Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

![]() |
अपराधी कोण ? 2 |
दुसऱ्या दिवशी दिवाकररावांचा मृतदेह त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला. परंतु त्यांच्या खुनाचे
गूढ अजून उकलले नाही. कोण असेल बरं हा खुनी ? प्रत्येक
अपराधी काही ना काही पुरावा मागे सोडतोच परंतु ह्या खुन्या ने एक पण पुरावा कसा सोडला नाही. इन्स्पेक्टर विशाल म्हणाले ," अजय त्या मोबाईल वर मिळलालेल्या
ठशांचा रिपोर्ट आला का ? "
" आला ना साहेब ."
" कुणाच्या हाताच्या ठसे सापडले ?"
" साहेब , दिवाकरच्या हाताचेच ठसे आहेत."
" असं कसं होऊ शकते ? काहीतरी गडबड घोटाळा आहे."
" मला काय वाटतं माहिती आहे साहेब ? खुन्याने हात मौजे वापरले असावेत."
" शक्यता आहे. तुम्ही एक करा. त्याचे बाकीचे जे पार्टनर आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलवून घ्या. आणि त्यांच्या कडून काही माहिती मिळते का बघा. म्हणजे एकट्या
विनायकरावणाच मिटिंग बद्दल सांगण्यात आले ? म्हणजे
इतरांना का नाही सांगण्यात आले ?"
" मला काय वाटतं साहेब , तो त्या दिवशी गैरहजर असेल.
आणि बाकीचे ऑफिसमध्ये हजर असतील म्हणून त्याला
फोन करून सांगितले गेले असेल."
" हूं ! शक्य आहे. पण ते आता ते सर्वजण पोलीस स्टेशनला
आल्या नंतर च कळेल."
एकेकाला फोन करून पोलीस स्टेशनला बोलवून घेण्यात
आले. आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या खोलीत नेऊन चौकशी
करण्यात आली. परंतु कुणाकडून ही समाधान कारण उत्तर
मिळाले नाही. फक्त विनायकराव कडून इतकेच समजले की
ते त्या दिवशी गैरहजर होते. म्हणून त्याना फोन करून बोर्ड
ऑफ डिरेक्टर ची मिटिंग असल्याची सूचना देण्यात आली होती. आणि त्याचा पुरावा म्हणून इतरांनी ही तेच सांगितले.
तेव्हा इन्स्पेक्टर विशाल ने विचारलेे की तुमच्यात काही मतभेद होते का ? तर सर्वांकडून एकच उत्तर मिळाले की
आमच्या मध्ये कसले मतभेद नव्हते आणि नाहीत. तेव्हा इन्स्पेक्टर विशालने विचारले ," तुमची कुणाशी दुश्मनी वगैरे ? " तेव्हा विनायकराव म्हणाले ," तशी दुश्मनी आमची कुणा बरोबर ही नाही. परंतु ...?
" परंतु काय ?"
" व्यवसायाकांचे दुश्मन अनेक असतात. आता कुणाचे नाव
घ्यावे ?"
" तुमचा कुणावर संशय आहे ?"
" आमचा कुणावरच नाही." मदनलाल बोलला.
" तुमच्याकडून कुणावर अन्याय झालाय असा कुणी आहे का ?" किंचित सर्वजण विचारात पडले. पण कुणालाही काही आठवेना. तेव्हा सर्वांकडून नकारात्मक उत्तर आले . तेव्हा इन्स्पेक्टर विशाल म्हणाले ," खुन्या चे पुढील पाऊल कायआहे ,याची काही कल्पना नाही. तेव्हा तुम्ही सर्वांनी सावध राहा. जोपर्यंत खुनी पकडला जात नाही." तेव्हा सर्वांच्या चेहऱ्याचे भयकींत झालेले दिसले.
दुसऱ्या दिवशी भीत भीत का होईना सर्वजण ऑफिसला पोहोचले. पण विपरीत असं काहीच घडले नाही. आणि त्यानंतरही काही दिवस कुठंच काही घडले नाही.म्हणून
सर्वांची खात्री झाली की, दिवाकरराव ची पर्सनल कुणा बरोबरी दुश्मनी असावी. त्या दुश्मनी खातीर त्या माणसाने
त्यांचा खून केला असावा. असाच सर्वांचा समज झाला नि एके दिवशी म्हणजे नेहमी प्रमाणे संध्याकाळी साडेपाच
ला ऑफिस सुटते तसे आज सुध्दा साडेपाच वाजता ऑफिस
सुटले . तसे सर्व कर्मचारी घरी जायला निघाले. मात्र विनायक राव अध्याप आपल्या केबिन मध्ये बसून संगणक वर काहीतरी पेंडीग काम सुरू होते. सहा वाजायला दहा मिनिटं शिल्लक होती तेव्हा प्यून त्यांच्या केबिनचा दरवाजा ठोठावला. तसा आतून आवाज आला की, येस कम इन .
