पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

काळपुरुष -३

इमेज
काळपुरुष -३                                    ३ आवाज बंद झाल्यावर इन्सपेक्टर विजय ने त्या अरबाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठविला .नि स्वाती ने सांगितलेल्या पत्त्यावर बाबरच्या अड्यावर धाड टाकली. पण त्या अगोदरच बाबर ने सर्व मुलींना तेथून दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी हलविले होते. परंतु एक रूम आतून बंद होता. ज्या रुम मध्ये तो अरब स्वाती सोबत होता. तो रूम मास्टर  किल्लीच्या मदतीने उघडला गेला. परंतु आतील दृश्य पाहून सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले,अर्थात रूमच्या आंत मध्ये ना अरब होता ना स्वाती होती . त्यामुळे सर्वना प्रश्न पडला की  कुठं गेलीत हे दोघेही ? पळून गेले म्हणायचे तर दरवाजा आतून  बंद होता. खिडक्या ही बंद होत्या. बाथरूम ,सौचालय चेक केले असता तेथेही संशयास्पद असं काहीही  आढळलेले नाही. मग हे दोघेही गेले कुठे ? म्हणजे त्या दोघांना जमीन ने गिळले का आकाशात उडून गेला. काही कळायला मार्ग  नाही . आता काय करावं बरं ? असा विचार मनात सुरू असतानाच तेथे पोलिसांची धाड पडली. आणि त्यानी त्या रूम ची कसून तपासणी केली; परंतु संशयास्पद असे तेथे काहीच आढळले नाही. म्हणूनच इन्सपेक्टर विजय ने सी. सी. ट

काळपुरुष - २

इमेज
काळपुरुष - २          इन्स्पेक्टर विजय विचारच करत होते एवढ्यात फोन ची बेल वाजली. विजयने लगेच रिसिव्हर उचलून कानाला लावत हॅलो म्हटले , तेव्हा पलीकडून स्वातीच्या आईचा आवाज आला. त्यांनी आपली मुलगी सहीसलामत घरी परतल्याची फोनवरून माहिती दिली. तक्रार मागे घेण्यासाठी त्यानी फोन केला होता. परंतु त्यांनी दिलेली माहिती मात्र कोड्यात टाकणारी होती. इन्स्पेक्टर विजय ने त्याना त्यांच्या मुली सोबत पोलीस स्टेशनला यायला सांगितले. आणि थोड्याच वेळात स्वाती नि तिची आई पोलीस स्टेशनला पोहोचले. तेव्हा इन्स्पेक्टर विचारले की, तुमच्या सोबत नेमके काय घडले ते सविस्तर सांगाल का ? " त्यावर स्वाती म्हणाली," मी बस स्थानक वर बस येण्याची वाट पाहत होते. एवढ्यात तेथे एक कार येऊन उभी राहिली. आणि  कार मध्ये बसलेल्या  व्यक्ति ने पुढील दरवाजाची काच खाली  करून माझ्या कडे पहात म्हटले ," हॅलो स्वाती कशी आहेस तू  ?" मी  त्याच्याकडे पाहिले नि त्याला लगेच ओळखले. तो प्रशांत होता. माझ्या सोबत कॉलेज मध्ये शिकत होता.मी लगेच हसून उत्तर दिले, फाईन ! तू कसा आहेस ?      " मी कसा दिसतो तुला ?"      "

काळपुरुष -१

इमेज
काळपुरुष -१                                 १       (कथा काल्पनिक आहे,फक्त मनोरंजनासाठी लिहिली. वास्तवीकेशी ह्या कथेचा काही संबंध नाही. कोण आहे हा काळपुरुष सस्पेंस थ्रिलर रहस्यमय कथा ) आप्पासाहेब सकाळी उठले नाहीत की त्याना सर्वात पहिले वर्तमानपत्र लागायचे. त्यांचे म्हणणे असे की नित्य नियमाने प्रत्येक माणसाने वर्तमानपत्र वाचायला हवं. जगात रोज घडणाऱ्या घडामोडीची   माहिती घेणे गरजेचे आहे, परंतु आज-काल वर्तमानपत्र वाचायला  एवढा वेळ आहे,  कोणापाशी ? रोजच्या धावपळीच्या जीवनात माणूस एकदम मेटाकुटीस आलेल्या असतो. पण तरी देखील थोडा वेळ वृत्तपत्र वाचण्यासाठी वेळ काढायलाच हवा नाही का ? तरच कळेल ना ? आपला देश कुठं चालला आहे ? आप्पासाहेब वर्तमानपत्र चाळत असतात, तेवढ्यात त्यांची नजर एका बातमी वर जाऊन स्थिरावली. त्यात लिहिलं होतं की , सकाळी कामाला गेलेली मुलगी घरी परतली नाही. ती काम करत असलेल्या कंपनीत तिच्या आईने चौकशी केली असता तिला समजले की ती आज कंपनीत आलीच नाही. असे म्हणताच तिच्या आईच्या काळजात एकदम चर्रर्र झालं. आणि भीतीने अंगावर काटा उभा राहिला. आणि मनात अनेक प्रश्न उभे राहिले. कं

