक्षणासाठी लंडन ला गेला होता. सध्या तो भारतात आलेला आहे. पोलिसांनी लगेच त्या
डॉक्टर ची भेट घेण्यासाठी त्यांच्या इस्पितळात गेले. पण तेथे
गेल्यावर कळले की डॉक्टर अभय दोन दिवसांपूर्वी लंडन ला
एक काँल्फरन्स  मिटींगला गेले आहेत.  पोलिसांनी एअरपोर्टवर जाऊन चौकशी केली असता. डॉ. अभय लंडनला गेले असल्याचे सिध्द झाले. त्यामुळे तो संशय ही खोटा ठरला. त्यानंतर कोर्टात खटला दाखल केला. कोर्टात केस उभी राहिली. तेव्हा त्या आरोपीला स्वतःचे नाव विचारण्यात आले तेव्हा तो जयचंद पवार त्यानंतर न्यायमूर्ती विचारले ," तुला तुझा गुन्हा मान्य आहे का ?" त्यावर तो म्हणाला ," हो मला मान्य आहे. " तेव्हा न्यायमूर्ती महाशय नी
त्याला फाशीची शिक्षा दिली. तेव्हा तो आरोपी म्हणाला ," न्यायाधीश महाशय एक खुनाची शिक्षा पण फाशी नि दहा खून ची शिक्षा पण फाशीच ना ?" न्यायाधीश म्हणाले ," हो.
फाशीच. " तेव्हा तो आरोपी म्हणाला , "  मग मला अजून दोन खून करू द्या. म्हणजे माझे आठ खून पूर्ण होतील."
असे बोलून त्याने साक्षी पिंजऱ्यातून बाहेर उडी मारली नि
पळतच जाऊन इन्स्पेक्टर रंगराव की पिस्तुल हस्तगत केली.
नि सरळ इन्स्पेक्टर रंगराव वर गोळी झाडली. तसाच मागे फिरला नि न्यायाधीश वर नेम धरून मधोमध डोक्याच्या मध्यभागी गोळी घातली. त्याच सरशी इन्स्पेक्टर विशाल ने
त्या आरोपीला गोळ्या घातल्या. आरोपीच्या पाठीमागे दोन गोळ्या लागल्या. परंतु इन्स्पेक्टर रंगराव आणि न्यायाधीश
जागच्या जागी ठार झाले. कोर्टात पळताभुई झाली होती.
जयचंद पवार ला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने तो वाचला. परंतु पोलिसांनी त्याला
आठ खून कधी आणि कुणाचे केले असे विचारले. तेव्हा त्याने कबुल केले की जयचंद पवार नसून डॉ. अभय आहे. आणि कांचन त्याची प्रेमिका होती. तो पाच वर्षांसाठी लंडन ला काय गेला. आणि इथं कांचन ची इज्जत  त्या नराधमानी लुटली. इतकेच नाही तर तिला जीवानिशी ठार मारले. त्याच दिवशी मी प्रतिज्ञा केली. की ज्या ज्या लोकांनी
माझ्या प्रेमाला बदनाम केले त्या सर्वांना जीवानिशी ठार मारेन. तेव्हाच पोलिसांच्या हवाली होईन. त्यानंतर मी आणि कांचन चा भाऊ विजय दोघांनी मिळून योजना तयार केली. सर्वात अगोदर त्या चार ही जणांची गोपनीय माहिती मिळविली. त्यानंतर त्या सर्वांचे चेहऱ्याचे मास्क बनवून घेतले. आणि मग एकेकाला मृत्यूच्या स्वाधीन केले. परंतु विजय ने थोडी घाई केली. विना चेहऱ्यावर मास्क लावता त्याच्या समोर गेला नि फसला. त्यामुळे तो इन्स्पेक्टर रंगरावच्या हातात सापडला नि त्यात त्याचा अंत झाला. असे बोलून त्याने स्वतःच्या चेहऱ्यावर लावलेला नकली चेहरा दूर केला. तेव्हा एअरपोर्ट येथे  पाहिलेला डॉ. अभयचा चेहरा समोर आला. त्यानंतर डॉ. अभय म्हणाला की ,मी जे केले त्या बद्दल मला  बिल्कुल खेद नाही. उलट मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली. आता मला फाशी दिलेत तरी हरकत नाही. तेव्हा इन्स्पेक्टर विशाल ने विचारले ," लंडनला तू जागी कोण गेला ? " त्यावर डॉ. अभय बोलला ," कुणी नाही गेला. फक्त तसा दिखावा केला." त्यानंतर डॉ . अभय विरुध्द खटला दाखल झाला. आणि गुन्हा सिध्द होऊन फाशीची शिक्षा झाली.

  समाप्त



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.