केबिन चा किंचित दरवाजा उघडून प्यून ने विचारले ," साहेब , तुम्हांला निघाला वेळ आहे का ?"
" हो ; थोडंस काम शिल्लक आहे,ते पूर्ण करतो नि मग
निघतो."
" मग साहेब मी थांबू का जाऊ ?"
" तू कशाला थांबतोयेस , तुझा टाईम झालाय ना ? मग
तू जा."
" ओके सर ! " असे बोलून प्यून तेथून निघून गेला. परंतु
लगेच १० मिनिटांनी परत माघारी येऊन सिक्युरिटी ला म्हणाला ," मी माझा मोबाईल विसरलोय तो घेऊन येतो. असे सांगून तो आंत गेला नि थोडया वेळाने परत आला नि सिक्युरिटी ला म्हणाला ," अर्ध्या तासाभराने साहेबांच्या केबिनमध्ये जा नि साहेबांना काही हवे नको ते विचारा. " असे सांगून तो निघून गेला.
" ठीक अर्ध्या तासानंतर सिक्युरिटी त्यांच्या केबिनमध्ये
गेला नि पाहतो तर काय विनायकराव रक्ताच्या थारोळ्यात
पडलेले सापडले. त्याने लगेच पोलीस स्टेशनला फोन केला नि विनायकरावांचा खून झाल्याची खबर दिली. तसे थोड्याच वेळात पोलिसांची जीप विनायकरावांच्या ऑफिस ला पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळाचा पोलीस पंचनामा केला.
आणि तिथल्या सिक्युरिटी जवळ चौकशी केली असता. सिक्युरिटी संतोष काळे बोलला की, सर्वात शेवटी ऑफिस प्यून विजय जाधव ठीक पाच वाजून ५० मिनिटांनी ऑफिस
मधून बाहेर पडला नि पुन्हा दहा मिनिटांनी ऑफिस मध्ये आला आणि आपला विसरलेला मोबाईल घेऊन लगेच निघून
गेला. तेव्हा पोलिसांचा तर्क झाला की परत जेव्हा तो आपल्या ऑफिस मध्ये आला तेव्हाच तो विनायकरावांचा खून करून गेला. इन्स्पेक्टर विशालने मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठविण्यात आला.
नि ऑफिस च्या प्यून ला पोलीस स्टेशनला पाचारण करण्यात आले. त्याच्या कडून मिलेल्या माहिती अशी की
पाच वाजून ५० मिनिटांनी ऑफिस मधून बाहेर पडला तो परत ऑफिसला परत आलाच नाहीतर मग विजय जाधव
ऑफिस मधून बाहेर पडल्यानंतर विजय जाधव सारखाच
हुबेहूब दिसणारा तो माणूस कोण होता ? कारण ऑफिस च्या
सी सी टीव्ही कॉमेरा मध्ये फुटेज पाहिले असता त्यात दिसणारी व्यक्ती विजय जाधवच आहे. आणि विजय जाधवचे म्हणणे आहे की मी एकदा ऑफिस मधून बाहेर पडलो तो
पुन्हा वापस आलोच नाही. इन्स्पेक्टर विशाल विचारात पडला की असं कसं होऊ शकतं ? ऑफिसमध्ये सापडलेल्या
पिस्तूलावर हाताच्या ठशांचा रिपोर्ट आला .त्यावर सापडलेले
ठसे नि विजयच्या हाताचे ठशे एकदम मॅच होतात. अर्थात खुनी विजय जाधवच आहे असे समजून विजय जाधवलाच
पोलीस कोडरीत बंद केले.
त्यानंतर विनायकरावांच्या घरी जाऊन विनायकरावांचा
खून झाल्याची खबर देण्यात आली. तेव्हा विनायकरावांच्या
पत्नी कडून मिळालेली माहिती काही वेगळंच सांगत होती .
त्यांचे म्हणणे होते की विनायकराव आज पाच वाजताच घरी
आले नि ऑफिस मध्ये पुन्हा बोलविले आहे असे सांगून पुन्हा ऑफिस ला जायला निघून गेले.
आता मात्र पोलीस सम्रमात पडली की विनायकराव ऑफिस मधून घरी गेलेच नाही तर विनायकरावांच्या घरी विनायकराव बनून गेलेला माणूस कोण होता ? आणि त्या
मागचा त्याचा उद्देश काय असावा बरं ? बहुधा पोलिसांना हे त्याने केलेले खुले चॅलेंज होते की खऱ्या खुन्याला पकडून
दाखवा. पोलिसांना तपासाची नक्की दिशा सापडत नव्हती.