कुलांगार -२

इमेज
कुलांगार -२     कुमुदचे नाव बदलून सुमती ठेवण्यात आले. दोन्ही बहिणी एकदम खेळीमेळीने राहत होत्या. कुमुद आपल्या नवऱ्याच्या जीवनात आल्यानंतर कल्याणी ने आपली झोपण्याची खोली बदलली. परंतु दयानंद एक दिवस आड करून तिच्याही खोलीत येत असत. तिने त्याना आपल्या खोलीत येण्यास मनाई केली. म्हणाली ," तुम्ही आता माझ्या शयनगृहात येत जाऊ नका."     "  का ? आता मी तुझा नवरा नाही राहिलो ?"     " असं म्हटलं का मी ?"     " तुझ्या खोलीत यायचं नाही याचा अर्थ काय होतो ,मला सांग बरं."      " तुमचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे,परंतु माझ्या पेक्षा ही कुमुद चा तुमच्यावर नि तुमचा तिच्यावर जास्त अधिकार आहे, शिवाय तुम्ही जर असे माझ्या खोलीत येत राहिलात तर ,तिला काय वाट्टेल बरं ? तिचा विश्वासघात केल्या सारखा नाही होणार का ?"     " तुला माहितेय मला इथं कुणी पाठविले ?"     " कुणी पाठविले ?"     " सुमती ने ."     " काय सांगता ?"     " खरं तेच."     " कुमुद ने पाठविले तुम्हाला ?"     " हो. "   

यह इश्क नहीं आसान ५ (अमर प्रेम )

इमेज
  यह इश्क नहीं आसान ५      निलोफर ला तिला तिच्या घरी सोडून रुद्र आपल्या घरी पोहोचला. घरात पाऊल ठेवले मात्र तोच समोर आजी म्हणजे दुर्गाबाई दत्त म्हणून उभ्या दिसल्या. परंतु त्यांच्या कडे न पाहिल्या सारखे करत रुद्र आपल्या खोलीत निघालाच होता.   तोच दुर्गाबाईंच्या खणखर आवाजाने  त्याच्या पायांना ब्रेक जसा लागला जणू ! तो मागे वळून आपल्या आजीकडे पाहू लागलाच होता, तोवर आजीने त्याला दरडावून विचारले," कोठून आला भटकून ? नाही म्हणजे तुला भेटकण्या व्यतिरिक्त काम नाही ना दुसरे म्हणून विचारते " आजी फार राग आला होता मनात परंतु शक्य तितके स्वतःवर संयम ठेवत रुद्र म्हणाला की, आजी मी गाव भटकायला गेलो नव्हतो तर एका मित्राच्या घरी गेलो होतो, नोट्स मागायला." त्यावर दुर्गाबाई उतरल्या ,    "  तू रोज जातोस ना कॉलेज ला ? का कॉलेज मध्ये जायचं सांगून कोठे भटकत असतोस उनाडक्या मुलासोबत ?"     " आजी मी उनाडक्या करायला जात नाही. रोज कॉलेज मध्येच जातो खोटं वाटत असेल तर कॉलेज मध्ये प्रिन्सिपल सरांना भेटत का नाहीस ? मग सरच खरं काय ते सांगतील."     " मला ते नाही म्हणायचंय.&qu

वारसदार-३

इमेज
  वारसदार-३                               ३           सुशिलाबाईची चाल यशव्ही झाली. त्यांच्या दोन्ही मुलांना कंपनीत काम मिळाले. आता उंदीर सारखे हळूहळू घर पोकरण्याचे काम सुरू होणार होते. दोघांनी प्रतापरावांचा लवकरच विश्वास संपादन केला. त्यामुळे त्या दोघांनाही कंपनीत महत्वाच्या पदावर नियुक्त केले. त्यामुळे दोघेही एकदम खुश होते. काही दिवसानंतर सुशिलाबाई आपल्या नवऱ्याला अर्थात धोंडीराम ला भेटायला तुरुंगात गेल्या तेव्हा धोंडीराम तिच्यावर भयंकर चिडला. म्हणाला ," आता कशाला तोंड दाखवायला आलीस मला." त्यावर त्या म्हणाल्या ," असं मी का केले ते नाही का विचारणार ?"       " गरज काय पडली आहे ?"       " तुमचा राग समजू शकते मी पण माझं ऐकून तर घ्याल का नाही."      " काहीही ऐकायचं नाही मला. चल जा इथून."      " मी जाणारच आहे, तुम्हाला फक्त एक खूषखबरी द्यायला आले होते ; परंतु तुमची ऐकायची तयारी नाही तर दुसरं काय करणार मी बापडी ! पण एक सांगून ठेवते की जे काम तुम्हाला नाही जमलं ते काम मी नक्की करून दाखवेन. आणि त्या नुसार मी पहिली सीडी पार के

वारसदार -२

इमेज
वारसदार -२                             २                                 "  हे तुम्ही एवढे खात्री ने कसे सांगू शकता ?" त्यावर त्या म्हणाल्या ," मी त्यांची पत्नी आहे, अर्थात माझ्या पेक्षा दुसऱ्या कुणाला त्यांच्या सवयी जास्त माहीत असू शकतील बरं ? पण तरी देखील खरं काय आहे,मी त्यांच्या तोंडून वदवून घेईन. फक्त माझ्याशी त्यांची भेट करून द्या."       पोलीस तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. इन्स्पेक्टर विजय त्याना भेटातला त्यांच्या पत्नीला पाठविले जाते. धोंडीराम आपल्या पत्नीला पाहून समजतो की आपल्या कडून सत्य वदवून घेण्यासाठी आपल्या पत्नीला पोलीस स्टेशनला घेऊन आलेत. परंतु त्याना हे सांगितले कुणी की मी माझ्या पत्नी जवळ खोटे बोलू शकत नाही. कदाचित हे सुमतीबाई चे काम असावे. पण आता काय करणार ? पोलीस त्यांच्या पत्नीला सोडून तेथून निघून गेले तसे ते आपल्या पत्नीवर रागवत म्हणाले ," तू कशाला आलीस इथं?" त्यावर त्या एकदम निर्विकार चरहऱ्याने म्हणाल्या, मी इथं कशाला आलीय हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, परंतु तुम्ही आता विचारला आहात तर त्याचे उत्तर मी दिल्या शिवाय राहणार

वारसदार -१

इमेज
वारसदार  -१                           १      प्रतापराव  एक प्रसिध्द उद्योगपती , त्यांच्या पुण्यात कपड्याच्या चार मिल्स आहेत. एवढे मोठे उद्योगपती असूनही त्यांचे राहणीमान साधेच सामान्य माणसासारखे ! याचे कारण ते गरिबीतून वरती आलेले. त्यांच्या वडिलांचे एक कपड्याचे दुकान होते. प्रतापरावाणी मात्र तेवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी मोठे बनण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात ते यशव्ही सुध्दा झाले. आणि त्यात त्यांच्या पत्नी चा शिंहाचावाटा आहे. ती एका उद्योगपतीची एकुलती एक मुलगी होती परंतु तिचे प्रेम प्रतापराव वर होते. हे जेव्हा तिच्या वडिलांना कळले तेव्हा त्यांनी त्यांच्या लग्नास नकार दिला. परंतु मुलीच्या हट्टापायी त्याना शेवटी माघार घ्यावी लागली. परंतु त्यांनी त्याच्या पुढे एक अट ठेवली. की मी हवे ते तुला साह्य करीन परंतु तू एका कपड्याच्या दुकानाचा व्यापारी बनून न राहता मिल्स चा मालक व्हायला पाहिजेस. त्यासाठी लागेल ती मदत मी करीन. आणि जर त्यात तू यशव्ही नाही झालास तर तुला माझ्या मुलीचा नाद सोडला लागेल."       या गोष्टीस तो लगेच तयार झाला. परंतु सुमित्रा मात्र तयार नव्हती. ती आपल्या बापाला म्ह