खुनी कोण असावा बरं ? आता बाकी राहिले दोन पार्टनर त्यांचे मात्र धाबे दणाणले. त्याना आता घरातून बाहेर पडायला पण भीती वाटू लागली. इतकेच नाही तर ऑफिसमध्ये आणि राहत्या बंगल्यावर पोलिसांचा पहारा बसविला . शिवाय त्यांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर
नजर ठेवली गेली. ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर एकदम बारीक नजर तर ठेवली गेलीच शिवाय
आधारकार्ड चेक करून आंतमध्ये सोडले जाऊ लागले.
परंतु एके दिवशी मदनलाल चा मृतदेह त्यांच्या मोटार मध्येच सापडला. आणि त्यांचा ड्रायव्हर बेशुध्द अवस्थेत ड्रायव्हर सीटवर आढळला. आणि मोटार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर आदळलेली सापडली. परंतु मोटार एकदम सुरक्षित होती. याचा अर्थ मोटारीला अपघात झाला
नसून फक्त तसा दिखावा केला गेला. पोलिसांना कुणीतरी सूचना दिली . पोलीस घटना झालेल्या ठिकाणी पोहोचले.
पोलीस पंचनामा केला. मदनरावांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. तेव्हा कळले की त्यांच्याच मोबाईवरून
पोलिसांना खबर देण्यात आली. अर्थात हे खुन्याचेच काम
असणार. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. आता राहिला शेवटचा नि चौथा पार्टनर तो तर इतका
घाबरला की त्याने ऑफिस जाणेही टाळले. आणि घरातून ही
बाहेर कुठं जाईना ? ऑफिस च्या काही जरुरी कागदपत्रावर हस्ताक्षर हवे असल्यास प्यून त्यांच्या घरी यायचा. परंतु त्याला आत मध्ये सोडले जात नसे. कारण मागचा विनायकरावा सोबत घडलेल्या प्रकाराची सर्वांना कल्पना होती. त्यामुळे त्याला बाहेरच थांबवून बंगल्याच्या बाहेर पहारा देत बसलेल्या कॉन्स्टेबल कडे ते कागदपत्रे दिली जात
आणि मग त्या कागदपत्रावर किंवा चेक वर अशोकरावांचे हस्ताक्षर करून आणले जात होते. एवढी दक्षता घेतली जात
होती.
एके दिवशी मात्र विपरीत घडले. झाले असे की कंपनीचा
प्युन कंपनीचे काही चेक घेऊन आला. त्यावर असोकरावांच्या
हस्ताक्षर करुन आणावयाचे होते. नेहमी प्रमाणे एक कॉन्स्टेबल ते चेक घेऊन अशोकरावांच्या बंगल्यात गेला नि
हस्ताक्षर करून वापस आला सुध्दा. थोड्यावेळाने मात्र बंगल्यात आरडाओरडा सुरू झाला म्हणून एकजण कसली
ओरड चालली आहे म्हणून पहायला आंत गेला तर आतून
मोठ्या ने रडण्याचा आवाज येत होता. अर्थात अशोकरावांना कुणीतरी गोळी मारून गेले होते. हे पाहताच त्या कॉन्स्टेबल ला आपल्या साथीदारांचा संशय आला. कारण तोच थोड्या वेळापूर्वी अशोकरवकडे चेक वर हस्ताक्षर करायला आला होता. तो पळतच बाहेर आला. पाहतो तर काय दुसरा कॉन्स्टेबल आपल्या स्थानावरून गायब होता. याचा अर्थ खुनी त्या कॉन्स्टेबल चा वेश धारण करून आला होता.
त्याने लगेच मोबाईल वरून पोलीस स्टेशनशी संपर्क साधला
नि घडलेलेल्या घटने बद्दल सविस्तर माहिती दिली.
आणि थोड्याच वेळात घटना स्थळी पोलीस पोहोचले.
घटनास्थळाचा पोलीस पंचनामा केला. अशोकरावांचा मृतदेह
शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठविण्यात आला.
अजय कॉन्स्टेबल चा शोध घेण्यात आला तेव्हा तो अशोकरावांच्या बागल्यापासून थोड्याच अंतरावर बेशुध्द
अवस्थेत आढळला. त्याच्या तोंडावर पाणी मारून शुध्दीवर
आणले असता. त्याने दिलेली माहिती.पोलिसांना गोंधळात
टाकणारी तर होतीच पण त्यापेक्षा पोलिसांना शोध कामात उपयुक्त ठरणारी पण होती. अशी काय माहिती दिली होती
कॉन्स्टेबल अजय कांबळे ने ?
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा